कॉकटेल लाउंज : सेंचुरी धमाका ('वडवानल' स्पेशल)

शंभर वर्षातून एखाद्याच वेळेला साजरे करण्यासारखे काही क्षण असतात, त्यापैकी एक म्हणजे सचिनची सेंचुरीची सेंचुरी. त्यासाठी काहीतरी भन्नाट पेय नको का? पण आपले लाडके कॉकटेलाचार्य सोत्रि सध्या दारूचा बारच्यामागची आपली जागा सोडून वेगळेच बार उडवण्याच्या मोहिमेवर आहेत. तेव्हा म्हटलं आपण चान्स मारून घ्यावा. म्हणून 'सेंचुरी धमाका' हे नवीन कॉकटेल सादर करत आहोत. हे कॉकटेल काहींना भन्नाट आवडतं आणि ते भरभरून प्रतिसाद देतात. आणखीन इतरांना ते कॉकटेल वाईट वाटलं नसलं तरी आधीच्यांचे प्रतिसाद आवडत नाहीत, मग ते त्यांना तसं सांगतात. त्यांची एकमेकांत चर्चा रंगते आणि प्रतिसादांची सेंचुरी हा हा म्हणता गाठली जाते. म्हणून हे नाव.

या कॉकटेलचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे एक स्फोटक विषय. स्त्री-पुरुष, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, निवासी-अनिवासी, पुणेकर-इतर, एक संस्थळ - दुसरं संस्थळ असे जनमत दुभागणारे विषय हवेत. ते विषय आधीच खूप वेळा वापरून घेतले गेले आहेत याची चिंता करू नये. दारूप्रमाणेच या विषयांची नशाही दरवेळी नवीन चढते. व्होडका बऱ्याच वेळा प्यायली आहे म्हणून आपण ती पुन्हा प्यायची नाही असं करतो का? खरं तर म्हणूनच तिची वेगवेगळी कॉकटेलं करून प्यायली की जरा तेवढाच बदल होतो.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आत्यंतिक साळसूदपणा. स्क्रूड्रायव्हरमध्ये घातलेल्या ऑरेंज ज्यूसप्रमाणे त्यामुळे अल्कोहोलची जळजळीत चव सुसह्य होते. त्यासाठी काहीही विधानं करण्याऐवजी प्रश्न विचारणं सोयीस्कर ठरतं. त्या प्रश्नाचे शब्द योग्य प्रमाणात आले पाहिजेत. खरडवह्यांतून किंवा व्यनिंतून - 'साला, पेटणार आहे बघ वडवानल!' असं स्वतःला गुदगुल्या होत असलेल्या स्वरात जरूर लिहा. पण लेखात मात्र गंभीरतेचा आव आला पाहिजे. तुम्हाला काही क्षण उच्चभ्रूच समजलं जाण्याचाही किंचित धोका पत्करावा लागेल इतपत गंभीर. म्हणजे उदाहरणार्थ 'हे हरामखोर अनिवासी इतके का माजलेले आहेत?' असा सरळ प्रश्न विचारला तर कॉकटेलची मजा जाते. त्याऐवजी 'अनिवासी भारत सोडून गेल्यामुळे त्यांची महाराष्ट्राशी असलेली सांस्कृतिक नाळ तुटते का?' असा उच्चभ्रू शब्दांत, स्वतःला खरोखरच त्या माहितीत रस असल्याप्रमाणे प्रश्न विचारावा. मग कोणीतरी लिहितंच 'हे साले अनिवासी, सिटिझन होतात आणि आपल्याच माजी देशवासीयांवर गोळ्या घालू म्हणून खणखणीत आवाजात शपथ घेतात.' जर कोणी लिहायला तयार नसेल तर आपल्याच मित्राला असली भडकाऊ कॉमेंट टाकायला सांगायची. मग कोणी तरी पिडांसारखा मातब्बर नागरिकत्व आणि जीवनपद्धती यांमधला फरक सांगायला गदा फिरवत धावून येतो. स्वतःला काहीच टोकाची विधानं करावी न लागता शांतपणे धाग्यावरचे प्रतिसादांचे चौकार, षटकार वाढताना बघायचे. अगदी शून्य ची पानं फाडून टाकलेल्या पुस्तकाने खेळलेल्या बुक क्रिकेटसारखे.

सामान्य कॉकटेलला ज्याप्रमाणे थंडावा देण्यासाठी बर्फाची जरूर असते, तशीच या कॉकटेललाही काहीतरी सुसंबद्ध भासणाऱ्या लिखाणाची गरज असते. उदाहरण देऊन सांगतो. मार्गारिटामध्ये आइस्ड आणि फ्रोझन असे दोन प्रकार असतात. एकात बर्फाचे मोठे तुकडे असतात, दुसऱ्यात ते कॉकटेल ब्लेंडरमधून बर्फासकट काढल्यामुळे अगदी पेयाशी एकजीव झालेला बर्फाचा भुगा असतो. (नक्की कुठचं आइस्ड आणि कुठचं फ्रोझन हे माहीत नसलं तरी फरक पडत नाही). तसंच तुम्हाला दोन पद्धतीने ते लेखन करता येतं. एक म्हणजे साळसूद प्रश्न - यात विषयाची मांडणी आणि तदनुषंगिक प्रश्न येतात. दुसरी पद्धत म्हणजे एखादी ढोबळ रूपककथा लिहिणं. राजा-प्रधान, अमात्य-विदूषक, एक राज्य आणि दुसरं राज्य वगैरे घिसीपिटी रूपकं वापरली की झालं. मग तुमच्या साळसूदपणाच्या ऑरेंज ज्यूसची चवही जिभेला थंडगार लागते. वाचकांनी ही रूपकं चुकीची इंटरप्रिट केल्यामुळे प्रतिसादांत आणखीनच कल्ला होतो हा बोनस!

सर्वात शेवटी गार्निशसाठी एक डिस्क्लेमर भुरभुरवावा. म्हणजे पेयातली सगळी कडवट चव निघून जाते.

हा लेख निव्वळ कॉकटेलचंच वर्णन म्हणून घेणे, व त्यात इतर अर्थ शोधू नयेत, व शोधलेच आणि समजा काही विचित्र साम्यं सद्यपरिस्थितीशी किंवा व्यक्तीशी सापडलीच तर तो कर्मधर्मसंयोग समजावा, आणि तेवढे कष्ट घ्यायचे नसतील तर सगळ्यांनीच हलक्याने घेणे. आणि अर्थातच मी हे सांगण्याचं काम केलेलं आहे कारण माझं मन स्वच्छ आहे, मला कोणाच्या कुरापती काढायच्या नाहीत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

गुर्जी, त्रिवार दंडवत!!!

पहिला दंडवत ह्या पोटंट कॉकटेलसाठी ! _/\_

च्यायला, एकापेक्षा एक पोटंट (जहाल) कॉकटेलं ट्राय केली पण ह्या 'सेंचुरी धमाका'ची सर कुठल्याही कॉकटेलला नव्हती हे साळसूदपणे कबूल करतो.

खरडवह्यांतून किंवा व्यनिंतून - 'साला, पेटणार आहे बघ वडवानल!' असं स्वतःला गुदगुल्या होत असलेल्या स्वरात जरूर लिहा. पण लेखात मात्र गंभीरतेचा आव आला पाहिजे

क ड क ! ह्यासाठी हा दुसरा दंडवत!! _/\__/\_

आणि गार्निशिंगसाठी तिसरा दंडवत _/\__/\__/\_

- ('सेंचुरी धमाका' चढलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वात शेवटी गार्निशसाठी एक डिस्क्लेमर भुरभुरवावा. म्हणजे पेयातली सगळी कडवट चव निघून जाते.

लहान मुलांसाठी कॉकटेलं नाही हो, माकटेलं असतात. गुर्जी, मोठे व्हाच तुम्ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

