सिंधुआज्जींचे प्रवास-सुनीत

सिंधुआज्जींचे प्रवास-सुनीत
(वृत्त: "भुजंगप्रयात म्हंत्यात मला")

मनाला सुचावे प्रवासास जावे
जगाचे निराळे नजारे पहावे
विमाने न जाती अशा दूर जागा
पहाव्या कशा हा फुकाचाच त्रागा
असे प्रश्न येता तयां मारू लाफा
समुद्रात सोडू स्वतःचा तराफा
पहा ओंडके बालसा लाकडाचे
कुकाणूसवे नाहिकायंत्र साचे
सहा पाणघोडे अशी अश्वशक्ती
पहाताच इंजीन घेते विरक्ती
ध्वजाच्या पताका विसर्णे अशक्य
"ज्लखिण्न्ठं" व "प्थाॅभ्री" - पहा ब्रीदवाक्य
प्रवासात आनंद, बाकी तु* मिथ्या
महासागराचे हिरो सिंधु-स्लॉथ्या

* "च वै तु हि" प्रभृतींचे सादर आभार.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"ज्लखिण्न्ठं" व "प्थाॅभ्री" - पहा ब्रीदवाक्य

हे काही कळले नाही.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्लखिण्न्ठप्थाॅभ्री हे सिंधुआज्जीचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या ध्वजावरही याची नोंद आहे.

"ज्लखिण्न्ठप्थाॅभ्री"चा नेमका अर्थ कोणालाच ठाऊक नाही. अगदी सिंधुआज्जींनासुद्धा. पण साधारण गोषवारा "तुम्ही काय म्हणताय किंवा विचारताय ते मला कळतंय पण त्याला उत्तर देण्याची माझी बिलकुल इच्छा नाही आणि मी कदापि उत्तर देणार नाही" असा आहे.

उदा. "तुमचं वय किती?" "पहिल्या महायुद्धात इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढला का विरुद्ध?" "माझ्या अशीलाला खून करताना तुम्ही पहिले का?" यापैकी कोणत्याही प्रश्नाला "ज्लखिण्न्ठप्थाॅभ्री" हे उत्तर एकदा दिले तर त्याहून अधिक माहिती मिळणार नाही हे नक्की.

"ज्लखिण्न्ठं" व "प्थाॅभ्री" ही इतरेतर द्वंद्व समासाची फोड असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंधुआज्जींचे प्रवास सध्यासुद्धा थांबवणं शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.