बखर....कोरोनाची (भाग ६)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---

आज क्रांती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काही केल्या मास्क घालत नव्हते, पण अखेर त्यांनी मास्क घालून दर्शन दिले आहे.

Trump Wears Mask!

Donald Trump finally wears mask in public

field_vote: 
0
No votes yet

बसच्या ड्रायव्हरने नियमावर बोट ठेवून प्रवाशाला मास्क घालायला सांगितले म्हणून दक्षिण फ्रान्समध्ये एका बस ड्रायव्हरची हत्या झाली आहे.
French bus driver dies following attack by passengers who refused to wear masks

आज ड्रायव्हरला पाठिंबा म्हणून हजारो लोकांनी मोर्चात भाग घेतला -
Thousands march for French bus driver who died after attack by passengers over face masks

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

oh...:(

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

दक्षिण अमेरिकेत काही प्रमाणात आलेली आर्थिक प्रगती करोनामुळे थांबली आहे आणि सामाजिक घडी किती भयावह पध्दतीनं मोडली आहे हे सांगणारा एक लेख -
In Latin America, the Pandemic Threatens Equality Like Never Before

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डॉ. रणदीप गुलेरिया हे AIIMSचे संचालक आहेत. त्यांच्याकडून आलेली माहिती अंमळ भीतीदायक आहे, कारण त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार व्हायरस केवळ श्वसनमार्गावरच घाला घालत नाही (आतापर्यंत तसं सांगितलं जात होतं), तर रक्तात गुठळ्या होऊन मरणाऱ्या लोकांची संख्याही बरीच आहे. कदाचित मेंदूज्वरामुळे किंवा इतर कारणांमुळे मेंदूलाही धोका संभवतो, वगैरे.

New insights on Covid, key learnings from managing it

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Florida Smashes U.S. State Record Of Daily New Cases: More Than 15,200

फ्लोरिडा राज्यात एका दिवसातल्या केसेसचा उच्चांक आहे - १५०००+. तुलना म्हणून, न्यूयॉर्क शहरात (पर्यायानं राज्यात) कोव्हिड थैमान घालत होता तेव्हा दिवसाचा उच्चांक ११०००+ होता. फ्लोरिडा हा देश असता तर रुग्णांच्या संख्येत जगात चौथा आला असता - यू.एस, ब्राझिल, भारत आणि चौथा फ्लोरिडा.

मात्र राज्यपाल अजूनही मास्कची सक्ती करायला तयार नाहीत. टेक्सासच्या राज्यपालांना बुद्धी सुचली आहे. गेल्याच आठवड्यात मास्क-सक्ती सुरू झाली. आम्हांला इंग्लिश आणि स्पॅनिश दोन्ही भाषांतून एसेमेस आले; चार दिवस आधी सांगितलं मास्कची सक्ती कधीपासून आहे ते. मास्क नसेल तर २५० डॉलर दंडही आहे.

आणि उदारमतवादी माध्यमांमध्ये सतत चर्चा आहे की मध्यवर्ती नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे अजूनही कोव्हिड आटोक्यात आलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता भाज्या विकणे बंद करून तेरा दिवस झाले,आणखी सहा दिवस बाकी. कधी विक्री होणारा भाग बंद तर कधी ज्या भागातून भाजी येते तो नगर, जुन्नर ,शहापूर, कर्जत भाग बंद असा मारा आहे. छोट्या पिकअप मधून काही जण माल आणतात तेवढीच आवक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानी संस्कृतीत असं काही तरी आहे का, ज्यामुळे त्यांना कोव्हिडला तोंड देणं अधिक सोपं जात असेल? गिरीश शहाणे यांचा लेख -
Why we can't emulate Japan in our fight against covid-19

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऑक्सफर्ड आणि इतरांच्या लस शोधण्याच्या प्रयत्नांचा आढावा (भारताचे नावही यात नाही) -
Oxford coronavirus vaccine: Does it work? And what happens next?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबतच टायप करून लस निर्माण करण्याची तयारी केलेली आहे. लस शोधण्याचं मुख्य काम ऑक्सफर्डच करणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करणार नाही हो, केले आहे म्हणा भटोबा.(त्याला काही महिने होऊन गेले)
आता त्याच्या ट्रायल्स चालू आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेखर गुप्ता सांगतोय. ज्या स्विस शास्त्रज्ञाच्या लेखावर हे आधारित आहे तो लेख -

Coronavirus: Why everyone was wrong (The immune response to the virus is stronger than everyone thought) - Beda M Stadler

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे खरडफळ्यावर टंकण्यासाठी सुरुवात केली. मग लक्षात आलं, इथे लिहिलं नाही तर अबापट चिडतील.

(संदर्भ - अमेरिकेतल्या जॉर्जियाच्या राज्यपालानं हुकूम काढला की जॉर्जिया राज्यातल्या शहरांना मास्क-सक्तीचे हुकूम काढता येणार नाहीत. स्वतः मास्क-सक्ती केलेली नाहीच.)

कधी नव्हे ते मला ग्रेग ॲबटबद्दल दोन बरे शब्द बोलता येतील. (संदर्भ - जॉर्जिया आणि टेक्सास ह्या दोन्ही राज्यांत, ट्रंपच्या, रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे.)

ॲबट टेक्सासचा राज्यपाल. ह्यानं दोनेक आठवड्यांपूर्वी फतवा काढून मास्क-सक्ती केली. तीही गंमतच आहे असं म्हणायची वेळ आली. गेल्या विकेण्डला न-मॅनेजर पोर्ट अरान्सासला गेला होता - उन्हाळ्याची सुट्टी, समुद्रकिनारा, बीच आणि गाडी चालवत ४-५ तासांवरच आहे. तिथे म्हणे, करोना ही लिबरल कन्स्पिरसी आहे, अशी हवा होती. गाड्यांवर असले झेंडे. लिबटार्ड वगैरे शब्द. हे दोघं नवरा-बायको चिंतेत आठ वर्षांच्या मुलाला काय दाखवायचं आणि त्याच्यापासून काय लपवायचं. पाच दिवसांजागी दोन दिवसांत, सुट्टी घरीच घालवण्यासाठी परत आले.

त्याचे शब्द - Port Aransas is an epicentre of calling corona virus as a libetard conspiracy!

