सवय

सवय एखाद्याला बाबारे तु जसा आहेस तसाच रहा! अस म्हणुन आपण स्विकारतो(?) त्या माणसाला आपल्या आयुष्यात..
मग तो मनुष्य कोणीही का असेना. आई-वडिल,भाऊ/बहीण, नवरा-बायको अगदी कोणीही!
पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस?
विचार केल्यानंतर देखील मला मिळालेली उत्तरे. मला स्वतःलाच पटत नाहीत.
पहिलं उत्तर सवय!
जुनी लोक म्हणतात " जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही." पण हे खरं मानलं तर
शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा! तो कसा खोटा ठरवावा?
जाऊदे. मरुदेत.. तो सवयीचा विचार करता करता "माझी अतिविचार करायची." सवय मला परत लागायची..

-दिप्ती भगत
१४ मे,२०२०

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एखाद्याच्या सवयीचा आपण उपयोग करून घेत असतो. तो उपयोग कामाचा राहिला नाही की खटकते. गरज सरते.
रानात एकटा राहाणाऱ्यास कुत्रा सोबत म्हणून आवडत असतो. तोच गावात माणसांत आला की "किती अंगाशी येतो हा सारखा!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा!

हे कुठल्या संदर्भात, ते कळले नाही. म्हणजे कोरोनाची साखळी जशी २१ दिवसांनी तुटते, अशी एक भाबडी समजूत, या देशाच्या पंतप्रधानांपासून सर्वांची झाली होती तसलं की आणखी काही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0