सिंधुआज्जींचे मर्चन्डाईझ

लॉकडाउन संपल्यावर सिंधुआज्जी त्यांच्या ब्रॅण्डचा मर्च - म्हणजे मर्चन्डाईझ - विकायचा विचार गांभीर्यपूर्वक करताहेत.

कुठली उत्पादनांचे तुम्ही अव्वाच्या दीड किंमतीला पॅनिक बायिन्ग कराल?

१) बालसा लाकडाचे सुबक तराफे: किंमत प्रत्येकी वीस हजार डॉईश्च मार्क. कुकाणू आणि नाहीकायंत्र यांसाठी निराळी आकारणी होईल.

२) पेस्टल कलर्सची मऊसूत पातळं (३ नग) आणि तपकिरी बॉम्बार्डियर जॅकेट (१ नग) यांचा संच: किंमत प्रति संच आठशे पोलिश झ्लोटी.

३) धोत्र्याच्या चहाचे सॅशे: किंमत प्रति सॅशे तीन पॉलिनेशियन कवड्या

४) स्लॉथ्याचा केस ठेवलेला जादुई ताईत (हा दंडाभोवती लावल्यास कोणतीही मधमाशी एकाहून अधिक वेळा डंख करत नाही). किंमत प्रति ताईत पाच रुपये बारा आणे.

५) सुहासिनी आणि तरस बल्बा यांच्या हसण्याच्या जुगलबंदीची कॅसेट. किंमत प्रत्येकी औट अमेरिकन डॉलर.

६) "पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा" असे लिहिलेले तांदळाचे दाणे. किंमत प्रति किलो रेशनच्या दुकानातील सुरती कोलमच्या किंमतीएवढी.

७) सिंधुआज्जींच्या स्वर्गीय आवाजातील "काका कुवा, हिअर यू फ्लाय अगेन, माय माय, हाऊ कॅन आय डेझिस्ट यू" या गीताची एलपी. किंमत दिनूच्या आईच्या बिलाएवढी.

त्वरण करा! ही ऑफर स्टॉक नसेपर्यंत मर्यादित!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

७) सिंधुआज्जींच्या स्वर्गीय आवाजातील "काका कुवा, हिअर यू फ्लाय अगेन, माय माय, हाऊ कॅन आय डेझिस्ट यू" या गीताची एलपी. किंमत दिनूच्या आईच्या बिलाएवढी.

हम्म्म्म्म्... हा प्रकार रोचक वाटतोय. शिवाय, किंमत दिनूच्या आईच्या बिलाएवढी म्हणजे... फुकट! नॉट बॅड ॲट ऑल!

फक्त, एक गोची आहे. ही एलपी आहे. आणि, एलपी वाजवायला माझ्याकडे काहीही नाही. सबब, तेवढी त्या एलपीबरोबर एखादे ब्लूटूथ टर्नटेबल - किंवा गेला बाजार एखादा जुना रेकॉर्ड प्लेयर किंवा ग्रामोफोन - चावीचा असला तरी चालेल! - फुकट देण्याची कृपा केलीत, तर बरे होईल.

५) सुहासिनी आणि तरस बल्बा यांच्या हसण्याच्या जुगलबंदीची कॅसेट. किंमत प्रत्येकी औट अमेरिकन डॉलर.

हेदेखील ऐकायला मजा येईल. औट बोले तो साडेतीन डॉलर म्हणजे जरा महाग आहे पण. शिवाय, अडगळीत पडलेला जुना वॉकमन हुडकावा लागेल. त्यापेक्षा यूट्यूबवर पोस्ट का करत नाही सरळ?

(बादवे, सुहासिनी कोण?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आत्ताच मोठ्या प्रमाणावर टाका खर्चायला आणि दवलतजादा करायला सुरुवात केली आहे. म्हणजे लॉकडाऊन संपल्यावर पुरेशी चलनवाढ झालेली असेल आणि मर्चच्या किंमती तेव्हा फार जास्त वाटणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही मर्चण्डाइझची किंमत टाक्यांत दिलेली नाही.

(ठीके ठीके. ('पाच रुपये बारा आण्यां'तल्या) रुपयालासुद्धा बंगालीत टाका म्हणतात म्हणून लगेच शिकवू नका. आपण बंगालीत बोलतोय काय? प्रस्तुत विज्ञापन बंगालीत आहे काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंधुआज्जींना घाबरवायला गेले तर 'न'बासुद्धा गळाला लागले नाहीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे मानसफ्रेंड आणि मानस- आज्जी बहुतेक नातेवाईक असणार - कुंभमेळ्यात वगैरे मह्याने आज्जीचा हात हिसकावून पळ काढला असेल.
जीन्स सेम आहेत त्यांच्या.
------------------
नम्बर ५ आणि ६ नक्कीच विकत घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0