मग मी विचारलं, अरे पण राज्यपालाचा हुकूम आहे वगैरे.
तर म्हणे, हुकूमाची अंमलबजावणी कुणी केलीच नाही तर काय घेणार!
मीही काय म्हणणार? मी भारतातच लहानाची मोठी झाल्ये!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुस्की चोरांनी म्हणे करोनाची लस चोरायचा प्रयत्न केलाय.
Coronavirus: Russian spies target Covid-19 vaccine research

ह्याबद्दल ट्रंपतात्या काही म्हणतात का, म्हणाले तर काय म्हणतात बघायचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता कळलं ना कुठून येणार त्यांची लस! भारतानं धडे गिरवले पाहिजेत त्यांचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथून पुढे टाळेबंदी करावी का? टाळेबंदीने होणारा फायदा आणि होणारे नुकसान याचा ताळेबंद कुणी मांडला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कोविड : आता लॉकडाउनपेक्षा लोकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यावर भर द्यायला हवा.
https://www.aksharnama.com/client/article_detail/4423

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे उद्दिष्ट म्हणून चांगलं आहे पण हे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत जो प्रसार होईल त्याचं काय करावं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विजय घोषित करण्यात आला आहे.

https://twitter.com/drharshvardhan/status/1283754911566450688?ref_src=tw...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुसऱ्या धाग्यावर प्रतिसाद दिला पण इथे पाहिजे हे लक्षात आलं.
अगदी जवळचे उदाहरण आहे.

बायकोचे एक नातेवाइक भाऊवहिनीला झाला आहे. ( ८० आणि ७३ )
मार्चपासून भाउंना घराबाहेर जायचे नाही असा वहिनीचा सज्जड दम होता.
जवळच्याच दुकानातून ,भाजीवाल्याकडून खरेदीसाठी वहीनी बाहेर पडत असे.
वहिनीला पंधरा दिवसांपूर्वी खोकला आणि दम लागू लागला होता.
जवळच्याच मनपा हॉस्पिटलांत एक्सरे वगैरे काढून नक्की झाले. भाऊंनाही आहे हे तपासणीत समजले आहे.
"घरातच राहा, हॉस्पीटलात जागा नाही." सांगितले. मनपा डॉक्टर घरी येऊन बी कॉम्प्लेक्स देऊन गेले. नेहमीच्या डॉक्टरने प्रोटिनेक्स पावडर आणि सूप घ्यायला सांगितले आहे.

आता दोघांशी फोनवर बोलतो. विडिओ कॉल नको सांगितले.

म्हातारपणी आजारपण, मुले जवळ असूनही सेवा ,मदत न करता येणे याचे फार दु:ख वाटते.
मुलगी गावातच आहेत. ती,जावई डबा देतात. दारातच डबा ठेवून येतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"राया तुम्ही गप्प घरात बसा" जनजागृती करणारी कोरोना स्पेशल लावणी (सौजन्य : श्री. विनय गुप्ते, कोल्हापूर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एमआयटी विद्यापीठातील काही संशोधकांच्या मॉडेलनुसार लस किंवा औषध उपलब्ध न झाल्यास भारतात २०२१मध्ये रोज २.८७लाख नवे कोव्हिड रुग्ण आढळू लागतील -
India may become worst-hit, record 2.87 lakh Covid cases daily by 2021: MIT study

मूळ पेपर इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छे हो, इतक्या टेस्टच नाही होणार

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छे हो, इतक्या टेस्टच नाही होणार

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

|| तात्या कृपा ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्राझीलशी आपण एकास एक तुलना केली तर दैनिक शिखर 3.71 लाख येते. इतक्या टेस्ट होणार नाहीत हे खरे. (ब्राझीलचा दैनिक ग्रस्तांचा ग्राफ समतल होत आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

https://www.bbc.com/news/world-asia-india-53485039 च्या या बातमीनुसार दिल्लीत केलेल्या सॅम्पल सर्वे अनुसार चारातील एक जण कोव्हिड होऊन बरा झाला आहे.
याचा अर्थ असा घ्यावा का?
1. पॉझिटिव केसेस ५० ते ६० लाख
2. 99% asymptomatic
3. नगण्य मृत्युदर
4 इतका लॉकडाऊन अनावश्यक होता

या हिशोबाने हा रोग साध्या फ्ल्यू पेक्षा किती भयानक ठरतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका अँगलने ५० ते ६० लाख बाधित असणे म्हणाजेच आपल्या टेस्टच्या कक्षात ते आले नाहीत आणि त्यांनी प्रसार केला असाही अर्थ होतो.

नगण्य मृत्यूदर हे मान्य होऊ शकते.

लॉक डाऊनचा फायदा झाला नाही असे म्हणाता येईल. लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच मायग्रंट कामगारांना परत जाऊ दिले असते तर इतर राज्यातील प्रसार कमी होऊ शकला असता. त्यांना जायची परवानगी मिळाली ती विषाणू पुरेसा पसरल्यावर. त्यातले अनेक लोक बाधित पण लक्षणरहित/ (अजून लक्षणे विकसित न झालेले) असतील आणि ते मोठ्या प्रमाणात विषाणू घेऊन गेले असतील. (हे दिल्लीतल्या सर्व्हेशी संबंधित नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिल्ली मेट्रोपोलिटन एरियाची लोकसंख्या तीन कोटीहुन थोडी जास्त आहे आणि हा निष्कर्ष काढताना फक्त 21000 टेस्ट केल्या आहेत.
रबर किती ताणले आहे लक्षात येतंय ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२१००० ही संख्या सॅम्पलिंगच्या तत्त्वांनुसार कमी वाटते का?

पण दिल्लीतल्या सेरोलॉजिकल टेस्टचा डेटा देशातल्या आर टी पी सी आर टेस्टने मिळालेल्या डबलिंग रेटला जोडून २० कोटी लोक बाधित झाले असावेत हे म्हणणे योग्य नाही हे मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकवीस हजार हा आकडा छोटा नाही.परंतु त्याचे देश तर सोडाच, नुसते मेट्रोपोलिटन दिल्ली (3 कोटी लोकसंख्या) ला extraपोलेशन वावगे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसभा निवडणुक निकालांचे अंदाज करताना सॅम्पल साईज काय असतो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकवीस हजार हा आकडा छोटा नाही.परंतु त्याचे देश तर सोडाच, नुसते मेट्रोपोलिटन दिल्ली (3 कोटी लोकसंख्या) ला extraपोलेशन वावगे वाटते.

