"रॅम्बो" चे नाटक बंद झाले

रामभाऊनि ठरवलं एकदा

बदलून पाहूया नाव

करून टाकूया इंग्लिश बारसे

बघू काय बोलतंय ते गाव

काय ठेवूया , खलबते झाली

भरपूर नावे समोर आली

रजनीकांत आवडत असूनही

"रॅम्बो" चा झाला लिलाव

रामभाऊ आता रॅम्बो झाले ,

रॅम्बोबरोबर धोतरहि सुटले

टोपीसंगे सदरेपण विकले

जीन्स घालुनी उघडबंब ते

सांजसकाळी फिरू लागले

झटावून त्या गावगुंडांशी

दशावतार ते समजू लागले

खिशात पिस्तुल अन बनुनी धनुर्धर

नीट वागा नाहीतर करेन मर्डर

अंग देखण्यालायक त्यांचे

हाडांची काडं अन पातळ "ब" ओचे

त्यात लटकती जीन्स ती कोरी

खांदे उडवत चाले स्वारी

चर्चा झाली पंचक्रोशीत

स्वारी आली भलतीच खुशीत

मूठभर अजून मांस ते चढले

बघता बघता पोलिसांशी भिडले

इकडून तिकडून फैरी झाडल्या

दोन चार ढुंगणावर लागल्या

लाथाबुक्के असे काही बसले

धुवायचे पण वांदे झाले

रॅम्बो मेला , रामभाऊ परतले

"रॅम्बो" चे नाटक बंद झाले

अजूनही आहेत त्या जीन्सला भोके

धुवायला वेळ लागतो , पण आता आहेत ओके

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

field_vote: 
0
No votes yet