सद्गुरूवाचोनी सापडली सोय

बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !

मात्र अता सद्गुरू म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास

झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे

काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)

अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमची शालजोडी भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काम-वेगाचे गणित सोडविताना शालजोडीचे काय काम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता छान आहे. चांगली जमलीये. (ऑल्दो, एकदोन ठिकाणी वृत्तात गंडल्यासारखी - एखाद्या मात्रेचा हिशेब कमी पडल्यासारखी - वाटली, परंतु तो दोष तुलनेने मामुली आहे.) मजा आली.

काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?

इथे 'कशी'पेक्षासुद्धा 'कशा' जास्त फिट्ट बसेल काय?

(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)

अध्यात्माच्याच का नक्की?

की ही सारी गुरूमंडळी अध्यात्माच्याच शिखरावर बसण्याच्या लायकीची होती (पक्षी: आणखी कसल्याही शिखरावर बसण्याच्या लायकीची नव्हती), असे काही सुचवायचे आहे?

(एखाद्या मराठी माध्यमाच्या सदाशिवपेठी शाळेत शिकलात काय तुम्ही? मग, आय डोंट ब्लेम यू. (बीन देअर, डन दॅट.))

अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

हात् साला! झोपताना जवळ घेऊन घेऊन कोणाला घेता, तर रजनीशांच्या ग्रंथांना? (निरुपाय! नाम तयाचे बापू?) मग व्यर्थ तुमची उपासना!

आणि, झोपताना उशाखाली ठेवण्यासाठी इतर खूप चांगल्या गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय?

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचली, त्यांना छान वाटली, मजा आली? काय वाचतोय काय? कालाय तस्मै नम:

अध्यात्म व कामवेग यांचं झेंगट लावून ते जगभर पापिलवार करणार्‍या आद्य सं क रा चार्य ओशो गुर्जींशिवाय अशा आध्यात्मिक पेचात आम्ही इतर कोणाच्या ग्रंथांवर का बरे विसंबावे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा 'काम' आणि 'रजनीश' - चांगली दुक्कल जमवलीये Smile
ही कविता खासच आहे. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

Smile

अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

रजनीशांना सोडून सोडा, वात्स्यायन आणि अनंगरंग ह्यांनी ह्या "विषया"त उत्तम "काम" करून ठेवलं आहे...
भारतीय संस्कृती ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉट शुअर वात्सायन अध्यात्माशी निगडीत नाव असेल. अनंगरंग माहीत नाही मला.
पण समाधीतक हे फक्त रजनीशांनीच लिहून ठेवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

रजनीशांनी फक्त त्यांच्या स्टाईलने प्रवचने दिली आहेत, परंतु ज्ञानाचे मूळ स्रोत त्याचे आपलेच पूर्वज होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

यालाच म्हणतात आठरावी चाल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.