सर्व्हे मंकी ह्या सर्व्हे साइटवर एक सँपल साईझ कॅलक्युलेटर आहे. त्यात हे आकडे टाकले : लोकसंख्या : ३ कोटी, कॉन्फिडन्स लेव्हल : ९५% (डीफॉल्ट), एरर मार्जिन : ०.६६% तेव्हा सँपल साइझ आला : २१,८८७.
डिस्क्लेमर : मी या विषयातला जाणकार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते जरा स्पष्ट शब्दांमध्ये 'विषद ' करून सांगाल काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते जरा स्पष्ट शब्दांमध्ये 'विषद ' करून सांगाल काय ?

मी त्या विषयातला तज्ज्ञ नाही, परंतु स्टॅटिस्टिक्समध्ये सँपल साईझ कसा ठरवायचा त्याचं काही एक गणित असतं. उदा. इथे पाहा. तुमच्या लोकसंख्येचं स्वरूप काय आहे, कितपत एरर मार्जिन अपेक्षित आहे वगैरे गोष्टींवरनं सँपल साईझ किती असायला हवा याचा हिशेब करता येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संख्याशास्त्रात असेलही कदाचित हा नियम.
आणि माणसे कुठली कडधान्ये खातात किंवा कुठल्या पक्षाला मत देतात इत्यादी सर्व्हे करिता ते ठिकही असू शकेल.
परंतु (अजूनही)ज्या व्हायरसच्या सर्व बाबींचा पूर्ण अभ्यास झाला नाहीये* ,आणि ज्याची महासाथ (किमान भारतात तरी) आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाहीये , आणि जिथे आटोक्यात आली ती नक्की का आटोक्यात आलीय याचा नक्की शास्त्रीय उलगडा होत नाहीये ,अशा काळात वैद्यकीय महितीबाबत या संख्याशास्त्रीय ठोकताळ्यांवर विसंबून निष्कर्ष काढणे हे अशास्त्रीयच नव्हे तर धोकादायक आहे असे वैयक्तिक मत.

* ही टिमकी मी अजून चार महिने तरी वाजवणार आहे , कारण तोपर्यंत ती खरी असण्याची शक्यता जास्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय सर्व्हे सँपलमध्ये डेमोग्राफी, आर्थिक क्षमता/उत्पन्न, सामजिक स्तर, प्रगत वैद्यकीय सेवांची उपलब्धता (ॲक्सेस) इत्यादी गोष्टींना वेटेज दिलं आहे का आणि असल्यास कसं दिलं आहे वगैरे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेही सर्व्हेच्या निष्कर्षांत फरक पडू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय सर्व्हे सँपलमध्ये डेमोग्राफी, आर्थिक क्षमता/उत्पन्न, सामजिक स्तर, प्रगत वैद्यकीय सेवांची उपलब्धता (ॲक्सेस) इत्यादी गोष्टींना वेटेज दिलं आहे का आणि असल्यास कसं दिलं आहे वगैरे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेही सर्व्हेच्या निष्कर्षांत फरक पडू शकेल.

तुमचा मुद्दा बरोबरच आहे, मात्र हे सगळं नीटपणे करून सर्व्हे केला असेल तरीही अबापट यांना त्याविषयी आक्षेपच असेल असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आक्षेप असेल या आक्षेपबद्दल श्री चिंतातुर जंतू यांच्याशी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापट तुम्ही संख्याशस्त्रावर संशय* घेऊ लागलात.

*संशय सर्व गोष्टींवर घ्यावाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटलं होतं आता जंतू आणि बापटांची जुंपेल. मी म्हणणार होते, मला बोलवा भांडणाला. मी दोघांनाही जाहीर आणि मोठ्यानं उत्तेजन देईन. कुणालाही डावी-उजवी वागणूक देणार नाही!

मेलं आमचं नशीबच फुटकं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अबापट नको तेवढे सभ्य निघाले.

(जंतूंबद्दल कल्पना नाही.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जंतूला सभ्य म्हणाले तर आमची जुंपेल बहुतेक! प्रयत्न करून पाहते!!

कसा ते तू असा सभ्य, जंतू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फारा वर्षांची ओळख आहे म्हणे तुमची .
श्री जंतूंशी भांडणे शक्य नसते हे तुम्हाला अजूनही माहीत नाही ?
अहो, मी तर एकदा श्री अरुण जोशी आणि श्री जंतू यांचा एका टेबलावर बसून चर्चेचा सामना ठरवला होता.
समोरासमोर बसून 'तात्विक' चर्चा करूनही अरुण जोशी आणि जन्तु हे भांडण होऊ शकले नाही .मी आणि श्रीयुत मन हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अर्थात आय विटनेस होतो.
हा सामना होऊ शकला नाही तर माझा सामना होईल असे स्वप्न का पडले बुआ तुम्हाला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैद्यकीय दृष्ट्या तुमचे म्हणणे बरोबर असेलही पण माझ्या प्रतिक्रियेचा फ़ोकस अर्थव्यवस्थेवर जास्त होता.

इतकी सारी बंधने आपल्या सारख्या गरीब देशाला परवडणारी आहेत का हा मला असलेला पहिला प्रश्न. अपुरे इनपुट ््स असताना चांगले निर्णय कसे घ्यावेत याबद्दल काही ठोकताळे असतात का हा दुसरा प्रश्न?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या ह्या विषयावत तपशिलात लिहिण्याची माझी पत नाही; पण काही महिन्यांत ह्या गोष्टी आत्मसात करण्याची संधी मिळेलसं दिसतंय.

फक्त मोठमोठे शब्द वापरायचे तर 'बेझियन मॉडेल्स' बनवतात; त्यात सुरुवातीला काही गृहितकं धरतात. दिसणाऱ्या निरीक्षणांनुसार, विदेनुसार ती गृहितकं बदलतात; त्यातून ती गृहितकं न राहता, ते परिस्थितीचं वर्णन ठरायला लागतं. ती मॉडेलं बनवतानाही, समजा सुरुवातीला एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्या परिस्थितीवर होतो हे माहीत नसेल तर पुढे ते वाढवतात आणि मागचं मॉडेल रद्द करतात. ही मॉडेलं मॉड्युलर बनवण्याकडे लोकांचा कल असतो; म्हणजे बऱ्याच लोकांना बारक्या तुकड्यांवर एकाच वेळी काम करता येतं; आणि ते एकत्र जोडता येतं.

