वर्ग फोडणे

मी लहान होतो तेव्हा शाळेत वर्ग फोडणे नावाचा प्रकार कधीकधी होत असे. म्हणजे आमच्या शाळेत तरी.

तर हा फंडा असा होता - पहिली ते चौथी या इयत्तांमध्ये प्रत्येक तुकडीला (प्रत्येकी) एकच वर्गशिक्षिका असायच्या. चित्रकला, व्यायाम, हस्तव्यवसाय अशा विषयांचा आठवड्यातला एकेक तास सोडला तर बाकी सगळ्या तासांच्या सर्वेसर्वा वर्गशिक्षिकाच. भाषा, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास-भूगोल - सगळं त्याच शिकवायच्या.

आता एखाद्या दिवशी वर्गशिक्षिका आजारी पडल्या किंवा इतर काही कारणानी शाळेत आल्या नाहीत तर त्यांच्या तुकडीतल्या मुलांचं काय? तर शाळेनं याला एक अक्सीर आणि जालीम उपाय शोधला होता. शाळा सुरू होण्याची बेल झाल्यावर शाळेचा शिपाई डुलत-डुलत अशा वर्गात यायचा, आणि कुठलातरी अगम्य अल्गोरिदम वापरून सात-आठ, सात-आठ मुलं बाकीच्या प्रत्येक तुकडीत पाठवून द्यायचा. म्हणजे विस्थापित सीरियन आजूबाजूच्या देशांमध्ये जातात तसं.

आता त्या वर्गात थोडे एक्स्ट्रा बाक असले तर ठीक, नाहीतर जमिनीवर चटई घालून अशा निर्वासितांच्या बैठकीची व्यवस्था केली जायची. बरं त्या तुकडीत काय शिकवताहेत हे कळलं तर उत्तम, पण तिथल्या शिक्षिकांनी सिलॅबस पुढे नेला असेल तर काही कळायचंच नाही. मधल्या सुट्टीत डबा खातानापण नेहमीचे मित्र सोबत नसायचे. एकूणच वर्ग फोडणे हा प्राथमिक शाळेतला सगळ्यात खौफनाक प्रकार होता.

आता लॉकडाउनमध्ये रँडम विचारांना नेहमीपेक्षा जास्त वेळ मिळाला तेव्हा हे आठवलं आणि एक आयडिया आली. मोठ्या सरकारी किंवा खाजगी फॅक्टरीत किंवा ऑफिसात असं डिपार्टमेंट फोडत नाहीत हे किती छान. नाहीतर मार्केटिंगची व्हाईस-प्रेसिडेंट ऑफिसला आली नाही म्हणून मार्केटिंगचे चार जण पर्चेसला पाठवलेत, पाच जण फायनान्सला पाठवलेत, अजून चार जण डिस्पॅचला पाठवलेत, त्या त्या डिपार्टमेंटला काय चाललंय हे कोणाला फारसं कळत नाहीये, क्युबिकल कमी आहेत म्हणून चटईवर लॅपटॉप ठेवून लोक काम करताहेत वगैरे सुरस आणि चमत्कारिक प्रकार झाले असते. ऍक्चुअली, ऑन सेकंड थॉट्स, आपलं डिपार्टमेंट फोडत नाहीत तोपर्यंत असं बघायला मजा आली असती ना, तुम्हाला काय वाटतं?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यात अ तुकडीतल्या फर्ष्ट बेंचर चिन्मय-तन्मय पब्लिकवर ड किंवा ई तुकडीत जायची वेळ आली तर मग विचारायलाच नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिन्मय-तन्मयला सुट्टीच त्या दिवशी!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो , हा प्रकार अनुभवला आहे।
त्या वर्गात गणिताच्या तासाला उभेच राहिलो. राहावे लागले. म्हणजे त्या बाईंनी गणिताची पद्धत चांगलीच active पढवली होती. बाई गणित घालणार/प्रश्न विचारणार, उत्तर काढता आलं तरच खाली बसायचं. तर आमच्या तुकडीतून आलेली मुले उभीच. मग थट्टा झाली. एवढं कळलं की आम्ही रवंथ करत गणित शिकत होतो तसं दुसऱ्या तुकडीत नव्हतं.
हल्ली नोकरीसाठी अब्जेक्टीव टेस्ट घेतात त्याची ती सुरुवात असावी.
एखादा कागद, चलन, डॉक्युमेंट हातात आलं की अति जलद चूक/संदिग्ध गोष्ट लक्षात येते का हे तपासतात.

बाकी ते पर्चेस( आणि सिविल) डिपार्टमेंट हे फार होल्ली असतं. तिकडे कुणाला पाठवणार नैत. मोठ्या मालक मंडळींची प्यादीच तिकडे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0