प्रश्न संस्कृत आणि तमिळबद्दलचे!

१. भारतात संस्कृत ही भाषा साधारण कधी आली?या विषयाची बहुतांश 'मान्यताप्राप्त इतिहास संशोधन संस्थांनी' मान्य केलेली थेअरी कोणती?

२. संस्कृत भारतात येण्याआधी संपूर्ण भारतात द्रविड कुळातल्या भाषाच बोलल्या जात होत्या का?की अजून कोणते कुळ होते?कोणत्या प्रदेशात?

३. संस्कृत ही नियमबद्ध,ठरवून घडवल्यासारखी भाषा आहे.संस्कृत ही सुरुवातीला सर्वांसाठी नव्हती.मग जर ती केवळ विद्वानांसाठी असेल; म्हणजेच छोट्या जनसमुहाची ज्ञानवर्धनाची चर्चा करण्याची भाषा असेल तर त्याच संस्कृतचा भारताच्या जवळपास सर्व भाषांवर इतका प्रभाव का बरं पडावा?बहुजनांचा,कष्टकर्‍यांचा संस्कृतशी कितीसा संबंध हा त्या काळी येत असावा?

४. की कोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृत ही इथल्याच देशी भाषांवर 'संस्कार करून बनवली गेली' म्हणून तिला संस्कृत असे नाव दिले गेले हे खरे आहे?

५. भारतातल्या बर्‍याच भाषांवर संस्कृतचा चांगला प्रभाव आहे.पण सर्वात कमी प्रभाव आहे तो तमिळ भाषेवर. इतका की जर तमिळ लोकांनी 'ठरवलं तर' ते एक ही संस्कृत शब्द न वापरता केवळ १००% तमिळ शब्द वापरुन संवाद साधू शकतात.सध्याचा तमिळ भाषिक प्रदेश बघितला तर तो साधारण बाकीच्या राज्यांइतपतच आहे. मग हा एवढाच प्रदेश संस्कृतला प्रखर विरोध कसा काय करू शकला? त्या काळी आणि अजूनही तामिळनाडूने संस्कृतचा प्रभाव कसा काय रोखला असावा? शेजारचे कन्नड,तेलुगू ,मल्याळम या भाषा बोलले जाणारे प्रदेश संस्कृतच्या आक्रमणाला जितके शरण गेले तितके तमिळभाषिक शरण गेले नाहीत.ही केवळ आधुनिक काळची म्हणजे द्रविड पक्ष आल्यानंतरची गोष्ट नाहीये तर शेकडो वर्षांपासून तमिळ भाषिक विशेषत: ब्राह्मणेतर हे संस्कृतला विरोध करत आलेले आहेत.आता आधुनिक काळात जरी तमिळ भाषेतल्या आधीपासून असलेल्या संस्कृत शब्दांना पूर्वीइतका विरोध होत नसला तरी अजून नव्याने येणार्‍या संस्कृत शब्दांना टाळण्याचे प्रयत्न मात्र आवर्जून होतायत.हा इतका कट्टरपणा कशामुळे येत असेल?शेजारच्या अन्य दक्षिणी राज्यांनी मात्र संस्कृतपुढे नांगी टाकण्याचे कारण काय?

field_vote: 
0
No votes yet

वणक्कम सामि.
क्र ५ साठी काही उदाहरणे द्या ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मल्याळममधे तर भरमसाट संस्कृत शब्द आहेत. बाजूलाच असून.
ऐसा काय को?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा परशुरामाचा भाग मानला गेल्याने ब्राह्मणवस्ती आणि पर्यायाने संस्कृतचा प्रसार झाला असावा.नंबुद्रीपाद जातीचा केरळवर मोठा प्रभाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण या भाषांचे एक कोडेच आहे.

---------––
संस्कृत जिथे कुठे उदयास येऊन वेद, रामायण ,महाभारत इत्यादी लिहिले गेले तो भाग मध्यप्रदेश - ओडिशा असावा. या सर्व साहित्यात विंध्य, हिमालय, कैलास ,समुद्र,दंडकारण्य यांचे उल्लेख आहेत. काही बिहारी व्यापारी इंडोनेशिया,थाइलंडला गेले तसे काही तमिळीही { तेव्हाच्या}
पुम्पुहार बंदरातून तिकडे गेले.
दोन्ही भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वाढत होत्या.
पश्चिम किनाऱ्यावरच्या विशेषत: मंगळुरुकडचे लोकांना काशीचे,विद्याभ्यासाचे आकर्षण होते. तिथून संस्कृत कर्नाटक किनारा ते केरळला पोहोचली असावी.
------
पूर्वी देव मानल्यावर त्यांच्याशी संपर्क किंवा धनधान्य समर्पण पोहोचवण्याचे काम अग्निकडे होते. देवता जुन्या मोठःया झाडांत वसतात हे समजून झाडांचीच पुजा (अन्न ठेवणे, पाणी घालणे,प्रदक्षिणा घालणे)केली जात होती.

