मोंगलाई बिरयाणी

साहित्य :
बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)

पाककृती :
१) बिरयाणी करायला घ्यायच्या १ तास आधी तांदुळ धुवुन निथळत ठेवा.

२) चिकन किंवा मटण साफ करुन त्याला दही व वाटण चोळून १ तास मुरवा.

३) एका मोठा पातेल्यात तांदळाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उकळत ठेवा. त्यात मिठ, जिर, ४ वेलची, ४ मिरी, ४ लवंग, २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्र घाला. पाणी उकळले की त्यात तांदूळ टाका. ५-६ मिनीटांनी तांदूळ जरा अर्धवट शिजले की त्यातील अर्धे तांदूळ चाळणीत निथळवत ठेवावेत. नंतर अजुन ३-४ मिनीटांनी उरलेले शिजत आलेले तांदुळ दुसर्‍या चाळणीत निथळवत ठेवावेत.

४) एका भांड्यात तेल टाकून त्यात ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची, २ दालचीनीचे तुकडे, २ तमालपत्र घालून त्यावर कांदा बदामी रंगावर कुरकुरीत शिजवा. असा कांदा शिजवण्यासाठी तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त वापरावे.

५) मुरवलेल्या मटण्/चिकनला हिंग, हळद, मिरची पुड, ८ मिरी, ८ लवंगा, ४ वेलची, ४ दालचीनीचे तुकडे, ४ तमालपत्र, आलुबुखार, उभे चिरलेले बटाटे व २ चमचे तुप घालुन एकत्र करा.

६) बिरयाणी करण्यासाठी एक मोठे टोप घ्या. त्या टोपाला आतून तुप लावा. टोपात चिकनचे मिक्स केलेले मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या चिकन्/मटणवर तळलेला अर्धा कांदा टाका. त्यावर अननसाच्या चकत्या लावा.

७) चकत्यांच्या वर कच्चट तांदळांचा थर लावा व त्यावर थोडे तुप पसरवा.

८) राहिलेला अर्धा कांदा ह्या तांदळांवर पसरवा व शिजत आलेला भात ह्या थरावर लावा. परत थोडे तुप पसरवा.

९) टोपावर अगदी व्यवस्थित बसणारे झाकण लावा (हवा बाहेर गेली नाही पाहीजे असे). झाकण वसवून झाकण व टोप जोडणारी कडा गव्हाच्या मळलेल्या पिठाने गोलाकार घट्ट पॅक करा.

१०) टोप पातळ असल्यास पहीली १५ मिनीटे मोठ्या गॅसवर बिरीयाणीचे टोप ठेवा किंवा मिडियम गॅस वर टोप ठेवा मग अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर हे टोप ठेउन अर्धा ते पाऊण तास ही बिरयाणी शिजू द्या. जर निखारे असतील तर तेही झाकणावर ठेवल्यास बिरयाणी अजुन चांगली दम होते.

११) बिरयाणी तयार झाली की टोप गॅसवरुन उतरवून १० मिनिटे ठेवा. मग चमच्याने किंवा कालथ्याने गव्हाच्या पिठाचे आवरण काढा आणि झाकण उघडा. बिरयाणीचा वाफाळणारा दणदणीत वास घरभर पसरुन सगळ्यांना भुक लागेल. मग लगेच वाढायला घ्या. वाढताना मोठा कालथा थेट काली रोवून थरासकट बिरयाणी वाढा.

अर्धी झाली की.

१२) थोडी टेस्ट करा.

अधिक टिपा:
ही बिरयाणी रायत्यासोबत खावी.

ह्या बिरयाणीतील आलूबुखार लहान मुलांना विशेश आवडतात. माझ्या पुतण्याची व श्रावणीची त्या आलूबुखारांवर झुंबड असते.

अननस गोड लागतो थोडा पण भातात त्याची चव किंवा स्वाद मिक्स होत नाही. पण भाताबरोबर खायला चांगला लागतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

करून पाहीन. मी सध्या खाली दिलेला मसाला वापरून बिर्याणी बनवतो.

banne nawab

चित्र येथून साभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'श्रेणी' काढायला हवी आता!

("१२) थोडी टेस्ट करा." - हे भडकाऊ समजावं का? !!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मस्तच!(तोंडाचं पाणी गिळून लिहीत आहे.)
जागुतै, अशी बिर्याणी सोयीसाठी कुकरमधे शिटी न होइल इतपत मंद आंचेवर करता येते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता फार झाले.

कृपया.. आपला संपूर्ण पत्ता तातडीने व्यनी करावा आणि आपण ही बिर्याणी न्येक्ष्ट बनवणार असण्याची आपल्याला सोयीस्कर तारीख आणि वेळ त्याच व्यनीत कळवावी. त्यावेळी बनवताना सर्व साहित्याचे प्रमाण तिप्पट घ्यावे एवढी सुधारणा माफीसह सुचवतो..

धन्यवाद.

-गवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच
तोँपासू

बर कधी येउ घरी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

छळवाद आहे साला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिर्याणी हा माझा विकप्वाईंट आहे हो. हे असं तपशिलवार वर्णन आणि फोटो टाकून जागुताईनी अत्याचार केलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

थोडी टेस्ट करा." - हे भडकाऊ समजावं का?
असच समजाव.

स्मिता, श्रावण मोडक, तुमचा अजून छळ करण्याची इच्छा आहे, पुदच्यावेळेस वेगळी छळवादी डीश टाकून.

क्रेमर त्यापेक्षा खडे मसालेच चांगले लागतात.

गवि, जाई कधी येताय बोला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राजक्ता म्हात्रे

पत्ता व्यनि करावा. छळ प्रत्यक्ष करून घेणे मंजूर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0