नागार्जुन यांच्या तीन कविता

१. मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा

मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा
ते माझा लिलाव करतील
मला घेऊन जाईल
एखादा चतुर टांगेवाला
डोळ्यांवर रंगीत झापडे चढवील
आणि म्हणत राहील

पुढे चल बेटा
सरळ चल...
सरळ.....

. हे जे एन यू

नवयुवक नवयुवतींच्या
मनमोकळ्या खेळांचे प्रांगण
हे जे एन यू

मी खरं ते सांगून टाकू का ?
ही अतिशय चांगली जागा आहे
फारच चांगली
अजून काय म्हणू

मी विचार करतोय की मीही प्रवेश घेऊनच टाकतो
'तिबेटीयन' निवडायला कुणी कशाला आक्षेप घेईल
डॉ़क्टर बिमला प्रसाद
डॉक्टर नामवर
डोक्टर मुजीब
मला रेकमेंड करतीलच
मग माझा पुन्हा एकदा उपनयन संस्कार होईल
वसतीगॄहात एक खोली मिळूनच जाईल
शिष्यवृत्तीची देखील व्यवस्था होऊन जाईल
शाब्बास ! बेटा अर्जुन नागा

मी विचार करतच जातोय,
असं काय पडलंय या जागेत
खरंतर ही जागा आहेच मोठी शानदार
जे. एन. यू.,जे. एन. यू.,जे. एन. यू.,

३. त्या दुपारी

तुझी इच्छा असेल चीनला जाण्याची
तर मी व्यवस्था करून देतो!
- मला त्यांनी एकांतात सांगितलं होतं
ही खूप वर्षांपुर्वीची गोष्ट आहे
त्यावेळी मला थोडं रोमांचित झाल्यासारंख वाटलं होतं
नंतर थोडं हसूही आलं होतं

त्यांनी मला खरंच
पाठवून दिलं असतं
चीनच्या सीमेत
त्या नेहरू युगाच्या दुपारी

नागार्जुन

(* या कवितांचा या आधी मराठीत अनुवाद झाला आहे की नाही ते मला ठाऊक नाही. झाला असल्यास हा एक निव्वळ योगायोग समजावा. नागार्जुन यांच्या 'आमि मिलिटरिर बुडो घोडा' या बंगला संग्रहाचा हिंदी अनुवाद शोभाकांत यांनी केलेला आहे.दिल्लीच्या वाणी प्रकाशनाने हा अनुवाद छापला आहे. प्रकाशक आणि अनुवादक दोहोंचे आभार.
नागार्जुन मोठे कवी होते. त्यांच्या कविता वाचणे आणि अनुभवणे ही त्यातल्या त्यात एक विलक्षण प्रक्रिया आहे एवढे या निमित्ताने म्हणावेसे वाटते)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या कविता कोणत्या वर्षी लिहिल्या गेल्या आहेत याबद्दल काही माहिती आहे का तुमच्याकडे? विशेषतः 'जे. एन. यू.' कधी लिहिली आहे याबद्दल मला कुतूहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकात तारखा दिल्या आहेत, त्या नुसार या कविता ७८/७९ सालातल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडल्या. कवितेच्या काळाचा आणि कवितेतल्या आशयाचा संबंध मी लावू शकलो नाही. परंतु, तरीही कविता रोचक वाटल्या.

अशाच इतर, अप्रसिद्ध परंतु गुणी कृतींचं, त्यांच्या करून दिलेल्या ओळखीचं स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कविता अर्थातच नंतर लिहीलेल्या वाटतात...नागार्जून नेहरू युगात घडून गेलेली एक गोष्ट सांगत आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0