तमिळमध्ये झाड = मनरम् >> मंदीर>>मंदिर झाले. संस्कृत साहित्यात मंदिर नाही. बोधिवृक्ष - पोधिमनरम - पोधिगाई.
-------
तर या दोन भाषा एकमेकांवर प्रभाव का टाकू शकल्या नाहीत? दोन्हीही भाषा आपापल्या पद्धतीने अगोदरच समृद्ध झालेल्या होत्या. तमिळातल्या तिरुवल्लुवर संताचे एक उदाहरण घेता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तमिळमध्ये झाड = मरम्
पोधिगै हे तामिळनाडूतल्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या टेकड्यांचं नाव आहे.

संस्कृतमधे मंदिर शब्द नाहीये????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रश्नांची ठामपणे उत्तरे देणे कठीण आहे.
१. 'भारतात' 'संस्कृत' 'आली' यात तीन गृहीतके आहेत. संस्कृत भाषेतील आपल्याला ज्ञात आद्य वाङ्मय (वेद) कधी रचले गेले असा प्रश्न अधिक योग्य, पण त्याचेही सर्वमान्य उत्तर मिळेल असे नव्हे.
आज भारत म्हणतात तो देश अगदीच अलीकडे अस्तित्वात आला. वैदिक वाङ्मयात सप्तसिंधुंचे उल्लेख आहेत. त्या नद्या आजच्या पाकिस्तानात आहेत.
वेद ज्या भाषेत लिहिलेत त्या भाषेला काही विद्वान संस्कृत न म्हणता वैदिक भाषा म्हणतात इतकी ती पाणिनी-व्याकरण-बद्ध संस्कृतापेक्षा वेगळी आहे.
संस्कृत बाहेरून भारतात आली का नाही याविषयी विद्वानांत एकमत नाही.
असो. वेद कधी रचले गेले, याचे एक उत्तर: इसपू एक ते दोन हजार वर्षांच्या दरम्यान.
सवडी सवडीने अजून लिहीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेद ज्या भाषेत लिहिलेत त्या भाषेला काही विद्वान संस्कृत न म्हणता वैदिक भाषा म्हणतात इतकी ती पाणिनी-व्याकरण-बद्ध संस्कृतापेक्षा वेगळी आहे.

पाणिनीने संस्कार केले, म्हणून ती 'संस्कृत' ना? मग वेद ज्या भाषेत लिहिलेत, त्या (पाणिनीपूर्व) भाषेस 'संस्कृत' म्हणणे हे सयुक्तिक कसे ठरेल?

(तसेही, पाणिनीने जिच्यावर संस्कार केले, त्या वेदिक-टू-पाणिनियन भाषिक कंटीन्युअमला 'गीर्वाण' की कायसेसे नाव आहे ना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गीर्वाण असे काही official नाव नाही. गीर्वाण संस्कृतलाच म्हणतात.

पाणिनी संस्कार करणारा एकमेव होता असे नव्हे. शिवाय ज्यांना वेद क्लेम करायचे आहेत (अप्रतिहत परंपरा इ.) ते वैदिक भाषेस संस्कृत म्हणतात.

एकूणच, भाषाशास्त्रापेक्षा राजकीय मुद्दा आहे हा.

भाषा एखाद्या नदीसारखी असते म्हटले तर कुठल्या क्षणी जुने रूप संपून नवीन प्रचलित झाले सांगता येत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार्वी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२. संस्कृत भारतात आली की इथलीच, याविषयीच एकमत नसल्याने पुढचा प्रश्न गैरलागू ठरतो.
आर्य व द्रविड भाषाकुळांव्यतिरिक्त तिबेटो-बर्मन (ईशान्य भारत) आणि ऑस्ट्रो-आशियाई (मुंड व ख्मेर उपकुळे) कुळांतील भाषा भारतात बोलल्या जात असल्याचे उल्लेख ब्रिटिश सर्वेक्षणात आहेत.

४. प्रकृति म्हणजे निसर्ग, यावरून प्राकृत म्हणजे नैसर्गिकरीत्या विकसित झालेल्या भाषा तर संस्कृत ही त्यांच्यावर संस्कार करून, व्याकरणाच्या नियमांनी बांधून टाकलेली काहीशी कृत्रिम भाषा असा सिद्धांत अनेकांनी मांडला.
आधी संस्कृत, ती 'अपभ्रष्ट' होऊन/ विविध प्रांतात पसरल्याने बदल होऊन प्राकृत भाषा निर्माण झाल्या/ प्राकृत नियमबद्ध होऊन संस्कृत/ वैदिक भाषा मूळ - तिची दोन (विकसित/अपभ्रष्ट) रूपे संस्कृत व प्राकृत अशा अनेक थिअऱ्या उपलब्ध आहेत.[हे सगळेच सिद्ध करण्यास अवघड सिद्धांत आहेत.]
आपल्या प्रतिपादनास सोयीची ठरेल ती कुठलीही निवडतात Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे प्रेत जाळण्याऐवजी पुरायची, ममी करायची पद्धत असती तर काही पुरावे मिळाले/राहिले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुसंस्कृत म्हणजे अतिरेक संस्कार म्हणावे इतके संस्कार केले गेले. प्राकृतच बरी असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0