"कविता महानगरी"

उपनगरी ला महानगरी ची येतच नाही धार ,
कविता गेली पार ,
इथे तर कविता गेली पार!

निळ्या-तांबड्या त्रोटक चड्ड्या
दाखवीत अपुल्या त्या मांड्या
(पुरुषांच्याही ओढत चड्ड्या!)
कविणी फिरती फार
कविता गेली पार ,
गड्यांनो , कविता गेली पार!

"पुरुष येइ जर अमुच्या जवळे
कामाग्नीच्या धगेत वितळे
मोक्षाला तो अपुल्या कवळे
दाहक आम्ही फार
!"
कविता गेली पार ,
गड्यांनो , कविता गेली पार!

न्यूयॉर्की, कवी जर्सीवाले
कामरंगी ते जरी नहाले
दग्ध अशा कवितेने झाले
खिशामध्ये ते लपवून अपुले
काव्य, घरी जाणार !!!
उपनगरी ला महानगरी ची येतच नाही धार ,
कविता गेली पार ,
तिथे तर कविता गेली पार!
xxx
टीनेक , न्यू जर्सी

field_vote: 
0
No votes yet