आजचा सुधारक – मार्च २०१२

महाराष्ट्राला विवेकवादाची परंपरा लाभलेली आहे आणि ती अभिमानास्पद आहे असं अनेक मराठी लोक मानतात. पण सातत्यानं विवेकवादी भूमिका घेत एक वैचारिक नियतकालिक चालवणं ही तरीही महाराष्ट्रात सोपी गोष्ट नाही. ‘आजचा सुधारक’ हे मासिक गेली बावीस वर्षं हे करत आलं आहे. अनेक विषयांवरचं वैचारिक लिखाण कोणत्याही जाहिराती न घेता या मासिकात प्रकाशित केलं जातं. ‘ऐसी अक्षरे’च्या वाचकांना या मासिकाचा परिचय व्हावा या हेतूनं दर महिन्याच्या अंकाचा परिचय करून देण्याची आमची इच्छा आहे. त्यानुसार मार्चच्या ‘आजचा सुधारक’चा परिचय इथे देत आहोत.

बहुधा महिला दिनाच्या निमित्तानं श्रीनिवास हेमाडे यांची नवीन लेखमाला या अंकापासून प्रकाशित होऊ लागली आहे. ‘ही स्त्री कोण’ या नावाच्या या लेखमालेच्या पहिल्या भागात ‘बाई’ किंवा ‘स्त्री’ या अर्थाच्या मराठी, संस्कृत आणि इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीविषयी विवेचन आहे. या शब्दांचे मूळ अर्थ आणि व्युत्पत्ती यांद्वारे 'स्त्री' ही संकल्पना कशी आकार धारण करत गेली ते दिसत जातं. त्यामागे असलेल्या सामाजिक-राजकीय धारणा समजत जातात.

‘साहित्यातून विवेकवाद’ हे नंदा खरे यांनी लिहिलेलं सदर गेल्या महिन्यापासून चालू झालं आहे. एक लेखक असा लेखविषय घेऊन विवेकवादी परंपरेत त्या लेखकाचं स्थान काय ते पाहणं असं या लेखमालेचं स्वरूप आहे. पहिल्या भागात जॉन स्टाईनबेकचा परिचय होता; या अंकात जॉर्ज ऑर्वेलविषयी लेख आहे. ऑर्वेलचं चरित्र, त्याच्या लेखनाचा आलेख आणि त्यातून दिसणारा त्याच्या विचारधारेचा आलेख नंदा खरे यांच्या शैलीत यात मांडलेला आहे.

‘Hinduism Versus Hindutva - The Inevitability Of A Confrontation’ हा आशिष नंदी या प्रख्यात विचारवंतांचा १९९१ सालचा लेख अनुराधा मोहनी यांनी अनुवादित केला आहे. तोदेखील या अंकातला एक उल्लेखनीय लेख म्हणता येईल. ‘संघप्रणीत हिंदुत्वाशी लढण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे शस्त्र अपुरेच आहे. आपल्याला हिंदुधर्माचा व्यापक परिप्रेक्ष्यात विचार करून त्यातील बंडखोर परंपरांचा आधार घ्यावाच लागेल.’ अशी नंदी यांची मांडणी आहे. (मूळ इंग्रजी लेख इथे वाचता येईल.)

अंकाच्या पहिल्या पानावर मुखपृष्ठ म्हणून एक छोटेखानी उतारा उद्धृत करण्याची ‘आजचा सुधारक’ची पद्धत आहे. देवेंद्र गावंडे यांच्या ‘नक्षलवादाचे आव्हान’ या पुस्तकातला एक उतारा या अंकात दिला आहे. प्रभाकर नानावटी यांची ‘मानवी अस्तित्व’ ही लेखमाला गेल्या अंकापासून सुरू झाली आहे. विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे विचार मांडणारा त्यांचा लेख मार्चच्या अंकात आहे. दिवाकर मोहोनी यांनी ‘पैसा’ ही संकल्पना त्यांना कशी जाणवते याविषयी एक मुक्तचिंतन लिहिले आहे. निवडून येण्यासाठी आजच्या नेत्यांकडे काय क्षमता असायला लागतात किंवा असाव्यात याचा रोचक आढावा ‘लोकनेता’ या स्फुटात अनिल पाटील सुर्डीकर यांनी घेतला आहे.

याशिवाय डॉ. विमल भालेरावलिखित, अरुण टिकेकरसंपादित ‘पंडित-सुधारक श्री. म. माटे’ या पुस्तकाचा छोटेखानी परिचय र. ग. दाडेकर यांनी या अंकात करून दिला आहे. बाविसाव्या वर्षातला हा शेवटचा अंक असल्यामुळे गेल्या वर्षभरात मासिकात आलेल्या लेखांची सूची अंकाच्या अखेरीला दिली आहे. संदर्भ म्हणून ती उपयुक्त आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पत्रसंवादात दत्तप्रसाद दाभोळकर यांचा पत्रव्यवहार वाचनीय आहे, Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पत्रसंवादात दत्तप्रसाद दाभोळकर यांचा पत्रव्यवहार वाचनीय आहे

वाचनीय? हो.
विनोदी? हो.
अंतिमतः क्लेशदायक? हो.

