Making of photo and status : ७. गोलुमोलु

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!

Making of photo and status :
कार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का? cute ना!! अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का? गोलुमोलू! हा! हा!! हा!!

हा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही!!!? आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले.

माझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल!! आता पहा! गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल? बरोबर!! आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना!!? इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, "काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? " हा! हा!! हा!!

आता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा! "येता का सोबतीला?" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं? तर "जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत." आणि ते पण कसं? तर जोडीनं!! म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय? तर दूध!! गोलुमोलुचं फेवरेट!! वर आपल्यालाच तो सांगतोय, "टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!" बघा ना! आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.

तर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला? मग!!?.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत? दूध आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लहान मुलांसमोर घराबाहेर पडणं म्हणजे धर्मसंकटच असते कधीकधी. नेमकं गडबडीच्या वेळी ह्यांना चॉकलेट, चक्कर इ इ. पाहिजे असतं. मी खुपदा शर्ट पार्किंगमध्ये जाउन घातलेला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

भांबड आलं

मी खुपदा शर्ट पार्किंगमध्ये जाउन घातलेला >>> बापरे!! Shok

मी चपला गुपचूप घराबाहेर जाऊन घातल्याचं आठवतंय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.

आजतागायत एकाही मोठ्या माणसाला (किंवा फॉर्दॅट्मॅटर एखाद्या लहान मुलालासुद्धा) 'टकाटक' म्हणताना ऐकलेले नाही.

पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग काय काटा म्हणावं???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

भांबड आलं

@ 'न'वी बाजू, पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. >>> काय म्हणता!!!!??? Shok आमच्याकडे तर नेहमीच म्हणतात बुवा!!

'टकाटक' हा बहुउपयोगी शब्द आहे. त्याला आपण कसाही आणि कुठेही वापरू शकतो. कसा वापरायचा त्याची एकदोन उदाहरणे मी तुम्हाला सांगतो.

१) त्या गवंड्याचं काम एकदम 'टकाटक' असतं बरं!! (तो गवंडी उत्कृष्ट काम करतो)

२) आज काय दिसत होती रे ती, एकदम 'टकाटक'!! (ती आज फार सुंदर दिसत होती.)

३) गाडी काय मेंटेन केली आहे बाप!! एकदम 'टकाटक'!!! (गाडी एकदम कंडिशनमध्ये ठेवलीय)

समजलं ना कसं!!? तुम्हीही 'टकाटक' हा शब्द वापरत जा बरं! फार मज्जा वाटेल बघा बोलताना. आणि आपल्याला काय सांगायचंय ना ते समोरच्याला ह्या एका शब्दात बरोब्बर समजतं. त्याला जास्त काही सांगायची गरजच पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

मी दर रविवारी या लेखांची आतुरतेने वाट पाहात असतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

@ राजेश घासकडवी, मी आजपर्यंत तीन संकेतस्थळांवर प्रत्येकी सहा भाग याप्रमाणे एकूण अठरा भाग टाकलेत. सर्व मिळून प्रत्येक भागात सरासरी दहा प्रमाणे एकूण अंदाजे एकशेऐंशी प्रतिसाद आले असतील. त्यापैकी तुमचाच पहिला प्रतिसाद आलाय, जो माझ्या मनाला सुखावून गेला. आजपर्यंत मी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे मला वाटले. मी कायम तुमचा ऋणी राहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

हा! हा!! हा!!!
जिल्ब्यांची रेसिपी माहितीय का इथे कुणाला?.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

@ राव पाटील, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2