अजून एक नकार मोहोरला
khilaji
अजून एक नकार मोहोरला
तुझ्या वदनातून
रणशिंग फुंकिले परत
बाशिंग बांधिले गुढग्यावरी
राबल्या मोहिमा अनेक
शोधण्या पौर्णिमेस
चंद्रमुख दुरापास्त ते
ओसाड गल्ली अन सारे रस्ते
झिजली पाऊले झिजले मन जरी
तसूभरही प्रेम ढळले नाही
त्यांच्या हर एक नकारात
उदय नव्या प्रेमाचा
मी प्रेम शोधिता
नकार मोहरतो
हृदयात साठवून त्यास
पुन्हा प्रेम शोधितो
सिद्धेश्वर विलास पाटणकर
@ पुंबा
धन्यवाद मित्रा , आणि एक नम्र विनंती , मला " सर " हि पदवी नकोय . माझी तेव्हढी लायकी नाही . मला तुझ्या जवळच्यापैकीच एक समज ... मला ऐसी हे मिपा वाचनातून गवसले . त्यामुळे मी मिपाचा सदैव ऋणी राहीन .
हे " खवचट " नामांकन म्हणजे काय असते .. मी नवीन आहे म्हणून विचारतोय ... ते कसे देतात ? जरा प्रकाश टाकावा ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
खिल्जीसर, आपणाला ऐसी
खिल्जीसर, आपणाला ऐसी सापडल्याबद्दल अभिनंदन!!