विनोद दुआ के साथः वृत्तपत्र स्वतंत्रता दिवस

विनोद दुआ

विनोद दुआ हे मुक्त वृत्तपत्रकार असून आजकाल ‘दि वायर’साठी दर आठवड्याला ‘जन मन धन की बात’ नावाचा कार्यक्रम सादर करत असतात. कदाचित आपले वाचक नक्कीच विनोद दुआंचे एपिसोड बघतही असतील. आतापर्यंत त्यांनी 237 एपिसोड सादर केले आहेत. आपल्या देशाच्या राजकीय व सामाजिक घडामोडीवरील त्यांची टीका-टिप्पणी नक्कीच उद्बोधक असते.

एपिसोड १३७मधील त्यांच्याच शब्दातील संपादित आशय ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी पोचवावे म्हणून हा एक प्रयत्न.

ही गोष्ट आहे 2011 सालची. मी अहमदाबादला व्हिडिओ शूटिंगसाठी गेलो होतो. सामाजिक व राजकीय कार्यक्रमाबरोबर ठिकठिकाणच्या खवैयांच्या गल्लीवर मी कार्यक्रम करत होतो. अहमदाबादमध्ये भटियार गल्ली ही रुचकर आहार पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. हा एक मुस्लिम बहुल भाग आहे. रात्रीची वेळ होती. बारा-साडे बारा वाजले असतील. मी रमत गमत गाणे गुणगुणत त्या गल्लीत भटकत होतो. माझा एक टीम मेंबर पहिल्यादाच औटडोर शूटिंग करत होता. त्याचे आतापर्यंतचे आयुष्य प्रोडक्शन कंट्रोलच्या बंद खोलीत गेले असावे.
“तुम्हाला भीती वाटत नाही का?” त्याचा प्रश्न
“का?”
“आपण एका मुस्लिम वस्तीत आहोत. अहमदाबादसारख्या शहरात रात्री फिरत आहोत. असे कसे तुम्ही बिनधास्त फिरू शकता?” त्याचा भाबडा प्रश्न.
मी त्याला जिगर मुरादाबादी यांच्या शेरच्या काही ओळी सुनावल्या. डोंगराच्या कड्यावर, झाडांच्या पानावर, कधी फुलांच्या कळ्यावर, कधी फुलांच्या काट्यावर.. मी कुठेही जाऊ शकतो. मी कुठेही राहू शकतो. या सृष्टी सौंदर्यावर माझा हक्क आहे. निसर्गाने मला ही जमीन दिली आहे. समुद्र दिले आहे. पाणी दिले आहे. आम्ही शहरे वसवली. हा देश आमचा आहे. आम्ही स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत.
आम्ही कुठेही फिरू शकतो.

हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे?
आज वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस आहे. (3 मे) जगभरातील सर्व मुद्रित, इलेक्ट्रॉनिक वा समाज माध्यमं यांच्यासाठी स्वतंत्रता दिवस आहे. या दिवशी आज आपण कितपत स्वतंत्र आहोत याचा आढावा घेणे उचित ठरेल. हा देश आपला आहे. आपल्या मनाप्रमाणे आपण कुठेही जाऊ शकतो. हे जरी खरे असले तरी आपली वृत्तपत्रे किती स्वतंत्रबाण्याचे आहोत याचा विचार करू या.

