सदाचार

जिथे राहतो
जिथे जगतो
जयांचा लाभतो
सहवास मोठा
ते जन टाकती
प्रभाव बहुत
आपुल्या
जडण घडणीवर ||
ते जन देती
पाठींबा मोलाचा
सावली बनुनी
संकटे अडवूनी
वाट करती मोकळी
पुढे जाण्या ||
काही प्रवृत्ती
खेचती मागे
मुद्दाम करोनी
निर्माण अडचणी ||
असे वातावरण
नकारार्थी
करते केवळ
खच्चीकरण ||
यापरी असावा
सहवास सद् जनांचा
म्हणोनी गेले
संत, थोर, महान ||
सद् विचार
सद् आचार
नको निंदा कुणाची
केवळ चांगले ते स्तवन
अन कर्म करू निर्मळ ||
प्रमोदिनी

field_vote: 
0
No votes yet