बॅकग्राऊंड..

कवितेची संदर्भटीप: ड्राफ्ट्स मधली एक मेल..

"ऐक ना.. मजा..
रात्री कामाचा मूड आला आणि मी सगळी रात्र नीरव शांततेच मस्त काम केलं. आता पहाटेचे चार वाजलेत! रात्री दीडपासून एकीकडे काम आणि कानात हरीप्रसादांचा यमन, शिवरंजनी आणि हेमवतीची सोबत अशी आमची मैफील झाली. रात्री एकदोनदा वाटलं सुद्धा की एक मेल करुन तुला ही मजा सांगावी पण अर्थातच तुझ्या झोपेची गाडी केव्हाच नॉनस्टॉप सुटली असणार..! तिला ब्रेक देणे प्रत्यक्षात केलेच नसते..पण त्या वाटण्याची सहजखूण म्हणून आता "मेल" ड्राफ्ट करुन ठेवतेय त्या वाटण्याच्या बॅकग्राउंडवर लिहिलेल्या या ओळी..!"

"बॅकग्राऊंड"...

रात्रीचे तीन प्रहर..
बासरीचे सूर कानात..
लक्ष कामात
मन तारे-वारे अन आकाशात..
पापण्यांच्या कडा जड.. दिवसाच्या ओझ्याने शिणलेल्या..
पण डोळे?
रात्र विसरुन..
चुकून जागेच पूर्ण..
इतर कित्येक अपूर्णांकांच्या गर्दीत.. !!
-मेदिनी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नाही जमली. थोडी मुरायला ठेवली असती तर बरं झालं असतं. घाई झाली. रात्र विसरून डोळे जागे राहतात ही कल्पना चांगली आहे. त्याला अपूर्णांकाची जोड आहे. त्यातही दम आहे. पण बॅकग्राऊंडच जमलं नाही. मग हा कळस नुसताच उंच उडवणारा ठरतो.
क्षमस्व, स्पष्ट बोलल्याबद्दल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रावण, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व म्हणण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या नेमक्या प्रतिक्रियेमुळे एक ट्रिगर मिळाला आणि या प्रयोगाच्या अंतर्गत प्रक्रियेचा धांडोळा घेता आला त्यामुळे आपले आभार!
संशोधकाचा मूळ पिंड इथेही गप्प बसत नाही...!
कुठल्याही सृजनशील प्रक्रियेचा मागोवा घेतच राहतो तो असा. (संदर्भ: वर दिलेले उत्तर)
आपल्या प्रतिक्रियेवर सविस्तर उत्तर वर लिहिलेले आहे ते कृपया वाचावे.
धन्यवाद,
मेदिनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेदिनी..

श्रामोंशी सहमत
कल्पना छान असुनही आटोपती झाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मेदिनी,

छोटीशीच असली तरी कविता आवडली.
कवितेत एक मुक्तपणा जाणवला Smile

आशय व रुपके सखोल आहेत. अजून लिहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सागर, धन्यवाद.. हा एक प्रयोग होता.. अपूर्ण लेखनाचा...सोडून दिलेल्या वा राहून गेलेल्या म्हणा हवं तर..
आपल्याला आवडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
- मेदिनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेदिनी..

श्रावण मोडक, ऋषिकेश, आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. आपले म्हणणे एका अर्थी बरोबर आहे की मुरायला इ.ठेवायला हवी होती. या कवितेला संदर्भटीप मुद्दामहून ठेवली आहे. केवळ त्या त्या वेळी मनातल्या नोंदी आणि त्याअनुषंगाने उमटलेले शब्दतरंग इतकेच याचे स्वरुप आहे. एखाद्या अपूर्ण कॅनव्हास प्रमाणे.. असे अनेक कॅनव्हास मी सुरु करुन ठेवून दिलेले असतात...तसेच या कवितेच्या बाबतीत झाले आहे. ड्राफ्ट्स मधून उचललेली..म्हटलं तर अपूर्ण अशी ही कृती. यावर जास्त विस्तार करणार नाही पण एवढंच म्हणेन की नर सुगरण पक्षी घरट्यांच्या बांधणी हंगामात बाबतीत असा वागताना अनेकदा पाहिलेला आहे.. जवळपास पूर्ण होत आलेलं घरटं तसंच ठेवून दिलेलं असतं त्याने.. अशी अपूर्णांकांची गर्दी विहिरीकाठच्या वेड्या बाभळीवर झुलताना कैकदा पाहिलेली मनाने टिपून ठेवलेली आहेत. ती तशी का सोडून दिली मध्येच याला उत्तर काही नाही...पण त्यामुळे त्यांच्या त्यावेळच्या बांधणीला विसरुन जावं असंही वाटत नाही. बराच आकार तोवर त्यांनी घेतलेला असतो...केवळ पूर्णविराम नसला म्हणून त्यांच्याकडे पाहायचंच नाही की काय असं वाटतं.. आणि पूर्णविराम म्हणजे तरी काय? सुगरण पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नव्याने घरटी बांधायला घेतोच..आदल्या वर्षीची पूर्ण झालेली घरटी सोडून देऊन! असो..
जरा जास्तच लांबला प्रतिसाद. विस्ताराबद्दल क्षमस्व..
- मेदिनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेदिनी..

त्या त्या वेळी मनातल्या नोंदी आणि त्याअनुषंगाने उमटलेले शब्दतरंग इतकेच याचे स्वरुप आहे. एखाद्या अपूर्ण कॅनव्हास प्रमाणे.. असे अनेक कॅनव्हास मी सुरु करुन ठेवून दिलेले असतात...तसेच या कवितेच्या बाबतीत झाले आहे.

मान्य. माझा मुद्दा निकालात निघतो. Smile
जर, वाटलंच आणि, केला हा कॅनव्हास पूर्ण, तर नेमकं काय झालं आहे ते पहावयास आवडेल.
सुगरणाचं अर्धं घरटं यामागे काही कारणपरंपरा असावी असा कयास आहे. कधीतरी ऐकल्यासारखं वाटतं की, सुगरणीला मोहवून घेण्यासाठी तो आपली घरटं बांधण्याची क्षमता फक्त सिद्ध व्हावी एवढ्यापुरतंच ते घरटं बांधतो. नंतर जोडी मिळून ते पूर्ण करते. चुभुद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर..!! पण डोळे?
रात्र विसरुन..
चुकून जागेच पूर्ण..
इतर कित्येक अपूर्णांकांच्या गर्दीत.. !!

हे तर खासच...!!! आवडली कविता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले