मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दांन शिवाय समजत होती

मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दांन शिवाय समजत होती.........
दर दोन महिन्यांनी शिशुविहार मधील मुलांनी काही तरी सादरीकरण करायचे आणि ते त्यांचे शिक्षक,पालक आणि आम्ही काही प्रबोधिनीचे शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिळून अनुभवायचे अश्या उपक्रमाला आम्ही अभिव्यक्ती असे नाव दिले. मुलांच्या सादरीकरण नंतर पालक त्यांच्या भावना व्यक्त करतात व नंतर सर्व जन मिळून मुलांच्या प्रगती बाबतीत चर्चा करतात.
या उपक्रमाचा मुलांच्या विकासासाठी, शिक्षक पालक सुसंवादसाठी, आम्हा कार्यकर्त्यांना एकूण शिशुविहार मधील शिक्षण प्रक्रिया व आपण जे विचार करून उपक्रम करतो त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी खुपच उपयोग झाला.
पालकांचे अनुभव कथन खुपच बोलके व प्रेरणा देणारे असते. अश्याच एका अभिव्यक्ती उपक्रमानंतर ऐक थोडीशी ठेंगणी, शिडशिडीत बांध्याचे, गव्हाळ वर्णाची आई उठली व ती बोलायला लागली. आहो बोलणं कसलं, तिने चक्क टाहोच फोडला. ती त्या रडण्याच्या अवस्थेतच म्हणाली, “माझी मुलगी या शाळेत शिकली. जी आज ती काही आहे ती या सहले मुळेच आहे.” थोडं आपल्याच विचारांच्या तंद्रीत असलेला मी तिच्या रडण्याने व त्या नंतरच्या वाक्यांनी खाडकणी भानावर आलो व मी थोडं नीट पाहिलं कोण ही स्त्री ...........आणि मी चक्क ४ वर्ष मागे गेलो ........
सकाळची ११ ची वेळ आमच्या चिमण्याची आणि मोरांची शाळा भरली होती चिवचीवाट थांबून सामुहिक प्रार्थना सुरु झाली होती. राष्ट्रगीत सुरु झाले मी डोळे मिटून कार्यालयात उभा होतो. भारतमाता की जय झाले व मी डोळे उघडले. समोर ऐक आई आपल्या मुलीला घेऊन उभी. मी त्यांच्याकडे पहिल व हसलो ......शाळेचा पहिलाच आठवडा त्यामुळे मुलांची व पालकांची नीट ओळखपण झाली नव्हती. मी त्यांच्या कडे पाहून हसलो आणि ती आई जोरात रडायला लागली ...... “माझ्या मुलीला शाळेतून काढू नका हो ......मी नाही सांगितलं तुम्हाला पण माझ्या मुलीला शाळेतून काढू नक्का” ... तिच्या त्या रडण्यानी व त्यानंतर च्या वाक्यांनी मी फारच अस्वस्थ झालो होतो. तसा हा पहिलाच अनुभव ......मी स्वतःला सावरत त्यांना म्हणालो तुम्ही आधी बसा व मला नीट सांगा काय झालं.
थोडस सावरत आई म्हणाली, “ही माझी मुलगी.” .......गोरा व उभटसा चेहरा....बोलके व पाणीदार डोळे, थोडीशी अकल्पित भीती ...४ वर्षाचे ते लेकरू थोडं भेदरून गेलं होत. मी तिच्या कडे पाहिलं व विचारला, “आजी बाई नाव काय हो आपलं?” ती काहीच बोलली नाही मी परत विचारलं पण ती ....फक्त आपल्या आई कडे पहात होती ....आईच हुंदके देण चालूच होत. त्यातच ती म्हणाली, “नाही बोलता येत तिला पण तिला शाळेतून कडू नका. जन्मल्यापासून नाही बोलता येत, योगिता आहे तीच नाव ”
ऐक अबोल शांतता सर्वत्र पसरली ........मला काय बोलावं हेच समजत नव्हत.
योगिता आई हुंदके देतच बोलत होती, “ दादा , हिला लहान पणापासून खूप कमी ऐकू येत ....जवळ पास नाहीच आणि त्यातून मग हिला बोलता पण येईना....सगळ हातवारे करूनच बोलणं चालत. ऐक दोन शाळेत घातलं पण त्यांनी ठेवायला नाही म्हटलं......आत्ता काय करू सांगा खरं सांगून शाळेत घालायचं म्हणल तर कुणी शाळेतच घेत नाहीत .....त्यामुळ या वेळी न सांगताच प्रवेश घेतला. चूक झाली माझी ...पण करू तरी काय मी ? मुंबई पुण्याच्या डॉक्टर ला दाखवलं ते म्हंत्यात लहान मुलात खेळू द्या ...पण आमच्या घरात ही एकटी लहान बाकी मोठी माणस.”
मला काय बोलावं हेच समजेना. मी आमच्या शिशूविहारच्या ताईंना बोलून विचारलं काय कराव. त्या म्हणाल्या खुपच अवघड आहे. अस म्हणताच योगिताची आई परत रडायला लागली. मी त्यांना म्हणालो, “ताई, योगिताला विशेष शाळेत पाठवावे लागेल तिला वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागेल.”
“आहो दादा, कुठ आहे अशी बालवाडी अंबाजोगाईत .......नाही म्हणून लेकरांनी घरीच राहायचं का ?” योगिताची आई म्हणाली.
त्याचं ही खरं होत. योगिता मात्र अनिमिष नेत्रांनी सर्व कावरंबावरं होऊन पहात होती. तिचे डोळे मधून मधून हसणाऱ्या आमच्या चिमण्यांकडे जायचे. मी ताईंच्या कडे पहिले त्यांच्या डोळ्यात ही अनिश्चितता....ऐक अनाहूत पोकळी माझ्या छातीत व पोटात ...ऐरवी कुणी मुलां बद्दल काही माहिती लपवली की पालकांना अद्वातद्वा बोलणारा मी मात्र .......काय निर्णय घ्यावा यातच अडकलो.
“चला पुढचे १५ दिवस आपण पाहू जर योगिता शिशूविहार च्या वातावरणात जुळून घेते का ? पण तिला जमले नाही तर मात्र मला माफ करा ताई” थोड्याफार अविश्वासानेच मी योगिताच्या आई ला माझा निर्णय सांगितला. थोडया केविलवाण्या आवाजात योगिताच्या आई हो म्हणाली.
योगिता वर्गात गेली .......पुढचे १५ दिवस ...तिला व आम्हालाही माहित नव्हते काय होईल.
दोन दिवसात योगिता हसायला लागली.....ताई तिला त्यांच्या समोर बसवायच्या ....चार पाच दिवसात ती नबोलता सामान्य कृती इतर मुलान सारख्या करू लागली आणि आठवडा भरातच योगिता आम्हा सर्वांची लाडकी झाली फक्त लाडकी नाही तर आमची झाली ....आज विचार करतो त्यावेळी आत्ता नक्की वाटत योगीतानीच आम्हाला आपलासं केलं होत. तिच्या शब्दात नव्हत तेवढ सामर्थ्य तिच्या डोळ्यात आणि धावूनी येत मिठी मारण्याच्या कृतीत होते. आम्हा सर्वाना तिने कामाला लावल ताई ओठांची व बोटाच्या हालचाली ची भाषा शिकु लागल्या. माझ्या अश्या मुलान साठी च्या शिक्षणाचा अभ्यास सुरु झाला.
१५ दिवस काय, अनेक महिने निघून गेले .....ऐक दिवस योगिताच्या वडिल पेढे घेऊन आले.त्यांना दुसरा मुलगा झाला आणि योगिताला भाऊ ....चला आत्ता भावाला पहायच्या निमित्याने योगिताच्या घरी जान झाल. घरी आमची आजीबाई (योगिताला मी आजी म्हण्याचो ) वाट पाहतच बसल्या होत्या ......आता दा..दा म्हणू शकत होती. ऐक तास बाळाशी खेळणं ....आणि त्यात सर्वात मला सामून घेणं आजी बाईन च चालू होत.तिच्या बाहुली पासून ते घरातील प्रत्येक गोष्टीना व व्यक्तीना ती माझी हसून ओळख करून देत होती. आपला उजवा हात डाव्या छातीला लाऊन .....आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी व “दा ..दा” शब्दांनी ती सर्वाना सांगत होती माझे दादा. दोन तासानी जायला निघालो आणि योगिता एकदम अस्वस्थ झाली व रडू लागली ती खूप प्रयत्न करून सांगत होती ...आणि मला ही ते आत्ता समजत होत ....नको न जाऊ दादा, तू माच्या घरीच रहा न .....मी समजून सांगत होतो पण तिच्या डोळ्यातील हट्ट मला जाऊ देण्यास तयार नव्हता. मला आत्ता तिच्या हृदयाची भाषा शब्दांन शिवाय समजत होती. जान भाग होत आश्वासन देऊन परत येण्याच .....
योगिता २ वर्ष आमच्या बरोबर होती .....ती ने खूप कमी बोलून सर्वान एवढच शिक्षण घेतलं होत. तिचा स्नेह्संमेलानातील सहभाग खुपच बोलका होता .....आणि त्या पेक्षा तिची प्रगती ....परीक्षेत कुठलही उत्तर न देता तिच्या प्रगती पुस्तकावर “ अ +” ची श्रेणी होती.......

