फ्लो डायग्राम---->माझ्या जुन्या पावसाळी कविता॑चा

माझ्या जुन्या पावसाळी कवितांच्या व‌हीची शेकोटी केलीय‌
ब‌घा कशी रसरसून पेटलीय !
पण ना धग
ना धूर
मग
कुठले माझ्या डोळ्यात पाणी ?
|
|
\/
मग
कुठली पाण्याची वाफ?
|
|
\/
मग
कुठले वाफेचे ढग?
|
|
\/
मग
कुठला ढगातून पाऊस?
|
|
\/
मग
कुठली पावसाची कविता?
|
|
\/
मग
कुठले कवितेचे कागद?
|
|
\/
मग
कुठली कागदा॑ची शेकोटी
|
|
\/
मग
कुठला बेब॑द धूर अन
कुणाच्या डोळ्यात अलोट पाणी?
|
|
\/
मग....मग
पुन्हा कुठून‌ ------>उसळती वाफ?----->गहिरा ढग?---->ढ‌ग‌फुटीचा पाऊस‍----->ओली कविता?---->भिज‌की व‌ही?--->विझती शेकोटी??????

field_vote: 
0
No votes yet