सध्याच्या परिस्थितीत व्यवसायावर किती, कसा परिणाम होईल ह्यांचं भवितव्य वर्तवणंही कठीण झालं आहे. ॲमेझॉनसारख्या छोट्या वस्तूंची मोठी उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना ही अडचण कमी जाणवत असणार. पण आमच्या कंपनीसारख्या, मोठ्या वस्तू छोट्या प्रमाणात विकणाऱ्यांना ही अडचण जास्त आहे. कारण साधारण मार्चपासून कोव्हिडचा परिणाम दिसायला लागला आणि पुरेशी विदा गोळा झालेली नाही. मग आहे त्या विदेतून मार्ग काढण्याचं 'जुगाडू' कसब असणारे (माझ्यासारखे) आणि संख्याशास्त्रात पदवी मिळवलेले लोक एकत्र काम करून ह्या प्रकारची भाकितं करत आहेत.

सर्वसाधारणपणे ब्रिटिश-अमेरिकी विद्यापीठांमधून आलेले निष्कर्ष बघितलेत तर ते आतापर्यंत योग्य असल्याचं दिसलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यू झीलंडमध्ये विनामास्क आणि विना सोशल डिस्टन्सिंग लोकांना रग्बीचा सामना पाहायला परवानगी दिली आणि २०,००० लोकांनी सामना पाहिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतात येवू नका सध्या पण निदान आशिया मध्ये तरी या

श्रीलंका,पाकिस्तान,बांगलादेश,भूतान,चीन ह्या देशात काय covid19 नी धुमाकूळ घातला आहे त्याची नोंद घ्या.
युरोप ,अमेरिका स्वतः ची काळजी घेण्यास सक्षम आहेत.
बांगलादेश मधील 60 percent लोकांमध्ये अतिप्राचीन मानवाचं जीन्स आहे त्या मुळे ते बाधित होवू शकत नाहीत असा पण निष्कर्ष आहे.
पण तुम्ही यूरोप सोडल्या नंतरच च लक्ष जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

>>श्रीलंका,पाकिस्तान,बांगलादेश,भूतान,चीन ह्या देशात काय covid19 नी धुमाकूळ घातला आहे त्याची नोंद घ्या.

ठीक आहे. ते नसतील येत भारतात तर तुम्ही रहा भारतात. नुसतीच अशी पिंक टाकण्यापेक्षा काय धुमाकूळ घातलाय त्याबद्दल दोन वाक्य लिहा.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साठ टक्के लोकांमध्ये अतिप्राचीन मानवाचे जीन्स आहेत म्हणजे काय ?
आणि ही माहिती आपण कुठून जाणून घेतलीत हे सांगू शकाल का ?
,पहिल्यांदाच ऐकलं असं काही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केळं आणि आपली ५०% गुणसूत्रं समान असतात म्हणे. मग अतिप्राचीन मानवांनी काय घोडी मारल्येत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संख्याशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखं आधारित शास्त्र असावं.
कारण -१) प्रथम काही आडाखे आणि गृहितकं आ्णि साम्पल्स घ्यावी लागतात.
मग २) ती खरी धरून पुढची गणित़ं करतात.
मग ३) निष्कर्ष.

क्रमांक (१) चुकल्यास पुढचे ढासळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>संख्याशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखं आधारित शास्त्र असावं.

अज्याबात नाय. एखाद्या माहितीच्या लहान संचावरून मोठ्या संचाबद्दल निष्कर्ष काढणे (विथ अ डीग्री ऑफ कॉनफिडन्स) हाच तर या शास्त्राचा मुख्य हेतू आहे.

>>१) प्रथम काही आडाखे आणि गृहितकं आ्णि साम्पल्स घ्यावी लागतात.
गृहीतकं प्रत्येके वेळेला लागतातच असे नाही. सँपल्स मात्र लागतातच. हे मात्र खरं की सॅम्पल सेट गंडला की निष्कर्षही गंडलेलेचे येतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बटबटीतपणे सांगायचं तर बेजियन पद्धतीत गृहितकं, अद्ययावत करणं वगैरे प्रकार असतात. Likelihood method does not.

ह्या दोन्ही सांख्यिकी पद्धती ठोस गणिती पायावर उभ्या आहेत. निरीक्षणं, आकडेवारी नसली तरीही समीकरणं असतातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला काय म्हणायचय ते मांडता आलं नाही. सांख्यिकी पद्धती ठोस गणिती पायावर उभ्या आहेत. याबाबत विरोध नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांख्यिकी वैज्ञानिक आहे आणि ज्योतिष नाही. एवढा बारका फरक वगळता बाकीचं सगळं सारखं असू शकतं. त्याचंही गणित सांख्यिकी वापरून मांडता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साबण म्हणजे सोडियमचा तेलाशी संबंध होऊन तयार झालेला लगदा. तो पाण्याचे आणि तेलाचे कण दोघांनाही धरू शकतो आणि मळ सोडवतो.
आता साबण विकायचा तर कोणता वास आणि कोणता रंग कोणत्या भागातल्या लोकांना कोणत्या नावाने भुलवेल हे गृहितक जमलं की साम्पल सेट गोळा करून खप वाढवता येतो.
( जाहिरातीत कोणत्या कपड्यातील कोणत्या वयोगटातील कलाकार लागतील हा आणखी एक पैलू.)
???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व्हिएतनामला चांगलंच यश मिळालं होतं (आतापर्यंत ४०० केसेस आणि एकही मृत्यू नाही). मात्र, अनेक महिन्यांनंतर अचानक चार नवे रुग्ण आढळल्यामुळे त्यांनी एक शहर सील केलं आहे आणि बाहेरून तिथे आलेल्या तब्बल ८०,००० लोकांना शहरातून परत धाडलं आहे (आपापल्या गावी ते १४ दिवस क्वारंटाईन होतील बहुतेक). सविस्तर बातमी -
Vietnam alarm after first cases in months

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Submitted by शरद गाडगीळ on गुरुवार, 30/07/2020 - 12:23.
काल आमच्याकडे इमारतीत सर्वांना तपासण्यात आले.
( आक्सीमिटर आणि कपाळाचे तापमान.) जे लोक कामावर जातात - बँकवगैरे त्यांना हाइड्रोक्सिक्विनोलीनच्या दहा गोळ्या दिल्या.
" काय झालं?"
"तळमजल्यावर एकाला झाला म्हणून पाहायला आलो. पण त्या घरातल्या तिघांचे आता रीडिंग ठीक आहे।"
-------
आज त्यांना विचारलं. ( घरात तिशीचा तरुण, त्याची बायको आणि मुलगा तीन वर्षांचा. बापाला झालाय)
"कधी कुणाला झालाय करोना?"
"साधारण १५ जुलैनंतर थोडा खोकला होता. ताप आल्यावर मुलुंडच्या एका खासगी ल्याबशी संफर्क केला. २७ तारखेला सोमवारी इथे डोंबिवलीत घरी येऊन साम्पल्स नेली. तीन हजार रुपये घेतले. बुधवारी स्थानिक डिपार्टमेंटला निरोप गेला की अमुक ठिकाणी बाधित आहे. तिथले लोक काल इमारतीत सर्वांची तपासणी करायला आले."

"कशामुळे झाला असेल?"
"मुंबईत कुठे आठवड्यात एकदा ओला ट्याक्सीने जात होता. "
"त्यास एका खोलीत ठेवले आहे."

.
-----------------
त्याचा इलेक्ट्रिक वायरिंग कॉन्ट्रॅक्ट धंदा आहे. सध्या बंद आहे.
बंदिस्त ट्याक्सी संसर्गाला कारण होत असावी का?

---------------
घराच्या दरवाजावर काही पाटी/ सूचना लावलेली नाही.
Submitted by शरद गाडगीळ on गुरुवार, 30/07/2020 - 12:23.
________________________________
गेटाला फलक लावला संध्याकाळी. करोनाक्षेत्र. बांबू लावले.
आता फवारणी केलीय जिन्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बंदिस्त फक्त टॅक्सीच नाही , मोकळी हवा नसलेली कुठलीही जागा (एसी ऑफिसेस पण) अशा ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता नेहमीच जास्त असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोकळी हवा नसलेली कुठलीही जागा (एसी ऑफिसेस पण) अशा ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता नेहमीच जास्त असते.

म्हणजे बँकानी कस्टमरना दारसेवा द्यायला हवी. रांग रस्त्यावरच. दारातच एका कर्मचार्याने काम आत नेऊन करून आणून बाहेर द्यायचे.
----------------------------
यावरून आठवलं -- एचडिएफसीने परळ दामोदर हॉल येथे हौझींग लोन ओफिस उघडलं होतं (८४-'८५ ) तेव्हा कस्टमरांनी रिसेप्शन एअरियातच बसायचं. आतमधून ओफिसर येणार, तुमचे पेपर्स आत नेणार आणि काम करून बाहेर आणून देणार. ( तृतिय चतुर्थ श्रेणी कर्मचारींना फाटा दिलेला हे अवांतर.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँगमध्ये पुन्हा नव्या केसेस सापडू लागल्या आहेत -
Australia sees record daily case rise as global infections pass 17m

झिम्बाब्वेमध्ये पीपीई किट्स आणि इतर सामग्रीच्या अपुऱ्या पुरवठ्याविरोधात नर्सेस संपावर आहेत. त्यामुळे हरारेच्या मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये काल रात्रीत सात अर्भकं जन्माआधीच मृत झाली.
Coronavirus: Seven Zimbabwe babies stillborn in one night at hospital

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जानेवारी महिन्यात डायमंड प्रिन्सेस हे जहाज आणि त्यावरचा कोव्हिडप्रसार गाजला होता. महिन्याभरात जहाजावर ७०० रुग्ण आढळले होते. आता शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करून निष्कर्ष प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. ऑफिस-शाळा आणि इतर बंद जागांत व्हायरस कसा पसरतो ह्याविषयी त्यातून सखोल माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
Aboard the Diamond Princess, a Case Study in Aerosol Transmission

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोनाविरोधात लस शोधून काढण्यात जग गुंतलेलं आहे. त्याविषयीच्या काही ठळक घडामोडी -

निवडणुकीच्या आधी लस बाजारात यावी यासाठी ट्रम्प धडपड आणि कदाचित तडजोडी करतो आहे?
Scientists Worry About Political Influence Over Coronavirus Vaccine Project

रशियामध्येही (पुरेशी पारदर्शकता न दाखवता आणि पुरेशा चाचण्या न घेताच) लसीकरण लवकरच सुरू होणार असे दावे केले जात आहेत -
Russia Sets Mass Vaccination for October After Shortened Trial

दरम्यान, भारतात सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीसाठी फेज-२ आणि फेज-३ क्लिनिकल ट्रायल्ससाठी परवानगी मिळाली आहे
DCGI nod to Serum Institute of India for phase 2 and 3 human clinical trials of Oxford vaccine candidate

आज न्यू यॉर्क टाइम्सनेदेखील पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटची दखल घेतली आहे -
Indian Billionaires Bet Big on Head Start in Coronavirus Vaccine Race

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क्षयामुळे जगभरात १५ लाख लोक दर वर्षी मरतात. सध्याच्या कोरोना महासाथीमुळे सगळीकडच्या आरोग्यसेवेचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. अशा काळात क्षय, मलेरिया आणि एड्सकडे दुर्लक्ष होत आहे. उदा. जगभरातले २७% क्षयरुग्ण भारतीय असतात. मात्र ह्या वर्षी भारतातल्या रुग्णांचं निदान ७५% कमी झालं आहे, कारण निदान करण्यासाठी रुग्ण येत नाहीत किंवा ते येऊ शकत नाहीत.
‘The Biggest Monster’ Is Spreading. And It’s Not the Coronavirus.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल भारतात ८१० मृत्यू आणि ५०,६२९ कोव्हिड रुग्ण सापडले. या बाबतीत काल आपला जगात पहिला नंबर होता.
Why won't India admit how Covid-19 is spreading?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात अधिक आहे, पण अधिकृतरीत्या कमी दाखवली जाते आहे असं अनेक लोक म्हणतायत, पण म्हणजे ती नक्की किती असावी यावर बांधलेले काही अंदाज आणि त्यांचं विश्लेषण -
From COVID19 pandemic to epidemic of spurious analysis

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला साखर कारखान्यांनी प्रतिसाद दिला आहे. साखर कारखानदारांनी तातडीने १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांच्या माध्यमातून आगामी काळात २,३०० करोना रुग्णांची सोय होणार आहे.
पवारांचे आवाहन; साखर कारखान्यांनी पहिल्यांदाच घेतला 'हा' मोठा निर्णय!
कोल्हापूर: साखर कारखाने सुरु करणार कोविड केंद्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमच्या शाळेच्या फेसबुक समूहावर (अर्थातच) मोदी गुणगान सुरू झालेलं आहे. त्यात एक दावा असाही होता की कोव्हिड वॉर्ड रिकामे आहेत. (शिवाय कुठल्यातरी रँडम नास्तिक माणसाच्या भिंतीवरचे ईद मुबारकचे स्क्रीनशॉट आणून, कोव्हिडमुळे त्याच्या मृत्यूची इच्छा करणं वगैरेही होतं.)