या संदर्भात मी तुमच्यासमोर काही मुद्दे ठेवणार आहे.
रिपोर्टर विदौट बॉर्डर नावाची जागतिक पातळीवर एक संस्था असून ही संस्था दर वर्षी जगातील 180 देशांतील माध्यमस्वातंत्र्याचा आलेख तयार करून त्या देशाला क्रमवारी देत असते. (अशाच प्रकारची अजून एक संस्था फ्रान्समध्येही आहे.) या संस्थेने अलीकडेच 2017-18 सालची सूची प्रकाशित केली असून त्यात आपल्या भारत देशाचा क्रमांक 138वा आहे. 2014 साली हा क्रमांक 140 होता. म्हणजे आपण 2 गुणानी वर चढलेलो आहोत. तेव्हा काँग्रेस प्रणीत युपीएचे शासन होते व त्या काळीसुद्धा आपली स्थिती नीट नव्हती. आणि आज भाजपाच्या संयुक्त आघाडीचा कारभार असूनसुद्धा फार फरक पडला नाही. 2017 मध्ये 136 व 2017 मध्ये 133 अशी थोडी फार सुधारणा झाली असे वाटत असले तरी आज आपण 138व्या क्रमांकावर आहोत. आपल्या प्रेसचे तथाकथित स्वातंत्र्य यातून कळू शकते.
देशाची क्रमवारी ठरवताना ही संस्था देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्यासंबंधीच्या काही मुद्द्यांचा विचार करते. देशातील वैविध्यतेला (प्लुरलिजम) कितपत मान्यता आहे? कपाळावर टिक्का लावणारे, गळ्यात पक्षाच्या प्रतीकांचे टॉवेल गुंडाळणारे किंवा भगवे कापडे घालणारे वा डोक्यावर पांढरी स्कल् कॅप घालून धर्माचे उघड प्रदर्शन करणारे इत्यादींच्याबद्दलचा हा आढावा आहे. आपण निवडून दिलेले सरकारच आपण काय खावे, काय प्यावे, कुठले कपडे घालावीत हे ठरवत असल्यास देशातील विविधता कशी काय टिकू शकते? सगळ्यांना एकाच साचेत का ढकलले जात आहे? जगभरात भरपूर विविधता आहे. कपड्यात, खाण्या-पिण्यात विविधता असणे अगदी नैसर्गिक असते. माणूस म्हणून जिवंत राहण्यासाठी जे स्वातंत्र्य हवे ते सर्व या विविधतेत असते. सगळ्यांना एकाच साचेत बसवण्याचा आग्रह केला जातो. वैविध्यतेच्या संदर्भात आपला क्रमांक 138वा आहे.
अजून एक निकषाप्रमाणे देशातील सत्ता वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याला कितपत अनुकूल आहे? आपल्या देशात उघडपणे आणिबाणी जाहीर केलेली नसली तरी माध्यमांवर अनऑफिशियली आणिबाणी लादलेली आहे. कित्येक वार्ताहरांना धमक्य़ा दिल्या जात आहेत, त्यांचे खून केले जात आहेत, बातम्या देण्यास अटी पाळाव्या लागत आहेत, वार्ताहरांना उध्वस्त केले जात आहे. याची सर्व जबाबदारी माध्यमांच्या मालकावर आहे असे मी समजतो. या मालकांकडे काही तरी लपवण्यासारखे आहे म्हणून ही लाचारी असू शकेल. किंवा त्यांना कुणीतरी ब्लॅकमेल करत असतील. म्हणून त्यांचे पगारी वार्ताहर स्पष्टपणे लिहिण्यास घाबरत असावेत. काही अपवाद वगळता सगळ्या माध्यमांची हीच दुस्थिती आहे. मी सादर करत असलेल्या दि वायरवरसुद्धा अब्रू नुकसानीचे खटले घातलेले आहेत. माझ्यासारख्या वार्ताहरांना धमक्या दिल्या जात आहेत.
अजून एका निकषानुसार त्या देशात environment of self censorship –प्रसिद्धीपूर्व नियंत्रण – कितपत आहे, याचाही क्रमांक देताना विचार केला जात असावा. बातम्या देणारेच सर्व गोष्टींचा विचार करून – सामान्यपणे एखाद्या कमकुवत समाजाचे जीवितहानी, वित्तहानी होणार नाही, देशाचे नुकसान होणार नाही, दंगल भडकणार नाही इत्यादींचा विचार करून - बातम्या देणे येथे अपेक्षित आहे. कुठल्या तरी भीतीने बातम्या दडपणे योग्य ठरणार नाही.
वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्या त्या देशात पारदर्शकता किती आहे हाही एक मुद्दा ठरू शकतो. आपल्या देशात किती पारदर्शकता आहे हे सर्वश्रुत आहे. दिवसे न दिवस माहितीच्या आधिकाराचा संकोच होत असून सर्व संबंधित याकडे दुर्लक्ष करत आहे. माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्ले केले जात आहेत. त्यांचा आवाज बंद केला जात आहे.
देशातील न्याययंत्रणा कितपत सक्षम आहे, हासुद्धा एक निकष असू शकेल. वार्ताहरांवरील बदनामीचे खटले जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्षानुवर्षे साचलेले आहेत. न्यायपालिकेवरील विश्वास कमी होत आहे. गुंड-पुंड मोकाट सुटलेले आहेत. आपल्या येथील न्यायव्यवस्थेची आपल्या नक्कीच असेल.
बातम्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात देशातील इन्फ्रास्ट्रक्चर कितपत अनुकूल आहे त्याची गुणवत्ता किती आहे हाही एक निकष असेल. माहिती वा बातमी कुठून मिळते, बातमी कोण देत आहे, वा बातमीत कितपत तथ्यांश आहे इत्यादी गोष्टींचा विचार केल्यास आपल्या येथील माहितीसंबंधीचा इन्फ्रास्ट्रक्चर फारच तकलादू आहे असे म्हणता येईल. साधारणपणे आपल्या येथील बातमीसाठी नोकरशाहीवर अवलंबून रहावे लागते. संपूर्ण नोकरशाही नागरिकांच्या विरोधात काम करत असते. नोकरशाही स्वतःहून काहीही सांगायला तयार नसते, वा सांगितले तरी त्यात खोटे नाटे असू शकते. ते नागरिकांना कधीच मदत करत नाहीत. सरकारी कार्य़ालयात आपण गेल्यास ताटकळत तास न तास उभे राहून काम करून घ्यावे लागते. पाणी तर सोडा, बसण्याचीसुद्धा सुविधा नसते. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुमचे काही हक्क आहेत याची जाणीवच सरकारी ऑफिसमध्ये नसते. त्यामुळे आपल्या येथील इन्फ्रास्ट्रक्चरची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे असे म्हणता येईल.
वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या प्रथम क्रमांकावर नार्वे, दुसऱ्या क्रमांकावर स्विडन आहे. सर्वात शेवटी 180व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. पाकिस्तान आपल्यापेक्षा एका क्रमांकाने खाली आहे. तेथेसुद्धा परिस्थिती सुधारत आहे. चीन 176, श्रीलंका 131, नेपाळ 106, मालदीव 120, भूतान 94, बांगला देश 146 अशा क्रमांकावर आहेत. आपल्यापेक्षा भूतान वरचढ आहे.
या संस्थेने आपल्या अहवालात इंडिया टुडे या नियतकालिकेतील लेखाचा उल्लेख केला आहे. वार्ताहरांच्या विरोधातील हेट स्पीचचा त्यात संदर्भ आहे. समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत आहे. व या ट्रोलिंगमध्ये सत्ताधारी पक्षाचा फार मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या पक्षातील अनेक पगारी कार्यकर्ते समाज माध्यमावरील ट्रोलिंगमध्ये सहभागी आहेत. जे वार्ताहर स्वातंत्र्याचे पुरस्कार करत आहेत, त्यांच्या विरोधात हे ट्रोलिंग करणारे कठोरपणे टीका टिप्पणी करत आहेत.
वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या दिवशी आपल्या देशाची याबद्दलची स्थिती काय आहे याचा आढावा मला घ्यावासा वाटला. गेल्या चार वर्षात काय घडले हे सांगावेसे वाटले.

