दिवाळखोरीचे बौद्धिक

नुकतीच डोंबिवलीत कोण्या एक कुलकर्णी नामक भाजपाईकडे बेकायदेशीर शस्त्रास्त्रे सापडली . अशा बातम्यांंवर कोणा एका अग्रगण्य मुखपत्रात खालील प्रकारे अग्रलेख आला तर आश्चर्य वाटायला नको....

सध्याच्या काळात अखिल हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवल्या जातील अशा घटना होताहेत. याचा आम्हास गर्व आहे. काफिर म्हणतात तसे 'हमे फक्र है'.
सध्याचे सरकार हिंदुत्ववादी विचारधारेचे नसून पोकळ लोकशाहीवादी झाले आहे. मी लोकशाही मानत नाही. सांप्रत हिंदुस्थानात ठोकशाही वा हुकुमशाहीच देशाला हिंदूराष्ट्र बनवू शकेल. त्यासाठी होतकरु मध्यमवर्गीय अभिजन वर्गातील तरुण जर शस्त्रास्त्रे बाळत असतील तर त्यांना माझा माझा पाठिंबा आहे. माझाच नव्हे तर हर एक कडवट हिंदूला पाठिंबा द्यावाच लागेल. शहरी नक्षलवादी जर परदेशातील हत्यारांसाठी व्यवहार करतील तर आम्ही षंढासारखे शांत बसायचे का. ज्या भवानी मातेसमोर महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शपथ घेतली तशीच शपथ तरुणांनी हिंदुस्थानातील घरोघरी घ्यायला पाहिजे. वेळ पडल्यास कट्टर हिंदू तरुणांनी आत्मघातकी हल्ले करायची तयारी ठेवली पाहिजे. हे सरकार षंढासारखे काम करतेय. गरीब ब्राह्मणी तरुणाच्या घरावर छापे मारुन काय मिळवलंत? शस्त्रास्त्रे तर मोहल्ल्यातील हर एका शामियान्यात सापडतील. आहे काय हिंमत धाड टाकायची सरकारची? नाही ना! मग का हिंदू तरुणांना लक्ष्य केले जातेय.भ्रष्टाचार, बेरोजगारी, आरक्षणे वगैरेसाठी कसले मोर्चे काढताय? पेटून उठा हिंदूराष्ट्रनिर्मितीसाठी. अभी नही तो कभी नही. हे कमकुवत सरकार व्होटबँक जपण्यासाठी लाचार हिंदू तरुणांना लक्ष्य करतंय. १९८९-९० च्या काळात कश्मीरमध्ये पंडीतांना हाकलून लावले गेले. तेव्हा काय मर्दुमकी दाखवली? ती अवस्था आज येऊ नये म्हणून आम्ही अशी शस्त्रास्त्रे साठवणाऱ्यांना जाहिर शाबासकी देतो. कुलस्वामिनी अंबाबाई तुम्हाला सदैव आशीर्वाद देवोत. हिंदुत्ववादी निखारे पेटू द्यावेत. त्यास आडकाठी करू नये. अन्यथा सरकारास महागात पडेल. भविष्यात जर शहरी नक्षलवाद रस्त्यावर उतरला तर त्याला जशास तसे उत्तर असेच कडवट हिंदू देतील. बाकीचे नपुंसक अवलादी मानवतावादी गप्पा हाकत बसतील. सध्याच्या काळात तरुणांनी महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, रस्ते, वीज पाणी समस्या वगैरे वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही पाहू नका जर आपले सरकार सत्तेत टिकले तर त्यावर तोडगा काढूच. पण हिंदूराष्ट्रनिर्मितीसाठी साठी असे शस्त्रसाठा बाळगणारे तरुण घरोघरी तयार झाले पाहिजेत. नाहितर पाकीस्तानची सरहद्द तुमच्या दारापर्यंत येईल. तेव्हा भविष्यात येणाऱ्या धोक्यांपासून आत्ताच सावध व्हा. हे लोकशाहीवादी सरकार उलथून टाका आणि भावी पिढीला नवनिर्वाचित हिंदूराष्ट्रात मोकळा श्वास घेण्यासाठी बलिदानास सामोरे जा.

(प्रस्तुत लेख वा वेचा असाच टाईमपास म्हणून लिहिला आहे. गंभीरपणे घेऊ नका. वाचा, फॉरवर्ड करा, मजा करा. अवतीभवती चाललेल्या तमाशात अजून ही वाढीव भर समजा)

©भूषण वर्धेकर
१९ जानेवारी २०१९
हैद्राबाद

field_vote: 
0
No votes yet