Skip to main content

मीरा

काही क्षण असे येतात जेव्हा तू कुठेच नसतोस
काही क्षण असेही येतात जेव्हा फक्त तूच असतोस
शोधत राहते नजर तुला निद्रा जागृतीच्या पलिकडे
स्पर्शाची चिरतृष्णा व्यापून टाकते तनमनाचा अवकाश
तुझा विरह करतो सोबत चिरंतन आणि अविरत
मग भेटलास युगयुगांच्या अंतरानी तरी काय बदलणार आहे?

shantadurga Mon, 10/09/2018 - 15:00

आभार !
उज्ज्वला, author's privilege.