आणि आता तुम्ही हे असं काही म्हणत आहात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुण्यातील १८०० लोकांचा सीरो सर्व्हे येऊ घातलाय...
Results of Pune’s first sero survey to be out next week

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आजच्या लोकसत्तामध्ये निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या प्लेगच्या साथीतल्या आठवणी आल्या आहेत -
साथीच्या वस्तीतली स्मरणचित्रे

त्यातला हा भाग रोचक वाटला. हे काय असावं?

प्लेगच्या लशीबरोबरच ‘शिजलेला मांसरस थोडासा शरीरात घालावा लागतो’ अशी नोंद करून त्यालाही आपला विरोध नाही, फक्त सक्तीला आहे, असे टिळकांनी म्हटले आहे. मांसरस शरीरात लसीबरोबर घालणे ही गोष्ट कदाचित आजच्या प्लाझ्मा थेरपीची पूर्वज असावी. ते अर्थात तज्ज्ञच सांगू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निवृत्त न्यायाधीशांना सगळ्या/कुठल्याही विषयातील माहिती असणे आवश्यक नाही.
त्यांनी माहीत नसलेल्या विषयावर का मतप्रदर्शन करावे ? असे म्हंटलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो का या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारताने ५०,००० मृत्यू आणि २५ लाख बाधितांचा आकडा गाठलेला आहे. (स्रोत : वर्ल्डोमीटर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोरोना येता दारी..... (कोथरूडमधील एका सोसायटीतून साभार...)
ही फक्त मनुष्य स्वभावाची निरीक्षणे आहेत, चांगले वाईट लेबल कोणावर लावायचे नाहीये. लोकांचा इन ऑल रुग्ण असलेल्या घराकडे पाहायचा दृष्टिकोन इतकेच या निरीक्षणांचे महत्व.

तर. ..संध्याकाळी सोसायटीत एकानी फोन करून त्यांच्या घरची बातमी दिली - त्यांची पत्नी पॉझिटिव्ह निघाली. (त्यांच्याकडे आणि आमच्याकडे एकच बाई काम करतात. )
संध्याकाळी त्यांनी बिल्डिंग ग्रुपवर हा मेसेज टाकला, अँड hell broke लूज.
बिल्डिंग ग्रुपमध्ये तरी सगळ्यांनी सपोर्टीव्ह मेसेज टाकले, पण प्रत्येकाचे डिफेन्स मेकॅनिझम काम करायला लागले.

बिल्डिंगमधली एक लहान मुलगी माझ्या घरी खेळायला आली होती , तिला तडक घरी बोलावण्यात आले, कारण रुग्णाची आणि आमची बाई एकच आहे.

बायकांच्या ग्रुप वर बायकोला आडून आडून "ती" बाई बंद करायच्या सूचना देऊन झाल्या.
एका दुसऱ्या उत्साही महिलेने, बाई-२ (जी आमची आणि त्यांची कॉमन आहे) तिला पण सुट्टी देऊन टाकली असे सांगून टाकले.
बाई-२चा घरी फोन, त्या वहिनींनी सुट्टी दिली, तुमच्याकडे यायचं का? विचारायला.

आपली बिल्डिंग सेफ आहे, गणपती साठी बिल्डिंगमध्ये सगळ्यांकडे जायला काही हरकत नाही असे म्हणून वहिन्यांनी केलेले सगळे प्लॅन ढासळले. आता नो गणपती hopping.

काल संध्याकाळी रुग्णाचा मुलगा आणि त्याचा ग्रुप गच्चीवर भेटला होता, त्या मुलांच्या आया टेन्शनमध्ये.

आमच्या ३ बिल्डिंग एका कम्पाउंडमध्ये आहेत, आठवड्यातून एकदा एक भाजीवाला टेम्पो घेऊन येतो, तो दिवस आजचा होता. आमच्या बिल्डिंगीत रुग्ण "सापडल्याची" बातमी दुसऱ्या बिल्डींगीत पोहोचल्यावर त्यांनी या भाजी सेशनला येणार नाही म्हणून कळवले.
ज्या बिल्डिंगच्या समोर टेम्पो उभा राहतो त्यांनी , हवे तर तुमच्या बिल्डिंगसमोर उभा करा टेम्पो, आमच्या बिल्डिंगसमोर गर्दी नको असा स्टँड घेतला.

आज सोसायटी सॅनिटाइझ करायला वेंडर येऊन कोटेशन देऊन गेला. त्याच्याशी बोलल्यावर हा सगळा दिखाऊ प्रकार आहे हे जाणवले.

त्यांचा माणूस गच्चीपासून खालपर्यंत ते सोल्युशन स्प्रे करत येणार. त्याने आत्तापर्यंत असलेले (असलेच तर) इन्फेक्शन जाईल, पण मोलकरणी, ड्रायव्हर्स इतर लोक यांची फ्री ये जा चालू असताना या सॅनिटायझेशनचा कितपत इफेक्ट राहणार? (नॉर्मल केस मध्ये १० तास राहतो म्हणाला तो माणूस)
शेवटी लोकाग्रहास्तव त्या माणसाला रविवारी बोलावलंय.

कोरोनाच्या सरत्या काळात ( आणि रुग्ण सगळी प्रोसेस सिरिअसली फॉलो करणारा माणूस असताना) लोक इतकी दहशत घेतायत की peak एप्रिल मे मध्ये लोक शॉक मध्येच जात असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणपती hopping.

Biggrin
हा शब्दप्रयोग आवडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगवान टेस्टिंग करता यावं म्हणून काही इस्राएली शास्त्रज्ञ वेगळं अल्गॉरिदम वापरून पाहत आहेत -
For Quick Coronavirus Testing, Israel Turns to a Clever Algorithm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गणपतीसाठी कोकणात गावी गेलेल्या व्यक्तीकडून -
इ-पास काढला, स्वतःची गाडी घेऊन गावी गेलो. गावी गेल्यावर इ-पास दाखवला, पोलीस ठाण्यात, ग्रामपंचायतीत रजिस्टरमध्ये नोंदणी झाली. त्यांनी १४ दिवस क्वारंटाईन व्हायला सांगितलं. गावातल्या घरी आम्ही घरातच आहोत, आमच्या सगळ्या गरजा घरात भागतात. फक्त गणपती आणण्यापुरते बाहेर जाऊन आलो. पण गावातले ओळखीचे लोक भेटायला येतात, देवदर्शनाला येतात. त्यांना घरात घ्यायचं नाही असं करून चालणार नाही, त्यामुळे क्वारंटाईन असून नसल्यासारखं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे अमेरिकेतल्या 'स्वातंत्र्यप्रेमीं'नी वाचलं तर त्यांचं म्हणणं पडणार - म्हणजे आम्ही येडे!

अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये लोकांनी निदर्शनं चालवली होती, आम्हांला नोकरी करण्याचा, मास्क न लावण्याचा अधिकार पाहिजे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करोना कोळीगीत
साभार : व्हॉट्सॲप

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मस्तच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

ऐ वैवै हा चीनमधला विख्यात कलाकार विविध माध्यमांत काम करतो. सध्या सरकारविरोधामुळे त्याला चीनबाहेर राहणं भाग पडलं आहे, पण त्याची जोडीदार मूळची वुहानची आहे, त्यामुळे वुहानमध्ये काय चालू आहे याविषयी त्याला कुतूहल होतं. दुरून लोकांना मार्गदर्शन / दिग्दर्शन करून त्यानं वुहानमधल्या परिस्थितीविषयी एक माहितीपट तयार केला आहे. त्याबद्दल -

From Ai Weiwei, a Portrait of Wuhan’s Draconian Covid Lockdown

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'टाइम'मध्ये आलेला हा लेख मोठ्या प्रमाणात पुण्यातली उदाहरणं आणि फोटो वापरतो -
How the Pandemic Is Reshaping India

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कसबा गणपती पुण्यातील मानाचा पहिला गणपती असतो. या करोनाग्रस्त गणेशोत्सवात मांडवापुढे शुकशुकाट आहे.
Kasba Ganpati during Coronavirus shutdown

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. जादवपूर विद्यापीठातील शिक्षकांनी एका दिवसाचा पगार देऊन विद्यार्थ्यांच्या मोबाइल, डेटा पॅकसाठी पैसे जमवले. त्यामुळे सुमारे ८०० गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होता येईल. सर्वेक्षण करून, विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन ६०० शिक्षकांनी मिळून १० लाख रुपयांची वर्गणी काढली. सप्टेंबरमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू होतील.
२. दुसऱ्या एका शिक्षणसंस्थेत एका शिक्षकाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती व सुनावणी सुरू होती. लॉकडाउनमुळे शिक्षणसंस्था बन्द झाल्या तेव्हा सुनावणी बंद पडली ती बंदच, तक्रारदार विद्यार्थ्यांपैकी अनेक पास होऊन बाहेर पडले. शिक्षक आनंदात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सायकलिंग जगातली विख्यात तूर द फ्रान्स ही स्पर्धा मुळात २७ जूनला चालू होणार होती. करोनाव्हायरसमुळे ती पुढे ढकलली गेली आणि आता उद्यापासून सुरू होईल. संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक टीमला विलग करून ठेवले आहे आणि अर्थात त्यांच्या नियमित चाचण्याही केल्या जात आहेत. प्रसारमाध्यमं आणि प्रेक्षकांवरही निर्बंध आहेत. अधिक माहिती -
Tour de France 2020: How does the Tour avoid Covid-19?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतात रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक

भारतात गुरुवारी रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक नोंदविण्यात आला. देशात गेल्या २४ तासांमध्ये ७५,७६० रुग्ण आढळले. जगात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या अमेरिकेच्या एका दिवसातील रुग्णवाढीपेक्षा ही संख्या अधिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माध्यमांना या आकड्यांचं इतकं का पडलंय हे काही कळत नाही. एकतर या वाढीच्या आकड्यांना काडीचाही अर्थ उरलेला नाही आणि आणि उरलाच आहे तर फक्त मृत्यूच्या आकड्यांना. मृत्यूदरही फसवा आहे त्यामुळे "इतके" मेले इतकंच काय ते खरं आहे.
मार्च एप्रिल मध्ये 100 रुग्ण झाले तरी लोक कानाला हात लावीत.
आता कुणी इतके लाख रुग्ण झाले, इतके मेले असं ओरडायला लागलं की पुढचं चॅनेल लावतात.
-----

सासूबाईंना मदत म्हणून एक "हिरा" नावाची मोलकरीण येते. तिला सगळे एका डोळ्याची हीरा असंच म्हणतात. दोन दिवस न सांगता रजा घेऊन परवा ती घरी आली आणि सांबर मसाला घेऊन गेली. का तर दोनेक दिवस तिला ताप आलेला, तोंडाची चव गेलेली आणि चार पायऱ्या चढताना सुद्धा तिला दम लागत होता. लक्षणांवरून तिला दोन आठवडे घरी आराम करायला सांगितले तर ती तिच्या बहिणीकडे जवळच्या गावी गेली. ती सध्या ठणठणीत आहे. तिच्या घरच्यांनाही "पडसं" येऊन तेही ठणठणीत आहेत. आणि सासूबाई मात्र घरात मास्क घालून फिरत आहेत!! टेस्टिंग नाही, उपचार नाहीत, कोणतेही विलगीकरण नाही असे कित्येक रुग्ण एव्हाना धडघडीत बरे झाले असतील. पण कौन्ट कोण करतो?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

माध्यमांना या आकड्यांचं इतकं का पडलंय हे काही कळत नाही. एकतर या वाढीच्या आकड्यांना काडीचाही अर्थ उरलेला नाही

