"तेंव्हा कोठे कविसंमेलने कमी झाली!"

सर्व पराभूत मार्क्सिस्टस सौंदर्यवादी होतात या
नियमाप्रमाणे फॅसिस्ट राजवटीच्या मधल्या वर्षांत
कविसंमेलने वाढली (श्रोत्यांपेक्षा कवी जास्त असत),
कवितांची पुस्तके वाढली, ती विकत घेणाऱ्यांची
संख्या वाढली , तरुण मुले तरुण मुलींना
कॅफेमध्ये कविता वाचून दाखवू लागली, (पैसेवाल्या
तरुणांचा तुडवडा असल्यामुळे मुली त्या ऐकूनही
घेऊ लागल्या ) एकूण अराजक झाले, लोक
जेरीस आले . सर्वत्र "त्राही माम्"!. अखेर
राजकीय वारे फिरवू शकणाऱ्या
मध्यमवर्गीय ड्रॉईंगरूम्समधून,
झोपडपट्यांच्या गणेशोत्सव मंडळांतून ,
नागर समाजाच्या सर्व थरातून मार्क्सिस्टांना
गुप्त मेसेजेस गेले "हे थांबवा , या वेळी तुम्हाला निवडून
देतो, नक्की!". फॅसिस्टांना बातमी गेली ,
घाईघाईने त्यांनी बेकारी, महागाई कमी करायचे
प्रयत्न केले. अनेक वर्षांची धोरणे
उलटविणें सोपे नव्हते, निवडणूक झाली,
मार्क्सिस्टांची लाट आली,
- तेंव्हा कोठे कविसंमेलने कमी झाली!
XXX

: मिलिंद पदकी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फॅसिझम हा मार्क्सिझम चा भाऊ आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Except when fascism masquerades as Hindutwa. Then suddenly they are sworn enemies!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0