शेअर बाजार

डिस्क्लेमर: या धाग्याचा लेखक अतिशय तिरसट आणि असोशल आहे. या धाग्याचे आणि तदनुषंगाने होणाऱ्या चर्चेचे कोणतेही प्रताधिकार आपल्याकडे असल्याचा दावा लेखक करत नाही. हा धागा आणि त्यापुढील सगळी चर्चा यावरील लेखकाचे प्रतिसाद त्याच्या स्वत:च्या अनुभवातून आणि वेगवेगळे युट्युब व्हिडिओ बघून शेअर बाजारात काय चालते आणि काय चालत नाही हे बघून लिहिलेले आहेत/असतील. ते योग्य आहेत असा लेखकाचा कोणताही दावा नाही. तसेच लेखक सेबी सर्टिफाईड फायनान्शिअल ॲडव्हायसर नाही. त्यामुळे लेखक फक्त स्वत:ची निरीक्षणे मांडणार आहे. त्यावर कितपत विसंबून राहायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. त्यामुळे कोणतेही नुकसान झाल्यास लेखक किंवा त्याच्या विस्तारीत कुटुंबातील कोणीही किंवा ऐसीअक्षरे ही वेबसाईट किंवा अन्य कोणीही जबाबदार राहणार नाही तर ती जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. लेखक त्याच्या मते योग्य अशी नुसती दिशा दाखविणार आहे. अमुक एक शेअर घ्या किंवा विका याविषयीचे कोणतेही रेकमेन्डेशन लेखक देणार नाही. आणि हे डिस्क्लेमर मान्य नसेल तर यापुढील लेख आणि प्रतिसाद वाचायची तसदी घेऊ नये. लेखक जन्मापासून पुण्यात सदाशिव पेठेतच राहिलेला असल्याने पुणेरी तिरसटपणा त्याच्यात पुरेपूर भिनलेला आहे याची नोंद घ्यावी.

शेअर बाजार म्हणजे एक हत्तीखाना असतो. आमच्या जमातीत आफ्रिकन हत्ती वेगळे, आशियाई हत्ती वेगळे, आशियाई हत्तींमध्येही भारतीय हत्ती वेगळे, थाई हत्ती वेगळे, भारतीय हत्तींमध्ये पण कर्नाटकी हत्ती वेगळे, केरळी वेगळे आणि आसामी अजून वेगळे. जंगली हत्ती आणि माणसाळलेले हत्ती हे अजून दोन प्रकार. तसेच शेअरमार्केटमधील ट्रेडर्समध्ये वेगवेगळे प्रकार असतात. काही हत्ती संयमी असतात तर काही उतावळे असतात. यापैकी उतावळ्या हत्तींना अपयशच येणार हा शेअरमार्केटचा नियम आहे. संयमी हत्तींमध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असतो तो म्हणजे मनी मॅनेजमेन्ट व्यवस्थित करणे. इतरही गुण लागतातच पण मनी मॅनेजमेन्ट व्यवस्थित नसेल तर इतर कितीही गुण असले तरी त्याचा उप्योग होणार नाही.

शेअरमार्केटमध्ये नव्या हत्तींसाठी सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपल्या भांडवलाच्या २% पेक्षा जास्त रक्कम एका ट्रेडवर कधीही पणाला लावायची नाही. समजा अबक कंपनीचा शेअर १००० रूपयाचा आहे. तो कोणा हत्तीने विकत घेतला. तो विकत घेताना त्या हत्तीची अपेक्षा असते तो शेअर वर जाईल आणि आपल्याला फायदा होईल. पण तो शेअर वर न जाता खाली जायला लागला तर हत्तीला तोटा होईल. किती तोटा सहन करायचा याला स्टॉप लॉस म्हणतात. म्हणजे समजा तो शेअर १००० वरून ८०० वर गेला तर नुकसान २०० रूपयांचे होईल. त्या परिस्थितीत तो शेअर विकायचा कारण तो हत्ती जास्तीतजास्त २०० रूपये तोटा सहन करू शकेल. म्हणजे १००० ही एन्ट्री प्राईस तर ८०० ही स्टॉप लॉस प्राईस झाली. हा स्टॉप लॉस कसा काढायचा हे नंतर कधीतरी. म्हणजे एका शेअरमागे २०० रूपये इतकी रक्कम पणाला लागली. पहिले सूत्र हे की आपल्या एकूण भांडवलाच्या २% पेक्षा जास्त रक्कम कधीही पणाला लावायची नाही. म्हणजे जर आपले भांडवल १०००० रूपये असेल तर त्याच्या २% म्हणजे २०० रूपये. जर स्टॉप लॉस २०० रूपये प्रती शेअर असेल तर १०००० रूपयात १० शेअर येत असले तरी एकच शेअर घ्यायचा. याला योग्य मनी मॅनेजमेंट म्हणता येईल.

दोन हत्तींचे उदाहरण घेऊ. संयमी हत्ती आणि उतावळा हत्ती. संयमी हत्ती मनी मॅनेजमेंट व्यवस्थित करतो तर उतावळा हत्ती मनी मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाही. दोघांकडेही १०००० रूपये आहेत. त्यामुळे नियमाप्रमाणे संयमी हत्ती एकच शेअर घेतो तर उतावळा हत्ती १०००० मध्ये दहा शेअर येतील म्हणून दहा शेअर घेतो. मार्केटमध्ये काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे ट्रेड घेण्यापूर्वी जर मार्केट आपल्या विरूध्द गेले तर आपण किती लॉस घेऊ शकतो हे पहिले बघायचे आणि मग पुढचे. समजा मार्केट विरूध्द गेले तर संयमी हत्तीला २०० रूपये तोटा होईल तर उतावळ्या हत्तीला २००० रूपये तोटा होईल. म्हणजे उतावळ्या हत्तीने आपले २०% भांडवल एका ट्रेडवर पणाला लावले तर संयमी हत्तीने २%. अजून एक असाच ट्रेड उलटा गेला तर उतावळ्या हत्तीचा तोटा होईल ४०% आणि संयमी हत्तीचा ४%. या परिस्थितीत संयमी हत्ती अजूनही मार्केटमध्ये फार मन:शांती न गमावता राहू शकेल पण उतावळ्या हत्तीला मार्केटमध्ये अर्थ नाही-- मार्केट हा जुगार आहे असे कायकाय वाटायला लागेल. आता तिसऱ्या ट्रेडमध्ये जरी स्टॉपलॉस २०० रूपये खाली असला तरी शेअर थोडासा खाली आल्यावर उतावळ्या हत्तीच्या मनात मागच्या दोन ट्रेडच्या दु:खद आठवणींची भुते थैमान घालायला लागतील. त्यामुळे एखाद वेळेस अगदी ५० रूपये शेअर खाली गेला तरी मार्केट माझ्यासाठी नाही असे म्हणत उतावळा हत्ती शेअर विकून चालू पडेल. बऱ्याचदा शेअर असा खाली येऊन परत वर जातो. त्यामुळे तिसऱ्या ट्रेडमध्ये शेअर असा ५० रूपयांनी खाली आला तरी नंतर ५०० रूपये वरही जाऊ शकतो. अशा वेळी उतावळा हत्ती आधीच मार्केटबाहेर पडलेला असेल तर संयमी हत्ती आधीच्या दोन ट्रेडचा तोटा भरून काढून तिसऱ्या ट्रेडमध्ये चांगला पैसा कमवेल.

मार्केटमध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. हत्तींनी शिस्तबध्द प्रकारे मनी मॅनेजमेंट केली तरी थोडे ट्रेड आपल्याविरूध्द गेले तरी नंतर घसघशीत पैसे देणारा ट्रेड मिळेपर्यंत मार्केटमध्ये राहता येईल. नाहीतर मार्केटकडून सणसणीत कानफाडीत खाऊन उतावळे हत्ती आधीच बाहेर जातील आणि भरपूर पैसे देणाऱ्या ट्रेडपर्यंत टिकायचेच नाहीत.

यापुढील मुद्दे प्रतिसादात लिहेन.

परत एकदा: लेखक अतिशय तिरसट स्वभावाचा असल्याने वरील डिस्क्लेमर वाचूनच मग प्रतिसाद द्यावेत. प्रतिसादांना वेळ मिळेल त्याप्रमाणे लेखक उत्तरे देईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

धन्यवाद, धागा काढल्याबद्दल.
-------

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा!!! वेलकम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटमध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही.
असहमत
सुनिल मिंगलानी या शेअर मार्केट मधील आसाराम बाबा ला चाबी सापडलेली आहे. तुनळी वर बघुन घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

सुनिल मिंगलानी या शेअर मार्केट मधील आसाराम बाबा ला चाबी सापडलेली आहे. तुनळी वर बघुन घ्या.

मी यांचे व्हिडिओ बघितलेले नाहीत पण कोणालाही शेअर मार्केटमधील आपल्याला सगळेकाही कळते आणि आपण १००% बरोबर असतो असे वाटायला लागले तर अशा लोकांपासून दूर राहावे असे मी ठरविले आहे. मार्केट हाच मायबाप असतो. त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्याइतके कोणालाही कळूच शकत नाही.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर दिलेल्या उदाहरणात संयमी हत्तीने हजार रूपयाचा एक शेअर घेतला. त्याच्याकडे भांडवल आहे १० हजार रूपये. उरलेल्या ९ हजार रूपयांचे काय करावे? उरलेल्या पैशात जास्त ट्रेड घेता येतील पण प्रत्येक ट्रेडमध्ये २% चा नियम पाळायचाच. म्हणजे कोणत्याही एका ट्रेडमध्ये भांडवलाच्या जास्तीतजास्त २% एवढीच रक्कम पणाला लावायची. समजा दुसरा शेअर १०० रूपयात मिळत असेल आणि स्टॉप लॉस २ रूपयांचा असेल तर २०० भागिले २ = १०० शेअर जास्तीतजास्त घेता येतील. १०० शेअर घ्यायला १०० गुणिले १०० = १० हजार रूपये लागतील. तेवढे त्याच्याकडे नाहीत. त्याच्याकडे आता ९ हजार रूपयेच उरले आहेत. तेव्हा तो त्या पैशात ९० पर्यंत शेअर्स घेऊ शकतो. एकावेळेस कितीही ट्रेड घ्या- एक किंवा अनेक. कोणत्याही एका ट्रेडमध्ये २% पेक्षा जास्त रक्कम पणाला लावायची नाही म्हणजे नाही.

जर चांगला सेट-अप मिळाला तर सगळी रक्कम एकाच ट्रेडमध्ये गुंतवली तरी हरकत नाही. चांगला सेट-अप म्हणजे नक्की कोणता हे नंतर कधीतरी. पण काहीही झाले तरी २% चा नियम पाळायचाच.

मी स्वत: १०-१५% भांडवल नेहमी मोकळे ठेवतो. कारण मार्केट दररोज संधी निर्माण करून देत असते. अचानक चांगली संधी मिळाली तर ती घ्यायला आपल्याकडे भांडवल शिल्लक हवे. सगळेच भांडवल अडकलेले ठेवले तर अशा संधी सोडाव्या लागतील.

आमच्या सुपासारख्या कानाला खडा म्हणजे मनी मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची. मार्केटमध्ये कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. श्रीयुत ट्रम्प महाशयांनी एखादी ट्विट टाकली तरी मार्केट हादरू शकते. अशावेळी आपल्याकडे केवळ स्टॉप लॉस असतो. तो कसोशीने पाळायचा. कोणत्याही ट्रेडमध्ये शिरायच्या आधी आपण किती तोटा सहन करू शकतो ते बघायचे. चार्टवरून स्टॉप लॉस किती येतो हे बघायचे आणि त्याप्रमाणे शेअर किती घ्यायचे हे ठरवायचे. बरेच नवे हत्ती २% नियम पाळतात पण स्टॉप लॉसमध्ये चूक करतात. म्हणजे समजा चार्टवरून स्टॉप लॉस ५ रूपये येत असेल आणि भांडवलाच्या २% = २०० रूपये येत असेल तर २०० भागिले ५ = ४० शेअर्सच घ्यायचे. पण बऱ्याचदा नवे हत्ती आपल्याकडे किती भांडवल आहे ते बघून आधी किती शेअर्स घ्यायचे हे ठरवितात. समजा आपल्याकडे असलेल्या भांडवलातून १०० शेअर्स घेता येत असतील तर ते १०० शेअर्स घेतात. आणि रूपयात स्टॉप लॉस २०० असेल तर प्रत्येक शेअरला तो २००/१०० = २ रूपये झाला. मग शेअर दोन रूपयांनी खाली आला तर ते बाहेर पडतात. हा चुकीचा ॲप्रोच आहे. चार्टवर स्टॉप लॉस ५ रूपये दिसत असेल तर आपण पण प्रति शेअर ५ रूपये इतकाच स्टॉप लॉस पाळायचा. अनेकदा शेअर ३-३.५०-४ रूपये इतका पडून मग वर जाऊ शकतो. जर दोन रूपये असा मधेच स्टॉप लॉस आपण ठरविला तर अन्यथा नफ्यात जाणारे ट्रेड पण तोट्यात जाऊ शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर दिलेल्या उदाहरणात उतावळ्या हत्तीला २०% तोटा दोन वेळा होईल असे म्हटले आहे तसा दोन वेळा फायदा होऊ पण शकतो. आणि तो फायदा संयमी हत्तीला होईल त्यापेक्षा जास्त असेल कारण त्याने जास्त शेअर्स घेतले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे असा फायदा चुकून अपघाताने झालेला असतो. सगळी शिस्त, सगळे नियम, मनी मॅनेजमेंट न सांभाळता झालेला फायदा हा घातक असतो. कारण असा फायदा झाला तर तो आपल्याला चार्ट रिडिंग बरोबर येते म्हणून झाला आहे असा गैरसमज होतो आणि विनाकारण आत्मविश्वास वाढतो. मग अशा वाढलेल्या आत्मविश्वासातून असे उतावळे हत्ती अजून मोठे मोठे ट्रेड घेतात आणि कधीतरी खूप खोल खड्ड्यात पडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हत्ती, धागा वाचत आहे. मुख्य बोर्डावर स्वागत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही एका ट्रेडवर २% पेक्षा जास्त भांडवल पणाला लावायचे नाही हा नियम पाळत एकापेक्षा जास्त ट्रेड घेता येऊ शकतील. वर दिल्याप्रमाणे उतावळ्या हत्तीने एका ट्रेडमध्ये २०% भांडवल पणाला लावले तर संयमी हत्तीने प्रत्येक ट्रेडमध्ये २% असे दहा ट्रेड घेतले. म्हणजे त्याने पण आपले २०% भांडवल पणाला लावले. कोणी विचारेल या दोन परिस्थितीत काय फरक आहे कारण दोघांनीही पणाला लावलेली रक्कम सारखीच आहे. इथे गणितातील प्रोबॅबिलिटी आपल्या कामाला येईल. समजा हत्तींनी कोणताही स्टडी केलेला नसेल आणि असेच ट्रेड घेतले तर शेअर एकतर वर जाईल किंवा खाली जाईल याची प्रोबॅबिलिटी सोयीसाठी प्रत्येकी ५०% धरू (यात शेअरची साईडवेज मूव्ह सध्या या उदाहरणापुरती धरत नाही) म्हणजे कोणत्याही ट्रेडमध्ये नफा किंवा तोटा व्हायची शक्यता ५०% आहे असे धरू.

म्हणजे उतावळ्या हत्तीला २०% तोटा होईल याची शक्यता ५०% आहे. संयमी हत्तीला २०% तोटा कधी होईल? जर सगळे म्हणजे दहाच्या दहा ट्रेड फसले तर. जर कोणताही एक ट्रेड फसायची शक्यता ५०% असेल तर सगळे दहाच्या दहा ट्रेड फसतील याची शक्यता १/१०२४ म्हणजे ०.१% पेक्षा कमी होते. म्हणजे संयमी हत्ती आपले २०% भांडवल गमावेल याची शक्यता जवळपास नाही पण उतावळा हत्ती आपले २०% भांडवल गमावेल याची चांगली ५०% शक्यता आहे.

मार्केटमध्ये काहीही झाले तरी आपले भांडवल सुरक्षित राखायचे. बुराडी घाटच्या लढाईतला दत्ताजी म्हणाला होता त्याप्रमाणे 'बचेंगे तो और भी लडेंगे'. जर भांडवल सुरक्षित ठेवले तर पुढचे ट्रेड घेता येतील. तसे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये पाऊल ठेऊ शकणार नाही. या गोष्टी न समजणारे लोकच 'मार्केट म्हणजे जुगार आहे' असा अपप्रचार करत फिरतात.

याचा अर्थ प्रत्येक वेळी दहा ट्रेड घ्यावेत का? तसे नाही. कारण नवे असताना एका वेळी दहा पोझिशनवर लक्ष ठेवणे कठिण जाऊ शकते. आणि जर खूप चांगला सेट-अप मिळाला तर एकच ट्रेड घेतला तरी काही हरकत नाही. पण काहीही झाले तरी एका ट्रेडवर २% पेक्षा जास्त रक्कम कधीच पणाला लावायची नाही. .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटमध्ये यशस्वी व्हायला मनी मॅनेजमेंट बरोबरच माईंड मॅनेजमेंट खूप महत्वाची असते. इथे आपला एक पैसाही पणाला लागला नसेल तर २०% तोटा सारख्या गोष्टी वाचायला मजा येते. पण प्रत्यक्षात आपले पैसे पणाला लागलेले असतात तेव्हा आपली मानसिकता खूप वेगळी असते. शेअर खाली जायला लागला आणि तोटा ५%- १०%- १५% झाला की आपल्या डोक्यात भुते थैमान घालायला लागतात. मग स्टॉप लॉस असेल त्यापूर्वीच एक्झिट करणे हा प्रकार अनेकदा होतो. किंवा इरेला पेटून अमुक एक होईल या आशेवर लॉस मेकिंग ट्रेडमध्येही बाहेर न पडता राहिले जाते. अशावेळी स्टॉप लॉस २०० रूपये असेल तर मग तो अजून थोडा खाली नेऊ- २२५ करू. शेअर २१० ने खाली गेला तरी मग वर जाईल या आशेवर. दोन्ही परिस्थितीत तोटा मोठा होतो. अशा वेळी मानसिकता कशी असते याचा अंदाज प्रत्यक्ष ट्रेड न घेता करता येणार नाही.पण माझ्या अनुभवावरून सांगतो की आपण ट्रेडमध्ये असताना आपल्या डोक्यात थयथया नाचणाऱ्या भुतांना काबूत करता न आल्यास तोटा होणारच हे लिहून घ्या. आम्ही हत्ती असलो तरी इथे बाकी सगळी माणसे आहेत. अशी भुते माणूस अनेकदा आपल्या कल्पनेतून तयार करतो किंवा १०-१५% इतका मोठा फटका बघितला की ही भुते डोक्यात बाहेरून येऊन थैमान घालायला लागतात. पूर्ण स्थितप्रद्न्य माणसाच्या डोक्यातच ही भुते अजिबात येणार नाहीत पण इतर सगळ्यांच्या येणारच. आपल्या हातात या भुतांचा आकार कमी ठेवणे हे नक्कीच असते. वर बघितल्याप्रमाणे उतावळ्या हत्तीने संयमी हत्तीच्या दहापट मोठी पोझिशन घेतली आहे. त्यामुळे जेव्हा उतावळ्या हत्तीला १५% तोटा दिसत असेल तेव्हा संयमी हत्तीला १.५% तोटाच दिसेल. तोटा होत असताना १.५% विरूध्द १५% हा फरक खूप म्हणजे खूप मोठा असतो. १५% तोटा म्हणजे दहापट जास्त दिसत असला तरी अशावेळी डोक्यात थैमान घालणारे भूत शंभरपट मोठे असते.

