कवी ग्रेस यांचे निधन

ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज पुण्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या कवितेच्या वेगळ्या जातकुळीने मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांचे ललित लिखाणही काव्यात्म म्हणून रसिकप्रिय होते. संध्याकाळच्या कविता (१९६७), राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७) हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह. चर्चबेल (१९७४), मितवा (१९८७) हे त्यांचे ललितसंग्रह गाजले होते. मराठी माध्यमांनी त्यांच्या मृत्यूची दखल घेऊन आंतरजालावर प्रसिद्ध केलेले काही लेखः

झी न्यूजः दु:खाचा महाकवी गेला
स्टार माझा: कवी ग्रेस यांचं निधन
लोकमतने त्या निमित्तानं ग्रेस यांची एक पूर्वप्रसिद्ध मुलाखत दिली आहे. त्यात ग्रेस दुर्बोधतेविषयी म्हणतातः कोरडी भाकर घेऊन पळणारे कुत्रे सगळ्यांनाच सुबोध वाटते; त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन धावणारा नामदेव नेहमीच दुर्बोध असतो!
महाराष्ट्र टाईम्सने 'ग्रेस गेले... साहित्यातील 'माणिक' हरपलं!' ही बातमी आणि काही जुने लेख आपल्या संकेतस्थळावर दिले आहेत.
प्रहारमध्ये बातमी आणि एक मुलाखत ऐकता येईल.
लोकसत्ता: कवी ग्रेस यांचं पुण्यात निधन

ग्रेस यांना विनम्र आदरांजली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"ग्रेस माझे पाळण्यातले नाव नाही..त्यावेळी वारा सैरभैर झाला होता आणि बाजूच्या वेलींवर जळता कंदील कलंडला होता..रामदासाला एका नदीच्या ओसाड पात्रात माझी आई उभी असलेली दिसली. तिचे नाव सुमित्रा.. सौमित्र म्हणता मग मला? चंद्रउदयिनी वेळेतील काचेतून साजणवेळांच्या परसात पाउल टाकताच राम चालला जणू असे शिळेस वाटले आणि सर्पाच्या तरल स्पर्शाप्रमाणे आत्म्याच्या तळातून एक आठवण सरसरत वर आली.. एका मुसळधार पावसाच्या रात्री, परमुलुखात red river valley song ची हिंस्त्र करुण टेप ऐकली चर्च मध्ये..तेव्हापासून मेंदूची एकेक पाकळी गळतेच आहे.. आठवणी तरी कश्या... कुठल्याश्या संध्याकाळी एखाद्या जीर्ण मशिदीत कुराणाची शेवटची प्रत उजळत असावी तश्या.. नाही तरी कसे... दुखाची भरजरी तिरीप डोळ्यांवर चालून आली कि मी ही एखादा उखाणा घालतो.. वेदनेचे सुलभीकरण करण्यासाठी तिचा अपभ्रंश करीत नाही.. मी द्वैती, तपशीलाला महासिद्धान्ताचे रूप देण्याची ताकद माझ्याजवळ नाही.. मोडलेल्या प्रर्थानांची वीण उसविणारा एखादा फकीर मला सापडेल..."
- ग्रेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली

ग्रेस यांच्या 'संध्याकाळच्या कविता' अजूनही मनांत रेंगाळत आहेत.

तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो
आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…
"संध्याकाळच्या कविता" - ग्रेस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार

कवी ग्रेस यांना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेस यांना श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेघ हळुच ओढावी
टिम्ब ठेवूनही अन्ती
गीत अपुरे वाटते...

- ग्रेस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेस यांना विनम्र आदरांजली.

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा
-ग्रेस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0