आभारः दि वायर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

या संदर्भातील लोकसत्ता मधील अग्रलेख आणि अक्षरनामावरील श्री निखिल वागळे यांचा लेख वाचनीय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अग्रलेखापेक्षा त्याखालिल प्रतिक्रिया अधिक बोलक्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोद दुआ यांनी मांडलेली बाजू अतिशय योग्य व वास्तववादी आहे. खरोखरच, आज देशांत असे वातावरण आहे. पण याला दुसरी बाजूही आहे. जे अनेक पेड पत्रकार, भाजपाच्या आणि कॉन्ग्रेसच्या पगारावर आहेत, त्यांच्याबद्दलही दुआ यांनी आवाज उठवावा. कित्येक घडलेल्या घटनांना, अतिशय विकृत स्वरुप देऊन त्या छापणे, सुपारी घेऊन एखाद्याची बदनामी करत रहाणे, इत्यादि अनेक कृत्यांमधे पत्रकारच सामील असतात. ठराविक दिवस गेले की एखादा, न सुटलेला प्रश्नही सोईस्कररीत्या बासनांत का गुंडाळला जातो, याची पण दुआ यांनी माहिती द्यावी. प्रसिद्ध व्यक्तींनाही काही खाजगी आयुष्य असते, याचा काही पत्रकारांना विसर पडलेला असतो. असे अनेक देसी पापाराझी इथे वावरत असतात. याबाबतीत, एक अनुभवलेले उदाहरण देतो.
शांता मोडक, या पूर्वीच्या जमान्यातल्या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्या आमच्या अगदी जवळच्या नातलगांतील आहेत.(आता या जगांत नाहीत.) त्यांना प्रवासांत, योगायोगानेच 'नथुराम' भेटला होता. यासंदर्भात, गांधी खून खटल्यात सर्व छापले गेले होते. त्यांनी स्वत:ही ही गोष्ट आम्हाला सांगितली होती. पुढे अनेक वर्षांनी, काड्या टाकणाऱ्या, एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकांत, ती स्टोरी उकरुन काढून, त्यांत त्यांना , 'ल्युसियस बिंबा', असे संबोधण्यांत आले होते. त्यांचा या खटल्याशी काहीही संबंध नसताना, त्यांना त्यावेळीच भरपूर मनस्ताप भोगावा लागला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी, पुन्हा त्यांच्यावर अशी राळ उडवण्यांत आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात घेतलेल एक नाव रोहिणी सिंग. यांचे उत्तर प्रदेश निवडणूकांच्या वेळचे ट्वीट, किंवा न्युज आर्टिकल इत्यादी पाहिली आहेत. समाजवादी पार्टीचा पद्धतशीर प्रचार करत होत्या त्या. इकॉनॉमिक टाइम्समध्ये कामाला होत्या त्या. पेड पत्रकारिता याचं मुर्तिमंत उदाहरण. उत्तर प्रदेश निकाल लागल्यावर लज्जेस्तव यांनी आधीचं अकाऊंट डिलीट केलं ट्विटरवरचं आणि काही महिन्यात नव्या अकाउंटने आल्या परत ट्विटरवर. आणि नंतर वायरमधुन जय शाह वगैरे ष्टोरींवर काम केलं.
(बादवे, या रोहिणी सिंगचा राडिया टेप्समध्येही उल्लेख आहे. )

गेल्याच आठवड्यात पत्रकार आणि तेहेलकाचे माजी सीईओ, उपेंद्र राय यांना अटक झाली आहे. ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीच्या अरोपात हे पत्रकार महाशय तुरुंगात आहेत. त्यामुळे केवळ मालक लोक चोर आहेत हे खरं नाही. वरीष्ठ पत्रकार सुद्धा चोर आहेत.

वागळ्यांच्या लेखात त्यांनी सोशल मिडीयाला शिव्या घातल्या आहेत. सोशल मिडियामुळे पत्राकारांना मालकांच्या जाचाशिवाय काय वाटेल ते म्हणता येतं. मालकांच्या जाचापासुन मुक्त करणाऱ्या सो.मी ला पत्रकार लोक नावं का ठेवतात हे अनाकलनीय आहे. ( केवळ लोक शिव्या देतात हे कारण पुरेसं वाटत नाही. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विनोद दुआ यांच्यावर मोदीविरोधी असल्याचा आरोप केला जातो. माझे अनेक मित्र असा दावा करतात.
पण पत्रकारांनी बिकाऊ किंवा पक्षपाती का नसावे याचं उत्तर मात्र कोणीही देत नाही.
माझं मत हे आहे की पत्रकारांनी व मिडिया कंपनीने अवश्य बिकाऊ किंवा पक्षपाती असावे. सिरियसली.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माझं मत हे आहे की पत्रकारांनी व मिडिया कंपनीने अवश्य बिकाऊ किंवा पक्षपाती असावे. सिरियसली.

यावर एकदा सिरियसलि लिहा.भविष्यात होणाऱ्या पत्रकारितेतील बदलाची ही नांदी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/