आयुष्य

आयुष्य मी चालत आहे ,

सोबतीला चंद्र चांदण्या -

मी नाही कंटाळलो,

बिचारा चंद्र मूक राहिला !

पाठवून दिले त्याने

माझ्या सोबतीला -

विनातक्रार शांतपणे

किरणांसवे सूर्याला !

...आता मला सोबत करताना

सूर्य भलताच तापला आहे !

field_vote: 
0
No votes yet