सुशांत

नव्हते जेव्हा पाहत कुणिही
रडलो होतो

झगमगताना पायतळीच्या अंधारी
अवघडलो होतो

बेमालुमसा प्रतिमेमागे
दडलो होतो

उजेड नाकारून अंधारा
भिडलो होतो

श्रेयस प्रेयस तुंबळात
सापडलो होतो

रुजताना उन्मळलो
आतून किडलो होतो?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हम्म्म!!! किडलो पेक्षा पोखरलो होतो हा शब्द आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0