नक्की मुद्दा समजला नाही. आताच्या परिस्थितीत करोना झाला तर कुणाला वैद्यकीय मदतीची गरज भासेल आणि कुणाला नाही, हे आधीपासून सांगता येत नाही. ज्यांना मदत लागते त्यांचे हाल कुत्रं खात नाही अशी परिस्थिती आहे. माझ्या परिचयातील चार व्यक्तींचे आतापावेतो निधन झाले आहे. त्याशिवाय तीन व्यक्तींना वैद्यकीय मदत लागली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. प्रत्येकाला जागा मिळण्यासाठी धडपड करावी लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

testing असंच चालू राहिलं तर जगातील सगळ्यात जास्त रुग्णसंख्या भारताचीच असणार आहे. आणि या बातमीतली जी रुग्णवाढ आहे ती तर या पूर्वीच कधीतरी येऊन गेलेली आहे आणि या बातमीला कसलेच मूल्य नाही. इंटरनेटवरून, सरकारकडून आकडे घ्यायचे आणि नुसत्या रुग्णवाढीच्या बातम्या द्यायच्या (हे लोकसत्तेला उद्देशून आहे). संध्याकाळी "या इथे हे झाले आणि इथे इतके मेले" असल्या याग्रस्त बातम्या टाकायच्या. लोकसत्ताच्या पुणे विभागात कोणत्या हॉस्पिटलात किती बेड आहेत, कुठे कुठे उपचार मिळू शकतात, किती पेशंट क्रिटिकल आहेत, किती जण खाऊन पिऊन सुखी आहेत, एकूण व्हेंटिलेटर किती आहेत, ऍम्ब्युलन्स कुठे आहेत, किती आहेत, त्यांचे नंबर काय असली माहिती तासातासाला बरी अपडेट होत नाही.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हं, म्हणजे तुमचा cynicism सगळ्यांना आपलासा करावा आणि आपल्या परिचयातल्या, ओळखीच्या लोकांच्या आरोग्याची चिंताही करू नये? का बुवा? मला परवडतं माझ्या परिचित, मित्र-मैत्रिणींच्या, नातेेवाईकांच्या आरोग्याची काळजी करणं!

ज्यांना इतरांची, स्वतःची काळजी नाही त्यांनी समाजापासून लांबच राहिलेलं बरं. ह्या लोकांमुळे इतरांना उपद्रव नको व्हायला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी लोकसत्तेच्या रोजच्या आकड्यांवर आणि बातम्यांवर उखडलो आहे. ते रोज फेकले जाणारे आकडे निरर्थक आहेत हे मी माझ्या परिचयातल्या एका untested कोरोनाग्रस्ताचं एक उदाहरण देऊन सांगितलं. कुणी कुणाची चिंता करावी आणि करू नये याबद्दल मी काहीही बोललेलो नाही. उगाच वडाची साल वांग्याला लावू नकोस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अगदी लक्षणेसुद्धा न जाणवणे इथपासून झटपट मृत्यू इथपर्यंत अत्यंत बेभरवशाची "आऊटकम रेंज" असल्याने आणि अगदी सौम्य लक्षणे होऊन बरे झालेल्या लोकांतही लॉन्ग टर्म हानी (फुप्फुसे, हृदय इत्यादि सिस्टम्सना) याबद्दल पुढे येणारी निरीक्षणे यांमुळे हा आजार घातक बनला आहे.

आदमी छे, गोली तीन, क्लिक- बचगया साला, क्लिक- ये भी बचगया अशा टाईपचं आहे. ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ताच घडलेली घटना. स्थळ : केडगाव, पुणे
वर्कशॉप मध्ये संध्याकाळी एक क्रूजर आली. ड्रॉयव्हर पाणी घ्यायला उतरला. ओळखीचे गृहस्थ होते. त्यांनी मला एक श्री xxxx हॉस्पिटल चे एक प्रिस्क्रिप्शन दिले. ते त्यांच्या 65 वर्षांच्या आईचे होते. त्यावर दहाएक औषधं/गोळ्या होती/होते.
त्यांनी विचारलं हे kovid 19 काय लिहिलं आहे? त्यावर kovid 19 negative असं स्पष्ट लिहिलं होतं. त्यांनी सांगितले की त्या हॉस्पिटलने नुमोनियाचे उपचार केलेले होते. झालं असं होतं कि काल रात्री दीड वाजता त्याच हॉस्पिटल मध्ये गृहस्थाच्या 70 वर्षीय वडिलांचा न्यूमोनिया ने मृत्यू झालेला होता म्हणून त्याने तिथेच ऍडमिट असलेल्या आईला रुबीमध्ये हलवलं होतं. आणि नुकतंच तिला तिथे ऍडमिट करून तो घरी जाता जाता वर्कशॉप वरती आलेला होता.

रडत रडत तो त्याची धावपळ सांगत होता. त्याचे सांत्वन करून त्याला धाडून दिले.

थोड्यावेळापूर्वी म्हणजे तो गेल्यानंतर दोनेक तासांनी त्याची आई निवर्तल्याची बातमी कळली.

थोडक्यात कळलेली सगळी कथा : आई वडील दोघेही मधुमेही होते. जावई मुंबईला PSI आहे. त्याला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच या मृत्यांच्या मुलीला कोरोनाबाधा झाली. मुलीवर जीव असणारे आईवडील मुंबईला त्यांच्या भेटीला गेले. तिकडून आल्यावर तेही लगेच आजारी पडले. साताठ दिवस अंगावर काढून शेवटी श्री. xxxx हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. तिथे न्यूमोनियाचे त्यांचे उपचार सुरु असताना काल वडिलांचा मृत्यू झाला. बिथरलेल्या मुलाने आईला रुबीला आज दुपारी दाखल केले आणि ती ही संध्याकाळी गेली.

श्री xxxx हॉस्पिटल मध्ये बरेच लोक "न्यूमोनिया" साठी उपचार घेत आहेत. कारण लोकांना 14 दिवसांचे quranatine, कोविडग्रस्त म्हणून समाजापासून आणि कुटुंबापासून "विलग" व्हायचे नाही, शिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये होणारी "हेळसांड"सुद्धा टाळायची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

करोना लोकगीत
साभार : व्हॉट्सॲप

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोविड काळात रस्त्याने जाताना वा दुकानांत, दुकानासमोरच्या रांगा यातील माणसांच्या मास्क बद्दल :
बहुतेक लोक मास्क लावतात, पण कित्येकांच्या नाकावरुन तो अर्धवट वा पूर्णपणे खाली सरकलेला असतो. नाकाची भोके अर्धवट दिसत असतील तर त्या मास्कचा काय फायदा ?
तसेच, मोबाईलवर बोलणारी तरुण पिढी, सर्रास मास्क हनुवटीवर सरकवून मोठ्यांदा बोलत असते. खोकला आला तर मास्क खाली करुन खोकतात.
दवाखान्याच्या वेटिंग रुममध्ये आलेले ज्येष्ठ नागरिक, मास्क बाजूला करुन रुमालाने सर्व चेहेरा, डोळे पुसतात आणि मग मास्क पूर्ववत चढवून, समोरच्या व्यक्तीकडे संशयाने पहात रहातात.
ही निरीक्षणे पुण्यातील आहेत हे सांगायला नकोच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील प्रतिसाद इथे द्यावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0