दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे

या लेखाचा उद्देश “आपले गुगल अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे या बद्दल माहिती देणे” हा आहे. कारण इतर वेबसाईटवरचे अकाउंट हॅक झाले तरी सुद्धा आपले मुख्य गुगल अकाउंट सुरक्षित ठेवणे जास्त महत्वाचे आहे. एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड माहिती झाल्यास ते तुमच्या सगळ्या ईमेल डिलीट करू शकतात, तुमच्या नावाने इमेल्स पाठवू शकतात, तुमच्या बँकिंग अकाउंटचे पासवर्ड बदलू शकतात, किंवा तुम्हाला अकाउंट पासवर्ड परत करण्यासाठी खंडणी पण मागू शकतात.
आपले अकाउंट सुरक्षित ठेवण्याचा माझ्या मते सर्वात चांगला उपाय म्हणजे २ step authentication/verification - म्हणजे दुहेरी प्रमाणीकरण. यात तुमचा नेहमीचा पासवर्ड टाकावा लागतोच पण त्याचबरोबर एका अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही स्वतः लॉगिन करत आहात असं प्रमाणित करावं लागतं.



अशा प्रकारे दुहेरी प्रमाणीकरण आपल्या अकाउंट वर सुरु करून आपले गुगल अकाउंट आपण सुरक्षित ठेऊ शकता. गुगल प्रमाणेच फेसबुक वर सुद्धा दुहेरी प्रमाणीकरण उपलब्ध आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
एकच प्रश्न
त्यात लॉगिन केल्यावर आपल्याला दुहेरी प्रमाणीकरणाचे वेगवेगळे प्रकार दिसतात.
तुमचा स्क्रीक अनलॉक झालेला फोन कुणाच्या हातात पडला तर तो सरळ गुगल अकाउंट ॲक्सेस करू शकेल ना? (म्हणजे, तो सरळ जीमेल-ड्राईव्ह वगैरे ॲक्सेस करु शकेलच, पण ह्यापैकी एक ॲक्टिव्हेटेड असल्यास पासवर्डच बदलून, तुमचे सेकंडरी इमेल अकौंट आणि फोन नंबर उडवून अख्खं अकाऊंट ताब्यातच घेऊ शकेल ना? शिवाय गुगलही ह्या केसमध्ये हात वर करेल असं वाटतं.)
--
लेख छानच. एकेकदा सगळ्या गोष्टी वापरून पाहतो आणि सवडीने सविस्तर प्रतिसाद देतो.
तर तो सरळ गुगल अकाउंट ॲक्सेस
तर तो सरळ गुगल अकाउंट ॲक्सेस करू शकेल ना?
हो. पण पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड माहीत असावा लागतो, फक्त लॉग इन केलेला मोबाईल सापडून उपयोग नाही. आणि कोणी पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला तर वॉर्निंग इमेल/sms सुद्धा येतो. अजून एक सिक्युरिटी लेअर म्हणून म्हणजे फोन ला नेहमी पिन लॉक ठेवावे.
वा वा, कामाची माहिती.
वा वा, कामाची माहिती.