अशी भुते थैमान घालायला लागली की चुकीचे निर्णय घेतले जातात आणि चुकीचे निर्णय घेतले की तोटा होतो. ही प्रक्रीया अजिबात सोपी नाही. सोपी असती तर शेअर मार्केटमध्ये केवळ १०% इतक्या कमी लोकांनाच नफा झाला नसता. आपण ट्रेडमध्ये असताना ही भुते डोक्यात थैमान घालायला येणारच हे गृहित धरावे. फक्त त्या भुतांना काबूत ठेवायला त्यांचा आकार मर्यादित ठेवणे हे आपल्या हातात असते. म्हणून मनी मॅनेजमेंट खूप महत्वाची. मनी मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर माईंड मॅनेजमेंट व्यवस्थित करता येऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टॉप लॉस म्हणजे काय हे आपण बघितले. तो कसा काढायचा हे नंतर कधीतरी चार्टसह आपण बघणार आहोत. स्टॉप लॉसला महत्व असते कारण मार्केटमध्ये ही एकच गोष्ट आपल्या नियंत्रणात असते. त्यामुळे आपण किती तोटा सहन करू शकतो हे बघायचे आणि त्याप्रमाणे किती शेअर घ्यायचे हे ठरवायचे. इतर गोष्टी त्यानंतर. कोणत्याही ट्रेडमध्ये शिरताना सगळे फायदा व्हावा याच उद्देशाने शिरतात. आपल्याला तोटा व्हावा या उद्देशाने ट्रेड घेणारे सॅडिस्टिक हत्ती माझ्या पाहण्यात नाहीत. तरीही तोटा व्हायचा तो होतो कारण आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणामुळे मार्केट आपल्याला अपेक्षित असते त्या दिशेला न जाता विरूध्द दिशेला जाते. आता आपल्याला अपेक्षित दिशेला मार्केट गेले तर आपल्याला फायदा होईल. पण तो फायदा किती होईल? उदाहरणार्थ आपण १०० ला एन्ट्री घेतली आणि स्टॉप लॉस ९५ चा असेल. म्हणजे प्रति शेअर स्टॉप लॉस ५ रूपये झाला किंवा प्रति शेअर रिस्क ५ रूपये झाली. शेअर वर गेला तर तो किती वर जाऊ शकेल?म्हणजे टारगेट प्राईस किती असेल? जसा स्टॉप लॉस चार्टवरून येतो त्याप्रमाणे टारगेट प्राईस पण चार्टवरूनच काढायची. आपल्या मनाला येईल तो स्टॉप लॉस आणि टारगेट घेणे म्हणजे तोट्याला आमंत्रण. दोन्ही- स्टॉप लॉस आणि टारगेट कसे काढायचे हे नंतर बघू. जर टारगेट १२० चे असेल तर रिवार्ड १२० वजा १०० = २० रूपये झाला. म्हणजेच रिस्क ५ रूपयांची आणि रिवार्ड २० रूपयांचा. म्हणजे रिस्क-रिवार्ड रेशो १:४ झाला.

नवे हत्ती जर पोझिशनल ट्रेड करणार असतील तर रिस्क-रिवार्ड रेशो किमान १:३ हवा. जर इंट्राडे करणार असतील तर २:३ पण चालेल. पोझिशनल आणि इंट्राडे म्हणजे काय हे पण नंतर कधीतरी. जर रिस्क-रिवार्ड रेशो १:३ पेक्षा कमी असेल म्हणजे वरील उदाहरणात टारगेट ११५ पेक्षा कमी असेल तर ट्रेड घ्यायचा नाही. मार्केटमध्ये हजारो शेअर्स आहेत. हा नाहीतर तो दुसरा कोणता शेअर आपल्याला संधी देईलच. त्याच्यात ट्रेड करायचे.

म्हणजे जसे पहिले तत्व- आपल्या भांडवलाच्या २% पेक्षा जास्त रक्कम पणाला लावायची नाही त्याप्रमाणेच दुसरे तत्व- रिस्क-रिवार्ड रेशो १:३ पेक्षा कमी असल्यास तो ट्रेड घ्यायचा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान. वाचतोय. येत राहुदे.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे आपला एक पैसाही पणाला लागला नसेल तर २०% तोटा सारख्या गोष्टी वाचायला मजा येते. पण प्रत्यक्षात आपले पैसे पणाला लागलेले असतात तेव्हा आपली मानसिकता खूप वेगळी असते.

होहो. हे छान.

कधी कुणी विकिपिडियावर लेख लिहितात तेव्हा लेखकाला 'मला काय वाटते' हे लिहिता येत नाही. दुसरा कुणी एडिटर ते काढून टाकतो संदर्भ नाही म्हणून.
पण आता तो यातला काही भाग तो संदर्भ म्हणून घेऊ शकतो जर तुम्ही हे लेखन कॉपीराईट मुक्त आहे असं लिहिलंत तर. अर्थात मी हे फक्त सुचवतो आहे. निर्णय तुमचाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरच डिस्क्लेमर लिहिले आहे:

" या धाग्याचे आणि तदनुषंगाने होणाऱ्या चर्चेचे कोणतेही प्रताधिकार आपल्याकडे असल्याचा दावा लेखक करत नाही. हा धागा आणि त्यापुढील सगळी चर्चा यावरील लेखकाचे प्रतिसाद त्याच्या स्वत:च्या अनुभवातून आणि वेगवेगळे युट्युब व्हिडिओ बघून शेअर बाजारात काय चालते आणि काय चालत नाही हे बघून लिहिलेले आहेत/असतील. ते योग्य आहेत असा लेखकाचा कोणताही दावा नाही."

हे विकीपीडियाला चालणार असेल तर संदर्भ जरूर द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर लिहिले आहे की रिस्क-रिवार्ड रेशो १:३ पेक्षा कमी असेल तर ट्रेड घ्यायचा नाही. याचा काय परिणाम होईल ते आता लिहितो.

आपल्याला एकूण शेअरमार्केट ट्रेडमधून पैसे काढायचे आहेत. शेअर अ किंवा शेअर ब कडूनच पैसे मिळाले पाहिजेत असे नक्कीच नाही. पैसे कुठूनही येईनात. कोणताही शेअर ही आपली लग्नाची बायको नाही काय समजलास बेंबट्या? दुसरी चांगली दिसली तर पहिलीला सोडायचे आणि दुसरीचा हात धरायचा किंवा पहिली घरात असतानाच दुसरीला पण घरी नांदायला आणायचे हे मला सुदैवाने बरेच लवकर कळले.

नंतर आपण वेगवेगळे सेट-अप बघणार आहोत. इथे किती सेट-अप विषयी कसे लिहिणार आहे मला माहित नाही कारण त्यासाठी इंडिकेटर्स लागतील आणि ते असे लिहिता येणे कठिण आहे. मार्केटमध्ये नवे असाल तर कोणतेही इंडिकेटर्स न वापरणारे दोन बेसिक सेट-अप पण नक्कीच देता येतील. समजा असा एखादा सेट-अप आपल्याकडे आहे. आपण तो सेट-अप वापरून ज्या ज्या शेअर्समध्ये बाय सिग्नल मिळतो त्याप्रमाणे ते शेअर विकत घेतले असे समजू. उदाहरण सोपे करायला प्रत्येक ट्रेडला रिस्क १ रूपया आणि रिवार्ड तीन रूपये इतका आहे असे समजू. आपला सेट-अप प्रत्येकवेळी चालेल का? तसे नक्कीच नाही. आपला सेट-अप काही परिस्थितीत फसू पण शकतो म्हणजे त्या सेट-अप मधून ट्रेड घेतला तरी आपल्याला तोटा होऊ शकतो. जगातील कोणत्याही सेट-अपची ॲक्युरसी १००% नाही. आणि समजा कोणी असा १००% यशस्वी सेट-अप आपल्याकडे आहे असा दावा करायला लागल्यास तो माणूस थापा मारत आहे असे समजावे.

आता आपण या सेट-अप प्रमाणे १००० ट्रेड घेतले आणि त्यातील ७५% म्हणजे ७५० ट्रेड फसले तरी आपले नुकसान होईल ७५० रूपये. आणि उरलेले २५० ट्रेड आपल्याला २५० गुणिले ३ = ७५० रूपये मिळवून देतील. म्हणजे आपला ट्रेड ७५% वेळा फसला तरीही ब्रेक-इव्हन असेल. आणि त्यापेक्षा कमी वेळा फसला तर तो आपल्याला पैसे मिळवून देईल इतके साधे गणित आहे.

हे सगळे वाचताना खूप सोपे वाटते पण प्रत्यक्षात ते तितके सोपे नाही. नाहीतर मार्केटमध्ये ९०% लोकांना तोटा झाला नसता. मराठीत सोपा हा एकच शब्द आहे पण इंग्लिशमध्ये सांगायचे तर It is simple but not easy.

हे वरकरणी इतके साधेसोपे दिसणारे गणित असले तरी बहुसंख्य लोकांना मार्केटमध्ये तोटा का होतो? याविषयी पुढील प्रतिसादात लिहेन. एकाच प्रतिसादात सगळी कारणे आठवतील असे नाही. मी काही सगळे मुद्देसूद आणि फ्लो मध्ये शिकवायला कॉलेजमधला प्रोफेसर नाही. जसे आठवतील त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रतिसादात की कारणे लिहेन.

बऱ्याच जणांना शेअर मार्केट म्हणजे झटपट श्रीमंत व्हायची गुरूकिल्ली वाटते. ते तसे नक्कीच नाही म्हणून मुख्य ट्रेडिंगशी संबंधित विषय घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी लिहित आहे. हे सगळे माहित नसेल आणि तरीही मार्केटमध्ये उतरलात तर तुम्ही इतरांना श्रीमंत कराल-- इतर म्हणजे अन्य अनुभवी ट्रेडर्स आणि ब्रोकर लोकांना. आपला उद्देश इतरांना श्रीमंत करणे हा नसून आपण स्वत: पैसे मिळविणे हा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये उतरायच्या आधी माहिती असल्याच पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर म्हटल्याप्रमाणे जर रिस्क-रिवार्ड रेशो कमितकमी १:३ ठेवला तर आपण तब्बल ७५% वेळा चुकीचे असलो तरी तोटा होणार नाही. वरकरणी दिसायला अगदी साधेसोपे गणित असूनही मार्केटमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांना तोटा का होतो याची कारणे आपण बघू. जशी आठवतील तशी आणखी कारणे इतर प्रतिसादात देईन.

१. मनी मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची. ती बरोबर नसेल आणि न झेपणारे मोठे ट्रेड घेतले तर आधी म्हटल्याप्रमाणे मोठा तोटा भांडवलच खाऊन टाकू शकतो. असे अनुभव आले की मार्केटविषयी अविश्वास वाढत जातो आणि मार्केट आपल्यासाठी नाही असे वाटायला लागते.

२. माईंड मॅनेजमेंटविषयी आधी लिहिलेच आहे. मार्केटमध्ये थोडेफार पैसे मिळवणारा कोणीही सांगेल की माईंड मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट यावर ८०% पेक्षा जास्त गोष्टी अवलंबून असतात. वर लिहिल्याप्रमाणे मनी मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर माईंड मॅनेजमेंट व्यवस्थित करायला मोठ्या प्रमाणावर मदत होते.

३. स्टॉप लॉस आणि टारगेट चुकीचे काढणे: आतापर्यंत कळून आले असेलच की आपण शेअर विकत घेत असू तर स्टॉप लॉस म्हणजे शेअर किती खाली जाऊ शकेल आणि टारगेट म्हणजे शेअर किती वर जाऊ शकेल हे बघणे. या दोन्ही गोष्टी चार्टवरून आणि चार्टवरूनच काढायच्या. डे ट्रेड करताना अर्धा किंवा पाऊण टक्का टारगेट ठेवता येईल पण पोझिशनल करताना असे १०% किंवा २०% टारगेट आपण आपल्या मनाने ठरवायचे नाही. हे चार्ट बघूनच ठरवायचे. जर स्टॉप लॉस खूप जवळचा ठेवला तर बहुतेक ट्रेडमध्ये छोटा छोटा तोटा होईल आणि सगळे ट्रेड बघितले तर एकूण तोटाच होईल. जर स्टॉप लॉस खूप लांब ठेवला आणि स्टॉप लॉस हिट झाला तर मोठा तोटा होईल. तेव्हा स्टॉप लॉस आणि टारगेट या दोन्ही गोष्टी एकदम ऑब्जेक्टिव्ह हव्यात. त्यात कुठेही आरबिट्ररीनेस किंवा भावना नकोत.

४. रिस्क-रिवार्ड रेशो १:३ पेक्षा कमी असेल तरी ट्रेड घेणे. १:३ म्हणजे रिवार्ड तिप्पट आहे असे दिसत असले तरी ब्रोकरेज, एस.टी.टी आणि इतर चार्जेस आपल्याला भरायला लागतात आणि या गोष्टी दोन्ही वेळा म्हणजे शेअर विकत घेताना आणि विकतानाही भरायला लागतात. त्यामुळे प्रत्यक्षात आपला नफा तिप्पट नसेल तर त्यापेक्षा कमी असतो. आणि कितीही काहीही म्हटले तरी ट्रेड करताना चुका होतात. त्यामुळे १:३ हे मार्जिन ठेवले तर एखाद वर्षात नफा होईल ही शक्यता नक्कीच वाढते. त्यापेक्षा कमी रिस्क-रिवार्ड ठेवला तर 'इन द लाँग रन' तोटा व्हायची शक्यता असते.

५. माईंड मॅनेजमेंटशी संबंधित गोष्ट म्हणजे शेअर खाली जायला लागला की डोक्यात भुते नाचायला लागतात. यातून दोन प्रकारच्या कृती केल्या जाऊ शकतात. पहिली म्हणजे स्टॉप लॉस हिट व्हायच्या आधीच एक्झिट करणे आणि दुसरी म्हणजे तोटा होत आहे याचा इगो इश्यू बनवून इरेला पेटून स्टॉप लॉस अजून खाली नेणे. असे करताना आशा असते की स्टॉप लॉस खाली नेला तर आपण किंमतीला खाली जायला अजून मार्जिन देऊ आणि मग तिथून किंमत परत वर फिरेल. दोन्ही गोष्टींमुळे मोठा तोटा होऊ शकतो.

६. ट्रेडमध्ये कोणत्याही भावनांना स्थान नको. बाहेर जायचा सिग्नल मिळाला की बाहेर जायचे. इगो इश्यू बनवायचा नाही. जगात बिलिअन-ट्रिलियन डॉलर्सचे व्यवहार चालतात. आपण त्यापुढे चिल्लर असतो. इगो ठेवायचा असेल तर तो रॉथशिल्ड, मॉर्गन स्टॅन्ले अशा अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या संस्थांना ठेऊ दे. आपण त्यापुढे क्षुल्लक असतो. पण इगो ठेवल्यामुळे होते असे की एक्झिट सिग्नल आला तरी लॉस मेकिंग ट्रेडमध्ये कायम राहिले जाते. आणि नफ्यात जाणाऱ्या ट्रेडमध्ये थोडे असुरक्षित वाटते त्यामुळे एक्झिट सिग्नल येण्यापूर्वीच थोडा थोडका नफा घेऊन बाहेर पडले जाते. अनेकांना तोटा घ्यायला (आणि तोटा घेतला म्हणजे आपण चुकीचे होतो हे मान्य करायला) आवडत नाही. आणि नफा होत असेल तर परत नंतर शेअर पडला तर काय घ्या म्हणून थोडा नफा घेऊन चालू पडले जाते. यातून होते असे की अनेक सामान्य ट्रेडर मोठे मोठे लॉस आणि छोटे छोटे प्रॉफिट घेतात. यातून एकूण लॉस होतो. जर १०० पैकी ९९ ट्रेडमध्ये एक रूपयाचा नफा आणि एका ट्रेडमध्ये २०० रूपयाचा तोटा झाला तरी एकूण लॉसच होणार. तेव्हा ॲक्युरसीच्या टक्केवारीला फार महत्व नसते. आपण बरोबर असताना किती मोठा मलिदा घेऊन जाता आणि चुकीचे असताना किती तोटा घेऊन बाहेर जाता हे महत्वाचे. गुरूमूर्ती साहेब म्हणतात की चांगला ट्रेडर ८०% वेळा चुकीचा असेल तरी एकूण नफा घेतो. कारण ते उरलेल्या २०% प्रॉफिट मेकिंग ट्रेडमध्ये खूप मोठा प्रॉफिट घेतात.

७. सेट-अप प्रमाणे जर सिग्नल मिळत असेल तर तो न घेता त्याच्या विरूध्द दिशेचा सिग्नल घेतला म्हणजे मार्केट खाली चालले असताना शेअर विकत घेतला तर नक्कीच तोटा होईल.

सातव्या मुद्द्यात फक्त सेट-अपचा उल्लेख केला आहे. बाकी ज्या सगळ्या गोष्टींमुळे तोटा होतो त्या गोष्टी मनी मॅनेजमेंट आणि माईंड मॅनेजमेंटशी संबंधित आहेत हे समजेलच, अजून कोणती कारणे आठवली तर नंतर लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

८. बरेच जण इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून शेअर घेऊन ठेवतात. त्या शेअरची किंमत खाली आली की मग आणखी शेअर घेतात कारण त्यातून घेतलेल्या शेअरची सरासरी किंमत कमी होते. या प्रकाराला 'ॲव्हरेजींग' म्हणतात. असे करताना मंथली चार्टवर नेहमी लक्ष ठेवायला हवे. इन्व्हेस्टमेंटसाठी लाँग टर्म शेअर घेतलेले असतील तर त्यातून कधी बाहेर निघायचे याचे सिग्नल मंथली चार्टवरून घ्यायचे. ॲव्हरेजींग करायचे तर जरूर करा पण मंथली चार्टमधून निघायचा सिग्नल आला की निघायचे. मंथली चार्टवर निघायचा सिग्नल येईल शेअर बऱ्यापैकी खाली पडला तर. जर शेअर खाली पडला असेल तर मग तो परत कधीतरी वर येईल वगैरे आशेवर शेअरमध्येच टिकून राहायचे नाही. शेअर परत वर आला तर परत विकत घ्यायचा पण खाली पडणारे चिंचोके नकोत. २०११ पर्यंत रिलायन्स कम्युनिकेशन्स हा पण निफ्टी-५० पैकी एक शेअर होता. आज तो शेअर घ्यायला साठ पैसेही द्यावे लागत नाहीत. तीच गोष्ट सुझलॉन, जयप्रकाश असोसिएट्स सारख्या एकेकाळच्या 'ब्लू चीप' शेअर्सची.

खाली रिलायन्स कम्युनिकेशनचा मंथली चार्ट देत आहे.

hatti

हा शेअर २००८-०९ मध्ये जवळपास ८०० रूपयांचा होता यावर विश्वास बसणार नाही पण ही सत्य परिस्थिती आहे हे चार्टवरून समजेलच. लोक चूक करतात ती म्हणजे शेअर ८०० वर असताना समजा २० शेअर घेतले तर शेअर अर्धा पडला म्हणजे ४०० झाल्यावर दुप्पट म्हणजे ४० शेअर घ्यायचे. अजून अर्धा पडल्यावर त्याच्या दुप्पट म्हणजे ८० शेअर घ्यायचे. आणि हे चक्र चालूच राहते. गेली १२ वर्षे असे ॲव्हरेजिंग करणाऱ्यांच्या हातात अक्षरश: कवडीमोल असे हजारो शेअर्स असतील. शेअरमार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सचे नुकसान होते त्याचे ॲव्हरेजींग हे मोठे कारण आहे. ॲव्हरेजींग करायचेच असेल तर वर जाणाऱ्या शेअर्सचे करावे. खाली जाणाऱ्या शेअर्सचे कधीच करू नये. २००७-०८ पासून नियमितपणे एच.डी.एफ.सी बँक घेणाऱ्या इन्व्हेस्टरची आता किती चांगली स्थिती असेल. शेअर वर जाणार की खाली हे आपल्याला आधीच कळत नाही. म्हणून मंथली चार्टवर लक्ष ठेवायचे. मंथली चार्टवर बाहेर जायचा सिग्नल मिळाला की निघायचे. शेअर परत उलटा वर जाईल वगैरे आशेवर राहायचे नाही. शेअर वर चालला आहे याचे चिन्ह दिसले तर परत शिरायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या ठराविक शेअर साठी ठराविक सेटअप सांगता येईल का? आत्ताशी थोडफार तांञिक बाबी समजावून घ्यायला चालू आहेत.
कागदावर फार छान काम करतात, प्रत्यक्षात ट्रेडिंग करायला गेलं की नाही जमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

या अडचणींना सामोरा न गेलेला नवा ट्रेडर मिळणे कठिण आहे. यावर मी पुढील उपाय सुचवेन--

१. keep it simple. उगीच पन्नास इंडिकेटर वापरून कन्फ्युजन वाढते. कारण एक इंडिकेटर बाय सिग्नल देतो तर दुसरा सेल. मुख्य फोकस प्राईस ॲक्शनवर हवा. त्याबरोबर मुव्हिंग ॲव्हरेज पाहिजेत. बरोबर एम.ए.सी.डी, आर.एस.आय किंवा स्टोकॅस्टिक आणि बोलींजर एवढे असले तरी भरपूर झाले. सगळे मिळून शंभर-दोनशे इंडिकेटर्स तरी असतील. इंडिकेटर्स पेक्षा प्राईस ॲक्शन जास्त महत्वाची. म्हणजे सपोर्ट-रेजिस्टन्स, ट्रेन्डलाईन्स खूप महत्वाचे.

२. बरेच नवे ट्रेडर एक चूक करतात आणि ती म्हणजे कुठूनतरी एक सेट-अप मिळाला तो चालला नाही तर मग दुसऱ्या सेट-अपच्या मागे धावायचे. तो चालला नाही तर तिसऱ्याच्या मागे धावायचे. मग चौथ्या-पाचव्या आणि हे चालूच राहते. असे करू नका. वर म्हटल्याप्रमाणे सेट-अप पेक्षा मनी मॅनेजमेंट आणि माईंड मॅनेजमेंट अधिक महत्वाची असते. अगदी ४०% ॲक्युरसी असलेला सेट-अप जरी मिळाला तरी रिस्क-रिवार्ड कसोशीने पाळला तर पैसे काढता येतील. आता थोडे गणित करून बघितले तर ४०% ॲक्युरसी असलेल्या सेट-अपचे पहिले चार ट्रेड फसतील ही शक्यता १२.९६% असते. ही शक्यता अगदी कमी नाही. आणि त्यातही महत्वाची अट म्हणजे सेट-अपचे सगळे नियम पाळले गेले पाहिजेत. बऱ्याचदा 'एन्ट्री मिळेल' असे वाटून प्रत्यक्ष सिग्नल यायच्या आधीच ट्रेड घेतला जातो. तसे होत असेल तर नक्कीच पहिले चार ट्रेड फसतील ही शक्यता बरीच जास्त होईल. तेव्हा या गोष्टी टाळल्या जात आहेत ना हे बघा. सगळ्या अटी पूर्ण होत आहेत याची खात्री झाल्याशिवाय ट्रेडमध्ये शिरायचे नाही. अशी शिस्त आल्यावर सेट-अपवर प्रयोग करायचे आणि त्याला पुरेसा वेळ द्यायचा. पहिले दोन ट्रेड फसले की मग लगेच दुसऱ्या सेट-अपच्या मागे जायचे नाही.

३. एकच सेट-अप आधी बघायचा आणि तो ज्या शेअर्समध्ये येत असेल तिथे तो वापरायचा. सुरवातीला अगदी पाचच शेअर दररोज ट्रॅक करायचे. रिलायन्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, अचयुएल अशा मोठ्या शेअरवर तो आधी चालवून बघायचा. अशा शेअर्समध्ये अगदी रानटी मूव्ह शक्यतो येत नाही. त्यामुळे रिस्क तितकी कमी असते. बँकनिफ्टीसारख्या व्होलाटाईल गोष्टीवर सुरवातीलाच सेट-अप वापरू नका.

४. दररोज ट्रेड घेतलाच पाहिजे अशी अजिबात सक्ती नाही. एखादा निष्णात शिकारी सावज बंदुकीच्या टप्प्यात यायची वाट बघतो तसे करायचे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनी मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे. लगेच फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ नका. सुरवातीला अगदी पाच शेअर्सवर ट्रेड करा. मग हळूहळू हा आकडा वाढवत न्यायचा. ज्यावेळी फ्युचर्सला द्यावे लागणारे मार्जिन कॅशमध्ये ट्रेड करायचे असेल तर जेवढे पैसे टाकायला लागतील त्यापेक्षा थोडेसेच जास्त असेल त्यावेळीच फ्युचर्समध्ये शिरायचे. त्याआधी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, सध्या फक्त पिवोट पाॅईंट व आरएसआय लाऊन अभ्यास चालू आहे. नुकसान करून घेण्याचा कोटा पूर्ण केला आहे, आताही होत आहे पण स्टाॅपलाॅसचे उपकार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मला पिवोट पॉईंटविषयी माहिती नाही. मी ते कधी वापरत नाही.त्यामुळे त्याविषयी लिहिता येणार नाही. पण आर.एस.आय विषयी एक गैरसमज नेहमी आढळतो आणि तो म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर गेला तर शेअर ओव्हरसोल्ड होतो म्हणून तो विकायचा. एच.डी.एफ.सी बँकचा मंथली चार्ट बघितला तर हा केवढा मोठा गैरसमज आहे हे कळेल. हा शेअर गेल्या १२ वर्षात साडेबारा पटींनी वाढला पण आर.एस.आय बहुसंख्य वेळा ६० च्या वर होता हे बघायला मिळेल.

hatti

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहीत आहात. सोप्या शब्दात व सहज समजेल असे लिहीत आहात.
_/\_

डिलीव्हरी घेऊन स्विंग ट्रेडिंग करणाऱ््यांसाठी काही सांगण्यासारखे असेल तर तेही वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिलीव्हरी घेऊन स्विंग ट्रेडिंग करणाऱ््यांसाठी काही सांगण्यासारखे असेल तर तेही वाचायला आवडेल.

हो. स्विंग ट्रेडिंगसाठी डबल बॉटम आणि ट्रेंडलाईन ब्रेक-आऊट हे दोन सेट-अप वर लिहिणार आहे. एक तर कॅशमध्ये पोझिशनल शॉर्ट करता येत नसल्याने डबल टॉप सारख्या सेट-अपचा उपयोग होणार नाही. या सगळ्या गोष्टी मी कशा लिहिणार आहे याची थोडीही कल्पना मला नाही. अजूनपर्यंत कँडलस्टिक म्हणजे काय हे पण लिहिले नाहीये. अशा गोष्टी लिहून सांगण्यावर मर्यादा येतात म्हणून दोनच सेट-अप देणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_/\_

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार्टसह नेमक्या एका मुद्यावर उत्तर हे भारीच. ( यालाच फोकस्ट म्हणतात का?)
पुढच्या दहा वर्षांत एफडीवर फक्त विश्वास ठेवणाऱ्यांना गुंतवणुकीचे धंधेही शिकून घ्यावे लागतील.
फंडामेंटल्स का ट्रेंडस हा मुद्दा कळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक असतात-- ट्रेडर आणि इन्व्हेस्टर्स.

इन्व्हेस्टर्स म्हणजे दीर्घ काळासाठी शेअर घेऊन ठेवणारे लोक. कित्येक इन्व्हेस्टर्स वर्षानुवर्षे शेअर आपल्याकडे ठेवतात. शेअर चांगले असतील तर ते त्यात मधूनमधून भर टाकत असतात. इन्फोसिसने गेल्या २१ वर्षात ९० पटींने, टी.सी.एस ने १४ वर्षात १५ पटींनी परतावे दिले आहेत. हे शेअर 'मल्टीबॅगर' म्हणून सगळ्यांना माहित असतात. पण असे मल्टीबॅगर परतावा दिलेले इतर काही शेअर्स आहेत. मदरसन सुमी या शेअरने १९९६ ते २०१८ या २२ वर्षात तब्बल २६० पटींनी परतावा दिला होता. एच.डी.एफ.सी बँकने १९९५ पासून आजपर्यंत असाच ३०० पटींनी परतावा दिला आहे. क्रिसील, अजंता फार्मा या कंपन्यांनीही असे भरपूर परतावे दिले आहेत. या व्यतिरिक्त डिव्हिडंड वेगळा. असे चांगले शेअर नियमितपणे घेत राहिले आणि योग्यवेळी विकले तर माणूस लवकर रिटायर होऊ शकेल. बरेचसे लोक तसे करत नाहीत तर खाली जाणारे शेअर इन्व्हेस्टमेंट म्हणून विकत घेतात आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते हे आपण वर बघितले आहेच. मला ऑफिसमध्ये असताना बऱ्याचदा 'सस्तेमे मिल रहा है' हे कारण एखादा शेअर विकत घ्या असे रेकमेन्डेशन देणारे द्यायचे. जर एखादे घर दोन कोटीला असेल पण त्याच्या शेजारचेच घर पन्नास लाखाला असेल तर दुसरे घर स्वस्त का, टायटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही कोर्टकचेरी चालू आहे का हे प्रश्न आपल्याला पडतातच. पण शेअर स्वस्तात मिळत असेल तर त्या शेअरमध्ये काही प्रॉब्लेम असू शकेल हे काही बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आणि असले चिंचोके घ्यायला लोकांच्या उड्या पडतात.

ट्रेडर्स शेअर घेऊन दीर्घ काळ ठेवत नाहीत. शेअर्सच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्याचा फायदा घ्यायचा यांचा प्रयत्न असतो. काही डे ट्रेडर्स असतात म्हणजे ते घेतलेला शेअर त्याच दिवशी विकतात. तर काही पोझिशनल ट्रेडर्स असतात. म्हणजे शेअर घेऊन तो काही दिवसात किंवा काही आठवड्यात विकायचा. क्वचित प्रसंगी पोझिशनल ट्रेडर्स घेतलेले शेअर्स महिनाभर पण आपल्याकडे ठेवतात. डे ट्रेडर्सपैकी काही स्काल्पर असतात. हे अगदी काही पैसे एका ट्रेडमधून मिळाले तरी ते घेतात आणि चालू पडतात. पण ते भरपूर बल्कमध्ये शेअर्सची उलाढाल करतात आणि यांचा ट्रेड अगदी काही मिनिटेच चालतो. सामान्य लोक स्काल्परचे ट्रेड करताना मी तरी बघितलेले नाहीत. हे मोठ्या संस्थांचे काम असते.

त्यामुळे इन्व्हेस्टर्ससाठी मंथली चार्ट योग्य, पोझिशनल ट्रेडर्ससाठी विकली आणि डेली चार्ट योग्य तर डे ट्रेडर्स साठी एक तासाचे किंवा १५ मिनिटांचे चार्ट योग्य. तर स्काल्पर्ससाठी ५ मिनिटे आणि १ मिनिटाचे चार्ट योग्य. मी नक्की कोणत्या चार्टविषयी बोलत आहे? हे माहिती करून घ्यायला अजून काही प्रतिसादांची वाट बघावी लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्फोसिसने गेल्या २१ वर्षात ९० पटींनी परतावा दिला आहे असे वर म्हटले आहे. पण इन्फोसिसच्या शेअरची किंमत २०००-२००१ मध्ये तीन चार हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त असायची आणि सध्या ७०० रूपयाच्या आसपास चालू आहे. मग शेअरने ९० पटींनी परतावा कसा दिला? याचे कारण बऱ्याचदा कंपन्या बोनस शेअर देतात किंवा शेअर स्प्लीट करतात. समजा कंपनीने १:१ बोनस शेअर दिले तर याचा अर्थ आधी असलेल्या एका शेअरवर एक बोनस शेअर मिळतो. म्हणजे एकूण शेअरची संख्या दुप्पट होते. म्हणजेच शेअरची किंमत अर्धी होते. समजा शेअरची बोनस द्यायच्या आधीची किंमत २०० रूपये असेल आणि माझ्याकडे असे १० शेअर असतील. एकावर एक बोनस मिळाला की माझ्याकडील शेअरची संख्या २० होते आणि प्रत्येक शेअरची किंमत अर्धी होते म्हणजे १०० रूपये होईल. म्हणजे बोनसपूर्वी माझ्याकडे २०० रूपयांचे शेअर असतील तर बोनसनंतरही २०० रूपयांचेच शेअर राहतात. त्यानंतर शेअरची किंमत १०० रूपयाच्या नव्या किंमतीवरून कमी-जास्त होते. इन्फोसिसने वेगवेगळ्या वेळी कधी बोनस शेअर्स दिले आहेत आणि कधी शेअर स्प्लीट झाला आहे याचा इतिहास https://www.moneycontrol.com/company-facts/infosys/bonus/IT#IT वर बघायला मिळेल. त्यावरून समजेल की १९९४ पूर्वी इन्फोसिसचा एक शेअर म्हणजे आताचे १०२४ शेअर. त्यामुळे समजा १९९३ मध्ये शेअरची किंमत ५००० रूपये असेल आणि आज शेअरची किंमत ७०० रूपये असेल तर त्यावेळी ५००० रूपयाची गुंतवणूक आता वाढून १०२४ गुणिले ७०० बरोबर ७,१६,८०० रूपये होईल.

कंपन्या असे बोनस शेअर/स्प्लीट करतात त्याचे एक कारण शेअर सामान्य ट्रेडर्सना परवडणाऱ्या रेंजमध्ये आणणे हे पण असते. १९९३ साली ५००० रूपयांचा शेअर परवडणारे किती सामान्य ट्रेडर्स/इन्व्हेस्टर असतील? त्यावेळी मला नोकरीला लागून एक वर्ष झाले होते आणि त्यावेळी माझा पगारही महिन्याला ५००० नव्हता. आज एम.आर.एफ या टायर कंपनीचा शेअर असाच जवळपास ७० हजार रूपये आहे. तो शेअर किती लोकांना घ्यायला परवडेल? त्यापेक्षा समजा तो शेअर १०० मध्ये स्प्लीट केला किंवा बोनस शेअर दिले तर त्याच शेअरची किंमत ७०० रूपये होईल आणि बऱ्याच सामान्य लोकांना तो परवडेल. त्यातून या शेअरमधील उलाढाल वाढेल. याव्यतिरिक्त काही कारणे आहेत का हे मला माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी नक्की कोणत्या चार्टविषयी बोलत आहे? हे माहिती करून घ्यायला अजून काही प्रतिसादांची वाट बघावी लागेल.

नक्कीच. हे काय चार्ट आहेत आणि त्यावर सिग्नल कसे मिळतात हे कुतुहल वाढत चाललयं. आम्हाला फक्त सगळ्या साइटी दाखवतात ते डे, ५-डे, १ - इयर, ५-इयर, मॅक्स हेच चार्ट माहित आहेत. आणि ५२-वीक हाय-लो.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार्ट स्वत:हून सिग्नल देत नाही तर चार्ट वाचून कोणते सिग्नल मिळत आहेत हे आपण बघायचे आणि त्याप्रमाणे ट्रेड घ्यायचा.

चार्टचे बरेच प्रकार आहेत. पण मी कँडलस्टीक या जपानी प्रकारच्या चार्टचा वापर करतो. याव्यतिरिक्त हायकेन ॲशी, रेंको वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट असतात. एकावेळी पन्नास वेगळ्या गोष्टी बघितल्या की कन्फ्युजन वाढते. त्यामुळे मी कँडलस्टीक सोडून इतर कोणतेही चार्ट बघत नाही.

आता पुढील प्रतिसादात कँडलस्टीकविषयी लिहायला सुरवात करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेअर मार्केटमध्ये शेअर कमी भावावर घ्यायचे आणि जास्त भावावर विकायचे हे उद्दिष्ट असते. इन्व्हेस्टर्स हे शेअर्स अनेक महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनी विकतात, पोझिशनल ट्रेडर्स काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी विकतात तर डे ट्रेडर्स काही तासांनी विकतात. शेअरचा भाव कसा ठरवायचा याविषयी दोन ॲनॅलिसिस केले जातात- फंडामेंटल ॲनॅलिसिअ आणि टेक्निकल ॲनॅलिसिस.

फंडामेंटल ॲनॅलिसिस

कोणत्याही कंपनीचे भविष्यातील फायदा किती असेल यावरून शेअरची किंमत ठरते. भविष्यातील फायदा किती असेल याचा आपल्याला नुसता अंदाजच बांधता येतो. तो कोणत्या आधारावर बांधायचा?

गाड्यांसाठीच्या बॅटऱ्या विकणाऱ्या अमरराजा बॅटरीज या कंपनीचे उधारण घेऊ.जर गाड्यांच्या खरेदीत घट झाली तर या कंपनीच्या खपातही घट होणार म्हणजे कंपनीचे उत्पन्न कमी होणार म्हणजे फायदाही कमी होणार. गाड्यांच्या खरेदीत घट कशामुळे होईल? अनेक कारणांने. पेट्रोल महाग झाले तर, बेकारी वाढली, नोकऱ्यांची अनिश्चितता असेल तर अशी अनेक कारणे आहेत. या कंपनीची कॉम्पिटिटर आहे एक्साईड इंडस्ट्रीज ही कंपनी. या कॉम्पिटिटर कंपनीने जर बॅटरीची किंमत कमी केली तर अमरराजाला पण किंमत कमी करावी लागेल म्हणजे त्यंचे उत्पन्न घटणार म्हणजे फायदा घटणार. एकदम वेगळीच टेक्नॉलॉजी आली (इलेक्ट्रीक कार) तर बहुतेक बॅटरीच्या खपावर परिणाम होईल-- कमी किंवा जास्त. त्याप्रमाणे कंपनीचा फायदा कमी/जास्त होणार. समजा बजेटमध्ये सरकारने नवे कर लावले तर कंपनीचा फायदा कमी होणार. त्याउलट करात सवलत दिली तर कंपनीचा फायदा वाढणार. जर सरकारने या बॅटऱ्या बनवायला लागणाऱ्या सुट्या भागांवर कर लावले आणि या कंपनीला बॅटऱ्या तितक्या महाग विकता आल्या नाहीत तर या कंपनीचे उत्पन्न कमी होणार म्हणजे फायदा कमी होणार. जर कर कमी झाले तर कंपनीचा फायदा वाढणार.

समजा ही कंपनी भरपूर सुटे भाग आयात करत असेल आणि डॉलर ७१-७२ वरून ९० ला गेला तर कंपनीचा खर्च वाढणार म्हणजे फायदा कमी होणार. त्याचप्रमाणे डॉलर स्वस्त झाला तर कंपनीचा खर्च कमी होईल आणि फायदा वाढेल. जर सरकारने जीएस्टी वाढवला तर यांचे उत्पन्न कमी होणार. त्याउलट जर जीएस्टी कमी केला तर खर्च कमी होणार आणि फायदा वाढणार.

अशाप्रकारे कंपनीच्या फायद्यावर परिणाम करणारे असे शेकडो-हजारो घटक असतात. फंडामेंटल ॲनॅलिसिस म्हणजे या सगळ्या कारणांचा अभ्यास करायचा, कंपनीत काय चालले आहे यावर लक्ष ठेवायचे आणि शेअरची योग्य किंमत काढायची. इन्फोसिसमध्ये विशाल सिक्का अचानक निघून गेले तेव्हा अस्थिर काळ होता. पुढील काही महिने कंपनी भरकटेल का असी भिती काहींना वाटत होती. त्यामुळे कंपनीत काय चालले आहे हे पण महत्वाचे असते. हा सगळा स्टडी म्हणजे फंडामेंटल ॲनॅलिसिस. कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधील असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे घटक बरेच वेगळे असतात. त्यामुळे अमरराजा बॅटरीसाठी केलेला स्टडी मला फार्मा कंपनीला उपयोगी पडणार नाही. तसेच फंडामेंटल ॲनॅलिसिससाठी आपल्याला बॅलन्श शीट वाचता यायला हवी. आणि ती वाचता आली तरी ती माहिती जुनी असते. आणि शेअरच्या किंमतीवर परिणाम करणारी काही बातमी आली तरी ती बातमी माहिती होणारे आपण पहिले नसतो. त्यामुळे बऱ्याचदा या माहितीचा अंतर्भाव शेअरच्या किंमतीत झालेला असतो त्यामुळे ती बातमी आपल्याला कळली किंवा नाही याचा आपल्याला फार उपयोग होत नाही.

आपल्याला नंतर माहिती झालेल्या बातमीचा उपयोग आधीच करून पैसे कमावणारे पैसे खिशात टाकून निघून गेलेले असतात याचे एक उदाहरण पुढील चार्टमध्ये बघायला मिळेल. हा चार्ट आहे आयडिया सेल्युलरचा. ऑक्टोबर २०१७ मध्ये व्होडाफोन आयडीया मर्जर होणार ही बातमी आली होती.दोन कंपन्यांचे मर्जर होणार ही गोष्ट एका दिवसात नक्कीच होत नसते. या प्रक्रीयेत अनेक लोकांचा सहभाग असतो. म्हणजे ही बातमी आपल्याला नवीन असली तरी कंपनीतल्या आतल्या लोकांना आधीच माहिती असते आणि तिथून ती लीक होऊन काही संस्थांपर्यंत जाऊ शकते. असे लोक या बातमीचा फायदा आधीच उठवायला त्या शेअरमध्ये ट्रेड करतात. याला 'इनसायडर ट्रेडिंग' म्हणतात. कायद्याप्रमाणे असे इनसायडर ट्रेडिंग चालत नाही. पण पकडले न गेल्यास सगळे काही चालते. खाली चार्टमध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे आयडियाचा शेअर १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०१७ या काळात ४५ वरून एकदम ६० वर गेला. म्हणजे १० दिवसात या शेअरने ३३% रिटर्न दिले. एवढे रिटर्न यायला बँकेत एफ.डी ठेवली तर किती वर्षे लागतील?

hatti

तेव्हा फंडामेंटल ॲनॅलिसिससाठी कितीही डोकेफोड केली तरी त्यातून किती फायदा होणार? मोठ्यामोठ्या चर्चासत्रात भाषण ठोकायला अशा माहितीचा उपयोग होईल पण पैसे मिळवायला होणार नाही.कोणत्याही कंपनीचा फंडामेंटल ॲनॅलिसिस करणे ही एका माणसाच्या क्षमतेपलीकडे असते असे मला तरी वाटते. त्यामुळे मी या भानगडीत कधी पडलेलो नाही.

टेक्निकल ॲनॅलिसिस
टेक्निकल ॲनॅलिसिसमध्ये कंपन्यांच्या फंडामेंटलचा विचार करायचा नाही तर शेअरचे चार्ट बघायचे आणि त्यावरून ट्रेड करायचा. एखादी गोष्ट कशामुळे होते हे विचारायला जायचे नाही. ती गोष्ट का होत आहे हे माहित असले तरी आपल्याला काही पी.एच.डी मिळवायला जायचे नाही तर केवळ काही शेअर्समध्ये ट्रेड करायचे आहे. वर दिलेल्या आयडियाच्या उदाहरणात इनसायडर ट्रेडिंग झाले असेलच असे मला म्हणायचे नाही. ती एक शक्यता असू शकेल. मला माहित नाही आणि मला ते माहित करूनही घ्यायचे नाही. पण शेअरची किंमत अचानक वाढली आहे. इतकेच नाही तर चार्टवर खाली 'व्हॉल्युम' म्हणून काही बार दिसतील. आणि त्या बारच्या मधोमध जाणारी एक काळी लाईन दिसेल. ती काळी लाईन म्हणजे त्यापूर्वीच्या २० दिवसात किती शेअर विकत घेतले गेले/विकले गेले त्याची सरासरी आहे. चार्टमध्ये दिसेल की १३ ते २३ ऑक्टोबर या काळात सरासरीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात शेअर विकत घेतले गेले/विकले गेले आणि शेअरची किंमत पण वाढली. याचा अर्थ हा की कोणत्या तरी कारणाने विकत घेणारे लोक आक्रमकपणे विकत घेत होते आणि त्यामुळे शेअरची किंमत वाढत होती. बास. मला ट्रेड घ्यायला तितकीच माहिती पुरेशी आहे. काय झाले असेल हे विनाकारण तर्क मी लढवायला जाणार नाही. तेवढी माझी कुवतही नाही. माझा फंडा शिंपल आहे. आपल्याला झेपते तेवढेच करावे. फंडामेंटल ॲनॅलिसिस झेपत नसेल तर ते करायला हायचे नाही. तर फक्त चार्टचा स्टडी करायचा. या चार्टच्या स्टडीला 'टेक्निकल ॲनॅलिसिस' म्हणतात.

महत्वाचे म्हणजे कंपनीविषयी कोणतीही चांगली-वाईट बातमी आली तरी त्याचा परिणाम शेअर विकत घेण्यात होईल नाहीतर विकण्यात होईल. त्याप्रमाणे शेअरची किंमत आणि व्हॉल्युम वरखाली होतील. तेव्हा हजार गोष्टींचा अभ्यास करून डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा फक्त चार्टचाच अभ्यास करायचा. याचा एक फायदा म्हणजे मला कंपनीची फंडामेंटल माहित असायची गरजच नाही. मी जे फंडा मारूतीसारख्या वाहनक्षेत्रातील कंपनीच्या शेअरला वापरेन तेच फंडा टी.सी.एस या आय.टी कंपनीच्या शेअरसाठी वापरेन. कारण शेवटी काहीही झाले तरी शेअरची किंमत आणि व्हॉल्युम वरखाली होणार आहे- कारण काही का असेना. याउलट वाहन क्षेत्रातील कंपनीचा आणि आय.टी कंपनीचा फंडामेंटल ॲनॅलिसिस यात किती मोठा फरक असेल याची नुसती कल्पनाच करता येते.

वर दिलेल्या उदाहरणात आयडियामध्ये पोझिशनल ट्रेड करून भरपूर पैसे कमावता आले असते. आणि ते पण १० दिवसात. बऱ्याचदा एका महिन्यात शेअर १०%-२०% वगैरे वर जातो. म्हणजे कंपनीचे फंडामेंटल इतक्या थोड्या काळात इतके बदलतात का? तसे नक्कीच नसते. बऱ्याचदा या गोष्टी थोड्या 'सेंटीमेंट ड्रिव्हन' असतात. अशावेळी फंडामेंटल ॲनॅलिसिसचा काहीही उपयोग नाही. जर मला १४ ऑक्टोबर २०१७ या दिवशी आयडियामध्ये ट्रेड करायचा असेल तर मी ३१ मार्च २०१७ या दिवशीची बॅलन्स शीट बघून काय करू? आणि त्याचा ट्रेडिंगमधून पैसे मिळवायला उपयोग तरी किती?

आता चार्टची माहिती करून घ्यायच्या आधी आणखी काही गोष्टी लिहायच्या राहिल्या आहेत का हे बघून मग चार्टचे फंडा सुरू करू. मागे म्हटल्याप्रमाणे मी कॉलेजमधला प्रोफेसर नाही. त्यामुळे सगळे मुद्देसूद फ्लो मध्ये मला लिहिता येईलच असे नाही. पॉईंट वरखाली झाले तरी सगळे पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न नक्कीच असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम .
(डॉलर ९० ला जाईल हे कृपया उदाहरण म्हणून पण सांगू नका राव)
पुढंच्या भागाची वाट बघतोय गुरुजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सो को दस कम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आतापर्यंत बऱ्याचदा चार्ट हा उल्लेख आला आहे. काही मुद्दे मांडायला काही चार्ट इथे दिले पण आहेत. आता या चार्टविषयी अधिक माहिती करून घेऊ.

कोणत्याही शेअरची किंमत प्रत्येक क्षणाला बदलत असते (याला अपवाद आहेतच पण अशा शेअरमध्ये ट्रेड घेऊ नये. त्यामुळे सगळ्या शेअरची किंमत प्रत्येक क्षणाला बदलते असे म्हटले तरी चालेल. मार्केट सकाळी ९.१५ ला सुरू होते त्यावेळी असते ती त्या दिवसाची ओपनिंग प्राईस. दिवसभरात या किंमतीत चढ-उतार होत असतात. दिवसभरातील सगळ्यात जास्त किंमत असते 'हाय प्राईस' तर सगळ्यात कमी किंमत असते 'लो प्राईस'. मार्केट दुपारी ३.३० ला बंद होते. शेवटच्या अर्ध्या तासात झालेले ट्रेड लक्षात घेऊन मार्केट एका सूत्राप्रमाणे क्लोजिंग प्राईस काढते. याचा अर्थ क्लोजिंग प्राईस म्हणजे दिवसाच्या शेवटच्या ट्रेडची किंमत नसते. हा नियम का आहे हे मला माहित नाही. पण तो नियम आहे एवढेच मला माहित आहे.

मी वापरतो त्या कँडलस्टीक चार्टमध्ये या चारही किंमती एका रंगीत आयताकृती आकृतीत दिलेल्या असतात. त्या आकृतीला कँडल म्हणतात. जर क्लोजिंग प्राईस ही ओपनिंग प्राईसपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ त्या कालावधीत त्या शेअरची किंमत वर गेली. अशा कँडल हिरव्या रंगात दाखवितात. तर क्लोजिंग प्राईस ही ओपनिंग प्राईसपेक्षा कमी असेल तर त्याचा अर्थ त्या कालावधीत त्या शेअरची किंमत खाली गेली. अशा कँडल लाल रंगात दाखवितात. या विषयावरील पुस्तकात हिरव्या कँडल पांढऱ्या रंगाने तर लाल कँडल काळ्या रंगाने दाखवितात. मला स्वत:ला कँडलसाठी हिरवे आणि लाल हे रंग आवडतात कारण हिरवा रंग म्हणजे पुढे जा आणि लाल रंग म्हणजे थांबा हे रस्त्यावरील सिग्नल आपण नेहमीच बघत असतो.

candle

http://fxforever.com/learn/wp-content/uploads/2015/12/candlestick-course...

वर दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कँडलला बॉडी आणि बॉडीच्या वर आणि खाली टोके असतात. त्या टोकांना 'विक' असे म्हणतात.

तेव्हा एक कँडल त्या कालावधीत शेअरच्या किंमतीची नक्की कशी मूव्ह झाली हे दर्शविते. ही कँडल एक दिवसाची असायला पाहिजे असे नाही. तर एक मिनिटापासून एक महिन्यापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या कालावधीच्या कँडल उपलब्ध असतात. प्रत्येक कँडल त्या कालावधीत शेअरच्या किंमतीत नक्की कशी मूव्ह आली हे दर्शविते. शनीवार आणि रविवार वगळून समजा एका महिन्यात २२ दिवस आहेत म्हणजे मार्केट २२ दिवस चालू आहे. मंथली कँडलची ओपनिंग प्राईस असेल त्या महिन्याच्या १ तारखेची ओपनिंग प्राईस तर क्लोजिंग प्राईस असेल त्या महिन्यातील शेवटच्या दिवसाची क्लोजिंग प्राईस. त्या महिन्यात किंमतीने गाठलेली सर्वोच्च पातळी असेल 'हाय' तर सर्वात कमी पातळी असेल 'लो'. अशा एका मंथली कँडलमध्ये २२ डेली कँडल असतात. तर मार्केट दररोज ६ तास १५ मिनिटे म्हणजे ३७५ मिनिटे चालू असते. त्यामुळे एका डेली कँडलमध्ये १५ मिनिटांच्या २५ कँडल असतात. तसेच एका विकली कँडलमध्ये पाच डेली कँडल असतात.

खाली स्टेट बँक ऑफ इंडियाचा विकली आणि डेली चार्ट दिला आहे. या चार्टवरून समजेल की या शेअरने गेल्या आठवड्यात २९९.७० चा लो आणि ३२३.७० चा हाय मारला होता. या एका विकली कँडलमध्ये खाली दिलेल्या चार्टमध्ये दाखविल्याप्रमाणे उजवीकडून शेवटच्या पाच डेली कँडल आहेत. शेअरने २९९.७० चा लो चौथ्या कँडलला म्हणजे गुरूवारी मारला होता तर ३२३.७० चा हाय पाचव्या कँडलला म्हणजे शुक्रवारी मारला होता.

candle

अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टाईमफ्रेमवर चार्ट काढू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचा अर्थ क्लोजिंग प्राईस म्हणजे दिवसाच्या शेवटच्या ट्रेडची किंमत नसते. हा नियम का आहे हे मला माहित नाही. पण तो नियम आहे एवढेच मला माहित आहे.

या बाबतीत मी असं ऐकलं की, ३:३० ला मार्केट बंद होताना जी किंमत असते तिला लास्ट प्राईस असं म्हणतात. त्यानंतर १० मिनिटे मार्केट बंद होते व ३:४० ला परत उघडते. मात्र आता फक्त ब्रोकर्स लोकच त्यात भाग घेऊ शकतात. शॉर्ट डिलिव्हरीचे लिलाव होतात व मार्केट शेअर्स व्यवहारांसाठी ४:०० वाजता बंद होते. त्या वेळचा भाव म्हणजे बंद भाव.

हे ऐकलेलं चुकीचे असेल तर कोणी तरी दुरूस्त करेलच म्हणा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेअर मार्केटच्या क्लासेसना टाळें लावणारा हत्ती.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाली टाटा मोटर्सचा २०१९ या वर्षातील डेली चार्ट दिला आहे.

Tata Motors

या चार्टवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून येतील.

२७-२८ डिसेंबर २०१८, २८ मार्च २०१९, १५ मे २०१९ या दिवशी शेअरची किंमत १६८.५५ पेक्षा खाली गेली नाही. तसेच २२ ऑगस्ट २०१९ आणि ४ सप्टेंबर २०१९ या दिवशी शेअरची किंमत १०६.४० च्या खाली गेली नाही. शेअरची किंमत खाली कधी जाते? जेव्हा विक्रेते अधिक आक्रमकपणे शेअर विकायला तयार होतात आणि वेळ पडली तर कमी किंमतीला शेअर विकायला पण ते तयार होतात तेव्हा. विक्रेत्यांनी अशी शेअरची किंमत २७-२८ डिसेंबर, २८ मार्च आणि १५ मे या दिवशी १६८.५५ पर्यंत खाली आणली होती. पण त्यावेळी मार्केटमध्ये खरेदी करणारे मोठ्या प्रमाणावर आले आणि त्यांनी किंमत अजून खाली पडू दिली नाही. त्याचप्रमाणे २२ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर या दिवशी विक्रेत्यांनी शेअरची किंमत १०६.४० पर्यंत खाली आणली होती. पण त्यावेळी त्या किंमतीला खरेदी करणारे आले आणि त्यांनी किंमत अजून पडू दिली नाही. टेक्निकल ॲनॅलिसिसमध्ये म्हटले जाते की पहिल्यांदा शेअरने १६८.५५ वर आणि नंतर १०६.४० वर सपोर्ट घेतला.

त्याचप्रमाणे १८-१९ एप्रिल २०१९ रोजी शेअर २३८.९० च्या वर जाऊ शकला नाही. शेअरची किंमत कधी वाढते? जेव्हा खरेदी करणारे अधिक आक्रमकपणे शेअर खरेदी करायला तयार होतात आणि वेळ पडली तर जास्त किंमत मोजायला तयार होतात तेव्हा. पण १८-१९ एप्रिल ला खरेदी करणाऱ्यांनी शेअरची किंमत २३८.९० पर्यंत वर नेली पण ती किंमत आपल्याकडचा माल विकायला चांगली आहे असे समजून विक्रेते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आले आणि त्यांनी किंमत अजून वर जाऊ दिली नाही. टेक्निकल ॲनॅलिसिस मध्ये म्हटले जाते की शेअरने २३८.९० वर रेजिस्टन्स घेतला.

या चार्टवरून आणखी एक महत्वाची गोष्ट समजेल. १५ मे या दिवशी चार्टने १६८.५५ वर सपोर्ट घेतला हे आपण वर बघितलेच. त्यानंतर काही दिवसांनी किंमत सपोर्ट तोडून खाली आली. त्यानंतर १ जुलै आणि १७ जुलै या दिवशी किंमत १६८.५५ च्या वर जाऊ शकली नाही. म्हणजे पूर्वी जो १६८.५५ हा सपोर्ट होता तो आता किंमतीला रेजिस्टन्स झाला. ६ नोव्हेंबरच्या दिवशी किंमतीने ती रेजिस्टन्स लेव्हल तोडली. त्यानंतर ७ ते १५ नोव्हेंबरपर्यंत तीच लेव्हल सपोर्टचे काम करत आहे हे दिसेल.

म्हणजेच पूर्वीचा सपोर्ट नवा रेजिस्टन्स बनतो आणि पूर्वीचा रेजिस्टन्स नवा सपोर्ट बनतो. हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेअर्सच्या बाबतीत वेगवेगळ्या टाईमफ्रेमवर बघायला मिळेल.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे ६ नोव्हेंबरला एका मोठ्या हिरव्या कँडलने भरपूर व्हॉल्युमसह १६८.५५ चा रेजिस्टन्स (पूर्वीचा सपोर्ट) तोडला हे बघायला मिळेलच. अशा वेळी ती लेव्हल आता नवा सपोर्ट म्हणून काम करेल याची शक्यता जास्त असते.

याचा ट्रेडिंगसाठी कसा वापर करायचा? शेअर सपोर्टजवळ आलेला असताना रिव्हर्सलची चिन्हे दिसली तर तो विकत घ्यायचा. रिव्हर्सलची चिन्हे कोणती? हा खूप मोठा विषय आहे आणि तो असा इथे लिहून सांगता येणे कठिण आहे. पण छोट्या छोट्या कँडल सपोर्टजवळ यायला लागल्या तर किंमत तिथून उलटी फिरेल ही शक्यता जास्त असते. १८-१९ एप्रिलला पण किंमत रेजिस्टन्सवरून उलटी खाली आली तेव्हा त्या कँडलची बॉडी खूप लहान आणि विक्स खूप मोठे आहेत. अशा प्रकारच्या कँडलना 'हाय वेव्ह कँडल' म्हणतात. सपोर्ट किंवा रेजिस्टन्सजवळ अशा 'हाय वेव्ह कँडल' येणे हे किंमत उलटी फिरायची चांगली शक्यता आहे याचे चिन्ह असते.

टाटा मोटर्स आता सपोर्टजवळ आहे. सपोर्टजवळ लहान कँडल तयार होत आहेत. तेव्हा माझा व्ह्यू असा की शेअर आता वर जायची शक्यता आहे. त्यामुळे मी तो शेअर आता विकत घ्यायच्या तयारीत आहे. वर म्हटल्याप्रमाणे सगळ्यात पहिली गोष्ट बघायची स्टॉप लॉस किती. माझा आताचा व्ह्यू असा की सपोर्ट टिकायला हवा. म्हणजे सपोर्ट तोडून किंमत खाली येणार नाही असा माझा व्ह्यू आहे. मग मी स्टॉप लॉस या सपोर्ट लेव्हलच्या खाली लावणार. आणि किंमत वर गेली तर कुठपर्यंत जाऊ शकेल? तर १९५ ते १९७ च्या आसपास एक लोकल रेजिस्टन्स आहे. चार्टवर तो दाखविलेला नाही. पण १५ जानेवारी आणि १० ते १२ मार्च या काळात तो लोकल रेजिस्टन्स होता हे चार्टवरून बघता येईल. म्हणजे माझा स्टॉप लॉस झाला १६५ आणि टारगेट झाले १९५. आता सोमवारी जर हिरवी कँडल आली तर त्या कँडलच्या हाय ला मी मंगळवारी बाय करणार. पण समजा सोमवारी मोठी हिरवी कँडल आली आणि किंमत एकदम १७५ ला गेली. अशा परिस्थितीत माझा स्टॉप लॉस झाला १७५ - १६५ = १० आणि टारगेट झाले १९५ - १७५ = २०. म्हणजे माझा रिस्क-रिवार्ड रेशो १:२ आहे. तो आपल्या नियमात बसत नाही. अशा परिस्थितीत माझी बस चुकली असे म्हणत मी तो ट्रेड सोडणार. पण जर १७१- १७२ पर्यंत मला टाटा मोटर्स मंगळवारी मिळाला तर रिस्क-रिवार्ड १:३ येऊ शकेल. तसे झाल्यास मी तो ट्रेड घेणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या उदाहरणात मी एक साधा सेट-अप सांगितला आहे. हा सेट-अप समजावून सांगायचा माझ्या परीने सगळ्यात चांगला प्रयत्न केला आहे. ज्यांना याविषयी आणखी काही प्रश्न आहेत त्यांनी ते इथेच लिहावेत ही विनंती. मग त्यातून आणखी काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजावता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी हा शेअर मंथली चार्टप्रमाणे १ आॅक्टोबरलाच घ्यायला हवा होता का? तुम्ही १५ तारखेला आठवे कारण दिले आहे, त्या माहितीच्या आधारे विचारतोय. कारण सप्टेंबरला हिरवी मेणबत्ती आलीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी टाटा मोटर्स मी सध्या तरी घेणार नाही.टाटा मोटर्सचा मंथली चार्ट खाली देत आहे.

hatti

ऑक्टोबर मध्ये सपोर्टला मोठी ग्रीन कँडल येऊन मोठा बुलिश एनगल्फ आला आहे. ही गोष्ट चांगली आहे तरीही अजूनही स्टॉक डाऊनट्रेन्ड मध्येच आहे. डाऊ थिअरीप्रमाणे २०१७ पासून स्टॉक लोअर हाय आणि लोअर लो करत आहे म्हणजे तो डाऊनट्रेन्ड मध्ये आहे. चार्टमध्ये दाखविल्याप्रमाणे जर २३९ तोडला तर डाऊनट्रेन्ड रिव्हर्स झाला असे म्हणता येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मी तरी तेव्हा घेईन.

डाऊनट्रेन्ड मध्ये असलेले स्टॉक्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेऊ नयेत. ऑक्टोबरचा बुलिश एनगल्फ हा अपट्रेन्डची सुरवात असेल तर स्टॉक स्वस्तात मिळाला म्हणून चांगले होईल पण ते आपल्याला आधीच कळत नसते. ऑक्टोबरचा बुलिश एनगल्फ हा बहुतेक एलियटच्या ए-बी-सी करेक्शनमधील 'ए' वेव्ह आहे म्हणून किंमत वर गेली असावी असे आता वाटते. 'बी' वेव्ह आली तर किंमत अजून खाली जायची शक्यता आहे. डाऊनट्रेन्ड मधील स्टॉक्स स्विंगसाठी घ्यायला हरकत नाही पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेताना दहावेळा विचार करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुलिश एनगल्फ नाही तर मॉर्निंग स्टारला बराच जवळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटले.

मग एक नवा प्रश्न
अपट्रेंड सुरू असेल तर मंथली चार्टवर लालच्या ऐवजी हिरवी कॅंडल आली (आणि डाऊनट्रेंड तर सुरू झाला नाहीये) तर खरेदीचा सिग्नल आला असे म्हणता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपट्रेंड सुरू झाला असेल तर नक्कीच कुठेतरी हिरवी कँडल येईल. पण हिरवी कँडल आली म्हणजे अपट्रेंड सुरू झाला असे म्हणता येणार नाही. म्हणून हिरवी कँडल आली तरी जोपर्यंत कोणता रेजिस्टन्स तोडला जात नाही तोपर्यंत दीर्घ काळासाठी खरेदी करू नये असे मला वाटते. वर दिलेल्या चार्टमध्ये २०१७ पासून एक डाऊनट्रेंड दिसत आहे. त्यातही सगळ्या कँडल लाल नाहीत तर काही कँडल हिरव्या पण आहेत. पण हिरवी कँडल आली म्हणजे अपट्रेन्ड सुरू झाला असे समजून बाय करायला गेले तर लागेल ना वाट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ok

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाटा ग्रुपमधील भांडण आता ‍अधिकृतपणे संपली असे आता म्हणता येईल. २३९ चा भाव ओलांडायचा हा शेअर आता प्रयत्न करायला लागेल. मग लोक लाॅंगटर्मसाठी खरेदी करतील.
१ एप्रील २०२० नंतर सगळ्याच वाहन उत्पादन कंपन्यांचे रिरेटिंगची प्रक्रीया सुरू होईल. परत एकदा वाहन कंपन्यांचे दिवस येतील. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सपोर्टजवळच खूप डोजी व शूटिंग स्टार्स झाले आहेत. त्यामुळे किंमत कमी व्हायची भिती कितपत असावी. मला तरी भिती वाटतीय. म्हणजे स्टाॅपलाॅस हिट होण्याची भिती वाटतीय. अर्थात सोमवारी हिरवी मेणबत्ती आली तरच ट्रेड करायचा हे तुम्ही सुचवलेले आहेच म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजूनपर्यंत मला पाहिजे तशी हिरवी कन्फर्मेशन कँडल मिळालेली नाही. आज किंमत सपोर्टच्या थोडी खाली क्लोज झाली असली तरी १६५ चा स्टॉप लॉस पर्यंत गेलेली नाही. उद्या कन्फर्मेशन कँडल येते का याची वाट बघायची.

तेव्हा ट्रेड करताना घाईघाईने दिसला सपोर्ट की केले ट्रेड असे करायचे नाही. एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे सावज आपल्या टप्प्यात येईपर्यंत थांबायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाटा मोटर्सने ११/१२/२०१९ ला १५७.४० चा लो केला आणि
०३/०१/२०२० ला १९५.६५ चा हाय केला आहे.

बाजारात संधी कशी शोधायची हे उदाहरणासकट दाखवून देण्यात यशस्वी झाल्याबद्दल्
सतत नाव बदलणाऱ्या हत्तीचे अभिनंदन.
आणि
धन्यवाद.
_/\_

एक सुचवू इच्छितो.

एखादा विशिष्ट शेअर घेऊन त्यावर चर्चा केली तर जास्त चांगले होईल. त्या शेअर साठी वेगळा धागा काढला तरी चालेल.
उदा. टाटा मोटर्ससाठी वेगळा धागा काढावा. जे ह्या शेअरवर लक्ष ठेवून आहेत ते त्यांची निरिक्षणे चार्टच्या सहाय्याने मांडत राहतील. बुजुर्ग चर्चा करत राहतील आणि आमच्या सारख्यांना शिकायला मिळेल.

मायबोली व मिसळपाववर् राजकारणाचे धागे जसे ओसंडून वहात असतात अगदी तसंच इथेही घडू शकेल. पण इथली चर्चा ही अर्थपूर्ण असेल. त्यातून बरेच शिकता येईल. पैसेही मिळवता येतील. तिथले राजकारणाच्या धाग्यावरील प्रतिस्पर्धी इथे मित्रही होऊ शकतील.

थोडक्यात ऐसी अक्षरेवरचे मराठी माणसांनी मराठी माणसांच्या उन्नतीसाठी चालवलेले मराठीतले मनीकंन्ट्रोल.कॉम

मराठी लोकांची बचत वृध्दीगंत होओ या हेतूने लिहितोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सपोर्टजवळच खूप डोजी व शूटिंग स्टार्स झाले आहेत.

सपोर्ट-रेजिस्टन्सजवळ असे न्युट्रल पॅटर्न आले तर किंमत फिरायची शक्यता जास्त असते. त्यातही एका मोठ्या हिरव्या कँडलने पूर्वीचा रेजिस्टन्स (आणि आताचा सपोर्ट) मोठ्या व्हॉल्युमने तोडला आहे. अशावेळी तो नवा सपोर्ट होल्ड होईल ही शक्यता जास्त असते. पण हे मार्केट आहे. कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे आपला बेस्ट फ्रेंड- स्टॉप लॉस कायम लक्षात ठेवायचा.

अर्थात सोमवारी हिरवी मेणबत्ती आली तरच ट्रेड करायचा हे तुम्ही सुचवलेले आहेच म्हणा.

एकूण सपोर्टवरून किंमत फिरेलच असे म्हणत किंमत सपोर्टला आली की लगेच ट्रेड घ्यायचा नाही. तर कन्फर्मेशन कँडलची वाट बघायची. अजून तरी ती मिळालेली नाही आणि आजच्या मार्केटमध्ये अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही. आज ती कन्फर्मेशन कँडल मिळाली तर ठिक नाहीतर उद्या काय होते ते बघायचे. आणि वर म्हटल्याप्रमाणे कन्फर्मेशन कँडल खूप मोठी येऊन रिस्क-रिवार्ड बिघडत असेल तरी लगेच ट्रेड घ्यायचा नाही. किंमत स्टॉप लॉस जवळ यायची वाट बघायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जी भिती व्यक्त केली त्यामागचे कारण थोडे वेगळेच आहे. डेली चार्टबाबत मी वर लिहीलेले आहेच. त्याबाबत जास्त खोलात गेल्यावर मंथली चार्टवरून असे लक्षात आले की,
मंथली चार्टवर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेले व्यवहार अनुक्रमे १०९ कोटी व ११६ कोटी आहेत पण सप्टेंबर महिन्यातील अ‍ॅव्हरेज प्राईस फक्त १३२.४७ येतीय. त्यामुळे या महिन्यात नफेखोरी व्हायची शक्यता मला वाटतेय इतकेच. जवळजवळ २५ ते ३० टक्के फायदा पदरात पाडून घ्यायचा मोह!! तोच मोह डेली चार्टवर दिसतोय की काय, अस उगीचच मला वाटायला लागले.
Smile

मी फक्त मनात जो विचार आला तो विचार फक्त मांडलाय. बाकी काही नाही.
Smile

पण टेक्निकल अ‍ॅनॅलिसीस करताना चार्ट पहावयाचा. तो तसाच का आहे ते तपासायला जायचे नाही हेही तुम्ही सांगितलेलेच आहे म्हणा.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण टेक्निकल अ‍ॅनॅलिसीस करताना चार्ट पहावयाचा. तो तसाच का आहे ते तपासायला जायचे नाही हेही तुम्ही सांगितलेलेच आहे म्हणा.

हे मी सांगितले ते चार्टमागील फंडामेंटल कारणे शोधायला जायचे नाही या अर्थी म्हटले. मी म्हटलेले १००% वेळा बरोबरच असेल असे थोडीच आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सेट-अप आहेत. काही ट्रेडर्स चार्ट बघतच नाहीत तर केवळ VWAP वापरून ट्रेड करतात. काही नुसते हायकेन ॲशी चार्ट बघतात. यापैकी कोणताही ॲप्रोच १००% बरोबर किंवा १००% चूक नसतो. पैसे काढणारे कोणत्याही प्रकारे पैसे काढतातच.प्रत्येकाने आपल्याला काय बरोबर सांभाळता येते हे बघून ट्रेड करायचा. शेवटी मार्केट हाच मायबाप आणि सगळा शक्यतांचा खेळ. जे व्हायची शक्यता अधिक वाटते त्या दिशेला आपण आपला ट्रेड घ्यायचा. आपण बरोबर असू तर पैसे घेऊन आणि चुकीचे असू तर पैसे देऊन चालू पडायचे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आलं लक्षात.
तुमचे ते वाक्य लक्षात राहिले होते. पण खास करून ते फंडामेंटल अ‍ॅनॅलिसीस साठी वापरल होत ते लक्षात राहिलं नाही.
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२३ डिसेंबर २०१९ पासून टाटा मोटर्सला सेन्सेक्स मधून बाहेर काढण्यात येणार. स्टाॅपलाॅस हिट झालेले सुदैवी ठरणार!!!
Wink
ज्यांनी खरेदीच केलेली नाही ते तर खूपच सुदैवी.
Smile

गेले सलग तीन दिवस निफ्टी डेली चार्टवर डोजी, शूटिंग स्टार वगैरे सारखे दाखवतीय. सगळंच मार्केट काही संकेत देते आहे की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांनी खरेदीच केलेली नाही ते तर खूपच सुदैवी.

हो. म्हणूनच ट्रेडिंग करताना घाई करायची नाही. कोणीही आपल्या डोक्यावर बंंदूक ठेऊन ट्रेड घे नाहीतर गोळी घालेन अशी धमकी द्यायला बसलेले नाही. सुरवातीला प्राईस ॲक्शन बघून जर एखादा व्ह्यू बनला (जसा टाटा मोटर्समध्ये १६८ चा सपोर्ट राहिल असा व्ह्यू बनला होता) तरी लगेच ट्रेड घ्यायला जायचे नाही. कन्फर्मेशन कँडलची वाट बघायची. आणि ती न आल्यास तो ट्रेड घ्यायचा नाही. तसेच जर कन्फर्मेशन कँडल मोठी येऊन रिस्क-रिवार्ड बिघडणार असेल तरी तो ट्रेड घ्यायचा नाही. मार्केटमध्ये इतर शेकडो शेअर आहेत. हा नाहीतर तो. त्यामुळे मागे म्हटल्याप्रमाणे एखाद्या निष्णात शिकाऱ्याप्रमाणे सावज आपल्या टप्प्यात कधी येते याची अगदी संयम ठेऊन वाट बघायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि वर म्हटल्याप्रमाणे कन्फर्मेशन कँडल खूप मोठी येऊन रिस्क-रिवार्ड बिघडत असेल तरी लगेच ट्रेड घ्यायचा नाही. किंमत स्टॉप लॉस जवळ यायची वाट बघायची.

हे एकदम पटले. इथे उताविळपणा खूप नडतो. असं वाटतं की संधी हातातून जाते आहे.
Smile
मुख्य म्हणजे रिस्क रिवार्ड रेशोकडे लक्ष द्यायचे असते हे नेमके त्यावेळेस लक्षातच रहात नाही.
मग स्टॉपलॉस जवळ भाव आल्यावर अ‍ॅव्हरेजिंगचा मोह होतो.
हम्म.

चुकांतून शिकता नक्की येते. पण चूक काय होते आहे हे कळले तरच ते शक्य आहे.
_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसा माझा मार्केटशी काही संबंध नाही. पण चर्चा मनोरंजक आहे.
एक शंका.
हे सगळे पूर्णपणे यंत्रवत आहेसे दिसतेय. तेंव्हा याचे अल्गोरीदम्स उपलब्ध असतीलच ना? ते उपयुक्त असतात का?
निदान उतावळेपणा तरी नक्कीच टळेल असे वाटले.. नाही का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्या मोठ्या संस्था बऱ्याच प्रमाणावर अल्गोरिदमिक ट्रेडिंग करतात. रिटेल क्लाएंट्ससाठी अशा काही सर्व्हिसेस आल्या आहेत पण प्रोग्रॅम करणारा जितका चांगला ट्रेडर असेल त्यापेक्षा खूप जास्त चांगले अल्गोरिदम होऊ शकत नाही. आणि मार्केटमधील काहीकाही चार्टपॅटर्न केवळ बघूनच कळू शकतात. अशा पॅटर्नचे कोडिंग कसे करतात माहित नाही.

शेवटी ट्रेडिंगमध्ये मानवी बुध्दी यंत्राला मात देऊ शकते. हा एक मुद्दा मला नंतर लिहायचा होता पण तो हा विषय आला आहे म्हणून आताच लिहितो. वर टाटा मोटर्सच्या उदाहरणावरून आपण स्टॉप लॉस चार्ट बघून कसा काढायचा याचे एक उदाहरण बघितले. म्हणजे चार्ट बघून आपला एक व्ह्यू झाला तर त्यावरून किंमत कुठच्या किंमतीला जायला नको हे समजू शकेल. पण किंमत त्या किंमतीला गेली तर आपला व्ह्यू चुकीचा होता हे सिध्द होईल. म्हणजे माझा व्ह्यू आहे की टाटा मोटर्स १६८ चा सपोर्ट तोडून खाली जाणार नाही. मग मी त्याच्या खाली १६५ चा स्टॉप लॉस ठरविला. आता १६८ च्या तीन रूपये खाली म्हणून १६५ ही किंमत घेतलेली नाही. तर वर चार्टमध्ये कळू शकेल की ६ नोव्हेंबरच्या हिरव्या कँडलने १६८ चा जुना रेजिस्टन्स (आणि नवा सपोर्ट) तोडला त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक लाल कँडल १६५.५५ पर्यंत खाली गेली. जर १६८ चा सपोर्ट राहणार असेल तर या कँडलचा लो जायला नको. तो लो आहे १६५.५५ म्हणून त्याच्या थोडे खाली म्हणून १६५ चा स्टॉप लॉस ठरविला.

बऱ्याचदा होते असे की हे ट्रेडिंग अल्गोरिदम अशाप्रकारे प्रोग्रॅम केलेले असतात की शेअर कमीतकमी किंमतीत विकत घेता यावा. म्हणजे संबंधित संस्थेकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आधीच आहेत आणि आणखी शेअर घ्यायचे असतील तर अशा संस्थांचे अल्गोरिदम थोडे शेअर विकून किंमत १६५ पर्यंत खाली पाडते. म्हणजे बऱ्याच आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सचा स्टॉप लॉस हिट होणार. म्हणजे तितके शेअर १६५ या स्वस्तातल्या किंमतीला विकत घ्यायला उपलब्ध असणार. १६५ ला बरेच शेअर विक्रीला उपलब्ध आहेत हे त्यांना कसे कळते? कारण शेअरचे ऑर्डरबुक (याविषयी दुसऱ्या एका प्रतिसादात लिहेन) त्यांना दिसते. मग किंमत खाली पाडून कमी किंमतीला शेअर विकत घेतले जातात आणि मग किंमत परत वर जाते. म्हणजे आपला स्टॉप लॉस हिट करण्यापुरते काही कँडलचे विक्स लांब असतात. असे अनेकदा बघायला मिळते.

यावर उपाय काय? तर स्टॉप लॉस ऑर्डर सिस्टीममधे टाकायची नाही पण आपण स्वत: कसोशीने पाळायची. म्हणजे शेअर १६५ ला गेला तर विका ही ऑर्डर सिस्टिममध्ये द्यायचीच नाही तर दिवस पूर्ण व्हायची वाट बघायची. बऱ्याचदा किंमत १६५ पर्यंत खाली जाऊन मग उलटी फिरते. त्यामुळे १६५ च्या खाली क्लोज आला तर दुसऱ्या दिवशी लगेच शेअर विकून बाहेर पडायचे म्हणजे तो स्टॉप लॉस आपण घ्यायचा आणि चालू पडायचे.

काहीही झाले तरी ट्रेडिंगची सगळी कुंडली कँडलमध्ये दिसणारच. जर प्रोग्रॅम आपल्याला असे गंडवू बघत असेल तर आपली बुद्धी त्यापेक्षा जास्त चालू शकते त्याचा उपयोग असा करायचा. कदाचित मशीनला जास्त स्पीडने ऑर्डर देता येतील पण डोके आपलेच जास्त चालते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टॉप लॉस सिस्टिममध्ये न देता आपण स्वत: घ्यायचा या प्रकाराला फायदे-तोटे दोन्ही आहेत. केवळ आपला स्टॉप लॉस खायला किंमत खाली येते आणि मग वर जाते हे अनेकदा बघायला मिळते. त्यापासून आपण वाचतो हा फायदा.

पण जेव्हा स्टॉप लॉस लागतो तेव्हा आपण १६५ किंमत दिली असली तरी प्रत्यक्षात आपल्याला १६५ ला विकता येईल असे नाही कारण किंमत कदाचित अजून खाली गेली असेल. हा तोटा असतो. त्यामुळे १:३ रिस्क-रिवार्ड आपण ठरवितो तेव्हा त्यात यामुळे होणाऱ्या जास्त तोट्याचा पण विचार असतो.

एकूण निरीक्षण आहे की खोट्या स्टॉप लॉसपासून वाचण्याचा फायदा जास्त वेळा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. हे तर जुगारापेक्षा खतरनाक दिसतंय. RIGGED जुगार म्हणूया. जरासंघाच्या हाडांचे फासे...
शिवाय दुसरा कामधंदा असेल तर या भानगडीत पडू नये असेच सांगताय. कारण TRADING HOURS भर सतत दहा-एक SHARES च्या किमतीवर REALTIME नजर फक्त हत्ती अवतारातील रजनीकांतच ठेऊ शकेल बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय दुसरा कामधंदा असेल तर या भानगडीत पडू नये असेच सांगताय.

हे मी तरी लिहिलेले नाही.

नोकरी करणाऱ्यांना इंट्राडे करणे कठिण जाईल कारण प्रत्येक १५ मिनिटांच्या कँडलवर लक्ष ठेवता येणार नाही. पण डेली किंवा विकली कँडल बघूनही भरपूर ट्रेडींगच्या संधी मिळू शकतात.

मार्केट अमर्याद संधी उपलब्ध करून देत असते. आपल्याला काय करता येते ते बघून त्याप्रमाणे ट्रेड करायचे. मी नोकरीत असतानाच ट्रेडिंगची सुरवात केली होती. हे करताना जड जाते, खूप धक्के खावे लागतात, तितका वेळही द्यावा लागतो हे सगळे तितकेच खरे. शेअरमार्केट हा झडपट श्रीमंत व्हायचा खेळ नाही. दोन-तीन वर्षे तरी भरपूर वेळ द्यावा लागेल आणि कष्ट करावे लागतील आणि बरेच पैसे पण गमावावे लागतील. पण अशी ठेच लागल्याशिवाय मार्केटमध्ये योग्य मार्ग सापडत नसतो त्यामुळे हा मार्केट शिकायचाच भाग आहे.

या लेखातून मार्केटविषयी कोणतेही गैरसमज निर्माण होणार नाहीत अशाप्रकारेच लिहिले आहे पण हे स्पष्टीकरण देणे गरजेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याचदा अपट्रेन्ड आणि डाऊनट्रेन्ड हे शब्द आले आहेत. अमेरिकेत चार्ल्स डाऊ (डाऊ जोन्स इंडेक्सवाला) याने एक थिअरी मांडली आहे. त्यात इतर काही मुद्दे आहेत.पण महत्वाचा मुद्दा म्हणजे अपट्रेन्ड आणि डाऊनट्रेन्ड कसा ओळखायचा हा आहे.

शेअरच्या किंमती कधीही एकाच दिशेने सतत जात नाहीत तर वरखाली होत असतात. शेअरची किंमत खाली जाताना मागच्या वेळी खाली गेली होती तितकी गेली नाही तरी शेअर अपट्रेन्डमध्ये आहे असे समजावे. म्हणजे डाऊच्या भाषेत 'शेअरच्या किंमतीने हायर हाय आणि हायर लो' केले पाहिजेत. खाली कोटक महिंद्रा बँक़च्या शेअरचा मंथली चार्ट दिला आहे. या चार्टमधून कळेल की हा शेअर 'हायर हाय' आणि 'हायर लो' करत आहे.

kotak

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर विकत घेताना नेहमी अपट्रेन्डमधील शेअरच विकत घ्यावेत. त्यातही स्वस्तात शेअर मिळावे म्हणून शेअर हायर लो करेल तेव्हा काही रिव्हर्सल येऊन शेअर वर फिरतोय का ते बघून तिथे घ्यावा. कोटकला १४०३ हा आधीचा हायर हाय आणि लेटेस्ट हायर लो आहे म्हणून तिथे सपोर्ट आला आहे. जर १४०३ तोडून किंमत खाली आली तर मग शेअर अपट्रेन्डमध्ये राहणार नाही कारण पुढचा लो हा 'हायर लो' होणार नाही तर 'लोअर लो' होईल. त्यामुळे अपट्रेन्ड कायम राहणार असेल तर किंमत १४०३ इतकी पडायला नको. हा मंथली चार्ट आहे. जर विकली किंवा डेली चार्ट बघितला तर आजची किंमत १६२३ आणि १४०३ यामधे कुठेतरी लोकल सपोर्ट मिळेल. किंमत तिथपर्यंत पडली आणि टाटा मोटर्स जसे सपोर्टजवळ न्युट्रल पॅटर्न देत आहे तसे दिले आणि किंमत वर जात आहे याची कन्फर्मेशन कँडल आली तर शेअर तिथे घ्यावा.

पण शेअरची किंमत जर १४०३ च्या खाली गेली तर तो अपट्रेन्डमध्ये राहणार नाही. त्यानंतर पुढचा हाय जर आताचा लेटेस्ट हाय १६२३ पेक्षा खाली असेल तर मग शेअर डाऊनट्रेन्ड मध्ये गेला असे म्हणता येईल.

त्याप्रमाणे शेअर जर 'लोअर हाय' आणि 'लोअर लो' करत असेल तर तो डाऊनट्रेन्डमध्ये आहे. खाली आयशर मोटर्सचा मंथली चार्ट दिला आहे.

Eicher

चार्टमध्ये बघता येईल की सप्टेंबर २०१७ मध्ये शेअरने हायर हाय केला आणि जानेवारी २०१८ मध्ये हायर लो केला. तोपर्यंत अपट्रेन्ड चालू होता. नंतर शेअर वर गेला पण एप्रिल २०१८ मध्ये जानेवारी २०१८ चा हाय तोडण्यात किंमतीला अपयश आले आणि किंमतीने 'लोअर हाय' केला. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये किंमतीने जानेवारी २०१८ चा हायर लो तोडला आणि किंमत खाली गेली. याचा अर्थ काय? की यानंतरचा जो लो येईल तो 'लोअर लो' असणार. म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये किंमतीने डाऊन ट्रेन्ड कन्फर्म केला.

साईडवेज मूव्ह
आणि शेअरची किंमत वर किंवा खाली अशी कुठेच न जाता तिथल्यातिथे वरखाली होत असेल तर त्याला साईडवेज मूव्ह म्हणतात. रिलायन्स हे त्याचे सगळ्याच चांगले उदाहरण आहे. खाली रिलायन्सचा मंथली चार्ट दिला आहे. चार्टमध्ये बघता येईल की जून २००९ ते जानेवारी २०१७ पर्यंत रिलायन्स हा साईडवेज होता.

Reliance

याच चार्टमध्ये रिलायन्सच्या चार्टमधील हाय आणि लो जोडणाऱ्या दोन रेषा काढल्या आहेत. त्या रेषांना ट्रेन्डलाईन्स म्हणतात. जसा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तुटणे हे खूप महत्वाचे असते त्याप्रमाणे ट्रेन्ड लाईन तुटणे आणि तुटताना पण खूप व्हॉल्युमने तुटणे हे पण खूप महत्वाचे असते. ट्रेन्ड लाईन थोडी ॲन्गलमध्ये झुकलेली असते तर सपोर्ट-रेजिस्टन्स लाईन जमिनीला समांतर (हॉरीझॉन्टल) असते. रिलायन्सच्या चार्टमध्ये बघता येईल की दोन ट्रेन्डलाईन एकमेकींकडे जात आहेत. अशा चार्ट पॅटर्नला त्रिकोण (Triangle) म्हणतात. त्रिकोण कोणत्याही दिशेने तुटला तर त्या दिशेला एकदम मोठी मूव्ह येऊ शकते. रिलायन्सने फेब्रुवारी २०१७ मध्ये त्रिकोण वरच्या बाजूला तोडला आणि पुढे काय झाले हे आपल्याला दिसतेच. त्रिकोण तुटणे हे फार वेळा होत नाही पण असा तुटणारा त्रिकोण दिसला आणि तो ट्रेड घेतला तर भरपूर पैसे देणारा तो ट्रेड असतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर विकत घेताना नेहमी अपट्रेन्डमधील शेअरच विकत घ्यायचे आणि ते पण शक्यतो हायर लो च्या जवळ घ्यायचे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डाऊनट्रेन्डमधील शेअर कधीच घ्यायचे नाहीत. आणि शेअर साईडवेज असेल तर त्याला हात लावायचा नाही.

कोणताही ट्रेन्ड कायम राहात नसतो. अपट्रेन्ड डाऊनमध्ये बदलू शकतो हे आयशर मोटर्सच्या चार्टवरून बघितले.

या नुसत्या डाऊ थिअरीच्या फंड्याचा वापर करून कोणते शेअर घ्यायचे आणि कोणते नाही हे आपल्याला ओळखता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर दिलेल्या आयशर मोटर्सच्या चार्टवरून दीर्घकालीन गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचे हे समजेल. आयशर मोटर्स हा एक अगदी मल्टीबॅगर शेअर होता. त्याने किती पटींनी परतावा दिला हे चार्टमध्ये बघता येईलच. २०१८ पूर्वीची २० वर्षे नियमितपणे हा शेअर घेणारा गुंतवणुकदार किती धनवान झाला असेल हे बघता येईलच. ही शेअर मार्केटची ताकद आहे. इतका पैसा इतर कोणत्याही माध्यमातून मिळू शकत नाही. चार्टमध्ये बघता येईल की सप्टेंबर २०१७ च्या हायपासून (३२०००) अलीकडे शेअर ५०% खाली आला होता (१६०००). म्हणजे वेळेत बाहेर पडले नाही तर अर्धे नुकसान होऊ शकेल. एकदम आदर्श स्थितीत शेअर एकदम टॉपला असताना म्हणजे ३२००० ला असताना बाहेर पडावे. पण तसे करता येणे शक्य नाही. तेव्हा असे नुकसान कमितकमी कसे करता येईल अशा पध्दतीने वेळेत बाहेर कधी पडावे या प्रश्नाचे उत्तर आता बघू. त्या निमित्ताने इतर काही संकल्पना समजून घेता येतील.

आयर मोटरचा गेल्या चार वर्षातील मंथली चार्ट झूम करून बघू.

Eicher

सप्टेंबर २०१७ मध्ये ३२००० चा नाही तर ३३४६० चा हाय मारला होता हे चार्टमध्ये बघायला मिळेलच. या कँडलमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक लांब विक्स आणि छोटी बॉडी असलेली 'हाय वेव्ह' कँडल आहे. अशा कँडल अनिश्चितता दर्शवितात. अशा कँडल विशेषत: वर आल्या तर लगेच बाहेर निघाले नाही तरी निघायच्या तयारीत असावे. त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०१७ मध्ये एक लहान हिरवी कँडल बनली आहे. ज्यांना चार्ट पॅटर्न माहित आहेत त्यांना ही कँडल बऱ्यापैकी हँगिंग मॅन आहे हे समजेल पण सध्या त्याविषयी भाष्य टाळतो. त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०१७ मध्ये एक मोठी लाल कँडल आली आहे आणि त्या कँडलने आधीच्या लहान हिरव्या कँडलला पूर्ण खाल्ले आहे. या दोन कँडलच्या चार्ट पॅटर्नला 'बेअरीश एनगल्फ' म्हणतात. मार्केटमध्ये तेजीला बुलिश तर मंदीला बेअरीश असे म्हणतात. बेअरीश एनगल्फ वर आला तर हा एक मंदी दर्शविणारा पॅटर्न असतो.

तेव्हा सप्टेंबर-ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१७ ची प्राईस ॲक्शन बघून अनुभवी गुंतवणुकदार सप्टेंबरच्या हाय वेव्ह कँडलचा लो गेल्यावर बाहेर पडेल. ते समजा जमले नाही तर डिसेंबर २०१७ आणि जानेवारी २०१८ च्या कँडलनी आधीचा हायर लो तोडला म्हणजे यानंतर जो लो येईल तो लोअर लो असणार हे नक्की झाले. जेव्हा जानेवारी २०१८ च्या कँडलने आधीचा हायर लो तोडला ती लांब कँडल होती. तेव्हा समजा बाहेर पडायला जमले नसेल तर किंमत परत वर आली आणि जून २०१८ च्या कँडलने आधीचा हायर लो परत तोडला त्यावेळी बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे काय तर मार्केट बाहेर पडा हे सिग्नल देत असते. अगदी ३३००० ला नाही तर २९८०० ला तरी बाहेर पडायला स्कोप होता.

फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०१८ च्या तीन लागोपाठ हिरव्या कँडल बघून किंमत फिरली आणि आता वर जाणार असा ग्रह करून घेऊ नये. कारण आधीच्या कँडलने आधीचा हायर लो तोडला आहे आणि एप्रिल २०१८ च्या हिरव्या कँडलला सप्टेंबर २०१७ चा हाय तोडण्यात अपयश आले आहे. म्हणजे प्राईस ॲक्शन अशक्त (विक) आहे हे लक्षात घ्यायचे.

समजा एप्रिल नंतर मे २०१८ मध्ये पण एक हिरवी कँडल आली असती आणि त्या कँडलने सप्टेंबर २०१७ चा हाय तोडला असता तर मग अपट्रेन्ड परत येत आहे असे म्हणत परत शेअर विकत घ्यायला हरकत नाही. पण तो हाय तोडायची वाट बघायची. एखाद-दुसरी हिरवी कँडल बघून लगेच शिरायचे नाही.

चार्टमध्ये बघता येईल की जुलै-ऑगस्ट २०१५ च्या कँडलने पण असेच बाहेर पडायचे सिग्नल दिले होते. त्यांचा लो गेल्यावर बाहेर पडले तरी नंतर ऑगस्ट २०१६ च्या हिरव्या कँडलने जुलै-ऑगस्ट २०१५ चा हाय तोडला होता. त्यानंतर खरेदी करायला हरकत नाही. त्यानंतर नोटबंदीच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये पण एक मोठी लाल कँडल आली होती. पण महत्वाचे म्हणजे त्या कँडलने नवा लोअर लो केला नव्हता. तसेच त्या कँडलचा लोअर विक लांब होता. म्हणजेच काय तर किंमत खालच्या पातळीवर रिजेक्ट होत होती. आणि डिसेंबर २०१६ च्या कँडलने नोव्हेंबर २०१६ च्या कँडलचा लो पण तोडला नव्हता.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की गुंतवणूकीसाठी शेअर घेतले तरी एकदा घेऊन ठेवले आणि वर्षानुवर्षे त्याकडे बघितलेच नाही असे करू नये. मंथली चार्टवर असा बाहेर पडायचा सिग्नल आला की बाहेर पडायचे. जर शेअरने नवा हाय केला तर परत शिरता येतेच. त्याला कोणाचीच बंदी नाही. पण किंमत परत उलटी फिरेल या आशेवर राहायचे नाही.

या प्रतिसादात बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत. शक्य तेवढ्या सोप्या शब्दात समजावायचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे कळल्या असतील. नसल्यास इथेच प्रश्न विचारावेत. अजून स्पष्ट करता येते का बघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेअरची किंमत वरखाली कशी होते हे आपण आता बघू. किंमत वरखाली व्हायला फंडामेंटल काहीही कारणे असतील ती असतील. त्याविषयी मला भाष्य करता येणार नाही. मी केवळ टेक्निकल गोष्टींवर लिहिणार आहे.

समजा मागचा शेअर विकत घ्यायचा-विकायचा व्यवहार १०० रूपयात झाला. त्यानंतर ९९.९५, ९९.९०, ९९.८५, ९९.८० आणि ९९.७५ या ५ किंमतींना पुढचे विकत घेणारे उभे आहेत. तर १००.०५, १००.१०, १००.१५, १००.२० आणि १००.२५ या ५ किंमतींना पुढचे विकणारे उभे आहेत. उदाहरण सोपे करायला समजा या खालच्या ५ किंमतींना प्रत्येकी १०० शेअरची बाय ऑर्डर आहे आणि वरील ५ किंमतींना प्रत्येकी ५० शेअरची सेल ऑर्डर आहे. तेव्हा सगळ्यात महाग खरेदी करायला तयार असलेला ९९.९५ द्यायला तयार आहे तर सगळ्यात स्वस्त विकायला तयार असलेला १००.०५ घ्यायला तयार आहे. हा १० पैशाचा फरक (१००.०५ वजा ९९.९५) 'बिड-आस्क स्प्रेड' म्हणून ओळखला जातो.

आता या परिस्थितीत शेअर खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार कसा? तर त्यासाठी पुढील तीन पैकी एक गोष्ट व्हावी लागेल--

१. विकत घेणाऱ्यांनी थोडे जास्त पैसे द्यायची तयारी दाखवली. म्हणजे समजा ९९.८५ ला बाय ऑर्डर प्लेस केलेले आहेत त्यांना तो शेअर हवाच आहे. त्यांना दिसतेय की १००.०५ ला कोणीतरी शेअर विकायला तयार आहे. कुठे २० पैशासाठी अडून बसा असे म्हणत त्यांनी ९९.८५ ची बाय ऑर्डर १००.०५ केली तर त्यांना पाहिजे त्या किंमतीत शेअर विकायला कोणीतरी तयार आहे. पण यांना विकत घ्यायचे आहेत १०० शेअर तर विकणाऱ्यांना विकायचे आहेत ५० शेअर. तेव्हा १००.०५ या किंमतीत ५० शेअर विकत घेतले जातील आणि शेअरची किंमत १०० वरून १००.०५ होईल. या विकत घेणाऱ्यांना अजून ५० शेअर विकत घ्यायचे आहेत आणि ती ऑर्डर अजून पूर्ण झालेली नाही.

२, विकणाऱ्यांनी थोडे कमी पैसे घ्यायची तयारी दाखवली. वरील उदाहरणात १००.१० ला कोणीतरी ५० शेअर विकायला तयार आहे. त्यांना दिसत आहे की १००.०५ ला कोणीतरी ५० शेअर विकत घ्यायला तयार आहे. कुठे ५ पैशासाठी अडून बसा असे म्हणत विकणाऱ्यांनी आपली किंमत १००.१० वरून १००.०५ इतकी कमी केली तर त्या किंमतीत या आणखी ५० शेअरचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होईल. पण शेअरची किंमत १००.०५ वरच राहिल.

३. बाजारात नवी बाय किंवा सेल ऑर्डर आली आणि विकत घेणारे १००.०५ किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजायला तयार असतील किंवा विकणारे ९९.९५ किंवा त्यापेक्षा कमी किंमत घ्यायला तयार असतील.

अशाप्रकारे मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात आणि ज्या किंमतीला सगळ्यात अलीकडचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला ती शेअरची किंमत ठरते.

कोणत्या किंमतीला किती शेअर खरेदी-विक्रीसाठी आहेत याला शेअरचे ऑर्डर बुक म्हणतात. आपल्याला सर्वात पहिल्या ५ खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर बघायला मिळतात. मला वाटते एक्स्चेंजकडे आणखी (म्हणजे बरेच) पैसे भरले की पहिल्या १०० ऑर्डर बघायला मिळत असाव्यात. कारण संस्थांना १०० ऑर्डर बघता येतात हे ऐकले आहे. तपासायला हवे.

मार्केटमध्ये पुढील प्रकारच्या ऑर्डर असतात--

१. मार्केट ऑर्डर - या ऑर्डरमध्ये कोणतीही किंमत सांगितली जात नाही. समजा विकत घ्यायची (बाय) मार्केट ऑर्डर असेल तर एक्स्चेंज सगळ्यात स्वस्त विकायला तयार असलेल्याचा शेअर या बाय मार्केट ऑर्डर वाल्याला देते. त्याचप्रमाणे विकायची (सेल) मार्केट ऑर्डर असेल तर एक्स्चेंज सगळ्यात महाग विकत घ्यायला तयार असलेल्याला हा शेअर देते. त्यामुळे मार्केट ऑर्डर नेहमी पूर्ण होणार याची खात्री असते.

२. लिमिट ऑर्डर - विकत घेताना सध्याच्या किंमतीच्या खाली लिमिट बाय ऑर्डर असते. सध्याची किंमत १०० असेल पण लिमिट बाय ऑर्डर ९८ ची दिली तर शेअरची किंमत ९८ पर्यंत खाली आली तरच ही ऑर्डर पूण होईल. म्हणजे शेअर जास्तीत जास्त ९८ रूपयात विकत घ्यायला तयार असणे याचा अर्थ ९८ ची लिमिट बाय ऑर्डर. त्याचप्रमाणे जर कोणी तो शेअर कमितकमी १०२ ला विकायला तयार असेल तर ती लिमिट सेल ऑर्डर होईल. आता शेअर ९८ पर्यंत खाली आलाच नाही किंवा १०२ पर्यंत वर गेलाच नाही तर ही लिमिट बाय किंवा सेल ऑर्डर पूर्ण होणार नाही. तेव्हा लिमिट ऑर्डर पूर्ण होईलच असे खात्रीने सांगता येणार नाही. पण मार्केट ऑर्डर मात्र पूर्ण होणार याची खात्री असते.

३. स्टॉप लॉस ऑर्डर - आपण स्टॉप लॉस म्हणजे काय हे बघितले आहे. स्टॉप लॉस सेल ऑर्डरमध्ये शेअर विकायचा पण तो किंमत खाली पडली तर विकायचा. त्याचप्रमाणे स्टॉप लॉस बाय ऑर्डरमध्ये शेअर विकत घ्यायचा पण शेअरची किंमत वर गेल्यास तो विकत घ्यायचा.

म्हणजे परत एकदा-- सध्याच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत शेअर विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी लिमिट ऑर्डर वापरावी. तर सध्याच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीत शेअर विकत घ्यायचा असेल तर स्टॉप लॉस बाय ऑर्डर वापरावी. दोन्ही ऑर्डर पूर्ण होतीलच असे खात्रीने सांगता येणार नाही.

काल रिलायन्सने फेब्रुवारी २०१७ मध्ये जवळपास ८ वर्षांची ट्रेंडलाईन तोडली होती हे आपण बघितले. अशी ट्रेंडलाईन तोडली तर शेअरची किंमत वर जाऊ शकते. शेअरची किंमत समजा ट्रेंडलाईन जवळ आली आहे. अशावेळी ट्रेंडलाईन तोडेल त्या किंमतीला स्टॉप लॉस बाय ऑर्डर लावता येऊ शकेल. जर किंमत तिथपर्यंत गेलीच नाही तर ही ऑर्डर पूर्ण होणार नाही.

Hatti

/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादांमध्ये बऱ्याचदा स्विंग ट्रेड हा उल्लेख आला आहे. स्विंग ट्रेड म्हणजे काय? बऱ्याचदा शेअरची किंमत सपोर्टला येते आणि मग उलटी फिरते हे आपण बघितले आहे. अशावेळी सपोर्टजवळ शेअर विकत घेणे आणि वरच्या कुठल्या तरी रेजिस्टन्सला विकणे म्हणजे स्विंग ट्रेड.

खाली एच.डी.एफ.सी बँकचा डेली चार्ट दिला आहे.
hdfcbank

त्यावरून कळेल की किंमतीने ५ ते ७ ऑगस्ट आणि २३-२४ ऑगस्ट २०१९ या काळात १०८२ ला सपोर्ट घेतला. मधे एक दिवस किंमत १०६९ पर्यंत पडली पण परत सपोर्ट एरियात आली. त्यानंतर १७ आणि १८ सप्टेंबरला किंमत परत त्या सपोर्टजवळ जात होती. आता व्ह्यू असा असेल की हा सपोर्ट टिकायला हवा तर सपोर्टच्या जितक्या जवळ मिळेल त्या किंमतीत शेअर घ्यायचा. ती संधी १९ सप्टेंबरला मिळाली होती. जर १०८२ चा सपोर्ट राहणार असेल तर काही दिवसांपूर्वी १०६९ पर्यंत किंमत पडली होती तो लो जायला नको. म्हणजे १०६९ च्या आसपास किंवा १०६९ च्या थोडा खाली स्टॉप लॉस ठरवायचा. चार्टमध्ये बघता येईल की ११४५ ला लोकल रेजिस्टन्स आहे तेव्हा ते टारगेट ठेवायचे. अगदी १०८८ पर्यंत जरी मिळाला तरी १:३ रिस्क-रिवार्ड मिळू शकेल.

एखादी किंमत दोन वेळा सपोर्टपर्यंत आली आणि मग वर फिरली तर त्या चार्ट पॅटर्नला डबल बॉटम म्हणतात. हा स्विंग ट्रेडिंगसाठी खूप उपयुक्त सेट अप आहे.

किंमतीने ११४५ चे टारगेट लगेच दुसऱ्या दिवशीच दिले. असे बहुतेक वेळा होत नाही. २० सप्टेंबरचा दिवस हा अपवाद होता. पण टारगेट आले म्हणून लगेच बाहेर पडायचे का? तर तसे नाही. आपल्याला आपला नफा जास्तीतजास्त वाढवायचा आहे. टारगेट आले तरी ट्रेडमध्ये राहायचे- कधीपर्यंत? तर जोपर्यंत कोणती रिव्हर्सल साईन येत नाही तोपर्यंत. आणि आपला स्टॉप लॉस १०६९ वरून ११४५ करायचा. म्हणजे काहीही झाले तरी तेवढा नफा तरी आपल्याला मिळणारच. त्यावर जो नफा मिळेल तो बोनस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेअर मार्केटमध्ये नवे असल्यास आतापर्यंत दिलेली माहिती ही भरपूर आहे. आता सुरवात कुठून करावी?

पहिल्यांदा फार तर १० शेअर ट्रॅक करावेत. https://www.moneycontrol.com/stocks/marketinfo/marketcap/bse/index.html वर मोठ्या शेअर्सची यादी आहे. त्यातील वरचे १०-१२ शेअर्स घ्यावेत. सुरवातीला सगळ्यांचा मंथली चार्ट बघावा आणि सपोर्ट-रेजिस्टन्सच्या रेषा आखाव्यात. तसेच ट्रेन्डलाईन्स पण आखाव्यात. त्यानंतर विकली आणि डेली चार्ट बघून लोकल सपोर्ट रेजिस्टन्स आहेत का ते बघावे. दररोज संध्याकाळी एकदा सगळ्या चार्टवर लक्ष द्यावे. जर कोणता शेअर सपोर्टजवळ जात असेल तर तो घ्यायच्या तयारीत असावे. आधी सांगितल्याप्रमाणे स्टॉप लॉस कसोशीने पाळावा. सुरवातीला चुका होतील म्हणजे सपोर्टजवळून किंमत फिरणारच असे समजून वेळेपूर्वीच ट्रेड घेतला जाईल. हळूहळू यातून शिकायला मिळेल आणि एन्ट्री अजून फाईनट्युन्ड होतील.

व्होलाटाईल शेअर्स आता बघूच नका. व्होलाटाईल शेअर्स म्हणजे ज्यांना दोन्ही बाजूला लांब लांब विक्स येतात असे शेअर्स. हिंदाल्कोचा डेली चार्ट खाली दिला आहे. त्यावरून समजेल की जवळपास प्रत्येक कँडलला लांब विक्स आहेत.सध्या असे शेअर्स बघू नयेत. एकदा सरळमार्गी शेअरवर हात बसला की अशा अवखळ शेअर्सकडे लक्ष द्यावे.

hindalco

https://in.investing.com/charts/stocks-charts वर फ्री अकाऊंट तयार करून पाहिजे त्या शेअर्सचे पाहिजे त्या टाईमफ्रेमवर चार्ट बघता येतील. चार्ल्स डाऊ, आर.एन.एलिअट, वायकॉफ या शेअरमार्केटमधील मोठ्या लोकांना १०० वर्षांपूर्वी आलेख कागदावर स्वत: चार्ट काढून सगळा अभ्यास करावा लागायचा. आपण त्यामानाने कितीतरी जास्त सुदैवी आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिसादाद्वारे सांगता करत आहे. या लेखात आणि प्रतिसादात मनी मॅनेजमेंट, माईंड मॅनेजमेंट पासून सुरवात करून सपोर्ट-रेजिस्टन्स, ट्रेन्ड लाईन्स, डबल बॉटम इत्यादी गोष्टी बघितल्या. असे प्रतिसादात लिहून यापेक्षा जास्त काही सांगण्यावर मर्यादा येतील. त्यामुळे इथे थांबतो.

जर काही शंका असतील तर मी आहेच. ऐसीच्या खरडफळ्यावर बराच धुडगूस मी घालत असतो. इथे कोणी काही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर द्यायला काहीच अडचण नाही.

आमच्याविषयी अकारण आकसाचा अभाव असलेल्या अत्यल्प ऐसीकरांमध्ये आता अनेकांचा अंतर्भाव असावा अशी अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल. खूप माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फंडामेंटल्स हत्तींमध्ये ढोबळ प्रकारचे दोनच ग्रोथ हत्ती आणि व्हॅल्यू हत्ती म्हणजे ग्रोथवर शंका असणारा हत्ती. आयशर मोटराच उल्लेख आलाच आहे म्हणून माझा अनुभव सांगतो.

मोतिलाल ओस्वालमध्ये एक सिनिअर अ‍ॅनालिस्ट होते. २०१० पासून मोतिलालच्या म्युच्युअल फंड, चॅनल पार्टनर्स, सब-ब्रोकर्सना त्यांनी आयशर मोटर्स सजेस्ट केला होता. ते २०१४ पीई रेशो ५० च्या वर असताना पण ते हा स्टॉक सजेस्ट करत होते. ४-५ वर्षापूर्वी तेवढा अनुभव फारसा नव्हता. पण मला त्याचे व्हॅल्यूएशन खूप सुजलेले वाटले. पीई गुणोत्तर ५० च्या पुढे होते. रॉयल एनफिल्डची क्रेझ वाढताना दिसत होती. पण वाटलं शहरी मध्यम वर्गाची हौस आहे ग्रोथ एवढी होणार नाही. पण अंदाज चूकला. मोटर बाईक वरून लांब लांब प्रवास करणार्‍यांची प्रवासवर्णन इंग्रजी मराठीतून ब्लॉग्जवर येत होती. ४०% वार्षिक गतीने रॉयल एनफिल्डचा सेल्स होत राहीला. ग्रामिण भागातपण ही क्रेझ पोहोचली. पुढे काही वर्ष स्टॉकचे पीई गुणोत्तर ४० च्या आसपास राहीले. २०१५ च्या वर्षात १५ हजाराच्या किंमतीतला असलेला स्टॉक २०१७ संपेपर्यंत दुप्पट होवून ३० हजाराच्या घरात गेला. त्यांचे अंदाज बरोबर होते.

२०१७ च्या अखेरीस नंतर फुल पेनिट्रेशन झालं असावं किंवा मंदीची सुरुवात, वाढलेला इन्श्यूरन्स खर्च(पण तो या प्रिमिअम कॅटॅगरीसाठी शुल्लक म्हणा) , रेग्युलेटरी नॉर्म्स इ. कारणांमुळे असेल कदाचित ग्रोथ नॉर्मलाइझ्ड होत गेली. २०१७ च्या सुरुवातीला ६० हजाराच्या आसपास असलेला मंथली सेल्स २०१७ च्या मध्यापर्यंत ७५ हजाराच्य पुढे गेला आणि तिथून जो माघारी फिरला तो २०१८ संपेपर्यंत पार ६० हजारच्या खाली गेला. सेल्सग्रोथ ४०% टक्के रहाणार नाही मंद होत जाणार याची जशी कल्पना आणि एकमत होत गेलं तसतस पीई गुणोत्तर ४० वरून २५च्या घरात आले आणि ३० हजाराच्या घरातून स्टॉक पुन्हा एकदा १५ हजारावर आला.

आता बाजारात महिंद्राची (जावा) क्रुझर बाईक आली आहे. बजाज पण बहुदा हे सेगमेंट टार्गेट करत आहे. ऑक्टोबरच्या दिवाळीचा सिझन वगळला तर मंथली सेल्स अजूनही ६० हजारच्या खालीच आहे. नेट सेल्स ग्रोथ नॉमिनल राहीली तरी प्रिमियम सेगमेंट असल्याने आयशरला किंमत वाढवून रेव्हून्यू वाढवता येईलच. पण क्रेझ गेली तर बोंब आहे. ट्रक बस वाल्या सेगमेंट मधून फारशी अपेक्षा नाही आहे. बघू पुढे कंपनी कशी ग्रो करते ते. काही जण म्हणतायत ग्रोथ एक्सपोर्ट मधून येईल पण त्याचे आकडे अजूनतरी इतके उत्साही नाहीत.

