Skip to main content

शब्दांनो

पाह्यलंय तुम्हाला
जिज्ञासेचा तळठाव घेताना.
अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळताना.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावताना.
सत्याभासाच्या मृगजळातून ठिबकताना.
स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरताना.
क्षुद्रतेत बुजबुजताना.
कोलाहलात गजबजताना.
एकांतात निनादताना.
जाणिवेत- नेणिवेत अथक धपापताना.

अनघड शब्दांनो
वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.

तिरशिंगराव Sun, 05/08/2018 - 12:15

तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.

आणि तुम्ही(म्हणजे शब्दांनी, तुम्ही नव्हे) दुखावलेलं, रक्तबंबाळ केलेलं कोणासाठी ?

'न'वी बाजू Sun, 12/08/2018 - 03:14