सगळं सगळ कसं लखः डोळ्यासमोरून गेलं .... योगिताची आई म्हणाली, “माझी मुलगी आत्ता दुसरीत आहे. तिच्या कानाला आम्ही आत्ता यंत्र बसवले आहेत ......ती आत्ता थोडं थोड बोलू शकते ...आणि खूप चांगल लिहू शकते .....आता तिचा भाऊ शिशुविहार च्या चिमणी गटात आहे.”
आमच्या शाळेत ऐकमेकांना ज्या वेळी आम्ही भेटतो न आमचे दोस्त माझ्या हातावर जोरात टाळी देतात .....हीच आमच्या अभिवादनाची व निरोप देण्याची पद्धत ती सुरु झाली योगिता मुळेच .....योगिताची आई तिच्या मनोगतात म्हणाली, “योगिता व तिचा भाऊ एकमेकांना टाळी देतात व मोठ्यांनी हसत म्हणतात, प्रसाददादा” हे ऐकल आणि डोळ्यातील अश्रू लपवत हृदयानी रडण्याचा अनुभव मी घेत होतो.
सध्याच्या चिमणी गटात माझ्या मित्राचा असाच ऐक शाररिक दृष्ट्या अविकसित मुलगा आहे ....तो पण आपलं पूर्ण क्षमते अभिव्यक्त झाला होता. योगिताची आई त्याच्या आईला म्हणाली, “ ताई, मी तुम्हाला सांगते..खूप त्रास होतो पण आपण प्रयत्न करायचे बघा तुमचा मुलगा पण आमच्या योगिता सारखी प्रगती करेल ....फक्त धीर धरवा लागतो” आमच्या धीर देण्या पेक्षा..... योगिताची आईचा धीर माझ्या मित्राच्या बायकोच्या चेहेऱ्यावर ऐरवी न दिसणारे धीराचे भाव निर्माण करत होता. ह्याही पेक्षा योगितानी माझ्या शिक्षण विषयक दृष्टीकोनातच बदल केला “योग्य आणि निवडून घेऊन शिकवण्याची रीत बंद करून येतील त्यांच्यातील योग्य गुण शोधून त्यांना सुयोग्य शिक्षण देणं........
स्वामी विवेकानंदाच चे वाक्य नेहमी शिक्षणावर भाषण देताना मी सांगायचो ... “ प्रत्येक आत्मा हा ऐक अव्यक्त ब्रम्ह आहे. मनुष्यच्या सुप्तरूपात असणाऱ्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण.” योगिताने मला ह्या वाक्याचे अनुभवासह स्पष्टीकरण दिले होते.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला आणि विशेषतः शेवटचे वाक्य तर सुरेखच आहे. आपल्या मुलांचे पहिले शिक्षक आपणच असल्याने, पालक या नात्यानेही अनौपचारीक शिक्षणाकडेही इतक्याच सूज्ञपणे पहाणे किती गरजेचे आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचताना कधी डोळ्यात पाणी आले कळलेच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोज्ञ अनुभव....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

