आवाज

घराभोवतीचे घणघण, ठणठण, चर्रचर्र
डंगर-डंगर-डंगर-फाऽऽड-डंगर-डंगर
प्रेमळ राकट तुझ्याऽऽयचा तुज्या, रांडंच्याऽ
विझणाऱ्या गिरणीचा भोंगा दिवसातुन तीनदा
निर्विकार गंभीर वाजणारा..
शॉप्पिफाईड चौकात मशिदीचा भोंगा पाचवेळा

साडेपाचपासून डोळे चोळताना
रक्ताच्या पेशीपेशींत टवटवणारी
निरंतर टकटक टेलिप्रिंटर्सची
मध्येच वाजणारी न्युजफ्लॅशची टिंऽग घंटी
रात्रपाळीचे तंबोरे, मस्त जुळलेले
माणसांचे नी मशीन्सचे
पेपरवाल्याची रोजचीच लगीनघाई
सायकलघंटी ट्रींगट्रिंग
टरबूजवाल्याची वखवख कलकल
'पेत्र म्हणाला..' ची खिरापत
कोरीव देवळातल्या गेरिश टाईल्ससारखी

खंडेनवमीच्या पहाटे शेजारी बांधलेलं बकरू
बँहॅऽऽऽऽ बँऽऽ
दगडावर पाणी सोडत लावलेलं सत्तूर
घर्रघस्स, घर्रघस्स..
वाटेकऱ्यांची वादावादी
एक बोटी कमज्यादा
चलतायंच रं लांड्या!
निमुट पायतान मुलाण्याचं
घास्सकर्र-घास्सकर्र..

आवाज अंगचा वास घेऊन उरलेले
वेल्डिंगच्या धुराचे, शेणामुताचे, भितीचे..
स्पिरिटच्या मुक्या बोळ्यांचे, शेकल्या धनगरी ढोलांचे
गुलाबी पटक्यांचे, फेट्यातल्या नोटांचे
खालमुंड्या नऊवारीतल्या मिश्रीचे,
नाकझाड्या इनशर्टच्या पाचवारीतल्या मँड्रेकचे
‘नाऽव काय, बच्चन!’ चे, बाटलीचे
येणारे, रुतून बसणारे, सलणारे
सुखावणारे, स्मरणारे.

अंतर्बाह्य आसुसलेले, खदखदलेले
निपचित पडलेले, खोल दडलेले
आवाज नेहमीचेच, नवे वाटणारे
ओळख देणारे, ओळखणारे.
आपापल्या पेश्शल कोलाहलाचे
शिब्बोलेथ आवाज आपापले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

निरंतर टकटक टेलिप्रिंटर्सची

हल्ली टेलिप्रिंटर वापरतात?????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घराच्या आजूबाजूला दोन मंगल कार्यालय आणि मारुतीरायांचे मंदिर असल्याने आवाज हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

स्तुत्य प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0