असो.

काहींना 'आजचा सुधारक'चा संपर्कासाठीचा पत्ता आणि फोन नंबर हवा होता. तो असा:

संपर्कासाठीचा फोन नंबर : दिवाकर मोहनी : ९८८१९ ००६०८, नंदा खरे : ०७१२ २५३ १९४८
पत्ता : आजचा सुधारक, गौरीवंदन, १२३, शिवाजीनगर, नागपूर ४४००१०.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार

आम्हा माहितगार नसलेल्यांकरता दाभोळकरांचा विनोदी/रोचक पत्रसंवाद काय झाला ते सांगता येईल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आ.सु. ची आजीव वर्गणी ५००/- होती. त्यात कायमस्वरुपी अंक पाठवणे शक्य नाही हे व्यावहारिक गणित लक्षात आले. आसु ने रु ३०००/- वजा पुर्वीची वर्गणी असे पाठवावे अन्यथा एप्रिल २०१२ पासून अंक पाठवता येणार नाही असे जाहीर प्रकटन केले. त्यावरुन दत्तप्रसाद दाभोलकर यांनी हे अनैतिक असून वर्गणीदारांच्या पैशावर संपाद्क मंडळ आपले छंद जोपासत आहे. तसे अन्य काही दूषणे दिली आहेत. फेब्रुवारी व मार्च या अंकात सदर पत्रव्यवहार आहे तो भन्नाट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी एका संस्थेची आजीव सभासद आहे. (विषयांतर नको म्हणून बाकी माहिती देत नाही.) ना नफा ना नुकसान तत्त्वावर पैशांचा हिशोब होतो. सगळं काम हौसेमौजेचं. आजीव सभासदत्त्वाचे हजार रूपये २००१ च्या आसपास दिले होते. त्यांचं मासिक प्रकाशन आता इमेलने सगळ्यांना पाठवतात; ज्यांना हवं असेल त्यांनी तिथे कार्यालयात जाऊन छापील अंक घ्यावा, असं जनरल बॉडी मिटींगमधे ठरलं. आता अंक छापला जातो का नाही याचीही चौकशी करायला हवी. इमेलवर चिक्कार अपडेट्स येत रहातात.

हा निर्णय झाला तेव्हा "चला, त्या निमित्ताने आम्हीही इमेल, इंटरनेट वापरायला शिकू" अशी प्रतिक्रिया काही ज्येष्ठ सभासदांची होती. आम्ही काहींनी "चला, आता पोस्टात जायचा त्रास वाचला" म्हणत हुश्श केलं.

असो. त्यातही आश्चर्ययुक्त आनंद याचा झाला की आजचा सुधारकच्या संपादकांनी त्यांना दूषणे देणारा मजकूरही छापलेला आहे असं दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजचा सुधारकची इ-आवृत्ती असते का? नसल्यास विनोद आणि क्लेशाचे कारण काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"आजचा सुधारक" मधे १९९० पासून कुठकुठल्या विषयांची चर्चा झाली , कुठल्या विषयांबद्दल एकसलग लिहिले गेले, एकंदर काम कुठल्या दिशेने झाले याची निव्वळ कल्पना यावी म्हणून "सुधारका"च्या सर्व अंकांची सूची येथे द्यावी म्हणतो. सध्या सुरवात पहिल्या वर्षापासून करत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्ष १ , अंक १ : एप्रिल १९९०
- आगरकर म्हणतात
- संपादकीय
- प्रा, (श्रीमती) मनू गंगाधर नातू : विवेकवादाची साधना (संपादकीय)
- विवेकवाद -१ : दि य देशपांडे
- साम्यवादी जगातील घडामोडी : भा. ल. भोळे
- पत्रव्यवहार
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक २ : मे १९९०
- आगरकर म्हणतात
- "नवा सुधारक"चा प्रकाशन सोहळा
- खरा सुधारक कोण ? : य दि. फडके
- "बाई" : प्रभा गणोरकर
- विवेकवाद - २ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- फुले आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने : भा ल भोळे
- पत्रव्यवहार
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ३ : जून १९९०
- आगरकर म्हणतात
- विवेकवाद - ३ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- दहशतवाद आणि धर्म : किशोर महाबळ
- स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल : दमयंती पांढरीपांडे
- पत्रव्यवहार

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ४ : जुलै १९९०
- आगरकर म्हणतात
- यशोदाबाई आगरकर : ज बा कुलकर्णी
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- विवेकवाद - ४ : दि य देशपांडे
- विदर्भातील पुरोगामी विदुषी कै. म गं नातू : डॉ. चंद्रकांत धांडे
- पत्रव्यवहार
- वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ५ : ऑगस्ट १९९०
- आगरकर म्हणतात
- धर्म की धर्मापलिकडे ? : डॉ आ ह साळुंखे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- विवेकवाद - ५ : दि य देशपांडे
- रक्षण की राखण ? : दि य देशपांडे
- पत्रव्यवहार

