"नौकानयनातील प्रगती"

कुमारी मातेच्या पोटी देव जन्माला आला, त्याला त्यांनी
मोठ्या धारदार खिळ्यांनी क्रूसावर ठोकून ठार केले,
नंतर तो गुहेतून जिवंत बाहेर आला व आकाशात उडून गेला.
त्याच्या नावाने त्यांनी पुढची पंधराशे वर्षे विज्ञानावर
बंदी आणली, (पण ते चांगलेच होते!).
नंतर पृथ्वीचा थाळीसारखा आकार हळूहळू चेंडूसारखा
झाला व त्यांच्या लक्षात आले की यातून लुटालूट व बलात्कारांना
चांगली संधी मिळेल. गोऱ्या पिशाच्चांचा नायक होता
कोलंबस . "भारता" च्या किनाऱ्यावर उतरून त्याने
तिथे एक क्रॉस व स्पेनचा झेंडा ठोकला आणि सर्व दिशांच्या
सातशे मैलावर स्पेनच्या राजाचे अधिराज्य घोषित केले
(कारण त्याच्याकडे खूप बंदुका होत्या ).
रबराच्या चिकाला खनिज तेलासारखे महत्व प्राप्त झाले
तेंव्हा अमेझॉन नदीवरच्या स्थानिकांना चीक गोळा करण्याची
संधी देण्यात आली . त्यांनी ती आनंदाने घेतली कारण
कोटा पूर्ण झाला नाही तर त्यांचा उजवा हात तोडला
जात असे. स्थानिकांना प्रगतीची ओढ असल्यामुळे
बायकामुलांवरील बलात्कारांकडे ते हसून दुर्लक्ष करायला शिकले.
मग त्यांच्यातल्या काहींना युरोपच्या प्राणिसंग्रहालयात
ठेवण्यात आले. पिंजऱ्याबाहेर "त्यांना शेंगदाणे टाकू नयेत"
अशी पाटी असे, त्यामुळे गोरी मुले निराश होत.
अशी प्रचंड प्रगती झाली. नासा चंद्रावर रॉकेट सोडते तेंव्हा
त्याच्या लोखंडी कणांनी खालच्या तळ्यातल्या मगरींचे
थायरॉईड प्रदीप्त होऊन त्या अधिक वेगाने हल्ला करू लागतात.
लवकरच येथे कोलंबस डे साजरा होणार आहे !
xxx

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दमदार पुनरागमन मिलिंद राव .
आवडले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही आम्हालाच दोरांनी जखडून ठेवले
अन अत्याचार अत्याचार ओरडत राहिलो।
कोणीतरी थोड्यांना सोडवून घेऊन गेला
त्यांच्या नावाने बांधलेल्यांनी शंख फुंकले।
कुणाकडे होती छत्री संस्कृतीची
उघडून त्याने धरली सावली
किती गारेगार इथे
किती गारेगार इथे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरटबाबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

कोलंबसाचे गर्वगीत
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळुदे तारे!
विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे!

ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळुदे पळिता!

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान!

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटूदे नभ माथ्यावरती
आणि तुटुदे अखंड उल्का वर्षावत अग्नी
नाविका ना कुठली भीती!

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरि असीम नीलांमधे संचरावे
दिशांचे आम्हाला धाम!

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी
जपावे पराभूत प्राणा!
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती!

मार्ग ना आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा!

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

रँडम वाटलं पण जबर लिहिलय पद्कीजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

रॅण्डम वाटत असल्यास ह्या लिंका बघा -
https://en.wikipedia.org/wiki/Ishi
.
https://en.wikipedia.org/wiki/Human_zoo
.
https://en.wikipedia.org/wiki/California_Genocide
.
मला तरी ह्या संदर्भानं अर्थ लागला आणि लिखाण प्रभावी वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

दिवाळी अंकातही ही कविता होती पण त्या वेळच्या सुट्टीत अन् मचमचीत बहुतेकांच दुर्लक्ष झालं असेल http://aisiakshare.com/node/6262

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं