चाहूल..
Dr. Medini Dingre
चाहूल..
त्यावेळी विखरुन टाकल्या
त्या काटक्या अजून तशाच..
वाराही त्यानंतर फिरकलाच नाही काय?
तिन्हीसांजा उतरताना
कणाकणाने सावल्या दाटताना
झाडांच्या ओळखी पुसून
फक्त खुणाच उरताना
रेषारेषांनी सजताहेत
आठवणींच्या आकृत्या
पाखरांनाही आता अलगद उतरायचंच आहे
दिवस निवताना
निवार्र्याचा शोध घेऊन
डोळे मिटून आश्वस्त
थारा घेत थांबायचंय
आत्ता या क्षणी
इथेच मुक्कामी..
चाहूल थोडी आत..
थोडी बाहेर..
जागृती की स्वप्न ?
दोन्हीच्या कडा
एकमेकांत आत आत
सामावून जाताना
मधूनच टोचतेय
पानाआडच्या काट्याची धार
चंद्र पण नेमका
उगवतोय
तेव्हाच..
चाहूल लेऊन संपूर्णाची
पौर्णिमा ठेपलीय
येऊन केव्हाची..
कविता
कविता अतिशय आवडली.