कीडा

प्रत्येक जीव आपली गुणसूत्रे पुढे जावीत या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करतो हे ऐकून आहे, परंतु माझ्यासारखे जीव या गुणाला काही वेगळाच आयाम आणि खोली बहाल करतात.
.
पालक होणं = गिल्टी वाटणं असं काही समीकरण आहे का ते माहीत नाही. माझ्या बाबतीत मात्र हे समीकरण लागू आहे. म्हणजे मला सतत गिल्टी वाटतं राहातं. मुलगी जरा रोडावली कि आपल्या सीमित क्युलिनरी स्किल्स बद्दल तीव्रतेने विचार येतात, आपल्याला इतर आयांसारखे चविष्ट पदार्थ करता येत नाहीत म्हणून ही अशी रोडावली असेल का? हिला नीट खायला मिळतंय का? पिल्लू असं रोडावत का चाललंय? मग ताबडतोब कल्पनेत दिसू लागते कि मुलगी चाळिशीला पोचलीये, तिला लहानपणी झालेल्या आबाळीमुळे ऑस्टिओपोरोसिस निदान झालेले आहे. कशी काय मी इतकी आबाळ केली? की तिचं आयुष्य उध्वस्त केलं मी Sad प्रत्यक्षात पिल्लू रोडावत नसून, मी फोफावलेली असते आणि त्या स्केलवर एकंदर जग मला काडी पैलवान वाटू लागत असतं.
दुसरा एक असाच अचरट प्रकार म्हणजे अचानक १२ वाजता, कॉम्पुटर ब्राउझ करत असताना, रात्री आठवण येणे - आपण मुलीला सुरक्षेचे नियम नीट सांगितलेले आहेत का? जगाबद्दल तिला सावध केले आहे का? आणि हा किडा डोक्यात आला कि ना मग झोपच उडते. उदाहरणार्थ - तिने होस्टेलवरती खोलीची कडी नीट लावली असेल का? आणि मग अचानक कल्पनाशक्ती भराऱ्याच घेऊ लागते. कोणीतरी काळे मास्क चढवलेली व्यक्ती तिने सताड उघडे ठेवलेल्या दारामधून आता घुसते, मुलगी तर दार उघडं ठेऊन गाढ झोपलेली असते. ही व्यक्ती दाराला कडी (जी की मुलीने लावलेली नसते) लावुन पुढे सरकते ... .... ... बाप रे, माझ्यात घशाला कोरडा पडते, पोटात गोळा येतो, हातपाय गळतात, आणि मग कसला काँप्युटर आणि कसली झोप लागतेय या आईला! फोनाफोनी करून, तिला रात्री झोपेतून खडबडून उठवून मग विचारले जाते - बाई ग कडी लावलीस का? मग मुलगी अवेळी आल्लेया या निरुद्योगी फोनमुळे खूप वैतागते.
कधी ती वेळेत होस्टेलवर पोचली नसेल तर ३६० App वरती दिसतं आणि मग किडा लगतो, कोणत्या तरी अंधाऱ्या गल्लीमधून ती चाललेली असते जिथे ड्रग अड्डीक्टस चा नुसता सुळसुळाट असतो. किंबहुना कोण कोण त्या गल्लीतून जातंय यावर सापळाच लावून ते बसलेले असतात. माझ्या कल्पनेत हिचं म्हणजे मुलीचं अज्जीबात इकडे तिकडे लक्ष नसतं ..... मग काय, फोन उचलून ताबडतोब तिला लावला जातो. "काय गं कुठे आहेस? अजून पोचली का नाहीस? न्यू यॉर्कच्या एखाद्या अंधाऱ्या alley मधून जातेयास का? आणि फोनची बॅटरी का इतकी कमी? आता जरा ९११ ची वेळ आली तर लागणार का फोन तुझा? गल्ली संपेपर्यंत रहा बोलत आता माझ्याशी. पण नको बॅटरी कुठाय? च च ...." मग मुलगी वैतागते. अगं आई मी इथे मित्र-मैत्रिणीबरोबर आरामात पिझ्झा खातेय, पार्टी करतेय. Can I call you later? हुश्श! जीव भांड्यात् पडतो.
मुलगी जशी जशी मोठी होतेय नवी काळजी पोखरते आहे - काय तर म्हणे तिच्या बाळाला ती कशी सांभाळेल? खरं तर
"छांछ छागोळे , भैंस भागोळे,
घरमा धमाधम"
असा प्रकार आहे म्हणजे म्हैस बाजारातून अजुन विकत आणली नाही तोच ताक कोण करणार या बद्दल घरात 'तू-तू-मै-मै' चालू आहे. किंवा मराठीमध्ये सांगायचं तर "बाजारात तुरी, भट भटणीला मारी." मुलगी अजून खूप लहान आहे, शिकते आहे, एवढ्यात कुठलं नातवंड मला! पण .... आपण काही काळजी करायचा चान्स सोडायचा नाही.
