कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम)

पहिल्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास बघितला दुसर्‍या भागात (भाग २) टकीलाचे विवीध प्रकार बघितले आता ह्या अंतीम भागात टकीला तयार करण्याची चित्रमय झालक आणि टकीला प्यायची पद्धत बघूयात.

टकीला तयार करण्याची प्रक्रिया (चित्ररूपात)

अगावेचे फळ (piñas) भट्टीत भाजण्यासाठी दोन तुकड्यांमध्ये तोडले जाताना
भट्टीत भाजले जाणारे अगावेचे फळ
भाजलेले फळ श्रेडरमध्ये टाकले जाताना.
भाजलेला आणि श्रेड केलेला अगावेचा गर
भाजलेला गर भरडण्यासाठी कन्वेअर बेल्ट वरून जाताना
भाजलेला गर भरडण्याचा पारंपारिक दगड
गर भरडून होणारा रस फर्मेंटेशन टॅंक मध्ये जाताना
फर्मेंट केलेला रस डिस्टीलेशन प्रोसेसमध्ये
मॅनुअल टकीला क्वलिटी कंट्रोल प्रोसेस
डिस्टीलेशन नंतर ओक कास्कमध्ये मुरवत ठेवलेली टकीला

टकीला शॉट घ्यायची पद्धत

टकीला पिताना मीठ आणि लिंबू खुप महत्वाचे आहे. चव बहारदार होण्यासाठी.

टकीला शॉट मारण्याआधी थोडे मीठ हात उपडा करून त्यावर टाकून ते चाटून घ्यायचे. ह्या मीठामुळे जीभेवरील पॅलेट्स (मराठी शब्द ?) टकीलाच्या चवीसाठी तयार होतात. त्यानंतर टकीला शॉटसाठी 45 मिली टकीला शॉट ग्लासमध्ये घेऊन झटकन एका दमात गिळून टाकायची. शॉट गिळताना टकीला पडजिभेवर आदळू द्यायची त्याने टकीलाचा गंध (अरोमा) दरवळून, स्वाद आणखिन खुलवतो. त्यावर लिंबाची फोड घेऊन, चोखून तीचा रस जिभेवर पसरू द्यायचा.
आता जी एक मस्त ब्रम्हानंदी टाळी लागेल तीची अनुभूती घेत घेत दुसरा शॉट भरण्याच्या तयारीला लागायचे. Smile

आता एक थोडी चावट पद्धत. Smile

टकीला बॉडी शॉटची पद्धत

साहित्यः
टकीला : ४५ मिली
लिंबाची फोड
मीठ
आणि सर्वात महत्त्वाचे ती, प्रेयसी किंवा सखी, ह्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे.

कृती:
१. थोडे मीठ तिच्या खांद्यावर नीट काळजीपूर्वक पसरावे.
२. लिंबाची फोड तिच्या ओठात ठेवावी.
३. आता तिच्या खांद्यावरील मीठ जिभेने हळूवार चाटून घेऊन झटकन टकीला शॉट घेउन गट्टम करून टाकावा.
४. त्यानंतर तिच्या ओठात ओठ मिसळून रस येई पर्यंत ( लिंबाचा बरं का ) किस करावा.
Smile

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(समाप्त)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सचित्र लेख आवडला.

कदाचित "फळ" म्हणण्यापेक्षा "बुंध्याचा गाभा" म्हणता येईल.

स्पॅनिशमधले "piña" (अननस) हे नावही चित्रदर्शी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बरोबर नाही स्टेप बाय स्टेप फोटो टाकायचा सरतेशेवटी असा कंटाळा नाही करायचा!!

बाकी लवकर एक पुस्तक प्रकाशित कराच!! निदान इ-बुक तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोला गुर्जी सोकाजी यांचा विजय असो, विजय असो, विजय असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम मुरलेल्या उंची दारुसारखी कुलीन लेखमाला. एखादी शास्त्रीय संगीताची मैफल ऐकावी तशी वाचतो आहे.
पॅलेटस - रसग्रंथी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

येस्स! रसग्रंथी, चालेल.

पण हे असे मराठी शब्द प्रचलित नसल्यामुळे का कोण जाणे जीवशास्त्राच्या पुस्तकातले शब्द वाचल्यासारखे वाटतं. Smile

- (जीवशास्त्र अजिबात न आवडणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हंटात माहिती + मनोरंजन Wink
धुंद-सोकाजींचा विजय असो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोकाजी गुर्जी लेखमाला आवडली ..

एकदम झक्कास ..

तेवढे टकीला शॉट घेण्याच्या विविध प्रकारांचे फोटू टाका .. बघा जमलं तर ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

टकिला शॉट्स हा आमचा अत्यंत आवडता प्रकार आहे हे आम्ही पहिल्याच भागात जाहीर केलेलेच आहे, आता तर खूपच आवडायला लागला आहे. Smile
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0