मीच वागवतो मला सावत्र भावासारखा - गझल

लांब आलो कितीतरी आता
जाउया आपल्या घरी आता

=====================

कोण आहे याइथे माझ्या स्वभावासारखा
सोसतो आनंद मी आता तणावासारखा

तू कशाला काढतो आहेस खोड्या जीवना
मीच वागवतो मला सावत्र भावासारखा

====================

घेत गेलो सारखा उपभोग आयुष्या तुझा
पण तरी जडलाच नाही रोग आयुष्या तुझा

====================

तुझे निश्चीत नाही हे तरी निश्चीत आहे ना
मला माहीत आहे हे तुला माहीत आहे ना

===================

एकटे प्यायला मजा येते
आपले व्हायला मजा येते

ती मला भेटण्याहुनी हल्ली
वाट पाहायला मजा येते

ध्येय नसण्यास ध्येय केले की
ध्येय साधायला मजा येते

नाहिलेल्या अनोळखींचेही
केस हुंगायला मजा येते

ती विषय काढणार नाही तो
ज्यात बोलायला मजा येते

मी तिथे जीव लावतो जेथे
जीव सोडायला मजा येते

होउनी 'बेफिकीर' एखादे
नाव विसरायला मजा येते

=================

-'बेफिकीर'!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त आहे कविता! मजाच मजा आहे एकूण..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

एकटे प्यायला मजा येते
आपले व्हायला मजा येते
.
ध्येय नसण्यास ध्येय केले की
ध्येय साधायला मजा येते

कविताच पूर्णच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी उर्दूत "जिंदगी"ला उद्देशून काही लिहिले तर विचित्र वाटत नाही पण मराठीत जीवना, आयुष्या अशा हाका मारायला का कोण जाणे पण विचित्र वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लांब आलो कितीतरी आता
जाउया आपल्या घरी आता

पटले. खूप आवडला हा मतला. मतलाच म्हणतात ना? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0