पशूवत वर्तन करणाऱ्या पुरुषांच्या कलेचं काय करायचं?

'द पॅरीस रिव्ह्यू'मध्ये हे मत वाचनात आलं - What Do We Do with the Art of Monstrous Men?

वूडी ॲलनचं आपल्या माजी मैत्रिणीच्या टीनेजर मुलीशी - सून यी - प्रेमप्रकरण आणि पुढे लग्न करणं; 'मॅनहॅटन' चित्रपटात मध्यमवयीन प्राध्यापकाचं टीनेजर मुलीशी प्रेमप्रकरण दाखवणं या गोष्टी अतिशय disturbing (मराठी?) वाटतात; याच वूडी लनच्या 'ॲनी हॉल' चित्रपटाच्या प्रेमातही पडणं; या गोष्टींची संगती क्लेअर डेडरर आणि तिच्या मैत्रिणींना लावता येत नाही. वूडी ॲलन एकटाच कशाला रोमान पोलान्स्की, बिल कॉसबी, नॉर्मन मेलर, इत्यादी, इत्यादी अशी मोठी यादी काढता येईल. याबद्दल तिचा हा निबंध.

क्लेअर डेडरर
क्लेअर डेडरर; जालावरून; प्रतिमेचं श्रेय - जेनी हिमेनेझ

या निबंधाच्या शेवटच्या काही परिच्छेदांचं स्वैर भाषांतर -

--

कदाचित, लेखिका स्वतःला मारून घेत नाहीत किंवा स्वतःच्या मुलांना वाऱ्यावर सोडत नाहीत. तरीही त्या काही तरी सोडून देतात, स्वतःच्या मातृत्वाला थोडं बाजूला सारावं लागतंच. जेव्हा एखादं पुस्तक (लिहून) संपतं तेव्हा जमिनीवर बऱ्याच तोडक्यामोडक्या गोष्टी पसरलेल्या असतात : कलटी मारलेल्या डेट्स, मोडलेली वचनं, तोडलेले साखरपुडे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे असतात पडलेले विसर आणि अपयश : मुलांच्या होमवर्कला हातही लावलेला नसतो, पालकांना साधा फोनही केलेला नसतो, जोडीदाराशी रत झालेलो नसतो. पुस्तक लिहिताना या गोष्टी मोडलेल्या असतात.

निश्चितच, हाडामांसाच्या माणसाइतका सर्वसामान्य पाशवीपणा माझ्याकडे आहे, त्याची व्याप्ती माहीत नाही; मिस्टर हाईड दडवून ठेवलेला आहे. पण माझ्याकडे दृश्यमान, मापता येईल असा पाशवीपणाही आहे - आपली कलाकृती पूर्णत्वाला नेणाऱ्या लेखिकेचा पाशवीपणा. काम तडीस नेणाऱ्या नेहमीच पाशवी असतात. वूडी अॅलन वर्षाला एक सिनेमा बनवत नाही; तो वर्षाला एक सिनेमा काढण्याचा प्रयत्न करतो.

काम पूर्ण करण्यातला विशेष पाशवीपणा माझ्यासाठी नेहमीच एकटेपणाशी जोडला गेलेला आहे : कुटुंबाला मागे सोडणं, भाड्यावर घेतलेल्या केबिन किंवा हॉटेलाच्या खोलीत जाऊन राहणं. जर मला पूर्णपणे नामानिराळं होता येत नसेल तर मी माझ्या थंडगार ऑफिसात मफलर लपेटून, फरहॅट घालून, चामडी जॅकेटात लपून राहते; फक्त काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात.

कारण काम संपवण्यातून कलाकार बनते. कलाकारानं फक्त सुरुवात करण्याएवढं नाही, काम पूर्ण करण्याएवढं पाशवी असावं. आणि अध्येमध्ये जो काही कमीजास्त पाशवीपणा करावा लागतो, तो करायचीही तयारी बाळगावी.

इतर कोणीतरी आमच्या पोरांकडे लक्ष देईल अशी अपेक्षा धरण्याचा पाशवीपणा माझ्या मैत्रिणीनं आणि मी केला आहे. हे काही बलात्कार करण्याएवढं वाईट नाही; किंवा आपण त्वेषानं झाडाच्या कुंडीत 'वीर्यदान' करत असताना कोणाला जबरदस्तीनं बघायला लावण्याएवढंही हे वाईट नाही. मी दोन गोष्टींमध्ये गल्लत करत्ये असं वाटेल - पुरुष शिकारी आणि स्त्रिया काम संपवणाऱ्या - ते तापदायक वाटेल. आणि मी गल्लत करत आहेच. कारण जेव्हा लिहिण्यासाठी किंवा कलाकृती निर्माण करण्यासाठी जे काही करावं लागतं ते स्त्रिया करतात, तेव्हा आपण पाशवी आहोत असं कधीमधी वाटतं. आणि आपली, स्त्रियांची तशीच वर्णनं करताना इतर लोक कसर सोडत नाहीत.

*

हेमिंग्वेची गर्लफ्रेंड, लेखिका मार्था गेलहॉर्नचा विचार होता, कलाकारांनी पशूवत असण्याची गरज नाही; पशूंनी स्वतः कलाकार बनण्याची गरज आहे. "एवढा घृणास्पद मनुष्य असण्याची भरपाई म्हणून मनुष्यानं अत्यंत प्रज्ञावंत असावं." (मलासं वाटतं, तिला माहीत असणार.) ती म्हणत्ये, अत्यंत वाईट व्यक्ती जगात ज्या भीषण गोष्टी करतात त्याची भरपाई त्यांना करावीशी वाटते. एक प्रकारे, ही कलेच्या इतिहासाची स्त्रीवादी मांडणी आहे; एका झणझणीत, प्रखर फटकाऱ्यात ती इतिहासाला नैतिक भरपाई म्हणते.

कसंही असो, हा प्रश्न उरतोच :

पशूवत वर्तन करणाऱ्यांचं काय करायचं? आपण त्यांच्या कलेवर प्रेम करावं का? सगळेच महत्त्वाकांक्षी कलाकार पशूवत असतात का? आतला आवाज : [मी पशू आहे का?]

field_vote: 
0
No votes yet

माझ्या मते माणूस म्हणून निव्वळ पशू असणाऱ्या माणसाची कलाकृती उच्च असेल तर त्या कलाकृतीला उच्च म्हटलं पाहिजे.
उ.दा. बीभीषण सातपुते ह्या गृहस्थाने एक अतिशय सुंदर पुस्तक "अबक" लिहिलं आणि त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला (किंवा लोकांना ते अतिशय आवडलं.)
नंतर कळलं की बीभीषण सातपुते हा एक विकृत इसम आहे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत.
-----------------------
आता हे काहीच माहीत नसलेल्या कुणी समजा "अबक" वाचलं, तर -
१. त्याचं अबक ह्या पुस्तकाबद्दल एक मत असेल
२. अबकच्या लेखकाबद्द्ल एक मत असेल.

बीभीषण सातपुते बीभीषण आहे हे कळल्यावर २ मधे 180 ३६० अंश बदल होईल पण १ तसंच राहील. (किंवा राहू देता आलं पाहिजे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीभीषण सातपुते बीभीषण आहे हे कळल्यावर २ मधे ३६० अंश बदल होईल

३६०° की १८०°?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कलाकृती उच्च वाटली ही एक गोष्ट झाली. कलाकृतीवर प्रेम करावं का?

'अॅनी हॉल'बद्दल क्लेअर म्हणते की त्यातल्या आल्वीमध्ये ती स्वतःला शोधत होती; दुबळा, काटकिळा, बहुतांश 'स्त्रैण' गुणधर्म बाळगणारा आल्वी (वूडी अॅलनचं पात्र). 'अॅनी हॉल' या कलाकृतीबद्दल तिला आपलेपणा वाटतो; प्रेम वाटतं. 'मॅनहॅटन'बद्दल ती साशंक होते आणि त्यातल्या पात्रांमध्ये तिला वूडी अॅलन आणि सून-यी यांचं प्रेमप्रकरण दिसतं; ते प्रेमप्रकरण एकाच पातळीवर असणाऱ्या दोन व्यक्तींचं नाही. तिथून तिच्या प्रश्नांना, उत्तरं शोधण्याला सुरुवात होते.

इथे पुलं आणि लता मंगेशकर अशी स्थानिक तुलना करता येईल.

पुलंचं लेखन, सादरीकरण आवडणं आणि लताचं गाणं आवडणं (१९६५च्या आधीचं - तिरशिंगरावांनी आखलेली मर्यादा) या दोन गोष्टी तुल्यबळ आहेत. मात्र पुलं मनुष्य म्हणून अतिशय वरच्या वर्गातले होते; त्यांनी मिळवले त्यांतले बरेच पैसे समाजोपयोगी कामांसाठी परत दिले; आणीबाणीविरोधात कणखर भूमिका घेतली. जिथे जमलं नाही (दिल्ली आकाशवाणी), तिथे नोकऱ्या न करता त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. (म्हणून पुलंच्या मर्यादा मराठी समाजावर पडल्या का उलट मराठी समाजाच्या मर्यादांमध्ये पुलंनी स्वतःला मर्यादित ठेवलं; अशा प्रकारचे प्रश्न उद्भवतात.)

मात्र लता मंगेशकरांनी अशा कोणत्याही प्रकारची दिलदारी दाखवली नाही; उलट अनेक प्रसंगांमध्ये कद्रूपणा केला; आवाज फाटला असूनही गात राहिली. त्यामुळे लताचं गाणं आवडणारे तिरशिंगराव '१९६५पर्यंतच्या लताचाच आवाज ऐकू येतो', अशा छापाचं काही म्हणतात. (फेसबुकवर लिहिलंय; हवं असल्यास तिरशिंगरावांना त्यांच्या शब्दांत हे पुन्हा मांडण्याची विनंती करता येईल.) त्यापलीकडे लता मंगेशकर या व्यक्तीनं जे काही केलं ते दखल घेण्यासारखं नाही.

मात्र जेव्हा पुरुष स्त्रियांवर लैंगिक प्रकारचे अत्याचार करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर स्त्रिया स्वतःला त्या पीडीतेच्या जागी बघू शकतात. अशा निरनिराळ्या प्रकारचे अनुभव भरपूर स्त्रियांना असतात. (असा एकही अनुभव नसणाऱ्या स्त्रिया बहुतेक जंगलात, एकेकट्या किंवा फक्त स्त्रियांच्या समूहातच राहत असतील.) मग आपण स्वतःचा विचार पीडीतांच्या गटातली एक असा करायचा का असे अनुभव कार्पेटखाली दडवून मग कलाकृतीचा विचार करायचा? कलाकृतीची चिकित्सा करताना हे अनुभव तपासायचे का; चिकित्सा करताना आपण स्वतःला त्या कलाकृतीत शोधावं का? आपण स्वतः काही काम हातात घेऊन तडीस नेतो तेव्हा आपण लोकांशी वाईट वागतो का? असे स्वतःबद्दल प्रश्न उपस्थित होतात.

एखादं चित्र दीड कोटी अमेरिकी डॉलर मिळण्याएवढं महत्त्वाचं आहे का, हा प्रश्न कलाप्रेमींसाठी महत्त्वाचा नसतो. एखादं चित्र महत्त्वाचं, चांगलं का आहे, हा प्रश्न कलाप्रेमींसाठी सुसंदर्भ असतो. तसं 'अॅनी हॉल' किंवा वूडी अॅलनला पुरस्कार का मिळाले (नाहीत) हा प्रश्न महत्त्वाचा नाही. एकाच व्यक्तीला वूडी अॅलनचे काही सिनेमे आवडतात; मात्र त्याचं वर्तन पशूवत वाटतं. या दोन्हींची एकत्र संगती कशी लावायची, याचं स्त्रीवादी उत्तर म्हणून शेवटी मार्था गेलहॉर्नचा संदर्भ येतो.

महत्त्वाचं - या संदर्भात लता मंगेशकर आणि पुलं महत्त्वाचे नाहीत; त्यांचे धागे निराळे आहेत. मनुष्य आणि कला निराळे कधी करता येतात, कधी करता येत नाहीत असा प्रश्न आहे. तो विशिष्ट म्हणजे स्त्रीवादी संदर्भात मांडलेला आहे. याची नोंद घेतली जाणार नाही, या भीतीपोटी ही नोंद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या अपत्याच्या पालनपोषणाबाबत तिने जी गिल्ट व्यक्त केलेली आहे ती मला पटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांत मी कलेच्या उंचीप्रमाणे भेदभाव करतो. पण एखाद्याने अत्युच्च कलेचा आविष्कार दाखवला, तर त्याच्या (फक्त) कलेला भरघोस दाद देतो. कुणाचीही व्यक्तिपूजा करत नसल्याने, वर्तन आणि कला हे दोन कप्पे वेगळे ठेवण्याचे स्वातंत्र्य घेतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कुणाचीही व्यक्तिपूजा करत नसल्याने, वर्तन आणि कला हे दोन कप्पे वेगळे ठेवण्याचे स्वातंत्र्य

हे तार्किकदृष्ट्या उत्कृष्ट विधान आहे. मीही बव्हांशी सहमत आहे. भारतीयांच्या हाडामांसातच रुजलेली व्यक्तिपूजा ही बऱ्याच विचित्र गोष्टींमागचं कारण आहे खरी. असो.
तरीही,
वर्तन आणि कलेतल्या अत्यंत पुसट सीमारेषेचं भान कलावंताने ठेवायचं की प्रेक्षकांनी? उदा. आपण इथे टोपणनावं घेऊन लिहीतो. ऐसीवर ज्यन्तेच्या दृष्टीने आऊटरेजस असं बरंच लिहीलं जातं आणि ते लिहीण्याचं स्वातंत्र्यही दिलं जातं. ते जोपर्यंत कलेत आहे, तोपर्यंत ठीक आहे. एरवी ह्यांना जाळलं पाहिजे नी त्यांना पेटवलं पाहिजे असं लिहीणाऱ्यांना समज द्यायची वेळच आली नसती! प्रक्षोभक वक्तव्ये, चित्रे इ. बाबत कायदा आला नसता.

थोडं अजून सोपं करुन सांगायचं म्हणजे:
(जरा फारफेच्ड आहे, पण आर्थर कॉनन डायल, जॉन ग्रिशॅम इ.ना कल्पून पहा.)
क्ष पाककृतींबाबत चांगलं लेखन करतो.
क्ष खुनी आहे. त्यांना श्रीमंत लोकांचे खून करायला आवडतात.
आता ज्यांना क्ष माहित नाही, त्यांना पाककृतींबाबतचं लिखाण आवडणं अत्यंत नैसर्गिक आहे. ते त्याला इतरही लेखन करण्याबाबत प्रोत्साहन देतात.
क्ष लघुनिबंध, लेख इत्यादी पाडू लागतो. क्षचं फ्यानफौलोइंग जोमाने वाढतं.
इथे त्याची ती श्रीमंतांबद्दलची चीड बाहेर पडते. तो पोटतिडीकीने लिहीतो. त्याच्या कथांमध्ये तो उत्तमरीत्या खून पाडून कायद्याच्या कचाट्यात कसं सापडू नये इ.चं वर्णन करतो. ह्याबद्दल त्याचं कौतुकच होतं. प्रॉब्लेम हा, की स्वत: खुनी असल्यामुळे त्याच्यात भरलेला त्वेष तो जो कथांतून वाहू देतो, त्यामुळे एकूणातच त्यातून प्रेरणा घेऊन नवनवीन खुनी तयार होतात.
क्ष यथावकाश कायद्याच्या कचाट्यात सापडतो, गजांआड जातो.

आता प्रश्न:
क्षच्या पाककृती तितक्याच कौतुकाने पहायच्या का?
क्षचं बाकी लेखन तितक्याच कौतुकाने पहायचं का?
वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरं समान असतील तर काही प्रश्न नाही. तुमची साईड फिक्स आहे. पण एका प्रश्नाचं उत्तर हो आणि दुसऱ्याचं नाही असं असेल तर मात्र चर्चेला वाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

टॅनोबा, प्रतिसाद आवडला.
-----
मलाही हाच प्रश्न आहे.
एखाद्या कलाकाराने गुन्हा केला त्याआधीच्या कलाकृती आणि गुन्हा केल्यानंतरच्या कलाकृतींना वेगळं काढता येईल का?
त्याचा गुन्हा शाबीत झाला त्या आधी त्याने असे गुन्हे केलेच नसतील का?
इतर कलाकारांचे गुन्हे त्यांच्या मरणोपरांत प्रकाशझोतात आले तर त्या कलाकाराच्या सगळ्याच कलाकृती कमी आवडाव्यात का?
कुठले गुन्हे माफ करायचे आणि कुठले नाही? म्हणजे एखाद्या कलाकाराने सुरी भोसकून एक मांजर मारलं तर त्याचा गुन्हा शिरेसली घ्यावा का? आणि जर त्या कलाकाराने एका ८० वर्षांच्या म्हाताऱ्याचा गळा आवळून खून केला तर त्याने लिहिलेलं नाटक मला कमी आवडेल की जास्त? हे सगळं दर वेळी तपासून पाहता तरी येईल का?

इतकं सगळं आत जाऊन तपासण्यापेक्षा कलाकाराची "कलाकृती" आवडणं मला सोपं आणि तार्किक वाटतं. मग गुन्ह्याच्या गांभीर्याप्रमाणे कलाकार कमी जास्त आवडू शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या कलाकाराने गुन्हा केला त्याआधीच्या कलाकृती आणि गुन्हा केल्यानंतरच्या कलाकृतींना वेगळं काढता येईल का?

तो तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. ह्याचं उत्तर लईच कठीण आहे.

माझा मुद्दा म्हणजे, एक टाईम व्हेरिएबल जरा काँस्टंट ठेवून पाहू. त्या 'क्ष'वर गुन्हा सिद्ध झालेला आहे.
आता;
कलाकृती आणि पाशवी वृत्ती ह्यांच्यातल्या कोनाचं काय? माणसातलं पशुत्व आणि त्याची कला जोपर्यंत बऱ्यापैकी स्वतंत्र राहत असेल तोपर्यंत तिची वाहवा व्हावी आणि जिथे त्या समांतर, किंबहुना एकसंपाती होऊ लागतात तिथे त्यांची निर्भर्त्सना व्हावी असं असेल तर ह्या अँगलचा थ्रेशोल्ड काय आहे?
--
अजूनेक बरंच स्पष्ट उदा. म्हणजे हॅनिबाल लेक्टर. त्याने 'पाककृती करताना पाहणं'हाही आनंद असतो असं त्याच्याबद्दल (आधी) लोक म्हणतात. तेच तो माणसांचं मांस शिजवत असतो हे कळतं तेव्हा लोकांना (अर्थातच) उलट्या नि काय काय होतं. इथे कला आणि पशुत्वातला कोन ० अंश आहे. इथे कलेचं कौतुक करावं का? हाच हॅनिबाल उत्तम शल्यचिकित्सक आणि मनोविकारतज्ज्ञ आहे. हीही कला आहे. हिचं काय करावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

कुठेतरी उंबरठा सिनेमाची आठवण आली. व्यक्तिगत जीवनातील अस्वस्थपणा आणि हातून कलाकृती अगर मोठं काम घडणे (सामाजिक काम सुद्धा ) याचा जवळचा संबंध आहे. यात स्त्रीकडून कुटुंबाची आबाळ झाली तर ती स्वतःला दोषी मानते आणि समाज त्याला मान्यता देतो. पुरुषाच्या बाबतीत समाज जास्त क्षमाशील असतो. (गुरुदत्तचा उदोउदो ऐकताना गीता दत्तला लोक विसरू शकतात) स्त्रीची कर्तबगारी तिचं व्यक्तिगत जीवन किती सरळमार्गी आहे यावर जोखली जाते, तसं पुरुषांचं होत नाही. त्यामुळे कलेची उंची आणि कलाकार माणूस म्हणून कसा होता हे सापेक्ष ठरणार. वूडी अॅलनच्या कलाकृती बायका काहीशा ग्रजिंगली स्वीकारतील, पुरुषांचं तसं होईलच असं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण बिभीषण सातपुते?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इथे फक्त उदाहरणार्थ वापरलेत हो.

पण फार मोठा माणूस होता/आहे.
आ.बा. परत सविस्तर सांगेन.
त्यांनी त्यांच्या नातवाला सांगून (तो एक हॅकर आहे) इंटरनेटवरचे स्वत:बद्द्लचे सगळे उल्लेख काढून टाकलेत.
B. tavern नंतर इतका प्रसिद्धीपराड्मुख लेखक पाहण्यात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सातपुते सरांचे किस्से वाचायला आवडतील.

मला त्यांची माहिती असायचं कारण विचित्र आहे. एकदा रात्री उशीरा रमेश पान शॉपच्या रमेश उर्फ डैडीने चुकीचं पान दिलं. ते ज्या पुडीत बांधलं होतं ती डार्क वेबमधल्या एका पानाची प्रिंट होती. त्यात सातपुते सरांनी बँकसीला मालकंस शिकवल्याच्या नोट्स होत्या. आणखी समजू शकलं नाही कारण किमामच्या ओघळात शाई मिस्क होऊन गेली होती. तेव्हापासून सातपुते सरांची मिळेल ती माहिती घेत असतो.

(..आय नो, आय नो. झोपेत होतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नक्कीच. त्यांची एखादी अप्रकाशित मुलाखत सापडते का पहातो.पण इथे नको. तै वराडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाखत हावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

++111

अस्वल- आबा अशी जॉइंट लेखमाला पाह्यजेल!! बिभिषणजींचे कार्यकर्तृत्व लोकांपुढे यायलाच हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सुखवस्तु मराठी लोकांत सध्या सावरकरांच्या साहित्याबद्दल चर्चा होत आहेत, म्हणून मला हा धागा आठवला. प्रतिसाद वाचताना अस्वल आणि आबानं सुरू केलेलं काम अपूर्ण ठेवल्याचं लक्षात आलं आहे. आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याकडे तर कलाकार मंडळी एकदा वलयांकित झाली की त्यांच्या दुष्कृत्यांसाठी त्यांना शिक्षा होणं दुरापास्तच. मुळात फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडणाऱ्या सलमानला 900 रुपये भरून जामीन मिळतो, त्याची तक्रार करणाऱ्या त्याच्या सुरक्षारक्षकाची ससेहोलपट होते आणि पुढे म्हणे तो आत्महत्या करतो ! काळवीटांची शिकार वेगळीच. तरीही त्याला नवीन सिनेमे मिळत राहतात आणि कधीच्या काळी खटला उभा राहून शिक्षा होण्याची वेळ आली की कसं त्याच्या सिनेमांवर शेकडो जणांचं पोट अवलंबून आहे अशी पद्धतशीर हाकाटी सुरू होते. दुसऱ्या संजूबाबाचं काहीच वर्षात त्याच्या हयातीतच बायोपिक येतं आणि तेही गल्ला कमावतं. या दोघांचेही सिनेमे मी पाहात नाही कारण त्यांना मुळात ते सिनेमे करण्याची मुभाच मिळायला नको होती असं मी म्हटलं तर मला वेड्यात काढतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संजूबाबाची मुन्नाभाई सीरीज़ मी पाहिली. चांगली होती.

बाकी, सलमानचे पिच्चर मी सहसा टाळतो. अर्थात, याचा काळविटाशी किंवा त्याच्या फुटपाथवरून वाहन चालविण्याशी काहीही संबंध नाही, तर, एक नट/अभिनेता म्हणून सलमान मला केवळ ग्रोसली ओव्हररेटेडच नव्हे, तर आत्यंतिक भिकार वाटतो, म्हणून. परंतु तरीसुद्धा, दोनएक वर्षांपूर्वी भारताकडे येत असताना विमानात 'बजरंगी भाईजान' पाहण्याचा योग आला होता. बरा वाटला.

तर (आवर्जून) सांगण्याचा मतलब, मी कधीकधी संजूबाबाचे पिच्चर पाहतो. क्वचित्प्रसंगी सलमानचासुद्धा पिच्चर पाहिलेला आहे. टुक टुक.

(हे मुद्दाम होऊन सांगावेसे वाटले. उगाच. म्हणून सांगितले.)

...........

'खानावळी'पैकी तेवढा तो एक आमीर खान वगळल्यास उर्वरित दोन्ही खान ग्रोसली ओव्हररेटेड आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मी मूळ लेख वाचलेला नाही, पण वरचं लिखाण वाचून) कलाकारांनाच वेगळं का काढायचं ते मला समजलं नाही. न्यूटन किंवा आईनस्टाईननं आपल्या आयुष्यातल्या बायकांना कसं वागवलं ह्याचा संबंध शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या मूल्यमापनात येऊ द्यावा का? किंवा तुकारामानं आपल्या बायकोला कसं वागवलं ह्यावरून त्याची थोरवी मोजावी का?

ते असो. माझ्या मते कोणताही निर्मितीक्षम माणूस (त्यात बायकाही आल्या) पीडित किंवा राक्षसी असण्याची मोठी शक्यता असते. पीडितांमध्ये काफ्का, दोस्तोयव्हस्की, वगैरे येतात आणि राक्षसी लोकांमध्ये पिकासो वगैरे. (वूडी अॅलन माझ्या मते दोन्हींत मोडतो.) सांगण्याचा मुद्दा हा की सगळं जग चांगल्या माणसांनी भरलेलं असावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. त्याचा अपराधगंड मी मानून घेत नाही. बरेचसे चांगले पुरुष किंवा बायका मला दोन मिनिटांत कंटाळवाणे वाटू लागतात. ह्याउलट, केवळ थोर कलाकार आहे म्हणून मी व्यक्तिगत आयुष्यात एखाद्या त्रासदायक माणसाला फार सहन करेन असं नाही. उदा. दुर्गाबाई भागवत व्यक्ती म्हणून चांगल्याच त्रासदायक असाव्यात असा माझा अंदाज आहे. मी कधीही स्वतःहून त्यांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला नसता. पण म्हणून त्यांचं लिखाण न वाचण्याचा किवा वाचलं तर ते न आवडून घेण्याचा संबंध त्यांच्याशी मला व्यक्तिगत स्नेह ठेवावासा वाटला असता का, ह्याच्याशी लावावा असं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उदा. दुर्गाबाई भागवत व्यक्ती म्हणून चांगल्याच त्रासदायक असाव्यात असा माझा अंदाज आहे.

या विधानाला काही आधार?

(नाही म्हणजे, दुर्गाबाई व्यक्ती म्हणून त्रासदायक असतीलही किंवा नसतीलही. मला माहीत नाही, आणि त्याच्याशी कर्तव्यही नाही. परंतु विधानाचा दर्शनी (अपॅरंट) बेधडकपणा थक्क करून गेला, इतकेच.)

(अन्यथा, मुद्दा रोचक आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विधानाला काही आधार?

ऐसीवर चालेल असं एकच उदाहरण Wink

 1. पुलं मनानं चांगले होते
 2. ते दुर्गाबाईंना 'दुर्गे दुर्घट भारी' असं म्हणत

QED

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Smile

प्रयत्न चांगला आहे, परंतु

पुलं मनानं चांगले होते

या गृहीतकाला काही आधार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गृहीतकाला काही आधार?

अजिबात देणार नाही. ममव माणसाच्या विश्वात हे वैश्विक सत्य आहे.
(नारायण पेठेचं चांगलं नाव काढलंस पोरा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रश्न कोणी शून्य दुर्गुण असलेला/ली असू शकत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचं त्याच्या / तिच्या कार्यक्षेत्रातिल कर्तृत्व नाकारता येत नाही असा नाहीये, तर कर्तृत्वाच्या वलयामुळे त्यांचं कोणतंही कमीजास्त माणुसकीला सोडून केलेलं वर्तन खपवून घेण्या वा न घेण्याचा आहे. तो निर्णय सोपा नाही हाच मूळ लेखाचा सूर आहे. विशेषतः चित्रपटांसारख्या जनमानसावर प्रभाव असणाऱ्या माध्यमात वुडी ऍलनसारख्या सृजनशील कलावंताची काळी बाजू उजेडात आल्यावर सामाजिक घटक म्हणून आपल्याला भूमिका असली पाहिजे या मताची मी आहे. ते अंमलात आणण्याची परिस्थिती उद्भवली तेव्हा त्याची जाणीव झाली होती. कारण भूमिका न घेणे हीही भूमिकाच असते.
दुसरा मुद्दा जरा वेगळा आहे. आधुनिक स्त्रीवादी भूमिकेतून जुन्या काळातील सामाजिक परिस्थिती /जाणीवा यांचा निवाडा करता येत नाही हे समजण्याजोगे आहे.
व्यक्ती म्हणून कोणाशी संवाद साधावा वाटावा वा नाही हा तर त्या दोन्ही व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंतु उर्मटपणा/कद्रुपणा वगैरे गुण आणी अंडरएज सेस्क वगैरे एकाच पारड्यात तोलत आहेत. वर अदितीनेही तेच केलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

का म्हणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जंतु उर्मटपणा/कद्रुपणा वगैरे गुण आणी अंडरएज सेस्क वगैरे एकाच पारड्यात तोलत आहेत.

अजिबातच नाही. 'कलेचं काय करायचं?' हा धाग्याच्या शीर्षकापासूनच उपस्थित केलेला प्रश्न आहे. कलाकाराचं कृत्य जितकं अधिक पाशवी तितकीच त्याची कला कमी दर्जाची असं मानणं अशा प्रकारचं काही त्रैराशिक मला मांडता येत नाही, एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कलाकार किंवा समाजावर भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल हा प्रश्न आणखी कळीचा ठरतो. कलाकार जे जगतात, त्याचा काही भाग कलाकृतींमध्ये दिसतो. शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आणि त्यांचं खाजगी आयुष्य यांचा तसा फारसा संबंध नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बालिश हाकाटी आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विषय कलेचा आणि कलाकारांचा हे माहीत आहेच. मात्र वर चिंतातुर जंतू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अन्य क्षेत्रांतही हे लागू होते असे मानून हा प्रतिसाद लिहीत आहे.

इथे गांधीजींबद्दल बोलले गेलेले नाही. माझ्यासारख्याला हा अप्रिय विषय वाटतो. अनेकांनी कठोरपणे ह्या विषयावर लिहीले आहे. अनेकदा सत्य काय ते विश्वासार्ह स्रोतांकडून कळूनही आपली दिङ्मूढ स्थिती होते ह्याचे कारण म्हणजे निदान साक्षेपी विचार करणारे कुठेतरी एका विशाल परिप्रेक्ष्यातच गांधी ह्या माणसाचा विचार करतात, आणि नैतिक, कायदेशीर, कालनिबद्धता, मानवी स्वातंत्र्य आणि हक्क संबंधित अशा अनेक दिशांनी ह्यातून सुटकेचा मार्ग शोधतात. आणि तरीही असा समाधानकारक मार्ग मिळू शकत नाही, आणि जे उत्तर आपल्याला भेडसावत असते ते मान्य करण्याची मनाची तयारी होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे गांधीजींबद्दल बोलले गेलेले नाही.

गांधीजी भाषा/लिपी इथपासून ते रोग/औषधोपचार/आरोग्यशास्त्र इथपर्यंत वाट्टेल त्या क्षेत्रात कडमडले असतील, आणि कडमडून अक्षरशः काय वाट्टेल ती काहीबाही, वेडीवाकडी मते त्यांनी मांडली असतील. परंतु कलाक्षेत्रात ते नक्की कधी कडमडले, की जेणेकरून इथे या धाग्यावर त्यांचा ज़िक्र व्हावा?

(किंबहुना, गांधीजींचा चित्रपटांस विरोध होता, असेही ऐकिवात आहे. चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वय आणि मानानं मोठा पुरुष आणि त्याच्यासोबत दिसणाऱ्या स्त्रिया तरुण आणि कर्तबगारी गाजवण्यासाठी पुरेसा काळही न मिळालेल्या. मग हा मोठा माणूस सांगतोय त्यात काही तथ्य असणारच, असं वाटतं. सून-यीनं दिलेला होकार असेल किंवा गांधीजींना खांद्यावर हात ठेवण्याची दिलेली परवानगी असेल, त्यात खरोखर स्वतःची इच्छा किती होती आणि त्या पद-वयाला दबून जाणं कितपत होतं, असा प्रश्न पडतो.

गांधीजींची आठवण येणं मला रोचक वाटलं. कारण गांधीजींबद्दल प्रेम-आपुलकी आहेत मात्र हे वर्तन अजिबातच आवडत नाही. स्वतःच्या मनुष्य म्हणून भावना बाजूला काढणं जमत नाही. किंवा 'असे वागले नसते तर बरं झालं असतं', असं वाटत राहतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गांधीजींना खांद्यावर हात ठेवण्याची दिलेली परवानगी असेल, त्यात खरोखर स्वतःची इच्छा किती होती आणि त्या पद-वयाला दबून जाणं कितपत होतं, असा प्रश्न पडतो.

गांधीजींबद्दल प्रेम-आपुलकी आहेत मात्र हे वर्तन अजिबातच आवडत नाही. स्वतःच्या मनुष्य म्हणून भावना बाजूला काढणं जमत नाही. किंवा 'असे वागले नसते तर बरं झालं असतं', असं वाटत राहतं.

सगळे मान्य. गांधींचे काही वागणे चमत्कारिक आणि/किंवा गर्हणीय/पशुवत् वाटण्यासारखे असू शकते. (किंबहुना, ते गर्हणीय/पशुवत्-सुद्धा असू शकते.) तसेच, अनेक विषयांवरची त्यांची मते ही केवळ न पटण्यासारखीच नव्हे, तर तथ्यास धरून नसलेली, निखालस कैच्याकैसुद्धा असू शकतात. आणि त्यांच्यावर टीका अवश्य व्हावी. परंतु...

... प्रस्तुत चर्चेचा विषय हा 'पशूवत (sic) वर्तन करणाऱ्या पुरुषांच्या कलेचं काय करायचं?' असा आहे. सबब, गांधीजींचे कलेतील योगदान दाखवा, अन्यथा (गांधींविषयी) मुद्दा (या धाग्यापुरता तरी) मागे घ्या, एवढेच मागणे आहे. इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंतूंनी धाग्याचा क्यानव्हास मोठा केला ना? त्यामुळे कलाक्षेत्राखेरीज इतरत्र कडमडलेल्यांबाबतही विचार व्हावा.

तरी इथे बोलले गेले नाही म्हणजे या धाग्यावर बोलले गेले नसले तरी आमचे मित्र या संस्थळावर बरंच काही मेगाबायटी* लिहून गेलेत.

*आमचे हे मित्र लिहू लागले की कित्येक मेगाबाईट्स झाल्याशिवाय थांबत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमचे मित्र या संस्थळावर बरंच काही मेगाबायटी* लिहून गेलेत.

*आमचे हे मित्र लिहू लागले की कित्येक मेगाबाईट्स झाल्याशिवाय थांबत नाहीत.

नक्की कोणाची प्रशंसा आहे ही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे कोण ते तुम्हाला समजले नाही हेच ते "भाषेचे दौर्बल्य"

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये म्हणतात.

(अन्यथा ते परत येण्याची भीती असते.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यथा विहाय नवानि गृह्णाति .....

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्याच्या विषयात "पशुवत वर्तन करणाऱ्या स्त्रियांना" धरलं आहे किंवा कसे ते स्पष्ट होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चे कोवळ्या ब्रॅन्डन वर .....?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

मूळ लेखात लेखिकेने स्वतःच्या आणि आपल्या मैत्रिणीच्या पशूवत वर्तनाचा उल्लेख केलेला आहे. तसंच, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी पशूवत वर्तनाच्या व्याख्या वेगळ्या होतात, याकडेही लक्ष वेधलेलं आहे.

'मीटू' चळवळीत किती पुरुष 'आमचंही लैंगिक शोषण झालं' म्हणत पुढे आले? त्यावरून काही निष्कर्ष काढता येतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावर तुम्हीच लेख लिहून पॅरीस रिव्ह्यूला पाठवावा, ही विनंती. मला तो लेख आवडला तर मी त्याचं अंशतः भाषांतर करून ऐसीवर डकवेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१- श्रेष्ठ कलाकार त्याच्या स्वत:मधलं जे काय सत्व आहे म्हणजे जे काय सम टोटल ऑफ सत्व आहे ते पुर्णपणे त्याच्या कलाकृतीत काहीही हातचं न राखता ओतुन देत असतो. त्यानंतर "तो" रीता झालेला माणुस प्राणी फक्त उरतो.
२- एका माणसाच्या कलेचे मुल्यमापन करतांना शक्यतो त्याचे माणुसपण बाजुला ठेवलेले उत्तमच . व ॲज अ ह्युमन बिइंग म्हणुन विचार करतांना त्याच्या कलेला मध्ये आणणे टाळलेले उत्तम
बाकी वादी संबंधावर नो कमेंट
रोमन पोलान्स्की चा पियानीस्ट एक महान कलाकृती नेहमीच वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

वर चिंतातूर जंतू म्हणतात.

माझ्या मते कोणताही निर्मितीक्षम माणूस (त्यात बायकाही आल्या) पीडित किंवा राक्षसी असण्याची मोठी शक्यता असते.

मूळ लेखातही अशा प्रकारचं गृहीतक जाणवतं. वॉल्टर बेंजामिनचं उद्धृतही दिलं आहे. हे गृहीतक अनेक ठिकाणी बघायला मिळते. उदा. मोठा कलाकाराच्या अशा काही बाबी असणारच - खूप दारू पीत असणार, पुरुष असल्यास कदाचित बायकोला मारत असणार. इ. ह्या गृहीतकाला नक्की काय आधार आहे? 'कन्फर्मेशन बायस'पेक्षा जास्ती काही आहे का?


लेखाची सुरुवात वाचून कलाकारांच्या एकुण नैतिकदृष्ट्या अग्राह्य गोष्टी आणि कला ह्या व्यापक विषयाबद्दल बोलण्याऐवजी लैंगिक अत्याचाराच्या विषयावर सीमित आहे असं वाटलं. (ओळखीची वाटलेली नावे, ट्रंपचा उल्लेख इ. मुळे. जर लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले लोक इतर प्रकारच्या राक्षसीपणासाठी प्रसिद्ध असतील तर मुद्दा मागे.) असे करायला हरकत नाहीच. मात्र लेखाच्या शेवटी राक्षसीपणाचा स्कोप वाढून बऱ्याच काही गोष्टींचा समावेश केला आहे. लेखिका म्हणते.

हे काही बलात्कार करण्याएवढं वाईट नाही; किंवा आपण त्वेषानं झाडाच्या कुंडीत 'वीर्यदान' करत असताना कोणाला जबरदस्तीनं बघायला लावण्याएवढंही हे वाईट नाही. मी दोन गोष्टींमध्ये गल्लत करत्ये असं वाटेल - पुरुष शिकारी आणि स्त्रिया काम संपवणाऱ्या - ते तापदायक वाटेल. आणि मी गल्लत करत आहेच. कारण जेव्हा लिहिण्यासाठी किंवा कलाकृती निर्माण करण्यासाठी जे काही करावं लागतं ते स्त्रिया करतात, तेव्हा आपण पाशवी आहोत असं कधीमधी वाटतं. आणि आपली, स्त्रियांची तशीच वर्णनं करताना इतर लोक कसर सोडत नाहीत.

हे स्पष्टीकरण पुरेसं वाटलं नाही. जाणूनबुजून गल्लत करायची असेल तर दोन्ही गोष्टींना मॉन्स्ट्रस म्हणतात ह्यापेक्षा काहीतरी जास्त हवं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी दोन गोष्टींमध्ये गल्लत करत्ये असं वाटेल - पुरुष शिकारी आणि स्त्रिया काम संपवणाऱ्या - ते तापदायक वाटेल. आणि मी गल्लत करत आहेच. कारण जेव्हा लिहिण्यासाठी किंवा कलाकृती निर्माण करण्यासाठी जे काही करावं लागतं ते स्त्रिया करतात, तेव्हा आपण पाशवी आहोत असं कधीमधी वाटतं. आणि आपली, स्त्रियांची तशीच वर्णनं करताना इतर लोक कसर सोडत नाहीत.

अक्षरश: काहीही विधान आहे हे. ह्या स्त्रियांना 'पाशवी' म्हटल्याचं मला कुठेही दिसलेलं नाही. 'आपण पाशवी आहोत' वाटावंसं काहीही नाही त्यात. फारफेच्ड लेव्हल नबांच्याही पलिकडची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

मूळ लेखातही अशा प्रकारचं गृहीतक जाणवतं. वॉल्टर बेंजामिनचं उद्धृतही दिलं आहे. हे गृहीतक अनेक ठिकाणी बघायला मिळते. उदा. मोठा कलाकाराच्या अशा काही बाबी असणारच - खूप दारू पीत असणार, पुरुष असल्यास कदाचित बायकोला मारत असणार. इ. ह्या गृहीतकाला नक्की काय आधार आहे? 'कन्फर्मेशन बायस'पेक्षा जास्ती काही आहे का?

माझ्यासाठी तरी हे गृहीतक नाही. आणि दारू पिऊन बायकोला मारण्याइतकं ते साधंसरळ (म्हणजे अनेक सामान्य माणसांबाबत जे होतं ते अशा अर्थानं साधंसरळ) नसतं. कोणत्याही क्षेत्रातल्या टोकाच्या प्रतिभावान सर्जनशील माणसांची चरित्रं पाहिली, तर त्यात पीडित किंवा राक्षसी असण्याचं प्रमाण लक्षात येण्याइतकं जाणवतं. त्याचा संबंध बहुधा संवेदनशीलता आणि सर्वसाधारण माणसापेक्षा विलक्षण वेगळं काही तरी दिसत असण्याशी लावता येतो. म्हणजे एक तर मूळची अतिसंवेदनशीलता, शिवाय काही मानसिक आघात (ट्रॉमा) किंवा काही सांस्कृतिक आघात (अल्पसंख्य असल्यामुळे झालेला छळ, होलोकॉस्ट, इ.) वगैरेंचा परिणाम झालेला दिसतो. विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे आलेले गंड असू शकतात. अनेकदा गोष्टी अतिशय टोकाला जाईपर्यंत ताणण्याचा स्वभाव आढळतो. त्यांना सर्वसाधारण समाजाकडून विक्षिप्तपणाचा शिक्का मिळताना दिसतो. अशी खूप लांब यादी करता येईल. पण ज्याचं डोकं वेगळ्याच दिशेनं चालतं तो माणूस ठार वेडाही असू शकतो किंवा टोकाचा सर्जनशीलही इतकं म्हणण्याइतपत हे दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे ठरवणारे आपण कोण हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तो पर्यंत काय करायचं याचा विचार निरर्थक आहे उद्या असे नको व्हायला आपण निवाडा करायचो अन नंतर आपलाही निवाडा व्हायची वेळ यायची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

उद्या असे नको व्हायला आपण निवाडा करायचो अन नंतर आपलाही निवाडा व्हायची वेळ यायची

त्याची काळजी नको. तूर्तास आपली गणना थोरामोठ्यांत होत नाही, आणि भविष्यात तशी ती होण्याची सुतराम् शक्यता नाही. तस्मात्, आपला निवाडा करण्यात कोणाला शष्पभरसुद्धा रस असण्याचे काही कारण दृग्गोचर होत नाही.

सबब, चालू द्या. गो फोर्थ अँड जज. दाउ शाल्ट नॉट बी जज्ड एनीवेज़.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटते त्यांची कला फारच मोठी वा उच्च दर्जाची असेल (rarest or rare) तर मान हा राखावाच लागेल अन्यथा आशा पुरुषांना फार डोक्यावर बसवायची गरज भासत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

नुकतीच फेसबुकावर एक पोस्ट वाचली पाहिली.
आयझॅक न्यूटन हा म्हणे गुलामांच्या व्यापारात इन्व्हॉल्व्ड होता. म्हणून त्याच्या पदार्थविज्ञानातील थिअरीज काढून टाकाव्या का (?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आयझॅक न्यूटन हा म्हणे गुलामांच्या व्यापारात इन्व्हॉल्व्ड होता.

याबद्दल काही खात्रीलायक तपशील मिळू शकतील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याचा इथे काय संबंध ते समजलं नाही. विशेषतः शेवटी मार्था गेलहॉर्नचं उद्धृत दिल्यानंतर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रीमती मार्था गेलहॉर्न यांचे ते वैयक्तिक मत आहे, आणि अर्थातच, श्रीमती मार्था गेलहॉर्न यांना ते असण्याचा अधिकार आहे. मात्र, म्हणून ते देववाणीप्रमाणे वैश्विकतः ग्राह्य असण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही., ३अ

मात्र, श्री. आयझॅक न्यूटन यांच्यावर गुलामांच्या व्यापारात सहभागी असण्याचा जो आरोप झालेला आहे, आणि त्यावरून त्यांचे पदार्थविज्ञानातले योगदान रद्दबातल करावे किंवा कसे, असा जो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, तो प्रश्न निकालात काढण्यापूर्वी, किंबहुना तो प्रश्न विचारात घेण्यापूर्वीसुद्धा, मुळात त्या आरोपात तथ्य आहे किंवा कसे, हे प्रकाशात आणणे महत्त्वाचे तथा सयुक्तिक आहे. म्हणजे असे आहे, मुळात त्या आरोपाची छाननी न करता (केवळ असंबद्ध म्हणून, किंवा कशाही पद्धतीने) श्री. न्यूटन यांच्या योगदानाच्या ग्राह्यतेचा प्रश्न जर निकालात काढला, तर (योगदानाच्या ग्राह्यतेचा प्रश्न निकालात निघेलही कदाचित, परंतु) श्री. न्यूटन यांच्यावरील आरोप (भले त्यात तथ्य असो वा नसो, परंतु) छाननीविना जसाच्या तसा, कायम राहतो. उलटपक्षी, श्री.न्यूटन यांच्यावरील आरोपाची अगोदर छाननी केल्यास आणि त्यात तथ्य न निघाल्यास, एक तर तो आरोप खारिज होतो, आणि, त्यांचे पदार्थविज्ञानातले योगदान खारिज करण्या-न करण्याचा प्रश्न मुळात न उद्भवल्याकारणाने आपोआपच निकालात निघतो - एका दगडात दोन पक्षी! (आरोपात तथ्य निघाले तरच मग त्या परिस्थितीत त्यांच्या योगदानाचे काय करायचे हा फार पुढचा प्रश्न उद्भवतो. आणि, त्या फार पुढच्या प्रश्नाचा निकाल भले काहीही लागो, परंतु, मुळात जर त्या आरोपात तथ्य असेल, तर मग ते तथ्य माहीत असणे - ते दडपले न जाणे - हे माझ्या मते महत्त्वाचे आहे.)

राहता राहिली गोष्ट श्री. न्यूटन यांच्या योगदानाच्या ग्राह्यतेची. तर, गॅलिलिओसाहेबाने (मरतामरता) म्हटल्याप्रमाणे, तुम्ही न्यूटनसाहेबाचा गुलामांच्या व्यापारात सहभाग होता म्हणा किंवा नव्हता म्हणा, त्याच्या टाळक्यात जर सफरचंद पडायचेच असेल, तर ते पडल्यावाचून राहणार नाही. भले तुम्ही 'पण मुळात न्यूटनच्या टाळक्यात सफरचंद पडलेच नव्हते! ती गोष्ट खोटी आहे!' म्हणून बेंबीच्या देठापासून जरी बोंबलून राहिलात, तरी या बाबीत शष्पभरदेखील फरक पडणार नाही. तेव्हा, चालू द्या.

असो.

----------

तळटीपा:

गॉस्पेल.

युनिव्हर्सली.

देववाणी तरी मुळात वैश्विकतः ग्राह्य का असावी / असावी का, हा/हे प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू.

३अ थोडक्यात, श्रीमती मार्था गेलहॉर्न यांच्या बैलाला घो.

