दुपारचे तीन

दुपारचे तीन
---------------------------
नुसत्याच अंधाऱ्या रात्रींच्या आणि भुताखेतांच्या भयकथा सांगणाऱ्या,
कल्पना कर,

उन्हाचं ऊनपण कवेत घेऊन,
खिडकीभर बिलगलेला खादीचा पडदा.
ज्यातनं सरकते वाऱ्याची झुळूक,
कोमट अशी, मधूनच.
आणि झिरपत राहते स्तब्ध, सोनेरी दुपार अव्याहत.

अशा वेळी, "हं, घे रे यातलं काहीतरी तोंडात टाकायला" म्हणत पाहुणचार करेनच की तुझा,
आणि सोबत ऐकवेन माझ्या आवडीच्या कविता.
जान निसार अख्तरच्या, कमला दासच्या,
अखिल कत्याल आणि Warsan Shireच्या.
नाहीतर मग एखादा शेर, कदाचित
मेहदी हसनच्या गजलेतला?

कपाटातली जिन ची बाटली काढेन किंवा मग,
आपल्या ग्लासांत ओतलेल्या g&t कडे बघत
तू म्हणशील," ते, 'मत रोको इन्हें, पास आने दो,
ये मुझसे मिलने आये हैं' फारच भावलंय".
आणि घेशील पहिला घोट. निसारची जादूच
आहे तशी.

आणि नाहीच जमलं यातलं काही तर,
सरोद आहेच की माझी,
घेऊन बसेन तिला मांडीशी आणि छेडेन मुलतानी,
आलाप आळवेन मग सहजच त्या सोबतीने.
त्यात मग विरघळून जाईल सरोद, मनस्वी मुलतानी, चौथा प्रहर, सगळंच.

घराला जाग येईल आताशा,
खिडकिशी बिलगलेला पडदा, सरकत जाईल बाजूला,
अंग चोरून उभा राहिल.
नळ वाहिल,
भांड्यांचे आवाज होतील आणि
चहाला उकळी फुटेल. दुपार उतरणीला लागेल,
आणि तुला विचारेल -
येशील का मग परत? आणि कधी ते?

-मूळ कवयित्री - गार्गी रानडे
- स्वैर अनुवाद - अभिषेक

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तच! मुळ कवितेचा दुवा द्याल का?? आवडेल वाचायला.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

-मूळ कवयित्री - गार्गी रानडे
- स्वैर अनुवाद - अभिषेक

मूळ कविता नक्की कोणत्या भाषेत आहे?

नाही म्हणजे, मूळ कवयित्रीचे आडनाव 'रानडे', आणि (इथे सादर केलेली) कविता मराठीत भाषांतरित आहे म्हणताय, म्हणून शंका आली, इतकेच.

अर्थात, 'रानडे' आडनावाच्या बाईने मराठीव्यतिरिक्त इतर भाषेत कविता करू नयेत, असे नाहीच म्हणा! आणि, फॉर्दॅट्मॅटर, कविता मराठीतून मराठीत अनुवादाव्या लागूच नयेत, असेही म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांच्या कविता, मराठीतच आहेत, असे म्हणता येईल. परंतु, आजमितीस जर त्या जशाच्या तशा वाचल्या, तर एकअक्षरकळेलतरशपथ अशी अवस्था होईल. कोणीतरी मराठीतून गाइड काढावेच लागेल.

(इंग्रजी-टू-इंग्रजी शब्दकोशाची जर गरज असू शकते - आणि ते ढिगाने खपतात! - तर मग मराठी-टू-मराठी कवितानुवादानेच काय घोडे मारलेय?)

गार्गी रानड्यांच्या मराठी कविता जर दुर्बोध असतील, तर त्या (लोकांना समजेल अशा) मराठीत अनुवादित करणे हे अर्थातच सयुक्तिक आहे.

तर मूळ मुद्दा: गार्गी रानड्यांच्या कविता (मराठीतच असून) दुर्बोध आहेत, की इतर कोठल्या भाषेत आहेत? अनुवादाचे नक्की प्रयोजन काय?

----------

'गार्गी' या नावावरून ती बाईच असावी, असा अंदाज बांधतोय. अर्थात, त्यालाही फारसा आधार नाहीच, म्हणा. 'आरती प्रभू' नाव धारण करणारा इसम चक्क बाप्या निघाला. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0