" स्वप्नामधली जमाडीजंमत "

कावळा करतो कुहू कुहू
कोकिळा करते काव काव
फोडते मांजर डरकाळी
वाघोबा करतो म्याव म्याव

पळे सर सर सर हत्ती
निवांत चाले हळू खार ती
कोल्होबा चिडीचूप बसतो
ससोबा गुरगुरगुर करतो

आरोळी उंदीरमामाची ती
वनराजाला वाटे भीती
माकड चाले जमिनीवर
कासवाची उडी झाडावर

आई छान सांगते गंमत
बंडू ऐके पेंगत पेंगत
रंगुनी जाई बघत बघत
स्वप्नामधली जमाडीजंमत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! कल्पना आवडली!
छोट्यांसाठी म्हणायची तर अधिक नादमय हवी होती असे वाटून गेले!

येऊ दे अजून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!