पांच
तप्त अशा या कुंद दुपारी
शैथिल्याची दाट सावली
फिरून घेतो झोके पंखा
माशी फिरते गूं गूं करूनी
अशक्त कण्हती किलबिल किरणे
भिंतीवरती सरपटताना
घामट ओले उदास वास्तव
प्रकाशसुद्धा अशक्त ओला.
शेवाळ्याची बीभत्स वस्ती!
बुरशीला शेजार कुणाचा?
तडयात फिरते सूक्ष्म वाळवी
मुंग्यांचा सहवास फुकाचा.
अशा खपटचुक वातावरणी
एकच आहे पाल पांढरी
भिंतीवरची ट्यूब लागता
फ्लिकर होऊनी जाते पळुनि
जमिनीवरती असंख्य कपडे
धुळीत पडले इकडे तिकडे
चपला,बूट अन कितीक मोजे
टाय,कोट अन बिल्ले-सल्ले
भूक लागता मॅगी खावी
तहानही बिसलेरी घाऊक
स्वयंपाक हा शब्द शोधला-
डिक्शनरीतही नसेल ठाऊक
१६ पेले १७ जागी
शंभर ताटे दाटीवाटी
भ्रष्ट बाटल्या उघड्या पडल्या-
पिझ्झा दिसतो जागोजागी
स्क्रीन पाहता खेचून घेती
सुंदर सुरेख ललना मादक,
इंटरनेटी मुशाफिरी ही
करती इकडे पुरी रात्रभर
भुरी मांजरी येऊन जाऊन
पलंगावरी खुशाल नाचे
आवारा अनिकेत अशी मग
मित्रमंडळी मागे मागे
असल्या ह्या घनचक्कर जागी
राहण्यास जे होती राजी
राजीखुशीने वसती तेथे
बॅचलर तयां दुनिया म्हणते!
.
* शीर्षक रेफरन्स्
प्रतिक्रिया
जबरी जमलिये राव!!!
जबरी जमलिये राव!!!
१६ पेले १७ जागी
हिशेब
एखादा फुटला असेल.
होते कधीकधी - व्हायचेच! - असल्या प्रसंगी नि ठिकाणी.
पिजनहोल
गणितातल्या पिजनहोल सिद्धांताचा व्यत्यास आहे तो! काय पण, एवढं साधंसाधंसुद्धा उलगडून लिहावं लागतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अस्वल राव !!
अस्वल राव !!
अजून हुरहूर आहे की काय ?
जमले आहे.
!
अस्वलाला सकाळीसकाळी उंदीर१ चावले बहुधा!
----------
१ मर्ढेकरांचे.
राजीखुशीने वसती तेथे
इथे वृत्तात किंचित गंडलीशी वाटतीये. ('राजिखुशीने' चालेल का? पण समजा चालवले, तरी 'बॅचलर तयां'चे काय करायचे, समजत नाही.)
इथेही 'बीभत्सा'त धडपडलीये.
पण एरवी जमलीये झकास!
मस्त
एकदम मर्ढेकरी बाज !
बादवे... (अवांतर)
... आपल्या हिंदू पालींना ट्यूबलाइटच्या उजेडाचे भय नसते काही. उलट, ट्यूबलाइटभोवती भरपूर किडे खायला मिळतात, म्हणून भर ट्यूबलाइटच्या उजेडात ठिय्या मांडतात. इतर जातींच्या पालींसारख्या अंधारात दबा धरून बसत नाहीत काही!
इथे पाहा.
>>>>> इतर जातींच्या
>>>>> इतर जातींच्या पालींसारख्या अंधारात दबा धरून बसत नाहीत काही!>>>>> बरं बाबा तुमच्या पाली गुणाच्या
.
इस में कोई शक?
ते नेहेमींचं
ती नेहेमीचं, मोठ्ठ्या अक्षरातलं ' पालींची बदनामी थांबवा' , हे जगप्रसिद्ध वाक्य कसं आलं नाही अजून?
अस्वला काय कविता केलीस!!
अस्वला काय कविता केलीस!!
दोरीवरचे लटकणारे कपडे आणि पसारा.
सगळ्या टेक्नीकल चुका पालींच्या माफ .
पांच म्हणजे काय पाचांतली
पांच म्हणजे काय पाचांतली पहिली का?
उत्तम प्रश्न!
नाही, म्हणूनच खाली रेफरन्स दिलाय हो.
अनुराग कश्यपचा पांच माझा तरी एकदम आवडता सिनेमा आहे.
कदाचित तो पाहिला तेव्हा मीही असाच बॅचलर होतो - थोडाफार नोकरी वगैरे सुरू असलेला.
त्यातली ती लूक/पाँडी/मुर्गी/जॉय ह्यांची खोली आठवली एकदम. म्हणून पांच.
.
पाच कविता वगैरे जुलूम कुठे करणार
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अरर. माझं चित्रपट ज्ञान तोकडं
अरर. माझं चित्रपट ज्ञान तोकडं आहे.
पण उरलेल्या चार येत्या काही दिवसांत लिहिल्यांत तरी ऐकायला/वाचायला तयार आहे. म्हणजे आवडेलच.
जुलूम कसला? ब्याचलरचा बेफिकिरपणा बेमालुम बसवलाय.
ऐसीवर यासाठीच येतो.
कविता छानच पण
बॅचलर इतके गचाळ राहतात!
हे जीवन सुंदर आहे..
गृहस्थही गचाळ राहतात.
गृहस्थही गचाळ राहतात.
नाही!
याहूनही गचाळ राहतात. वर्णने ऐकलीत, तर अंगावर शहारे येतील.
- (बीन देअर, डन दॅट) 'न'वी बाजू.
(बीन देअर, डन दॅट) >>>
(बीन देअर, डन दॅट) >>>
हे जीवन सुंदर आहे..
(बीन देअर, डन दॅट) >>>
(बीन देअर, डन दॅट) >>>
हे जीवन सुंदर आहे..
>>>>याहूनही गचाळ राहतात.
>>>>याहूनही गचाळ राहतात. वर्णने ऐकलीत, तर अंगावर शहारे येतील.>>> मुलीही (अस्मादिक) अपवाद नाही. हॉस्टेलवरती
होला.
धन्यवाद सामो,अचरटबाबा, उज्ज्वला!
@मन्या - "गचाळ"?? ह्याला तुम्ही गचाळ म्हणता? तुमच्याच शब्दांत म्हणायचं तर - "हे जीवन सुंदर आहे ..."
@अबापट - काय बोलावं? those were the best days of my life!
@न.बा- तुम्ही चक्क कविता आवडली असं म्हणालात? सगळं ठीक?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
...
नाही हो! वय झाले आता. (पाहा ना! म्हातारचळ लागलाय. कवितासुद्धा वाचू लागलो म्हणजे... ) काय करणार? चालायचेच.
म्हातारे?
म्हातारे म्हणू नका. नाहीतर लोक तुमची माझ्यासारख्या थेरड्यांत गणना करायचे.