Skip to main content

इथे माणूस मरतो

इथे माणूस मरतो
नंतर त्याचा धर्म ठरतो
मग सादर होतो अहवाल
सुस्त शासन अन् माध्यमे मस्तवाल
मग येतात फुत्कार चंगळवादी
प्रखर होतात जाणीवा राष्ट्रवादी
काथ्याकूट होतो बाजारू मानवतेचा
एकच दिवस असतो बौद्धिक निषेधाचा
जोशात भरले जातात वृत्तपत्रीय रकाने
चर्चा झाडल्या जातात तावातावाने
नको त्यांचा वधारला जातो भाव
उगाच उकरून काढतात जुनाट घाव
काही काळ असाच जातो निघून
शांततेचा चित्कार चौफेर घुमून
फुकाचे विचारवंत अन् चौकटीतले जगणे
ज्याचे त्याचे कर्म स्वतःचे तुंबडे भरणे
दुटप्पी माणूसकीचे अवशेष भग्न
सकल प्राणीमात्र रोजच्या दिनचर्येत मग्न

--भूषण वर्धेकर
9-10-2015
8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल
------------------------------------------------

'न'वी बाजू Mon, 03/09/2018 - 17:15

8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल

प्रगती नेत्रदीपक तथा आश्वासक आहे.

या ठिकाणी लवकरच '7:47 सकाळी, दौंडमधील माझ्या घरातील कमोडचे सीट' इतक्या बारीक तपशिलातील मजकूर दिसला, की नेत्रांचे पारणे फिटेल.

पुढील डेटलाइनीस शुभेच्छा.