हां तर काय सांगत होते हा नवा किडा .... मुलीला तर आपण कधी शिकवलेले नाही की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये डोकं घालून पिशवी बांधू नये. माणूस गुदमरतो. मग जरा तिलाच हे माहीत नाही ती सुद्धा तिच्या बाळाला सांगणार नाही .... अरे बाप रे!!! ताबडतोब फोन उचलून काहीही संदर्भाशिवाय तिला ही मौल्यवान माहिती पुरवली जाते कि प्लास्टिकची पिशवी डोक्याला बांधू नये, श्वास कोंडतो. मुलगी बावाचळतेच , या सूचनेचा आता काय संदर्भ आहे हे काही ध्यानातच येत नाही. मी मात्र हुश्श करत - आपण शिकवलं बाबा. असच कधीतरी आठवतं बर्फ़ाचा फार मोठठा खडा गिळला तर घशात अडकून श्वास कोंडू शकतो.... आपण हे तिला कधी शिकवलंय का? ..... सेम ड्रिल अगेन! मध्यंतरी एकदा सहकाऱ्यांमध्ये काहीतरी सिरीअल किलर चा विषय निघालेलेआ होता, ताबडतोब त्या दिवशी मुलीला फोनाफोनी झालीच. तिने इकडे तिकडे वस्तू टाकल्या नाहीत असा दिवसच गेलेला नाही. त्यामुळे ती अतोनात अव्यवस्थित आहे, वेंधळी आहे याची मला खात्री असते त्यात मग स्पेशली एखाद्या बंडल साईटवरती वरती बातमी वाचते - अमुक एक बाई आपल्या बाळाला कारमध्ये ठेउन, टेक्सासच्या १०० डिग्री फॅ. तापमानात, शॉपिंगला गेली. परत आली तेव्हा बाळ ...... Sad ......... लागला ना कीडा डोक्याला. पूर्वी पितळ्याची का तांब्याची भांडी असत ज्याला कल्हई केली जाई नाहीतर अन्न विषारी होई, कळके. अरे बाप रे हे तिला शिकवायच विसरलोय आपण्. आता अमेरिकेत हीने पुढे कधी पितळ्याच्या(की तांब्याच्या) कल्हईशिवायच्या भांड्यात ..... अरे बाप रे! नाही ते काही नाही आज फोनच करेन कारण आपल्या इमेल्स ती आजकाल नीट वाचतच नाही. केवढं काही अति महत्वचे शिकवायचे राहीले आहे, पिल्लाला तर पंख फुटले आहे. आता काय!!! कसं शिकवायचं हे सर्व? Sad गिल्ट-गिल्ट-गिल्ट-चिंता-चिंता-चिंता!!
.
तर असे सगळे आहे मित्रांनो. तुम्ही हसत असाल, काय फुटकळ एक्सेसिव्ह बेसिक गोष्टी तरी, काय एवढी चिंता..... पण काय करणार, एकदा आई म्हणजे सर्वकाळ आई. तरुणपणी तर कधी आई-बाबांना काय वाटतं याची आपण पर्वा केली नाही, किंबहुना काय एवढी काळजी करतात , कशाला इतक्या निगेटिव्ह काळजीच्या गष्टीबद्दल सावध करतात असेच वाटे.पण आता इतक्या उशिरा कळतं आई बाबा आपली काळजी का करत आणि त्यांना त्या त्या वेळी काय वाटत असेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरं सांगु का आपण या वयात अशीच वागतो, हे सगळं सहज आहे. मी ही त्याच फेजमधून जात आहे. विशेषतः घरापासून मुलं दूर असली की, जास्तच घडतं. अगं आपल्या आधीच्या पिढीच्या बायका दुपार झाली की ओसरीवर येत पोस्टमनची वाट बघत ,आणि नाही आलं पत्रं खुशालीचं. तर मनाची समजूत घालत दुसर्या दिवशीही तशीच वाट बघायच्या. त्यांच्या अशा आठवणी आहेत माझ्याकडं.आज त्यांच्याकडे पाहतांना वाटतं
किती काळ बदलला पण कातर करणार्या घालमेली तशाच राहिल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!किती सुंदर शब्द वापरलात - कातर करणाऱ्या घालमेली.
त्यातून नोकरीमुळे मी फारच कमी वर्षे तिला दिली. त्यामुळे खूप काही निसटलेही. त्यातून मग असे वाटते अरे अमकं शिकवलं का तमकं शिकवलं का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुची, तुमचे बरोबर आहे, पण कसे आहे ना, आपल्याला नेह्मी वाटते की आपले काही चुकायला नको. आपले मन नेहमीच स्वत:ला सुरक्षित करायचा प्रयत्न करते, विशेषत: सायंकाळी अथवा रात्री. मध्यरात्री कधी जाग आली की असे विचार भरमसाठ येतात डोक्यात. काही नाही, "all is well" म्हणा.

"पूर्वी पितळ्याची का तांब्याची भांडी असत ज्याला कल्हई केली जाई नाहीतर अन्न विषारी होई, कळके. अरे बाप रे हे तिला शिकवायच विसरलोय आपण्. " -

झाले.. आम्ही सध्या तांब्याच्या भांड्यातुन पाणी पितोय. दोन भांडी भारतात पाठवली आहेत. कल्हई केलिये की नाही, हे माहित नाही. गिल्ट-गिल्ट-गिल्ट-चिंता-चिंता-चिंता!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो तांब्याची चव येते पाण्याला. मी म्हणून पीत नाही Smile

गिल्ट-गिल्ट-गिल्ट-चिंता-चिंता-चिंता!!

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0