एकरूपएकजीव

ये डोळ्यांत
रहायला
खुशाल
स्वप्नं होऊन

त्वचेला बिलग
कर सलग
रक्तात
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन
बिनऔषधी
मेंदूवरच्या
आठ्या
होऊन वाढ
नाकगुहेत
कर वास

जिभेच्या
पेशींमध्ये
विर्घळ

होऊ दे
इंद्रियमर्यादांचा
ठणाणा

आकार कर
आकारहीन

फास तोंडाला
रंग

दे विशाल रंगमंच
दे भूमिका
डायरेक्टरा

करेन सगळ्या
होऊन एकरूपएकजीव
- प्रणव

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

All the world's a stage,
And all the men and women merely players

ही उक्ती सत्य असेल तर मेकप करण्याची प्रक्रिया काय असेल याचा आढावा. आपली इंद्रियं कुठे संपतात आणि भूमिका कुठे सुरू होते हा प्रश्न विचारणारी.

अजून असंच लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळीच कविता. पण कवीला हवी तितकी भावना व्यक्त होत नसावी असे वाटते. पण होण्याची आवश्यकता आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.

काही ओळी इतक्या लहान झाल्या आहेत, की वाचायला कठिण जाते. उदा :

हो व्हायरस
कर
इन्फेक्शन
बिनऔषधी

हे असे वाचले :

हो व्हायरस
कर इन्फेक्शन
बिनऔषधी

तेव्हा वाचायला जमले.
...
येथील श्लेष थोडासा नावडला.

नाकगुहेत
कर वास

...

पण एकूण छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्यांचे आभार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये डोळ्यांत
रहायला
खुशाल
स्वप्नं होऊन....
अप्रतिम !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुई

छान. कोलटकरी प्रभाव जाणवण्याइतपत. कवी कविता करतो आहे हे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0