स्वगत

काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा बहरून येते
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी जाते

कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसतो
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी जातो

पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळते
मुका मार अनवरत झेलुनी
नको तिथे हुळहुळते

रे कवड्या, तुज एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको रे
आवर कढ प्रतिभेचे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रतिभा नसते फोफावत ही काव्यतडागी
घ्यावी खुडुनी कोणीही अन जशी सुगी
शब्द येती मागुती व्यक्त करण्या आशया
कविप्रतिभा प्रतिबिंबित होते न मागे रसिकाश्रया
मोडतोड जर निरर्थकशी कवि तो खचितच कवडा रे
नसे तयाशी कवणी प्रतिभा रसिक कैचा भाबडा रे

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी हा शरदिनीचा डु आयडी वाटला होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचाच वाटायला वाव आहे...
असो वा नसो, छान लिहिलीत कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं