अल्पसंख्यानका विरुद्ध हिंसा: उद्गम आणि परिणाम.....

Seeds of a million tyrannies हा श्री प्रवीण स्वामी ह्यांचा उत्कृष्ट लेख उपरनिर्दिष्ट विषयावर उत्तम प्रकाश टाकतो। (Indian express Sunday, 8 July).

त्यांची काही निरिक्षणे अत्यंत मार्मिक आहेत। उदा-

"The anti-Muslim violence India is witnessing is significant not principally because of its scale, but because of the processes engendering it. The new element is this: The state is abandoning the republican project, and ceding control to local squads independent of central authority. These are the seeds from which a million tyrannies may flower."

आणि

"This terror (perpetrated by the so called cow vigilante) is civil society’s bastard child, not an outsider who imposes himself upon it. The victims are of no great consequence unless one happens to be among them, and most are not."

लेख वाचून झाल्यानंतर कांही प्रश्न असे पडतात।

1) जर (जवळ जवळ) सर्व समाज आणि शासन यंत्रणा ह्या प्रकारच्या हिंसे विरुद्ध शांत राहणार (किंवा मूक संमती देत) असेल, तर हा भस्मासूर, भविष्यात कोणावरही उलटू शकणार नाही का?
2) निदान मराठी जनतेला तरी हे स्पष्टपणे आठवत नाही का-कीं अश्या सुरुवातीला किरकोळ भासणाऱ्या हिंसेतूनच पुढे पूर्णपणे फाशिस्त विचारसरणी असलेल्या 'सेना' जन्म घेतात?

ऐसीकरांना काय वाटते, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे।

field_vote: 
0
No votes yet