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ६ : सप्टेंबर १९९०
- आगरकर म्हणतात
- विवेकवाद - ५ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- सॉक्रेटिसीय संवाद : अनुवाद प्र ब कुलकर्णी
- 'शंभर वर्षांपूर्वीचे बालविधवेचे गाणे' - डॉ. मंदा खांडगे
- पत्रव्यवहार

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ७ : ऑक्टोबर १९९०
- आगरकर म्हणतात : नीतीविचार धर्मविचाराहून वेगळा
- विवेकवाद - ६ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- जातिविग्रहाच्या मर्यादा आणि धोके : अशोक चौसाळकर
- सॉक्रेटिसीय संवाद (उत्तरार्ध): अनुवाद प्र ब कुलकर्णी
- इच्छामरणी व्हा (पुस्तकपरामर्श)
- पत्रव्यवहार

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ८ : नोव्हेंबर १९९०
- आगरकर म्हणतात : सर्व जगाचे नेतृत्व फुकाचे नाही
- विवेकवाद - ८ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- आत्मनाशाची ओढ : वा प्र पांडे
- मला उमगलेले डॉ आंबेडकर : ना वा गोखले
- पत्रव्यवहार

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ९-१० : जाने १९९९१
तर्काची मुस्कटदाबी : वा म जोशी
संपादकीय
वा म जोशी यांच्या स्त्रीविषयक चिंतनाची माघार : म गं नातू
- विवेकवाद - ९ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल
- वा म जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने : म गं नातू
- वा म जोशी यांची नीतीमीमांसा : सु वा बखले
- वा म जोशी यांच्या कादंबरी वाङ्मयातील सुधारणावाद : श्रीपाल सबनीस
- सत्यशोधक वामन मल्हार जोशी : सुशीला पाटील
- "आश्रमहरिणी"च्या निमित्ताने : शे मा हरळे
- वा म जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका : वसंत पाटणकर
- पत्रव्यवहार
- वामन मल्हार जोशी (उतारे)
- वामन मल्हारांची सत्यमीमांसा : प्र ब कुलकर्णी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक ११ : फेब्रु १९९१
- आगरकर म्हणतात
- विवेकवाद - ९ : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- एक निरीश्वरवादी ग्रामसेवक दांपत्य : यदुनाथ थत्ते
- पत्र व्यवहार
- पुस्तकपरिचय : सुनीती देव
- "माग्रस" गौरव ग्रंथ १९९१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष १ , अंक १२ : मार्च १९९१
- आगरकरांचे अग्रेसरत्व : बा र सुंठणकर
- संपादकीय
- विवेकवाद - १० : दि य देशपांडे
- बर्ट्रांड रसेल : विवाह/नीतिमत्ता : दि य देशपांडे
- सांप्रदायिकतेचा जोर की सामाजिक सुधारणांचा असमतोल ?
- यमद्वितीयाया: उपायनम् आणि द्रविणसप्तकम् : डॉ वा शि बारलिंगे
- पुस्तकपरिचय : चार्वाकदर्शन : बा य देशपांडे
- विषयसूची आणि लेखकसूची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आजच्या सुधारकच्या जात आरक्षण विशेषांका बद्दल http://mr.upakram.org/node/1208 इथे चर्चा झालेली आहे. तसेच विशेषांकातील काही लेख http://ajachasudharak.blogspot.in/ इथे वाचता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>त्यातही आश्चर्ययुक्त आनंद याचा झाला की आजचा सुधारकच्या संपादकांनी त्यांना दूषणे देणारा मजकूरही छापलेला आहे असं दिसतंय.

हे त्यांच्या एकंदर धोरणाशी सुसंगतच आहे. पूर्वी कोणत्यातरी संदर्भात त्यांनी मराठी संकेतस्थळावरच्या बहुधा गुंडोपंत या आता दिवंगत सदस्यनामाची एक प्रतिक्रिया छापली होती असं अंधुक आठवतंय. ज्यांना 'गुंडोपंत' माहीत आहेत त्यांना ती प्रतिक्रिया 'आजचा सुधारक'च्या संपादकीय भूमिकेशी फारकत घेणारी असेल याचा अंदाज येईलच. मला आता संदर्भ आठवत नाही. चूभूद्याघ्या.

दत्तप्रसाद दाभोळकरांच्या या विशिष्ट प्रतिक्रियामालेबद्दल सांगायचं झालं तर तिचा आक्रस्ताळेपणा इतका धडधडीत आहे की त्यावर फार टिप्पणी करणं या धाग्यावर अवांतर ठरेल म्हणून इथेच थांबतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'समाजस्वास्थ्य'मधे र.धों.ही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया छापत त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘आजचा सुधारक’चा परिचय वाचून उत्सुकता चांगलीच जागी झाली आहे. अंक कोल्हापूर परिसरात कुठे उपलब्ध आहे याची क्रुपया माहिती द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हापुरातल्या उपलब्धतेविषयी कल्पना नाही. 'आजचा सुधारक'चे अंक बहुधा स्टॉल्स किंवा पुस्तकांच्या दुकानात विक्रीला नसतात. वर्गणीदारांना पोस्टानं पाठवले जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार

सदस्य "उत्पल" यांचा धागा पहावा : http://www.aisiakshare.com/node/648#new

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.