थोडक्यात ग्रोथ स्टॉकचे ग्रोथ इंजिन जो पर्यंत धडधडतय तो पर्यंत इन्व्हेस्टर्स/ट्रेडर्स किती प्रिमियम गाठतील ते सांगता यायचे नाही आणि ग्रोथ मंदावल्यावर आपटी नक्की किंवा स्टॉक मध्ये फारसे अ‍ॅप्रिशिएशन होण्याची शक्यता कमी. मागच्या आठवड्यात अ‍ॅबॅकस इन्व्हेस्टमेंटचा "बबल इन क्वालिटी" हा एक रिसर्च वाचला. बिझनेस स्टॅ. च्या आकाश प्रकाश यांच्या लेखातून त्याची लिंक मिळाली. गेल्या ५-६ वर्षात खास करून लार्ज कॅप सेक्टर मध्ये येणार्‍या गुंतवणूकीमुळे (म्युच्युअल फंड आणि एफआयआय) गुड क्वालिटी बास्केटवाल्या स्टॉक्स मध्ये (म्हणजे ज्यांचे ताळेबंद चांगले आहेत, मॅनेजमेंट पारदर्शक आहेत, आणि ज्या कंपन्यांचे ग्रोथ प्रॉस्पेक्ट चांगले आहे) अशीच सुजावट आल्याचे म्हटले आहे. बरं या कंपन्यांमध्ये (टायटन वगळता) गेल्या ९-१० वर्षात ग्रोथ १०-१२% च्या वर नाही. पण व्हॅल्यूएअशन्स मात्र अव्वाच्या सव्वा झाले. पीई गुणोत्तर ७०-८० च्या घरात आहे (जे एके काळी ५० च्या घरात होते). पुढल्या दहा वर्षात हे २०%च्यावर ग्रोथ गाठण्याची शक्यता किती. बरं डेव्हलप वर्ल्ड मधल्या ग्लोबल पीअर्सला पण इतके व्हॅल्यूएशन नाही आहे (जसे एशिअन पेंट्स विरुद्ध शेरविन-विल्यम्स). पण हेच स्टॉक्स बर्‍याच पिएमएस मध्ये आहेत (मला माहीत असलेल्या अँबिट कॅपिटल, इव्हेस्को, मोतिलाल ओस्वाल). आणि ते कंन्सिस्टंटली इंडेक्सला आउट परफॉर्म करत आहेत. असाच लार्जकॅप इंडेक्सचे पीई गुणोत्तर वाढल्याचे सांगणारा मंगेश सोमण यांचा एक लेख लोकसत्ताच्या सोमवारच्या अंकात होता.

तर असा हा ग्रोथ होणार असे वाटणारे हत्ती विरुद्ध ग्रोथ बद्धल शंका असणारे दुसरे हत्ती यांचा संघर्ष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान प्रतिसाद. फंडामेंटल ॲनॅलिसिस करताना इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आयशर मोटर्सचे शेअर्स माझ्याकडे पण काही महिने होते. त्यांचे नक्की प्रॉडक्ट किती आहेत आणि काय आहेत हे मला अजूनपर्यंत माहिती नाही. आपण कोणत्या प्रकारच्या गाड्यांची किती विक्री झाली, त्यात कसे बदल होणे अपेक्षित आहे याचा अंदाज कसा बांधायचा? फंडामेंटल ॲनॅलिसिस घरी बसून करायला या अडचणी आहेत. तेव्हा माझा फंडा शिंपल आहे. इतरांना फंडामेंटल ॲनॅलिसिस करून भरपूर कष्ट करू दे आणि योग्य वेळी शेअर विकत घेऊ दे. ते एकदा किंमतीत आणि व्हॉल्युममधे दिसायला लागले की मी मलई खायला आलोच Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

शॉर्ट टर्म ट्रेडर्स, इंट्राडे ते काही दिवस डिलेव्हरी घेणारे असतात म्हणून मार्केट मध्ये जास्त लिक्विडीटी रहाते. नाही तर सगळेच इन्व्हेस्टर्स आणि बाय-अ‍ॅण्ड-होल्ड स्ट्रेटेजीवाले असतील तर खरेदी-विक्री होणार कशी. त्यामुळे शॉर्टटर्म ट्रेडर्स शिवाय मार्केटला काहीच अर्थ नाही.

जस्ट एक कुतूहल म्हणून विचारतोय. तुम्ही तुमचे रिटर्न्स कसे मोजता? आणि कशा बरोबर तुलना करता? की या महिन्याची/क्वार्टरची/वर्षाची कामगिरी चांगली आहे. (म्हणजे तुमचे रिटर्न्स बेंचमार्कपेक्षा आणि कंपिटीटीव्ह प्रोडक्टपेक्षा चांगले आहेत). कारण असे टेक्निकल अ‍ॅनालिसिस स्ट्रेटेजी वाले म्युच्युअल फंड किंवा तसे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स भारतात बहुदा नाहीत. मी फक्त वाचून आहे की परदेशात (खास करून यूएस मध्ये) हेज फंड असतात जे वेगवेगळी स्ट्रॅटेजीज वापरून (टेक्निकल, फ्युचर/ऑप्शन्स, लाँग-शॉर्ट इ.) फंड चालवतात. पण तिथेही परतावे डिस्क्लोज करण्याची सक्ती नाही. सारा स्वखुषीचा मामला. रिटर्न्स ग्लोबली एक्सेप्टेडे फॉर्म मध्ये असतीलच असे नाही. त्यातही सर्व्हावरशीप बायस असतोच. भारतात इक्विटी पीएमएस चालतात. त्यात जास्त रिस्क घेऊन इंडेक्स आणि म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परतावे [टाईम वेटेड रिटर्न्स *] देण्याचा प्रयत्न असतो.

अलिकडेच मी मिपावर पण तेच म्हटलं होतं. म्हणणे फक्त इतकेच होते की, आपण जी स्वत: मेहनत घेतो त्यातून कंपिटीटिव्ह प्रॉडक्टपेक्षा कन्सिस्टंट बेसिसवर अधिक परतावे आले पाहिजेत. तुमचे परतावे जर खरोखरच आउटपर्फार्मींग असतील तुमच्या अनुभवातून आलेल्या विस्डमवर अजून वाचायला आवडेलच. कारण जरी लाँग टर्ममध्ये मी एखाद्या स्टॉकवर पॉझिटीव्ह असलो, बाय अ‍ॅण्ड होल्ड स्ट्रेटेजीवाला असलो तरी नव्याने आलेले कॅपिटल वा अगोदरच असलेला कॅश पोर्शन मी आजच डीप्लॉय करू की थोडे दिवस थांबून डिप्लॉय करू हा निर्णय घेण्यासाठी टेक्निकल अ‍ॅनालिसिस हा एक चांगला पर्याय आहे. हाच मुद्दा "बेस्ट प्रॅक्टीस इन इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट" या जेम्स व्हॅलंटाईन च्या पुस्तकात वाचला. त्याने टेक्निकल अ‍ॅनालिसिसच्या अधिक वाचनासाठी ३-४ पुस्तक सजेस्ट केली होती. तुमचे एखादे फेव्हरेट असेल तर नक्की शेअर करा.

*टाईम वेटेड रिटर्न्स आणि मनी वेटेड रिटर्स हे दोन प्रकार आहेत. टाईम वेटेड रिटर्न्स मुळे कॅश-फ्लो अनबायस्ड रिटर्न्स मोजता येतात. खास करून पीएमएस आणि म्युच्युअल फंडांची तुलना करण्यासाठी तो एक चांगला प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जस्ट एक कुतूहल म्हणून विचारतोय. तुम्ही तुमचे रिटर्न्स कसे मोजता? आणि कशा बरोबर तुलना करता? की या महिन्याची/क्वार्टरची/वर्षाची कामगिरी चांगली आहे.

खरं सांगायचं तर मी असे करतच नाही. मी केवळ मनी मॅनेजमेन्ट आणि माईंड मॅनेजमेंट बघतो. स्टॉप लॉस लहान असतील आणि टारगेट मोठी असतील असे ट्रेड घेतले की रिस्क-रिवार्ड आपोआप सांभाळला जातो. ट्रेडिंग मध्ये याच गोष्टी महत्वाच्या. काही काही पोझिशन्स तीन आठवडे चालतात. म्हणजे आज समजा पोझिशन घेतली ती लिक्विडेट करणार पुढच्या महिन्याच्या १५ तारखेच्या नंतर. अशावेळी महिना ते महिना रिटर्न मोजत नाही तर प्रत्येक ट्रेडमागे रिटर्न मोजतो. माझी ही पध्दत फार शास्त्रीय नसेलही पण मला कोणत्या रिपोर्टमध्ये माझे रिटर्न छापून आणायचे नसल्याने चालून जाते. माझे रिटर्न काही ट्रेडमध्ये छोटे तर काही ट्रेडमध्ये मोठे असतात आणि स्टॉप लॉस लागला तर काही ट्रेडमध्ये निगेटिव्ह पण असतात. पण ट्रेडिंगची शिस्त (मनी मॅनेजमेंट, माईंड मॅनेजमेंट आणि रिस्क-रिवार्ड) कसोशीने पाळली तर काही प्रॉब्लेम येत नाही. माझा मोजमापाचा मुद्दा म्हणजे मी माझी शिस्त कोणत्याही प्रकारे मोडत आहे की नाही. नसल्यास लॉस झाला तरी त्याचे दु:ख वाटत नाही आणि मोडत असल्यास प्रॉफिट झाला तरी तो चांगला नाही.

असे टेक्निकल अ‍ॅनालिसिस स्ट्रेटेजी वाले म्युच्युअल फंड किंवा तसे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स भारतात बहुदा नाहीत. मी फक्त वाचून आहे की परदेशात (खास करून यूएस मध्ये) हेज फंड असतात जे वेगवेगळी स्ट्रॅटेजीज वापरून (टेक्निकल, फ्युचर/ऑप्शन्स, लाँग-शॉर्ट इ.) फंड चालवतात. पण तिथेही परतावे डिस्क्लोज करण्याची सक्ती नाही. सारा स्वखुषीचा मामला. रिटर्न्स ग्लोबली एक्सेप्टेडे फॉर्म मध्ये असतीलच असे नाही. त्यातही सर्व्हावरशीप बायस असतोच. भारतात इक्विटी पीएमएस चालतात. त्यात जास्त रिस्क घेऊन इंडेक्स आणि म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परतावे [टाईम वेटेड रिटर्न्स *] देण्याचा प्रयत्न असतो.

इतके तांत्रिक द्न्यान मला नाही. आणि मला फंडामेंटल ॲनॅलिसिस झेपत नसल्याने यामागची थिअरी मला तरी माहित नाही. मी हार्डकोर टेक्निकलवाला आहे.

आपण जी स्वत: मेहनत घेतो त्यातून कंपिटीटिव्ह प्रॉडक्टपेक्षा कन्सिस्टंट बेसिसवर अधिक परतावे आले पाहिजेत.

हे वाचायला ठिक आहे पण अंमलात आणू नये असे वाटते. मार्केटमध्ये पहिली दोन-तीन वर्षे लॉस होणारच हे धरून चालायचे. अशी ठेच लागल्याशिवाय मनी मॅनेजमेंट, माईंड मॅनेजमेंट आणि रिस्क-रिवार्ड या तीन गोष्टींचे महत्व कळायचे नाही आणि ते कळले नाही तर मार्केटमधून पैसे काढता येणार नाहीत. सुरवातीलाच कोणी म्हटले की एक म्युचुअल फंड १५% रिटर्न देत आहे आणि मी लॉसमध्ये आहे मग तो फंडच बरा तर मग मार्केट ही काय चीज आहे हे शिकायला मिळायचेच नाही. तेव्हा मार्केटमध्ये सुरवातीला चार थपडा खायची तयारी ठेवायलाच लागते.

तुमचे एखादे फेव्हरेट असेल तर नक्की शेअर करा.

मी भरपूर पुस्तके बघितली पण शेवटी जोसेफ मर्फी, प्रिंग आणि एडवर्ड मॅगी या तीन लेखकांच्या पुस्तकावर स्थिरावलो. टेक्निकल ॲनॅलिसिस मध्ये अक्षरश: शेकडो प्रकार आहेत. रेंको, हायकेन ॲशी हे कँडलचे प्रकार, इचिमोकू क्लाऊड, केल्टनर चॅनेल पासून अगदी साधे इंडीकेटरही शंभर-दीडशे तरी असतील. हे बघून गोंधळायला होते. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम करायला जायच्या नाहीत ही गोष्ट कसोशीने पाळायची. मी ट्रेडींगमध्ये साध्या कँडल, थोडेफार पॅटर्न आणि मुख्य म्हणजे प्राईस ॲक्शन, बोलींजर बॅन्ड, आर.एस.आय, एम.ए.सी.डी आणि डी.एम.आय या गोष्टीच वापरतो. त्यातही प्राईस ॲक्शन सगळ्यात महत्वाची.

*टाईम वेटेड रिटर्न्स आणि मनी वेटेड रिटर्स हे दोन प्रकार आहेत. टाईम वेटेड रिटर्न्स मुळे कॅश-फ्लो अनबायस्ड रिटर्न्स मोजता येतात. खास करून पीएमएस आणि म्युच्युअल फंडांची तुलना करण्यासाठी तो एक चांगला प्रकार आहे.

इतके तांत्रिक डिटेल्स मला माहित नाहीत.

तुम्ही फंडामेंटल साईडचे दिसता. अशा लोकांविषयी मला खूप आदर वाटतो. कारण फंडामेंटलवाल्यांनी शेअर कोणत्यातरी आधारावर विकत घेतले/विकले नाहीत तर मग कँडल आणि व्हॉल्युममधून सिग्नल येणार तरी कसे?

एकूणच माझा ॲप्रोच म्हणजे-- किप इट सिंपल, उगीच कोणत्या मोठ्या शब्दांच्या जाळ्यात फसायचे नाही आणि आपल्याला झेपते तेवढे करायचे. पण काहीही झाले तरी शिस्त मोडायची नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद! खरेचे कुतूहल अजूनही आहेच की सक्सेसफुल ट्रेडर्स कॅपिटलवर किती रिटर्न्स मिळवतात (अ‍ॅटलिस्ट प्री टॅक्स) ते आणि त्यांचे मंथली रिटर्न्स किती व्होलाटाइल असतात ते.

जमले तर हे करून बघा. [जमले तर.. थोडं वेळखाऊ आहे खरं... पण तुम्हाला तुमची तुलना तुमच्याच भूतकाळातल्या कामगीरीशी करायला पण उपयोग होईल. रिटर्न्स कॅलक्यूलेशनची शास्त्रीय पद्धत आजमावायचा प्रयत्न करायला हरकत नाही]

उदा. महिन्याच्या सुरुवातीला १लाख रुपयाने टेक्निकल पोर्टफोलिओ चालू केला. महिन्या भरात समजा ५ ट्रेड घेतले. त्यातले ३ सक्सेसफुल आहेत . उरलेल्या २ पैकी १ लॉस मध्ये गेला आणि उरलेला अजून स्क्वेअर ऑफ केलेला नाही समजा तो तुम्ही पुढल्या महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास करणार आहात. या सगळ्या अ‍ॅक्शन्स मुळे पोर्टफोलिओ व्हॅल्यूएशन् एंड ऑफ मंथला समजा १,०१,००० झाले (म्हणजे ११०० रुपये रिअलाइझ्ड गेन - ३ सक्सेसफुल ट्रेड चे जे स्वेअर ऑफ केले महिन्या भरात, वजा ३०० रुपये - लॉस मध्ये गेलेल्या ट्रेडचे आणि अधिक २०० रुपये अनरिअलाइझ्ड गेन -जे ट्रेड अजून स्क्वेअरऑफ केलेले नाहीत. पण ज्यात अ‍ॅज ऑफ मंथ एंड २०० रुपये अनरिअलाइझ्ड प्रॉफीट आहे - वा लॉस असेल तर वजा).

मग महिन्याभराचे रिटर्न्स झाले (एण्ड ऑफ मंथ व्हॅल्यू /बिगिनिंग मंथ व्हॅल्यू - १) (१,०१,०००/१,००,००० - १) = १% असे दर महिन्याचे रिटर्न्स काढले की ३ महिन्याचे १२ महिन्याचे मंथली रिटर्न्स कंपाउंड केले की क्वार्टर आणि अ‍ॅन्यूअल रिटर्न्स मिळतील.

समजा दुसर्‍या महिन्याचे २% तिसर्‍या महिन्याचे -१% रिटर्न्स असतील तर क्वार्टरचे/३ महिन्यांचे रिटर्न्स झाले: (१ + १%)(१ + २%)(१ + -१%) - १ = १.९९% (३ महिन्याचे अ‍ॅब्सोल्यूट रिटर्न्स)

आणि वर्षाचे रिटर्न्स: (१ + १%)(१ + २%)(१ + -१%)(१ + ४थ्या महिन्याचे रिटर्न्स)....(१ + १२ व्या महिन्याचे रिटर्न्स) - १ = जे काही येतील ते १२ महिन्याचे अ‍ॅन्यूअलाइझ्ड रिटर्न्स झाले.

महिन्या-महिन्याचे रिटर्न्स काढण्यामागे उद्देश इतकाच की दर महिन्याचे रिटर्न्स किती वर खाली होत आहेत ते पण समजते. समजा दुसरा एक टेक्निकल ट्रेडर आहे जो इन्ट्राडेच ट्रेड करतो, तुमच्यासारखा पोझिशन घेत नाही वा दुसरे कुठले सिग्नल्स वापरून स्ट्रॅटेजी बनवतो. समजा त्याचे आणि तुमचे १२ महिन्याचे अ‍ॅन्यूअलाईझ्ड रिटर्न्स सेम असतील (समजा, तुम्हा दोघांनी १लाख रुपयाचे १.२० लाख रुपये केलेत, साधारण २०% अ‍ॅन्यूअलाईझ्ड रिटर्न्स) पण तुमच्या पोर्टफोलिचे महिन्याचे रिटर्न्स फार मोठ्या फरकाने वर खाली होत नसतील पण त्याचे तेवढे होत असतील तर मी असं म्हणेन की तुमच्या पोर्टफोलिची रिस्क कमी आहे, तुमची ट्रेडींग स्ट्रॅटेजी बेटर आहे. याचा अजून एक फायदा परताव्यांची इंडेक्स बरोबर पण तुलना करता येते. समजा माझ्या दुसर्‍या पोर्टफोलिओत मी १ लाखाचे इंडेक्सचा इटीएफ शेअर्स-नीफ्टीबी- खरेदी करून ठेवले. आणि तिसर्‍या पोर्टफोलिओत १लाखाचे कुठल्याही एका लार्ज कॅप ब्लू चिप फंडाचे युनिट घेऊन ठेवले असते तर वर्षाखेर या दोन पोर्टफोलिचे किती झाले असते. शिवाय हे दोनही पोर्टफोलिओ १ वर्ष १ दिवसांनी लिक्विडेट केला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पण लागणार नाही. त्यामुळे प्रीटॅक्स-पोस्ट टॅक्स रिटर्न्स मध्ये किती फरक पडतो ते ही पाहता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणालाही न घाबरणारे हत्तोबा,आता काय करायचं?
मार्केटं वारलीत म्हणे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही घाबरायची गरज नाही. शॉर्ट पोझिशन्स घ्यायच्या. अशा मंदीच्या मार्केटमध्ये जितका पैसा आहे तितका तेजीच्या मार्केटमध्ये नाही. संधीचे सोने करून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेबी शॉर्ट सेलवर बंदी घालायचा विचार करते आहे अशी २ दिवसांपूर्वी बिझनेस स्टँ. ची फ्रंट पेज न्यूज होती. तसे झाले तर ऑप्शन मार्केट हा चांगला पर्याय आहे. रिस्क हेज करण्यासाठी पण आणि स्पेक्युलेटीव्ह बेट घेण्यासाठी पण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0