योगितानी माझ्या शिक्षण विषयक दृष्टीकोनातच बदल केला “योग्य आणि निवडून घेऊन शिकवण्याची रीत बंद करून येतील त्यांच्यातील योग्य गुण शोधून त्यांना सुयोग्य शिक्षण देणं...स्वामी विवेकानंदाच चे वाक्य नेहमी शिक्षणावर भाषण देताना मी सांगायचो ... “ प्रत्येक आत्मा हा ऐक अव्यक्त ब्रम्ह आहे. मनुष्यच्या सुप्तरूपात असणाऱ्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण.” योगिताने मला ह्या वाक्याचे अनुभवासह स्पष्टीकरण दिले होते.

किती खरं आहे! माझ्या व्यवसायाच्यानिमित्ताने काही 'टिपीकल' वाढ नसलेल्या मुलांबरोबर काम करण्याची संधी काही काळ मिळाली होती. त्यातील काही मुले, केवळ शब्दांनीच नव्हे तर चेहेर्‍याच्या हावभावांनीही संवाद साधण्यास असमर्थ होती. पण प्रत्येक मुलाची व्यक्त होण्याची स्वतंत्र अशी पद्धत होती. ती कळली, की संवाद साधणे सुलभ होत असे. एकदा हा संवाद साधला गेला, की त्या मुलाच्या वागण्यात आपल्याबद्द्ल विश्वास दिसून येई आणि पुढची शिकवणी सोपी होत असे. नेहेमीच्या परिघाबाहेरचे असे बरेच त्या दिवसांत शिकायला मिळाले. ऐकणे, बोलणे, पाहणे, स्पर्श, चव घेणे याखेरीज इतरही जाणीवा आहेत हे पहिल्यांदा कळाले. या जाणीवांचे संकलन करणे ही किती गुंतागुंतीची गोष्ट आहे याची जाणीव झाली.

योगीताला शाळेतून काढून न टाकता, १५ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्द्ल तुमचे आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0