Skip to main content

पहिल्यांदा दारू बिअर पिल्यावर झालेल्या अभिक्रिया!

पहिल्यांदा दारू बिअर पिल्यावर झालेल्या अभिक्रिया!
आणि तो दिवस आलाच. सर्वसाधारण पणे बहुतेकांच प्रथम मद्यसेवन दुसऱ्या कोणाच्या इच्छेने/पैशाने होते, परंतु आम्ही सर्वसाधारण नसल्याने स्वखर्चाने व स्वतःचे धन वापरून मद्यपान केले.
बिअर भयंकर कडवट असल्याने आम्ही बिअर+7ul (५०:५०) मिश्रण बनवले.
बिअर पिल्यानंतर आमच्यावर झालेल्या अभिक्रिया. वेळ रात्री ९-१०
१) विचार करायचा वेग वाढलाय अस वाटू लागलं.(म्हणजे नेहमी एका वेळी डोक्यात १-२ स्वतंत्र विचार चालू असतात, पिल्यावर ४+ विचार चालू लागले)
२) हाताचा / चेहऱ्याचा रंग हलकासा लालसर झाला. (बाहेर असल्याने शरीराचे एवढेच अवयव दिसत होते)
३)पिल्यावर नियंत्रणाबाहेर लघवीला झाली.
४) कार्यक्रम झाल्यावर नेहमी पेक्षा कमी जेवण करू शकलो. (मित्राने यापुढे जेवताना पिण्याचा सल्ला दिला).
५)पिऊन झाल्यावर घरी फोन लावला आणि तो रेकॉर्ड केला. दोन दिवसानंतर रेकॉर्डिंग ऐकताना जाणवलं कि काही शब्दांचे उच्चार चुकलेत उदा संशयास्पद-शंशयास्पद.
६)झोपल्यावर रात्री (१-२ च्या सुमारास) पोटात आग पडू लागली. बिस्कीट वैगेरे खाल्यावर थोडी शांत झाली, पण रात्रभर झोपू शकलो नाही.(वैद्यकीय जाणकारांनी प्रकाश टाकावा).
तात्पर्य- स्वतःचे (कष्टाचे) पैसे वापरून, पोटात आग करणारे, जेवण कमी करणारे व लघवी वाढवणारे कडवट द्रव्य पिण्यात काहीही अर्थ नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/09/2018 - 18:41

"हे असलं काही द्रव्य एवढ्या लोकांना तोंडात घालण्यालायक का वाटतं? वाईनच बरी."

अबापट Sun, 23/09/2018 - 21:02

भ कु ? कुठल्या बार मध्ये गेला होतास ? बीअर डायल्यूट करायची नसते. त्यामुळे कडवटपणा कमी वगैरे होत नाही..अवयव वगैरे लाल होत नाहीत ( दुसरे काही कारण असेल आणि तू बिल याच्या वर फाडलास.
कुठल्याही प्रकारची दारू प्यायलीस तरी लघवी जास्त प्रमाणात होते, त्यात प्रॉब्लेम काही नसतो.(मद्य माईल्ड diuretic असते)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/09/2018 - 02:05

In reply to by भटक्या कुत्रा

दारूमुळे तात्पुरतं शरीरातून बरंच पाणी बाहेर टाकलं जातं. दुसऱ्या दिवशी तहान-तहान होणं नॉर्मलच असतं. दारूसोबत किंवा दारूनंतर बरंच पाणी प्यायलं तर दुसऱ्या दिवशी हँगोव्हरचा त्रासही खूप कमी होतो. मला व्यक्तिशः वायनींमुळे अधिक पाणी प्यावंसं वाटतं; व्हिस्की, मार्गारिटा (टकिला) पिऊन एवढं होत नाही.

माझ्या ओळखीतले जे लोक हौसेनं वारुणी पितात, त्यांतल्या बहुतेकांना बियर आवडत नाही. बियरवाल्यांना वारुणी आवडत नाही.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 05:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसऱ्या दिवशी हँगोव्हरचा त्रास

यावर उत्तम उपाय (ट्राइड अँड टेस्टेड): भरपूर बर्फ, लिंबाचा रस आणि किंचित मीठ घातलेला क्लब सोडा. (इन्स्टंट रिलीफ.)

