रदीफ़

रदीफ़ नाही कधी जुळला
न कधीही काफ़िया सुचला
ग़ज़ल जगण्यातला तरिही
कैफ़ भरपूर अनुभवला

जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार लढण्याचा
जखम गहिरी असून केला

सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफ़सोस ना केला

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0