म्हणजे नेमके कोठून, ते आम्हांस आजतागायत समजलेले नाही. मात्र, काही अश्लील संदर्भ असावा, अशी आपली उगाचच एक शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याचे अग्रगण्य वैज्ञानिक अशा प्रश्नांबद्दल काय भूमिका घेतात आणि त्यांच्या संशोधनाबद्दल श्री. थत्ते ह्यांचं काय मत आहे? कारण, लेखिकेनं ज्या पुरुषांबद्दल इथे लिहिलेलं आहे (रोमान पोलान्स्की, वुडी ॲलन, लुईस सीके, इ.) ते लेख लिहिताना जिवंत होते. श्री. आयझॅक न्यूटन माझ्या माहितीततरी सध्या जिवंत नाहीत. मूळ लेखिका मेलेल्या लोकांबद्दल मानहानीकारक काहीही लिहीत नाही; मीही लिहिलेलं नाही. श्री. थत्ते ह्यांनी तेही पथ्य पाळलेलं नाही. का, ह्या प्रश्नाचं उत्तरही अपेक्षित.

समजा बिभीषण विसपुतेंनी रिआयनायझेशनचा प्रश्न उद्या पहाटे निकाली काढला आणि उद्या दुपारी तो वुडी ॲलन किंवा हार्वी वाईनस्टाईनछाप वागला; तरीही त्याचा इथे संबंध काय? रिआयनाझेशनचा प्रश्न किंवा भौतिकशास्त्र ही कला आहे का? नितिन थत्ते ह्यांना कला समजतात का? कलाकृतींबद्दल कुणाला काय वाटावं, कलाकृतींचा अर्थ कसा लावावा, अर्थ लावताना कोणते संदर्भ वापरावेत, हा आपापला प्रश्न असतो; आणि लेखिकेला त्या संदर्भात पडलेले प्रश्न मलाही पडतात म्हणून मी हा धागा काढला. तसं व्यक्तिगत पातळीवरची चिकित्सा वा आकलन विज्ञानाच्या बाबतीत होतं आणि असावं, असं थत्ते समजतात का? मी समजत नाही.

मूळ लेखिकेला 'मॅनहॅटन', आणि 'ॲनी हॉल' हे सिनेमे आवडले; मलाही आवडले होते. म्हणून तिला हे प्रश्न पडतात. मला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा गतीचे नियम आवडत नाहीत कारण ते आवडीनिवडीच्या पातळीवर अस्तित्वात नाहीत, असं माझं मत आहे. श्री. थत्ते ह्यांच्या लेखी ह्या गोष्टी आवडीनिवडीच्या पातळीवर असून त्यांना त्या आवडतात का, आणि आता ही माहिती (गुलामांचा व्यापार) साधार सिद्ध झाल्यास ते नियम आवडणं बंद होण्याची भीती वाटते का?

'पशूवत वर्तन करणाऱ्या पुरुषांच्या कलेचं काय करायचं' ह्यात न्यूटन, आईनस्टाईन (किंवा मेरी क्यूरी) ह्यांचा संबंधच काय? मला समजलं नाही, म्हणून त्याही प्रश्नाचं उत्तर अपेक्षित.

. ह्याबद्दल माझ्यावर अंमळ विश्वास ठेवा (किंवा नका ठेवू, किंवा कसंही), महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये रिआयनायझेशनचा प्रश्न ही मोठी पाचर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बिभीषण विसपुतेंनी

सातपुते. बिभिषण सातपुते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाली नंदन यांनी उद्धृत केलेलीच पोस्ट वाचून मी हा प्रश्न इथे उपस्थित केला.
जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू आणि त्यामुळे गोऱ्या आणि काळ्या लोकांमधील भेदभाव आणि गोऱ्यांकडून काळ्यांवर होणारे अन्याय हे विषय ऐरणीवर आल्यामुळे कुणीतरी ही पोस्ट लिहिली. बहुधा ती सटायर आहे असेच वाटते. पण एक तत्त्व म्हणून आपली काय भूमिका आहे हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न आहे.

आयझॅक न्यूटन हे आज जिवंत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न कदाचित गैरलागू आहे हे मान्य. कारण आपण त्याच्या गुलाम-व्यापार-कृत्यामुळे त्याचे योगदान नाकारल्याने न्यूटन यांस काही फरक पडत नाही आणि चंद्र-पृथ्वी यांच्या परस्पर भौतिक संबंधांना काही फरक पडत नाही.

पण असे उघडकीस आल्याने आता कॅलक्युलसच्या शोधाचे श्रेय न्यूटन यांच्या ऐवजी लाइबनित्झ यांनाच द्यावे असे काही म्हणावे का? किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकवावा पण तो न्यूटनचा नियम म्हणून शिकवू नये का?

पण पण न्यूटन हे आज जिवंत असते आणि त्यांच्या भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक किंवा तत्सम काही बहुमान देण्याचे घाटत असते तर आपण विरोध करण्याची शक्यता आहे का? हा यामागील मूळ मुद्दा आहे. तोच प्रश्न बिभीषण सातपुते यांच्याबाबत विचारता येईल. बिभीषण सातपुते कोण हे मला माहिती नाही. त्यांनी कोणाता अत्याचार केला असल्याचे सूचित करण्याचा हेतू नाही.

न्यूटन दिवंगत असल्यामुळे आणखी एक उदाहरण आठवले. लोकसत्ताचे माजी संपादक अरूण टिकेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या गैरकृत्यांचा पाढा वाचणारे लेख प्रसिद्ध झाले. म्हणजे आधी त्यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख आणि त्यात त्यांच्या विद्वत्तेची थोरवी सांगितलेली. आणि मग त्यावर काउंटर लेख ज्यात त्यांच्या महिलाविषयक गैरवर्तणुकीचे दाखले होते. त्या लेखांतून "हे कसले विद्वान?" किंवा "अशांच्या विद्वत्तेचा उदोउदो कशाला करायचा?" असा सूर जाणवत होता. (टिकेकरांच्या मृत्यूपूर्वी असे लेखन आल्याचे मला माहिती नाही).

म्हणून मला एकूणच "कर्तबगार लोकांचा काळा इतिहास आणि त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह" हा विषय महत्त्वाचा वाटला.

अवांतर गंमत : सदरहू दिवंगत श्री न्यूटन यांनी आमच्या शैक्षणिक कालावधीच्या उत्तरार्धात आमच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत असे सांगणारे हजारो विद्यार्थी आज जगात सापडतील. विशेषत: तेव्हा आम्ही नावालिग असल्याने या अत्याचारांना चाइल्डहूड अब्युझ म्हणाता येईल असे वाटते. आज जसे करण जोहर हे सिनेमातील प्रत्येक क्षेत्र नियंत्रित करतात असे म्हणातात तसाच श्री न्यूटन यांचा गणित, भौतिक्शास्त्र वगैरेतील बऱ्याच प्रकरणात हस्तक्षेप होता असे आठवते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुतेक बॅटमॅनच्या फेसबुक भिंतीवर थत्तेचाचांनी ही पोस्ट वाचली असावी:
https://newsthump.com/2020/06/12/gravity-to-be-removed-due-to-sir-isaac-...

करिता माहितीस्तव:
NewsThump is a British news satire website that publishes spoof articles about current events. It is similar to other British news satire sites such as The Poke and The Daily Mash

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0