(अर्थात, दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर आल्यावर घ्यायचा. प्रतिबंधक उपाय नव्हे.)

तिरशिंगराव Mon, 24/09/2018 - 13:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बियरवाल्यांना वारुणी आवडत नाही.

आम्हाला बिअरपासून रमपर्यंत सर्व पेये आवडतात. योग्य काळजी घेतली तर, याचा कुठलाही दुष्परिणाम, आजतागायत जाणवलेला नाही.

अबापट Mon, 24/09/2018 - 06:51

In reply to by भटक्या कुत्रा

मराठा मध्ये गेलास तर चखणा म्हणून कांदा/बटाटा भजी खाल्ली नाहीस का ? शिवाय स्क्रिन वर कुठली जुनी हिंदी गाणी दाखवत होते?
तू लाल झालास असे म्हणणार्याचेच ( अति पिऊन ) डोळे लाल , झाले नव्हते ना ?
आणि एवढ्याश्या बिअर ने हँग ओव्हर वगैरे येत नाही.

गवि Mon, 24/09/2018 - 07:05

In reply to by अबापट

आंतरजालावर शोधल्यास दिसेल की किंचित अल्कोहोलनंतर स्किन लाल होणं, फ्लश वगैरे चिन्हे ही वॉर्निंग साईन्स असू शकतात. मुख्यतः पूर्व आशियात, पण भारतीय आणि उपखंडातही काही जेनेटिक घडणीमुळे काही लोकांना हा त्रास होतो. या लाल होण्याच्या सिग्नलवरून अनेक रिस्क फॅक्टर्स असतात. ती शक्यता पडताळून पूर्ण बंद ठेवणं सुरक्षित ठरु शकतं. केवळ एक शक्यता.

भटक्या कुत्रा Mon, 24/09/2018 - 08:30

In reply to by अबापट

ममवि जागृत असल्याने कोपऱ्यात बसलो होतो. दारू पिताना चखणा का खातात हा पण संशोधनाचा विषय आहे. मग केवढ्या बिअर ने हैगव्हर येतो?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/09/2018 - 20:37

In reply to by भटक्या कुत्रा

साधारणतः आपलं वजन आणि दारू पितेवेळी पोट किती भरलेलं/रिकामं आहे यावर अवलंबून असतं.

माझं वजन सध्यापेक्षा १० किलो जास्त होतं तेव्हा दोन पेले वारुणी चालून जात होती. आता रिकाम्या पोटी अर्धा पेला घेतला तरी टिप्सी होते. खाल्लं असेल तर पेलाभर पिऊन टिप्सी होते. दारू संपवल्यानंतर निदान तासभर तरी गाडी चालवत नाही.

मला अर्धा पेला वारुणीचाही हँगोव्हर येतो; व्हिस्कीचा त्रास कमी होतो. बियरही पुरेशी घेतली तर चढते, तिचाही हँगोव्हर येतो. हँगोव्हर म्हणजे दुसऱ्या दिवशी डोकं दुखणं, फार तहान लागणं, लक्ष लागण्यासाठी फार कष्ट करावे लागणं, असं काहीही असू शकतं. हँगोव्हर न येण्यासाठी आणखी एक उत्तम उपाय म्हणजे सकाळी उठून (आपापल्या मानानं) चिकार व्यायाम.

तरुण असाल तर एकदातरी फुल्ल चढेस्तोवर पिऊन पाहाच, असा माझा सल्ला. असे अनुभव एकेकदा घेऊन बघावेत. हे असं काही करताना आपल्या किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींच्या घरी असलेलं बरं. म्हणजे चढल्यावर घरी जायचंय, गाडी चालवायच्ये असली काळजी कोणालाच लागणार नाही.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 04:56

In reply to by अबापट

अवयव वगैरे लाल होत नाहीत ( दुसरे काही कारण असेल आणि तू बिल याच्या वर फाडलास.

त्यांना सेवनअपची अॅलर्जी असेल कदाचित...

गब्बर सिंग Sun, 23/09/2018 - 21:14

मय से नहलाना मेरी मय्यत को
दफ्न करना मुझे मयखाने में
.
बियर भयंकर कडवट असते ? खरंच ? मला तरी तसं काही कधीच वाटलं नाही.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/09/2018 - 21:27

In reply to by गब्बर सिंग

लोक मला बऱ्याच गोष्टी चाखायला देतात. 'तिखट नाही', 'मसालेदार नाही' किंवा 'अतिगोड नाही' म्हणत. बहुतेकदा मी पस्तावते.

गब्बर सिंग Sun, 23/09/2018 - 21:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पटतंय.
स्पायसी म्हंटलं की माझी व्याख्या अनेकविध मसाले घालून केलेला पदार्थ.
इथे अमेरिकेत स्पायसी ची अनेकांची व्याख्या "जास्त मिरची असलेला पदार्थ".
.

गब्बर सिंग Sun, 23/09/2018 - 22:10

In reply to by भटक्या कुत्रा

जाताजाता -
(मोरलायझिंग मोड)
(पॅराफ्रेज्ड्) : दारू सोडण्याची एकच वेळ असते ती म्हणजे... पहिला घोट घेण्यापूर्वी ___ सुधाकर (एकच प्याला).
.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 03:58

In reply to by गब्बर सिंग

'एकच प्याला' लिहिणारे गडकरी स्वतः मजबूत प्यायचे, असे ऐकून आहे.

(किंबहुना, 'एकच प्याला'चे सेंट्रल कॅरेक्टर सुधाकरास किंवा सिंधूस न मानता तळीरामास मानले, तर 'एकच प्याला' हे मुळात दारूविरोधी नाटक नाहीच, असे लक्षात येऊ लागते, असा काहीसा हायपॉथेसिस पु.लं.नी आपल्या गडकऱ्यांच्या 'पुनर्मूल्यमापना'त मांडला होता, असे कायसेसे अंधुकसे आठवते.)

पुंबा Sun, 23/09/2018 - 23:01

भकु, तात्पर्य फनी आहे. आम्हीसुद्धा अगदी हेच तात्पर्य काढले होते बरं का. उपयोग होत नसतो. त्यापेक्षा वेगवेगळे प्रकार ट्राय करणे श्रेयस्कर.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 03:11

५)पिऊन झाल्यावर घरी फोन लावला आणि तो रेकॉर्ड केला. दोन दिवसानंतर रेकॉर्डिंग ऐकताना जाणवलं कि काही शब्दांचे उच्चार चुकलेत उदा संशयास्पद-शंशयास्पद.

(१) पिऊन झाल्यावर घरी फोन लावणे बोले तो नक्कीच चढली असली पाहिजे.
(२) त्यात पुन्हा वर तो रेकॉर्ड करणे!
(३) फोनवर बोलताना 'संशयास्पद'सारखे शब्द कोण वापरतो? (आज 'संशयास्पद' म्हणताय; उद्या 'एकसमयावच्छेदेकरून' म्हणाल!)

तात्पर्य: हात् साला! याला बियरसुद्धा चढते!

भटक्या कुत्रा Mon, 24/09/2018 - 05:18

In reply to by 'न'वी बाजू

१)लेखक एकल असल्याने फक्त घरीच फोन लावतात.
२)हा सर्व एका प्रयोगाचा भाग असल्याने सर्व काही पूर्वनियोजित होत.
३)लेखकाला एका नोकरी देणाऱ्या संस्थेचा फोन आलेला पण त्या गोड बोलणाऱ्या आवाजात काहीतरी संशयास्पद वाटत होत.
तात्पर्य:

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 03:17

२) हाताचा / चेहऱ्याचा रंग हलकासा लालसर झाला. (बाहेर असल्याने शरीराचे एवढेच अवयव दिसत होते)

(बाहेर असल्याने हाताचा रंग दिसला, हे समजू शकतो, परंतु) चेहऱ्याचा रंग नक्की कसा काय दिसला?

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 05:15

In reply to by भटक्या कुत्रा

...तुम्ही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवलात?

ते तुमची खेचत असू शकतील, ही शक्यता तुमच्या मनाला चाटूनसुद्धा गेली नाही?

(फारच बुवा भोळे तुम्ही!)

भटक्या कुत्रा Mon, 24/09/2018 - 05:21

In reply to by 'न'वी बाजू

पूर्व-अनुभवावरून असं माहित आहे कि दारू पिणारे खोट बोलत नाही. आणि पिल्यावर त्याच्या मुखातून सत्य बाहेर काढणे सोपे असते.

गब्बर सिंग Mon, 24/09/2018 - 06:26

In reply to by भटक्या कुत्रा

बिअर सुद्धा दारूच आहे.

.
जोरदार सहमती.
.
बियर ला दारू न म्हणणे हे - मी जी काही दारू पिली ती फार काही सिरियस बाब नव्हती - हे बायकोला/मातोश्रींना पटवून देण्यासाठी - बियर चे चारित्र्यहनन करून तिची एहमियत कमी करण्याचा उद्योग करणे आहे.
.
.
बियर चे विशेष स्थान आहे दारूच्या विश्वात. आम्ही ह्या - बियरची एहमियत करण्याच्या उपद्व्यापांचा - जोरदार निषेध करतो.
.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 07:10

In reply to by भटक्या कुत्रा

...एका बियरमध्ये कोणी सत्यवादी हरिश्चंद्र बनण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.

(अर्थात, हरिश्चंद्र बियर ढोसून सत्यवादी बनत होता, असा आमचा मुळीच दावा नाही. आणि, (नीट) सत्यवादाची नशा तथा व्यसन दोन्हीही दारूच्या अनुक्रमे नशा तथा व्यसनापेक्षा कित्येक पटींनी पॉवरफुल असतात, याचीही आम्हांस कल्पना आहे. परंतु तरीही.)

..........

दारू न मिसळलेल्या.

चिमणराव Mon, 24/09/2018 - 06:26

पुन: प्रयोग करावासा वाटला नाही का?
स्वधनावर वारुणी,व्होडका,मोसंबि,गावठी इत्यादि प्रयोग करावेत असे सुचवतो.
तुमच्या प्रयोगात फा र प्रामाणिकपणा भरलेला जाणवतो, विश्वासार्ह डेटा मिळेल.

'न'वी बाजू Mon, 24/09/2018 - 07:01

In reply to by चिमणराव

... 'भटक्या गिनीपिग' किंवा 'भटक्या पांढरा उंदीर' असा बदलावा लागेल.

प्रयोग होतात तुमचे...

(आणि, 'स्वधनावर', हं? वस्ताद!)

भटक्या कुत्रा Mon, 24/09/2018 - 08:22

In reply to by 'न'वी बाजू

जर कोणी स्वधनानी नव नवीन चवी चाखत असेल तर ती त्याची फक्त निव्वळ 'न'वी बाजू असू शकते. त्यासाठी आयडी बदलण्याची गरज नसावी

अबापट Tue, 25/09/2018 - 05:21

In reply to by चिमणराव

आचरट बाबा , भ कु , हे मौजे दारएससलाम येथे रहात असल्याने त्यांना सध्या मोसंबी , संत्रा वगैरे वस्तूंचा आस्वाद घेणे अवघड असावे.
( यांना भेटल्यावर हे कधी बिअर /मद्य पीतील असे वाटले नव्हते.नाहीतर तेव्हाच मराठा मध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वगैरे केले असते. उगा त्या उडप्याकडे गेलो
असो)

भटक्या कुत्रा Tue, 25/09/2018 - 06:13

In reply to by अबापट

परत कधी इकडे भेट झाली तर नवीन विषयावर प्रयोग करू. येताना चितळेंच्या मिठाई ऐवजी भाकरवाडी आणावी, कारण चखणा या विषयावर स्वतंत्र संशोधन करण्याचा मानस आहे.

चिंतातुर जंतू Mon, 24/09/2018 - 10:19

बिअर भयंकर कडवट असल्याने आम्ही बिअर+7ul (५०:५०) मिश्रण बनवले.

ह्याला शँडी म्हणतात बहुतेक.

तुमचा अनुभव गोड आहे, पण तुम्ही वर्णन केलेल्या तुमच्या स्थितीवरून असं वाटतं की तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा दारू पिण्याचं काही प्रमाणात टेन्शन आलं होतं. पुन्हा हाच प्रयोग करून पाहा, पण अधिक रिलॅक्स होऊन.

चिमणराव Mon, 24/09/2018 - 10:52

स्वधनाने अथवा प्रायोजित, जे काही प्रयोग अनुमाने काढून प्रसारित करताहात इथे ते लेखात आल्यास मराठी विकिसाठी संदर्भ देता येतील.

बिटकॉइनजी बाळा Mon, 24/09/2018 - 12:07

मागच्या महिन्यात घरी एकटा असताना जवळपास अर्धी बाटली व्होडका प्यायलो. डोळे गरागरा फिरत होते. आडवं होण्याआधी खूप प्रमाणात डीहायड्रेशनकी काय झाले. तसल्या धुंदीत पाणी पाणी करत नळाला तोंड लावले, जवळच्या ॲम्बुलन्सचा नंबर टाईप करून ठेवला, दरवाजा उघडा ठेवला. घरभर उलट्या करून गॅलरीत अंगावरचे सगळे कपडे काढून आडवा झालो. ॲम्बुलन्स बोलवावी लागली नाही, हेच नशीब.

भांबड Mon, 24/09/2018 - 20:19

हळूहळू प्रगती करा.
पहिल्या वेळेसचे मद्यप्राशन बाधले नव्हते.
पहिल्यावेळेसचे काॅकटेल मात्र कुच्चळ होते.
कॅनन बिअर+हावर्ड क्वार्टर+भिंगरी= हाॅटेल ते हाॅस्टेल फक्त उलट्या

राजेश घासकडवी Tue, 25/09/2018 - 06:19

अभिक्रिया हा शब्द फारच आवडला. रासायनिक काहीतरी घडतं आणि त्यातून काहीतरी प्रेसिपिटेशन आपोआप होतं, हे चित्र छान उभं राहिलं.

अबापट Wed, 26/09/2018 - 12:45

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब , असं काही सांगू नका राव , गोमूत्राचं मार्केटिंग होतंय !!! ( गोलागर , गोपिल्सनर , गोएल वगैरे पतंजली चे भावी ब्रँड डोळ्यापुढे येऊ लागले ) चांगली बिअर घ्यायची असेल तर भेटा अथवा लिहा ...

khilaji Wed, 26/09/2018 - 18:51

देशी प्यायला चालू करा , कडू गॉड आंबट तुरट , सर्वांचं जालीम मिश्रण हाय . देशी प्यायलात तर एकाच नजरेने दुनियेला बघाल , विरक्त जीवन जगाल , थोर विचारवंतही तुमच्या विचारांत सामावले जातील आणि दुनियेवर राज्य कराल . स्वतःच्या पैश्याने प्यायलात तर त्यासारखे सुख नाही आणि आमच्यासारख्याना पण पाजलीत भविष्याची रुखरुख नाही .. सर्व कसं आमच्या आशीर्वादाने रेडकार्पेट टाकून मिळेल .. बसायचं कधी तेव्हढं सांगा

आडकित्ता Sat, 29/09/2018 - 13:40

एकंदर किती बियर प्याला होतात ते लिहिले असते तर तुमच्या क्रिया अन अभिक्रियांचे विच्छेदन अधिक योग्यपणे करता आले असते.

हँगोव्हरचे कारण डीहायड्रेशन हे असते. शरीरातून फेकून देण्यासारखे पाणी उरले नाही की मेंदूभोवतीच्या रसातूनही पाणी खेचून बाहेर काढले जाते, यामुळे प्रचंड डोकेदुखी होते. इतर लक्षणांत तोंड कोरडे पडणे, त्याची चव जाणे, हृदयाचे ठोके वाढणे. हातापायाची थरथर इ. होतात. दारूसोबत भरपूर पाणी पिणे हा अर्थातच इलाज आहे.

दारूसोबत तेलकट/खारट चखना खाण्याचे कारण म्हणजे पोटात असलेले या प्रकारचे पदार्थ अल्कोहोल् जठरातून रक्तात शोषले जाण्याचा वेग मंद करतात. ज्यामुळे भस्कन चढत नाही, अन दुसरे म्हणजे भरल्यापोटी ॲसिडीटी थोडी कमी होते. खारट चवीने पाणी प्यावेसे वाटते, व चवी एन्हान्स होतात.

लघवीला भरपूर होणे काहीवेळा चांगलेही असते. उदा. बारीकसारीक मुतखडे त्यामुळे निघून जातात. हार्ड वॉटरच्या प्रदेशात हा एक प्लस पॉइंट आहे.

बियरची चव हा आवडण्याचा प्रकार आहे. शक्यतो सुरुवात करताना माइल्ड ड्राफ्ट बियरने करावी. आपल्यात चांगली 'चढली' पाहिजे उर्फ पैसे वसूल करण्यासाठी स्ट्राँग बियर पिण्याचा प्रघात आहे, जी चांगलीच कडू असते. बियरचे प्रकार अन त्यांच्या चवी यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन, सध्या ,

तात्पर्य- स्वतःचे (कष्टाचे) पैसे वापरून, पोटात आग करणारे, जेवण कमी करणारे व लघवी वाढवणारे कडवट द्रव्य पिण्यात काहीही अर्थ नाही

↑ हे वाचून कीप इट अप व अजिबात पुन्हा कोणत्याही दारूला शिवू नका असे सुचवतो.

सामो Sat, 29/09/2018 - 17:21

In reply to by आडकित्ता

हे वाचून कीप इट अप व अजिबात पुन्हा कोणत्याही दारूला शिवू नका असे सुचवतो.

:) :) धन्यवाद डॉक्टर.
हा उपरोध नाही. दारुच्या उदात्तीकरणावर हे एक साधं उत्तर आहे - दारुच्या आहारी जाण्याची शक्यता खूप असते.

khilaji Mon, 01/10/2018 - 13:12

In reply to by आडकित्ता

सुंदर आणि सहजसोप्या भाषेत दिलेले स्पष्टीकरण आवडले गेलेलं आहे .. दारूबाईचा तमाशा नाहीतरी दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो थांबवणे गरजेचे आहे . आपले सहजसोपे लिखाण मी आमच्या इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर पेट्सवत आहे . धन्यवाद ...

'न'वी बाजू Mon, 01/10/2018 - 16:37

In reply to by khilaji

आपले सहजसोपे लिखाण मी आमच्या इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर पेट्सवत आहे .

पहिल्या वाक्यापासून, किंवा कसे?

("एकंदर किती बियर प्याला होतात ते लिहिले असते तर तुमच्या क्रिया अन अभिक्रियांचे विच्छेदन अधिक योग्यपणे करता आले असते" हे इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर? नक्की कोणाला उद्देशून?)

(उलटपक्षी, पहिले वाक्य वगळून, "हँगोव्हरचे कारण डीहायड्रेशन हे असते"पासून सुरुवात केली, तर "ही अनसॉलिसिटेड माहिती नक्की कशासाठी?", असा प्रश्न पडू शकेल.)

(नाही, आडकित्ता यांच्या प्रतिसादास आक्षेप नाही; तो प्रतिसाद सुस्थानीच आहे. परंतु त्याचे असे औट-ऑफ-कॉण्टेक्ष्ट वाटेल तेथे पेस्टविणे रिडिक्युलस ठरू शकेल, एवढेच सुचवू इच्छितो. साधारणत:, त्याच मार्गदर्शक फळ्यावर "निरोध वापरा" असा संदेश डकविण्याइतकेच. आणि नाही, त्याही संदेशात गैर असे काहीच नाही. बाकी चालू द्या.)

चिमणराव Sat, 29/09/2018 - 21:25

>>-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :->>

कित्ती दिवसांनी वाचतोय हे!!
धान्याचीच दारु होते ,नट्सची नाही हे फार बरं नाही का?