Skip to main content

मिठी

मिठी

कितीक समुद्रापलीकडची मामे बहिण
पुऱ्या सात वर्षांनी मायदेशी आली
तब्बल दहा दिवसांसाठी

भेटलो नेहमी प्रमाणे
भावन्डे मामा मावशा वगैरे
आता आम्हीच चाळीशीपार
आणि ते तर साठीच्या पुढे

बहिण आणि बाकी सारे
मुबलक हसलो खाल्लो प्यायलो हिंदकळलो
पुऱ्या सात वर्षाची कसर भरत

निघताना ती गप्प गप्प , सुन्न
" ठरवलंय आता दरवर्षी यायचं "
दबल्या आवाजात ती पुटपुटल्यागत

आणि निरोपाच्या मिठी नंतर तर काहीच नाही उरले
गदगदणार्या तिच्या कणाकणातून
फक्त अगतिकता , स्वतःवर दोषारोपण
आणे सारे बंध विसविशीत झाल्यानंतर येणारी
काळीज चिरून जाणारी
विकल निराश बोच फक्त

मला उगाचच फार श्रीमंत वाटून गेलं

आणि मी अधिकच आश्वासक समंजसपणे
तिला दाट मिठीत गुरफटून घेतलं

पुढची सात वर्ष तिला पुरेल इतकं .

अनामिक Thu, 05/04/2012 - 23:35

जेमतेम सगळ्याच परदेशस्त भारतियांची हीच अवस्था, वडासारखी! झाडाला आकाशी उंच वाढायचं तर असतं, पण पारंब्याची ओढ सतत जन्मभूमीकडे.
छान झालीये कविता, पण ह्या विषयावरच्या बर्‍याच कविता वाचल्यामुळे तितकी भावली नाही.

.शुचि. Fri, 14/08/2015 - 19:59

आणि निरोपाच्या मिठी नंतर तर काहीच नाही उरले
गदगदणार्या तिच्या कणाकणातून
फक्त अगतिकता , स्वतःवर दोषारोपण
आणे सारे बंध विसविशीत झाल्यानंतर येणारी
काळीज चिरून जाणारी
विकल निराश बोच फक्त

काही मूड कवेत येत नाहीत अर्थात शब्दात त्यांची इन्टेनन्सिटी परिपूर्ण रीतीने मांडता येत नाही. ही जी कालवाकालव - तो असाच एक मूड.