आपले वाङमयवृत्त – मार्च २०१२

बरीचशी मराठी प्रकाशनं आजकाल आपली मुखपत्रं नियतकालिकांच्या स्वरुपात प्रकाशित करतात. आपल्या पुस्तकांची प्रसिद्धी व्हावी हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे नवीन पुस्तकांविषयी माहिती, जुन्या पुस्तका/लेखकाविषयी लेख किंवा त्यातले उतारे, इतर माध्यमांत प्रकाशनगृहाच्या पुस्तकांची घेतली गेलेली दखल अशा प्रकारचा मजकूर त्यात असतो. यात गैर काही नाही, पण वर्तमानपत्राप्रमाणेच अशा मुखपत्रांना केवळ तात्कालिक मूल्य असतं. त्या तुलनेत लोकवाङमय गृहाचं ‘आपले वाङमयवृत्त’ खूपच दर्जेदार आणि संग्राह्य असतं. मार्च २०१२च्या अंकाचा हा परिचय :

मुखपृष्ठापासूनच अंकाचं वेगळेपण जाणवतं. गेल्या वर्षातले वाङमयवृत्तचे अंक जगभरातल्या सुप्रसिद्ध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांनी सजले होते. सध्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर शिल्पं दिसतात. दीपक घारे यांनी शिल्पकारांबद्दलची एक लेखमाला जानेवारीपासून चालू केली आहे. डोनाटेल्लो आणि मायकेलांजेलो यांच्यानंतर मार्चमध्ये त्यांनी बर्निनीचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे मुखपृष्ठावर बर्निनीचं Francesco I d'Este हे शिल्प आहे, तर मलपृष्ठावर Ecstasy of Saint Teresa हे शिल्प आहे.

अरुण खोपकर यांची लेखमाला हे अंकाचं आणखी एक आकर्षण असतं. मार्चमध्ये त्यांचा ‘तांबड्या विटांची शाळा : आंबा आणि पिंपळ’ हा लेख आहे. त्यात ते आपल्या शाळेच्या जुन्या इमारतीशी आणि तिथल्या वृक्षांशी असलेल्या आपल्या नात्यामधून झाड लावणारे आणि तोडणारे यांच्याविषयी एक मुक्तचिंतन करतात. स्मरणरंजन आणि त्यातली हळवी भावनिकता चांगल्या प्रकारे लिखाणात कशी आणता येते हे शिकण्यासाठी मराठी आंतरजालावरच्या लेखकांनी हा लेख जरूर वाचावा असा आहे.

लोकवाङमय गृहानं प्रकाशित केलेल्या वसंत आबाजी डहाके यांच्या ‘गोष्ट : न सांगता येण्याविषयीची’ या पुस्तकातला एक उताराही या अंकात आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक ए. के. रामानुजन यांनी ठिकठिकाणी हिंडून गोळा केलेल्या कथांपैकी एक कथा सांगून डहाके मग त्याद्वारे जगण्या-मरण्याशी गोष्टी सांगण्याचा कसा संबंध लागतो हे त्यांच्या ओघवत्या शैलीत उलगडून सांगतात.

मुकुंद टाकसाळे वाङमयवृत्तमध्ये ‘तिरपागडं’ हे खुसखुशीत सदर लिहितात. यावेळी त्यात द. भि. कुलकर्णी यांच्या तेंडुलकरांविषयीच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. त्याचबरोबर बोनस म्हणून त्यांनी रवि परांजपेंना झोडलं आहे. निमित्त म्हणाल तर परांजपेंनी काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी एक जावईशोध लावला होता. तो म्हणजे पुण्यातले रिक्षावाले जिथेतिथे पचापचा थुंकत का असतात? तर पाब्लो पिकासो जगात होऊन गेला म्हणून!

याशिवाय अंकात ऐश्वर्य पाटेकर यांच्या कविता आहेत. यांच्या ‘भुईशास्त्र’ या संग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा ‘युवा पुरस्कार’ होता. लोकवाङमय गृहाच्या ‘मुलाँ रूज’ या पुस्तकाचं ‘प्रहार’मध्ये आलेलं परीक्षणसुद्धा मार्चच्या अंकात आहे. शेवटच्या पानावरचं ‘उत्खनन’ हेसुद्धा या मासिकातलं एक उल्लेखनीय सदर आहे. एखाद्या जुन्या लेखातला किंवा पुस्तकातला पानभर मजकूर यात दिलेला असतो. यशवंतराव चव्हाणांच्या मनावर लहानपणी जतींद्रनाथ दास या स्वातंत्र्यसैनिकाच्या मृत्यूचा कसा खोल परिणाम झाला त्याविषयीचा ‘ऋणानुबंध’ पुस्तकातला उतारा यावेळच्या अंकात दिला आहे.

अंकाचे वर्गणीदार होण्यासाठीची माहिती इथे मिळेल. तिथेच ‘आपले वाङमयवृत्त’चे काही जुने अंक पाहता येतील.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगली माहिती.
माहितगाराचे धागे नेहमीच नवी माहिती देतात. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपयोगी माहिती आहे. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

माहितगाराचा अवतार आम्हा वाचकांच्या कल्याणा झालेला आहे असा आमचा समज आहे. नित्य नवी उपयुक्त माहिती मिळून आमची चंगळ होते आहे.

परांजपेंनी काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी एक जावईशोध लावला होता. तो म्हणजे पुण्यातले रिक्षावाले जिथेतिथे पचापचा थुंकत का असतात? तर पाब्लो पिकासो जगात होऊन गेला म्हणून!
यात जावईशोध काय, खरेच आहे ते. ते ही आपल्या परीने नवचित्रकला साकारायचा प्रयत्न करत असतात. आता हे त्यांचे दुर्दैव की बिचार युरप मधे जन्माला आले नाहीत. नाहीतर 'तांबूलगुट्टशैली' नावाची एखादी नवी शैली एव्हाना पोस्ट्-मॉडर्न आर्टफॉर्म म्हणून प्रसिद्ध झाली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

माहितगार,

अशी छान छान माहिती देत रहा. तुम्ही दिलेल्या दुव्यावरुन जुने अंक उतरवून घेतले आहेत
तसेच लोकवांड्मय गृहाला वार्षिक सदस्यत्वाविषयी ईमेलही केली आहे.

माहितीबद्दल मनापासून धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0