__/\__ ROFL __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संस्थळावरचं लै जुनं पण तरीही लै पापिल्वार असं हे काकटेल जरी असलं तरी जुन्यांपेक्षा नवे जास्त पितात. पण याची खरी मजा मात्र गपचुप बार पाशी उभं हळुवारपणे पीत जुनेच घेतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! कॉकटेल कृतीचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे.
गुर्जींनी केलेल्या वर्णानात भर टाकायची म्हणजे पैठणीला ठिगळ जोडण्यासारखे आहे याची कल्पना आहे पण नुकतेच भरपूर कॉकटेल पिऊन तर्र झालेलो अस्ल्याने हिंमत करतोय.
हे कॉकटेल खूपच लोकप्रिय असून भलतेच "पोटंट" आहे याचा चांगलाच अनुभव आहे. नुसते पोटंटच नव्हे तर अतिशय अ‍ॅडिक्टिव्ह आहे असेही म्हणायला हरकत नाही.
हे कॉकटेल तयार करून जगमध्ये ओतल्याबरोबर काही अनुभवी मंडळी लगेच बार-स्टूल पकडून बसून घेतात आणि चखण्याच्या वाट्या जमवून ठेवतात. या कॉकटेलच्या वासानेच तरल झाल्यामुळे की काय पण त्या वेळी बार-स्टूलला झाड आणि चखण्याला पॉपकॉर्न म्हणण्याची पद्धत काही बार्समध्ये पडली आहे.
नवख्या मनुष्याला अंदाज नसल्याने पहिल्या घोटातच तो खूप प्रमाणात बडबड करू लागतो आणि कॉकटेलच्या चवीवरून सुरू झालेले संभाषण लवकरच तारस्वरात किंचाळण्यापर्यंत आणि एकमेकांना बोचकारण्यापर्यंत जाते.
बारस्टूलवर बसलेले अनुभवी लोक मात्र मंद स्मित करत गंमत पाहत आहेत असे दिसते. ते पाहून एखादा नवोदित त्यांच्यापैकी एखाद्याशी बोलायला जातो. बर्‍याचवेळा हे दुरून गंमत पाहणारे अनुभवी लोक आपण डुलतोय हे लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्या नवोदिताला काहीतरी सल्ला देतात पण कधीकधी हे अनुभवी आधीच इतके टून झालेले असतात की त्यातल्या एखाद्याची बोलताना पटकन ओकारी निघून जाते.
काही अनुभवी पण व्यसनी लोक कॉकटेलचे काय परिणाम होतात हे माहित असूनही केवळ व्यसनापोटी भरपूर ढोसतात आणि भेसूर आवाजात क्रांतिकारी विचारांच्या नावाखाली बारमधल्या फर्निचरची नासधूस करतात. असा एकंदर गोंधळ पाहून बारच्या खिडकीतून पाहणारे कितीएक लोक बाहेरच्या बाहेरच पळ काढत असतील त्याची काहीही गणती नाही.
असे हे बहुगुणी, बहुटैमपासी कॉकटेल मांजाबारमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे यात शंका नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुलंच्या लेखनाचा प्रभाव धारे-धारेतून जाणवला. लेखाच्या शिर्षकासाठी प्रस्ताव "तुम्हाला कोण व्हायचयं? बारवाला, मद्यप्याला की बारबाला?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दारूप्रमाणेच या विषयांची नशाही दरवेळी नवीन चढते. व्होडका बऱ्याच वेळा प्यायली आहे म्हणून आपण ती पुन्हा प्यायची नाही असं करतो का? खरं तर म्हणूनच तिची वेगवेगळी कॉकटेलं करून प्यायली की जरा तेवढाच बदल होतो

हे बाकी बेष्टच! श्रमपरिहाराचे सुख प्रत्येक वेळी वेगळच असते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घासकडवी ग्रेट आहेत याबद्दल तिळमात्र शंका नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

नवशिके राज ठाकरे प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट होऊन स्वतःचे महत्त्व कमी करुन घेतात. मुरब्बी पवारसाहेब बहुतेक वेळा बहुतेकांना अनुल्लेखानं मारतात. पवार व्हा, घासकडवी. सुमारसद्दीतून वर जाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

नवशिके आणि मुरब्बी! मुरब्बी व्हायला वेळ द्यावा लागतो. दिला पाहिजे. Wink पवार व्हावं की नाही हा वेगळाच मुद्दा! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणूनच "त्या" धाग्यावर "तिकडे"ही काही सविस्तर लिहित बसलो नाही, "इकडे"ही नाही.
आमच्या कृतीला किमान शब्दांत नेमकेपणानं मांडल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा ! फटकेबाजी चालू ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

म्हणून 'सेंचुरी धमाका' हे नवीन कॉकटेल सादर करत आहोत.
कॉकटेल कडक आहे, पण नवीन नाही....
किंबहुना तुमच्या-आमच्या बारमध्ये पहिलं पाऊल ठेवण्याच्या आधीपासून काही शेलकी जेष्ठ मंडळी हे नित्यनेमाने सेवन करताहेत!!!
Wink
करोत बापडे!
आम्ही स्कॉच-बर्फवाले असल्याने आम्हाला या कॉकटेलमध्ये रस नाही.
आणि इतर कुणी प्यायला आमची हरकत नाही, सहानुभूती बाळगतो...
पण पिऊन आमच्या दारात जर कुणी येऊन ओकायला लागलं तर मात्र सहानुभूती विसरा, गदा काढतो!!
काय समजलेत!!!
Smile
बाकी आमचा उल्लेख करतांना तुम्हाला धनुष्य-बाण, तलवार, भाला, बर्ची, कुर्‍हाड, परशू इत्यादि न आठवता फ्रक्त गदाच बरी आठवली!!
धिस इज प्रोफायलिंग, अ‍ॅन्ड प्रोफायलिंग इज इल्लिगल!!
तुमचा जाहीर निषेध!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण पिऊन आमच्या दारात जर कुणी येऊन ओकायला लागलं तर मात्र सहानुभूती विसरा, गदा काढतो!!

गदा? हे गाणं आठवलं.
आणि पिडाकाका घटोत्कचाच्या अवतारात ... ROFLROFLROFL तुम्ही तुमच्या गदेनेच अशा वृत्तीचा खातमा करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.