"'झुका" म्हणे माठ्या "

फेसबुकावर / सौंदर्य-कल्लोळ
लावण्याचे लोळ / लागे पिसे
सुंदरी ने केला / "मैत्री" चा स्वीकार
गृहस्थ बेकार/त्यात फसे
सुंदरीचे होई/मात्र ते दर्शन
गात्रांचे घर्षण / त्यात नसे
तोंडाळ कलत्र / येता कडाडून
धोतर सुटोन / होतसे हसे
"झुका" म्हणे तुला / दिले फेसबूक
अशी घोडचूक / दूजी नसे .
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हसवाफसवी.