"फिकट सूर्य आणि आंबा खाणारी बाई"

आज तर करड्या हिवाळी धुरकटपणाने
मंदावलेला सूर्य फिकट मोतिया रंगही
दाखवत नव्हता, वर्षातला सर्वात निस्तेज दिवस!
त्यामुळे पार्किंग लॉटमधल्या शेजारच्या गाडीत
सूर्याला पाहून चकणाच झालो,
एक बाई आवेगाने त्याचे मुके घेत होती,
अफाट देखण्या सूर्यावर भाळली होती जबरदस्त ,
त्याच्या मिशांतून पाझरणारा गोडवा
आपल्या दातांनी खेचून घेण्याच्या प्रयत्नांत
तिची कांती चेतून उठलेली दिसत होती,
त्या सूर्याच्या असूयेत मी निरखून पहिले:
तो एखादा पुरुष आहे कि काय म्हणून,
मंद उजेडात नीटसे दिसत नव्हते,
अखेर दिसले की ती खातेय एक आंबा,
तिच्याच असूयेने ग्रस्त झालो नि काय !

भाषांतर: मिलिंद पदकी
(मूळ इंग्रजी :

The Sun in Bemidji, Minnesota
: Sean Hill

The sun isn’t even a pearl today—
its light diffused, strained gray
by winter haze—this the grayest
day so far, so when I enter the Wells
Fargo parking lot the last thing I expect
is to see the sun in the car next to mine.
I watch a woman make out with the sun,
and I’m jealous of the sun. Beautiful
beyond her desire—wanting the sun
so—she almost glows as she tugs
sweetness from his whiskers with
her teeth, and his drool runs down
her chin. I think the sun is a man,
but it’s hard to tell in this light. No,
it’s a mango, and I’m jealous of her.
xxx)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा त्याला आंब्याचा मत्सर वाटत नाहीये त्या बाईचा वाटतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काउंटरवरील सुंदर सेल्सगर्ल ला विचारलं
आंब्याचा रस आहे का ?
ती म्हणाली माझा चालेल का ?
नुसतं ऐकुनच किती बर वाटलं..

कविता भारीये
तुमच्या टायटल वरुन कमल देसाईंच काळा सुर्य आणि हॅट घालणारी बाई टायटल पण आठवल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love