Skip to main content

मी तृषार्त भटकत असता

मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
अक्षांश आखुनी घेता
रेखांश निखळुनी गेले

शब्दांच्या निबिडामध्ये
सावली शोधण्या गेलो
पण अनाघ्रात शब्दांचे
धगधगते पलिते झाले

क्षण कणास जोडित जाता
वाटले विश्व लंघेन
पण वितान स्थळकाळाचे
भवताल कोंदुनी उरले